अंडरटेकर, जॉन सीना यांना बदडणाऱ्या सुप्रसिद्ध WWE रेसलर ब्रे वायटचं अकाली निधन | Bray Wyatt Death Reason | Vishaych Bhari
2012 – 13 चा काळ. आपल्या आवडत्या WWE मध्ये अंडरटेकर, ट्रिपल एच, जॉन सीना, रँडी ऑर्टन, ब्रॉक लिसनर यांसारख्या तगड्या पैलवानांची ठासायला दि शिल्ड्स नावाची नवीन टॅग टीम जॉईन झाली होती. त्या शिल्ड्मध्ये रोमन रेंग्स, डीन अंब्रॉस आणि शेथ रोलिंग्ज हे तीन रेसलर्स होते. एखाद्या मोठ्या सुपरस्टार्सची कुणासोबत फाईट झाली की हे शिल्ड्सवाले पब्लिकमधून रिंगमध्ये घुसायचे आणि त्या सुपरस्टार्स तुडव तुडव तुडवायचे. आपल्या सुपरस्टार्सला मारत्यात म्हणून पब्लिक त्यांच्यावर कांदा खाऊन असायचं. पब्लिकला वाटायचं यांची पण कुणीतरी ठासायला यायला पाहिजे. अन तेव्हा एन्ट्री झाली खुंखार अशा वायट फॅमिलीची. एरिक रोवन, लूक हार्पर अन त्यांचा म्होरक्या Bray Wyatt. वायट फॅमिलीच्या दोन खासियत होत्या. त्यातली एक म्हणजे टीमच्या प्रत्येक मेंबरला दाढी होती अन दुसरी म्हणजे वायट फॅमिली समोरच्याला वायट मारायची. आल्या आल्या त्या वायट फॅमिलीनं थेट अंडरटेकरचा भाऊ केनलाचं आपलं टार्गेट बनवलं अन नंतर त्यांनी दि शिल्ड्सचा धुरळा उडवला. तेव्हा वायट आणि शिल्ड्समधली रायव्हलरी इतकी गाजली होती की WWE च्या टी आर पी नं व्हिव्हर्सचा रेकॉर्ड मोडला होता. त्या वायट फॅमिलीतला मेन मेम्बर ब्रे वायटचं काल हार्ट अटॅकमुळं दुर्दैवी निधन झालं अन WWE वर शोककळा पसरली. अंडरटेकर नंतर ब्रे वायट एकमेव असा रेसलर होता जो त्याच्या दुश्मनांशी बेक्कार आणि अतिशय क्रूर माईन्ड गेम खेळायचा. त्याच्या कारकीर्दीवर थोडक्यात नजर टाकणारा आजचा हा लेख..

( Bray Wyatt Death Reason| Vishaych Bhari )
मंडळी ब्रे वायटचं खरं नाव होतं Windham Lwarence Rotunda. तो त्याच्या खानदानातला तिसरा रेसलिंग सुपरस्टार होता. त्याच्या आधी त्याचे आजोबा ब्लॅकजॅक मुलिगन, त्याचे वडील माईक रोटुंडा आणि त्याचे दोन काका – बॅरी आणि केंडल हे देखील WWE मध्ये व्यावसायिक रेसलिंग करायचे. त्यांच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून विंडहॅम आणि त्याचा छोटा भाऊ टेलर रोटुंडा हे देखील WWE च्या रिंगमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरले. त्याचा बारका भाऊ सध्या Bo Dallas या नावानं रिंगमध्ये उतरतो. विंडहॅम लॉरेन्स रोटुंडा उर्फ ब्रे वायटचा जन्म 23 मे 1987 रोजी ब्रूक्सविले, फ्लोरिडा इथं झाला. त्यानं साधारण 2005 सालापासून विंडहॅम रोटुंडा या ओरिजिनल नावानं त्यानं रेसलिंगला सुरुवात केली. त्याच्या आधी तो कॉलेजमध्ये काही काळ फुटबॉल ही खेळला. नामांकित फुटबॉल पट्टू म्हणून नावलौकिक ही मिळवला. त्याचा खेळ बघून तेव्हा ट्रॉय विद्यापीठानं फुटबॉल ट्रेनिंगची शिष्यवृत्ती मिळवून दिली. तो उत्तम फुटबॉलपट्टू होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा गड्यानं अचानक 360 डिग्रीत टर्न घेतला अन थेट व्यावसायिक रेसलिंगमध्ये म्हणजे WWE च्या दिशेनं प्रवास चालू केला. सुरुवातीच्या काळात त्याच्या भावासोबत टीम बनवून त्यानं FCW म्हणजे फ्लोरिडा टॅग टीम चॅम्पियनशिपमध्ये राडा घातला. ती FCW स्पर्धा WWE च्या अंडर आयोजित करण्यात येते. जसं आपल्याकडं जिल्हा लेव्हलच्या स्पर्धेतून कुस्ती खेळून पैलवान राज्य आणि देश स्तरावर पोहोचतात अगदी तशाचं स्वरूपाची ती स्पर्धा असते. त्या स्पर्धेत 2008 ते 2010 याकाळात त्यानं WWE वेगवेगळ्या कुस्ती लीगमध्ये वेगवेगळ्या नावानं रेसलिंग केली. पुढं काही काळ WWE NXT मध्ये त्यानं घालवला. पुढं 2010 ते 2012 या काळात तो दि नेक्सस ग्रुपचा मेंबर झाला आणि त्याचंकाळात त्याची ऑफिशियली WWE मध्ये एन्ट्री झाली. हस्की हॅरिस या नावानं WWE मध्ये दाखल झाला होता. त्यांच्या दि नेक्सस ग्रुपनं अंडरटेकर सोडला तर त्यावेळच्या WWE Raw आणि WWE SmackDown च्या जवळपास सगळ्या मोठ्या सुपरस्टार्सना धुतलं.
( Bray Wyatt Death Reason| Vishaych Bhari )
पण नंतर जॉन सीना आणि रँडी ऑर्टन यांनी बनवलेल्या ग्रुपनं त्या नेक्सस ग्रुपचा धुव्वा उडवला. त्यानंतर नेक्सस ग्रुप विभागला गेला अन हस्की हॅरिस उर्फ विंडहॅम लॉरेन्स रोटुंडा WWE पासून काही काळ लांब गेला. पुन्हा एका वर्षानं तो WWE NXT मध्ये नवा लुक, नवा ग्रुप आणि नवीन नावासह परतला. त्याच्या ग्रुपचं नाव होतं वायट फॅमिली अन तो त्या फॅमिलीचा म्होरक्या ब्रे वायट. यावेळी तो कुणाच्या मागे उभा नव्हता. त्याच्या जोडीला सदस्य ल्यूक हार्पर आणि एरिक रोवन हे दोन तगडे साडे सहा फुटाचे रेसलर्स होते. WWE NXT च्या कामगिरीनंतर पुन्हा त्यांची खुंखार वायट फॅमिली ही टॅग टीम WWE आली. त्यावेळी शिल्ड्सनं WWE मध्ये धिंगाणा घातला होता. त्यात भर म्हणून ब्रे वायटच्या वायट फॅमिलीची एंट्री झाली. शिल्ड्स पब्लिकमधून रिंगमध्ये घुसायची तर ब्रे ची वायट फॅमिली अंधारातून रिंगपर्यंत हातात कंदील घेऊन शांततेत यायची रेसलर्सच्या काळजात धडकी भरवायची. अंडरटेकरसारखी वायट फॅमिलीची एंट्री सुद्धा लोकांच्या कुतूहलाचा विषय झालेली. सगळ्यात पहिल्यांदा ब्रे वायटनं केनसोबत बेक्कार माईन्डगेम खेळला. रूममध्ये अघोरी रूपाचं दर्शन देणं, टॉयलेटमध्ये आरशावर रक्तानं मेसेज लिहिणे, केन गर्लफ्रेंडसोबत असताना त्याला भीती दाखवणं वगैरे वगैरे खूपचं. दोन तीनदा रिंगमध्ये केनला शिकार बनवल्यानंतर पुढं समरस्लॅममध्ये केन आणि ब्रे वायट यांच्यात भिडत झाली. त्यात ब्रेनं केनला चीतपट केलं. पुढं वायट फॅमिलीनं रोमन रेंग्सच्या शिल्ड्सच्या शिट्ट्या वाजवल्या. इतक्या की पुढं कालांतरानं शिल्ड्स तुटली अन तिन्ही सुपरस्टार्स वेगवेगळे झाले. शिल्ड्स फुटल्यानंतर वायट फॅमिलीचे मेंबर सुद्धा स्वतंत्रपणे रिंगमध्ये उतरायला लागले. दरम्यान WWE नं ब्रेच्या माईन्डगेमचं स्किल बघता त्याच्यासोबत वेगळा प्रयोग केला.

( Bray Wyatt Death Reason| Vishaych Bhari )
2018 च्या दरम्यानं WWE नं ब्रे वायटचं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरने ग्रस्त असलेलं नवीन व्हर्जन रिंगमध्ये उतरवलं. तोंडाला राक्षसाचा मास्क लावून आणि लाल पॅन्ट घालून रिंगमध्ये उतरवणारा क्रूर ब्रे वायट उर्फ दि फियेंड वेगळा आणि नॉर्मल दाढी लुकसह पांढरी पॅन्ट घालून रिंगमध्ये उतरणारा मुलांचा होस्ट मि रोजर्स वेगळा असा कायतरी सीन होता. त्या दोन्ही पात्रांनी पब्लिकचं बेक्कार मनोरंजन केलं. दरम्यानच्या काळात ब्रे वायट WWE मधल्या सगळ्या टॉपच्या रेसलर्ससोबत लढला. कुणालाचं सोडलं नाय. अगदी त्याच्या वायट फॅमिलीसोबत ही तो लढला. काही रेसलर्ससोबत हरला असला तरी बऱ्याच जणांना त्यानं अस्मान ही दाखवलं. फाईट संपवायच्या टायमिंगला त्याची उलटं होऊन हातापायावर चालण्याची अस्वलासारखी आयकॉनिक स्टाईल लोकांना जाम आवडायची. तसं चालून तो पुढच्या रेसलर्सच्या पृष्ठभागावर गार आणायचा. अन शेवटी समोरच्या प्रतिस्पर्ध्याचं डोके पकडून त्यावर एक किस करून जबड्यावर आपटण्याची सिस्टर अबीगेल स्टाईल पाहून लोकं थक्क व्हायची. कधी रिंगखालून यायचं, कधी पेटाऱ्यातून बाहेर निघायचं तर कधी पब्लिकमधून, अंडरटेकर नंतर ब्रे वायटचं एकमेव असा रेसलर होता की जो लोकांना आश्चर्यचकित करायची एकही संधी सोडायचा नाही. ब्रे वायटच्या WWE मधील एकूण कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास तो तीन वेळा WWE चॅम्पियन आणि एकदा युनिव्हर्सल चॅम्पियन झाला. दोनदा त्यानं फ्रीबर्ड नियमांतर्गत ल्यूक हार्पर आणि रॅंडी ऑर्टनसह स्मॅकडाउन टॅग टीम चॅम्पियनशिप जिंकली. तर मॅट हार्डीसह रॉ टॅग टीम चॅम्पियनशिप एकदा जिंकली.
( Bray Wyatt Death Reason| Vishaych Bhari )
जुलै 2021 मध्ये त्याचा WWE सोबतचा करार संपला आणि त्याला रिलीझ करण्यात आलं. ऑक्टोबर 2022 मध्ये तो WWE च्या एक्स्ट्रीम रुल्समध्ये परत आला एका नवीन कॅरॅक्टरसह. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यानं माउंटन ड्यू पिचवर ब्लॅक मॅचमध्ये एलए नाइटशी त्याची शेवटची फाईट खेळली. तो जिंकला त्यानंतर त्यानं रेसलमेनिया 39 मध्ये बॉबी लैश्लेलाचं सिंगल फाईटचं आव्हान दिलं. पण त्या फाईटमध्ये तो सहभागी होऊ शकला नाही कारण तेव्हापासून त्याच्या तब्येतीमध्ये सातत्यानं बिघाड होतं गेला आणि त्या भयानक आजाराशी लढत असतानाचं काल रात्री त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रिंगमध्ये भल्या भल्या पैलवानांना घाम फोडणारा ब्रे वायट आपल्या आजाराशी मात्र लढू शकला नाही. Wwe चा मुख्य चेअरमन ट्रिपल एच ने ट्वीटर हॅन्डल वरून ती बातमी जाहीर केली. ट्रिपलएच म्हणाला, WWE हॉल ऑफ फेम माईक रोटुंडा यांचा नुकताच एक कॉल आला, ज्याने आम्हाला दुःखद बातमी कळवली की आमच्या WWE कुटुंबातील आजीवन सदस्य, विंडहॅम रोटुंडा ज्याला ब्रे वायट म्हणूनही ओळखले जाते, त्याचं आज अनपेक्षितपणे निधन झालं. आमचे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने यावेळी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. कुणालाचं त्यांच्या आजारपणाविषयी कल्पना नव्हती. तो सहा महिने लढत राहिला. 19 ऑगस्टला तो चांगला होतोय अशी खबर मिळाली होती पण आज ही न्यूज आली. खूप वाईट वाटतंय. WWE साठी ब्रे नं जे योगदान दिलं ते न विसरता येण्यासारखं आहे. त्याला WWE परिवाराकडून मनस्वी श्रद्धांजली वाहतो. ट्रिपलएच सह आज प्रत्येक WWE रेसलर्सनी ब्रे वायटला श्रद्धांजली वाहिली अन एका ऑल टाईम फेव्हरेट WWE सुपरस्टार्सचा प्रवास थांबला. तुम्हाला ब्रे वायटची नेमकी कोणती फाईट लक्षातय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply