इंजिनियरिंगच्या कॉलेजला होतो. तिथं आम्हाला सिटीत राहणारा एक बोल्ड न बिंदास मित्र मिळाला. तो आम्हांला त्याकाळात किम कर्दाशियन, सनी लिऑनी, लिली कॉलीन्स, ऑलिवीया वाइल्डी, मिया खलिफा, डॅनी डॅनियल्स अशा काही आघाडीच्या हिरोईनची नावं सांगायचा. आम्ही गावात राहून मोबाईलच्या एका कांडीवर फोन लावणारी माणसं, हिरोईनची नावं ऐकून वाटायचं हॉलिवूडच्या सिनेमात काम करणाऱ्या या कुणीतरी पऱ्या असतील. पण नंतर गावात 3 जी 4 जीचं वारं वाहू लागलं अन आम्हाला साक्षात्कार झाला की समस्त मानवजातीला भुरळ घालणाऱ्या या पऱ्या पॉर्न इंडस्ट्रीच्या क्वीन्स आहेत. तशा पहिल्या भेटीत सगळ्याचं आवडल्या होत्या पण लक्षात राहिली ती मादक डोळ्यांची मिया खलिफा. आता प्रत्येकाची आवड अन त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण एक गोष्ट होती, चंचल स्वभावाच्या मियानं तेव्हा पोरांना मोकळं करून सबंध पॉर्न इंडस्ट्रीचं मार्केट जाम केलं होतं. काही काळ तर तिनं सनी लियोनीला सुद्धा trp त मागं टाकलेलं. पण नंतर अचानक मियानं त्या इंडस्ट्रीतून एक्जिट घेतली अन तिनं स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतलं. पण पॉर्न इंडस्ट्रीत तिची एंट्री आणि एक्जिट भयंकर चर्चेचा विषय ठरली. खरंतर मियाच्या बोल्ड अंदाजामागची स्टोरी लय इमोशनलय. आजच्या या Blog मध्ये आपण मियाच्या त्याचं भावनिक गुंत्याला हात घालणारे,
(miya khalifa | Vishaych Bhari)
तर मंडळी मिया खलीफाचा जन्म 10 फेब्रुवारी 1993 ला लेबनन नावाच्या अरब देशात झाला. ती 7 वर्षाची असताना तिचे कुटुंबिय अमेरिकेत स्थायिक झाले. मुलगी वयात आली की मुलांनी आपल्याकडे बघावं असं प्रत्येक मुलीला वाटत. आजकाल तर वयात येण्याआधीच म्हणजे शाळेपासूनच मुलींना हे सगळ वाटतं. पाश्चिमात्य संस्कृती, त्यात अमेरिकेसारखा देश, त्यामुळे शॉर्ट कपडे आणि हॉट ड्रेस याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. इतर मुलींप्रमाणे मियालाही मुलांनी आपल्याला अटेन्शन द्यावं असं वाटायचं. मात्र शाळेत असताना मिया अतिशय जाड होती. त्यामुळं तिला मुलांचं फारसं अटेन्शन मिळत नसायचं. पण तरीही मिया सतत हॉट आणि स्टाईलीश दिसण्यासाठी काहीतरी उपाय नेटवर शोधत असायची. तिनं काही वेबसाईट चाळल्या पण उपाय सापडत नव्हता. जाड असल्यामुळं तिला तरुण मुलांचं अटेन्शन मिळत नव्हतं. ह्ये स्वतः तिनंच एका मुलाखती दरम्यान सांगितलेलंय. दरम्यान वयाच्या 18 व्या वर्षीचं मियानं एका अमेरिकन तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर तिने अमेरिकेच्या मिया टेक्सास विद्यापिठात हिस्ट्री या विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजला जाईपर्यंत मियानं तब्बल 25 किलो वजन कमी केलं होतं. त्यामुळं ती आकर्षक आणि हॉट दिसायला लागली होती. मात्र वजन कमी झाल्यानं तिच्या छातीचा उभार ही कमी झालाय असं मियाला वाटू लागलं. त्यामुळं मियानं आणखी हॉट दिसण्यासाठी पुन्हा थोडस वजन वाढवलं. त्यावेळी तू मॉडेलिंगसाठी का ट्राय नाही करत असं तिला अनेकांनी विचारलं. अशातच 2014 मध्ये एका कॅफेमध्ये काम करत असताना पॉर्नहब नावाच्या वेबसाईटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तिला पॉर्न व्हिडिओसाठी काम करशील का असं विचारलं. त्या व्हिडिओतून मिळणारे रग्गड पैसे आणि आपल्या हॉट सौंदर्याला मिळणारं अटेन्शन यामुळं भविष्यातल्या परिणामांचा विचार न करताना मियानं पॉर्नहब वेबसाईटसोबत काम करायला होकार दिला.
(miya khalifa | Vishaych Bhari)
2014 च्या मे महिन्यात मियानं तिचा पहिला पॉर्न व्हिडिओ शूट केला. पॉर्नहब या वेबसाईसाठी तिनं एकूण 12 व्हिडिओ शूट केले. तिचा पहिला व्हिडिओ ऑक्टोबर 2014 मध्ये अपलोड करण्यात आला होता. त्यावेळी आपण पॉर्न स्टार होऊन जगभरात प्रसिद्ध होऊ, लोकं आपल्या कामाला इतकं पसंत करतील असं तिला स्वप्नात सुद्गा वाटल नव्हतं. इतर अनेक पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुलींप्रमाणे आपलेही व्हिडिओज एक डार्क सिक्रेट राहतील असं मियाला वाटलं. पण तसं झालं नाही. पॉर्नस्टार म्हणून काम करत असल्याचं मिया खलिफाच्या घरच्यांना समजलं तेव्हा त्यांनी तिच्याशी असलेले सगळे संबंध कायमचे तोडून टाकले. मियाचा तिन वर्षाचा संसार मोडला. तिच्या नवऱ्यानं ही तिला घटस्पोट दिला. हे तर काहीचं नाही. तिच्या काही पॉर्न व्हिडीओजनी तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला. कारण हिजाब घालून शूट केलेल्या पॉर्न व्हिडीओमुळे आयसिस या दहशतवादी संघटनेनं मियाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच लिबनन जमातीनं सुद्धा तिच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मिया खलिफाच्या उजव्या हाताच्या दंडावर लेबनीज रेशा असलेला एक मजकूर आहे. ज्यावर लेबनीज राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या ओळी आहेत. तिच्या हिजाबमधील व्हिडिओमुळे लेबनाॅन देशातील लोकांनी तिने आमच्या देशाची बदनामी केली असं म्हणत तिच्याविरोधात निदर्शनं केली होती. आयसिसने गुगलवरुन मियाच्या घराचे फोटो शेअरकरत तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेली मिया जवळपास 11 दिवस घर सोडून हॉटेलमध्ये राहात होती.
(miya khalifa | Vishaych Bhari)
आयसिसनं तिचं इंस्टग्राम अकाऊंटही हॅक केलं होतं. तो सगळा काळ मियासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. घडलेल्या त्या सगळ्या प्रकरानंतर आपला निर्णय आपल्यावरच उलटलाय हे मियाला कळून चुकलं. यामुळं आयुष्यभरासाठी आपलं नुकसान होणारय हे मियाला लक्षात आलं. घरच्यांनी संबंध तोडले, नवऱ्यानी घटस्फोट दिलेला असताना एकट्या पडलेल्या मियानं त्या व्हिडिओमुळे सतत येणाऱ्या धमक्यांना कंटाळून पॉर्नहब वेबसाईटसोबत काम करणं थांबवण्याचं ठरवलं. तिनं एका महिन्यात पॉर्नहब वेबसाईटला राजिनामा सादर केला. त्यावेळी पॉर्नहब वेबसाईटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी आणि सगळ्यात जास्त सर्च केली जाणारी पॉर्नस्टार म्हणून तिचं नाव वेबसाईटवर पहिल्या क्रमांकावर होतं. पॉर्नहबने तिला थांबवण्याचा त्यावेळी खूप प्रयत्न केला. त्या चर्चाच तुला आणखी प्रसिद्ध करतील, तु आणखी मोठी स्टार होशील असं तिला सांगण्यात आलं, आणखी जास्त पैश्याचीही तिला ऑफर देण्यात आली. मात्र मियानं पॉर्न इंडस्ट्रि सोडायचा निर्णय फायनल केला होता. 30 वर्षांच्या मिया खलिफानं केवळ तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं. मात्र पॉर्न इंडस्ट्री सोडून 9 वर्ष झाल्यानंतरही तिची पार्नस्टार म्हणून असलेली ओळख अजूनही कायम आहे. विकी पीडियावर पॉर्नस्टार मिया खलिफा अशी आपली ओळख पुसण्यासाठी तिनं कायदेशीररित्या प्रयत्न केले. Pornhub लाही व्हिडिओज काढून टाकण्यास सांगितले . मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
(miya khalifa | Vishaych Bhari)
आज तिचा चेहरा morf करून तिच्या नावाने अनेक फेक व्हिडिओज बाजारात आणले जातात. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर 9 वर्षांनी आजही तिला अनेक वाईट ,भयंकर प्रसंगांचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक आपल्याला वरपासून खाली अशाप्रकारे बघतात की जणू ते त्यांच्या नजरेनेच माझ्यावर बलात्कार करतात असं मला वाटतं हे मियानं एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलं होतं. कामामुळे मला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढा पैसा मिळाला नाही असं तिचं म्हणणं आहे. Pornstar म्हणून मी केवळ 12 हजार डॉलर कमवले. त्या उपर मी एक कवडीही मिळवलेली नाही असं ती म्हणते. पॉर्नस्टार म्हणून करिअरला राम राम केल्यावर दुसरी नोकरी शोधताना तिला अनेक ऑफिसेसमध्ये कामासाठी अक्षरशः नाक रगडावं लागलं. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर करोडो चाहते असलेली मिया खऱ्या आयुष्यात मात्र एकटी पडलीय. आयसीसच्या धमकीनंतर हक्कानं एखाद्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडण्यासाठी आपल्याकडे कोणीही नव्हतं असं मियानं अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हंटलय. मियानं 2021 मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र, त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. दीड-दोन वर्षामध्येच मिया आणि रॉबर्ट यांचा घटस्फोट झाला. सध्या ती झाय कॉर्टेझला डेट करतीये अशा चर्चा आहेत. मियानं झाय कॉर्टेझ सोबत एका युट्यूब व्हिडीओमध्ये काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याविषयी दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
(miya khalifa | Vishaych Bhari)
अलीकडेच हमास-इस्रयाल युद्वावर पॅलस्टाईनच्या समर्थनार्थ मिया खलीफाने पोस्ट केली. मात्र ही पोस्ट करणं तिला चांगलंच महागात पडलंय. तिला या पोस्टमुळे थेट आपली नोकरी गमवावी लागली. कॅनडामधील एका पॉडकास्टरनं मियानं पॅलेस्टाइनच्या बाजूने केलेली पोस्ट वाचून तिला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकलय. त्यामुळं सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली असून, केवळ एका पोस्टमुळे मिया खलिफाचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. मात्र या पोस्टमुळे मिया खलिफा पु्न्हा एकदा चर्चेचा विषय बनलीय. वयाच्या 21 व्या वर्षी घेतलेल्या त्या एका निर्णयामुळं मियाचं वैयक्तिक आयुष्य उद्धवस्त झालंय. घरच्यांच्या प्रेमाला ती कायमची मुकलीये असंही मिया बऱ्याचदा रडत रडत सांगते. मिया खलिफा सारख्या कित्येक मुली अशाचं पैसा नआणि प्रसिद्धीच्या अमिषाला बळी पडतात. पॉर्न वेबसाईटकडून तिच्यासारख्या अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं. एकदा का तरुणी त्या जाळ्यात अडकल्या की त्या फक्त त्यात आणखी गुरफटत जातात. बऱ्याच जणी त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतात. पण त्यांना सहजासहजी ते शक्य होत नाही. शेवटी मात्र त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे एकच टोकाचा अंतिम पर्याय उरतो. असो, पण तरीही मिया म्हणते, पॉर्न स्टार म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करेन, मी खचणार नाही. सध्या मियानं स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतलंय. मियानं गेल्या वर्षी बेरुत इथं झालेल्या स्फोटानंतर तिच्या चष्म्याचा लिलाव केला होता. त्या चष्म्याला तब्बल 73 लाख रुपयांची बोली लागली होती. ते पैसे तिनं मदत कार्यासाठी दान केले होते.
(miya khalifa | Vishaych Bhari)
त्याव्यतिरिक्त, तिनं यापूर्वी तिच्या जवळच्या संस्थांना 1 कोटी 17 लाख रुपये इतकी रक्कम दान केलीय, जी तिनं तिच्या OnlyFans खात्यातून कमावली होती. मागच्या काही काळात भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळं मिया खलिफा भारतात देखील चर्चेत आली होती. त्यावरुन भाजपा नेत्यांनी तिच्यावर टीका केली होती तर भाजप विरोधकांनी तिच्या ट्विटला पाठिंबा दिला होता. बाकी काहीही म्हणा पण मिया खलिफा आजही तिच्या करोडो फॅन्सच्या मनावर राज्य करते. पण आजवर तुम्ही जिला स्क्रीनवर हॉट आणि बोल्ड म्हणून पाहिलं त्या मियाच्या आयुष्याची ही दुसरी इमोशनल बाजू ऐकून तुम्हाला काय वाटलं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply