सरपंच ते मुख्यमंत्री, विलासरावांचा राजकीय प्रवास वाटतो तेवढा सोप्पा नव्हता | Vilasrao Deshmukh Biography | Vishaych bhari

सध्याच्या राजकारणात पुढारी एकमेकांचे लचके तोडायची वाटच बघत असतात. विचारधारा खुंटीला टांगून गुलाल तिकडं चांगभलं म्हणणाऱ्या पुढाऱ्यांच्या आसपास महापूर आलाय. पण मागच्या काही काळात महाराष्ट्रानं असे काही राजकीय नेते बघितले जे मरेपर्यंत फक्त एकाच पक्षाशी कट्टर राहिले.‌ हो मी आज बोलतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्तानंच त्यांनी सरपंचपदापासून थेट मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन केंद्रीय मंत्री पदाची शपथ कशी घेतली.‌हेच आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.‌..

( Vilasrao Deshmukh Biography in marathi | Vishaych bhari )

vilasrao deshmukh death,
vilasrao deshmukh photo,
vilasrao,
vilasrao deshmukh images,
vilasrao deshmukh jayanti,
vilasrao deshmukh death anniversary,
vilasrao deshmukh,
vilasrao deshmukh biography,
vilasrao deshmukh mahiti,
vilasrao deshmukh biography in marathi,

तर ही गोष्ट सुरू होते. २६ मे १९४५ यादिवशी.‌ कारण याच दिवशी लातूरमधील बाभूळगाव या खेड्यात विलासरावांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच राजकारणाची आवड असल्याने विलासरावांनी सगळ्यात आधी म्हणजे १९७४ ला बाभूळगावची ग्रामपंचायत ताब्यात घेतली . वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी विलासराव गावचे सरपंच झाले. गावच्या विकासकामातून त्यांनी आपली वेगळी ओळख जपली. याच आधारावर विलासराव पुढे पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्यही झाले.‌ पुढे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बॅंकेवरही विलासरावांनी आपलं नाव कोरलं.‌ पण विलासराव एवढ्यावर समाधान मानणारे नव्हते. त्यांनी १९८० साली थेट आमदारकीची निवडणूक लढवली. आणि ती जिंकलीसुद्वा. तिथूनच विलासराव देशमुख नावाचा एक झंझावात महाराष्ट्रात घुमू लागला. अगदी दोनच वर्षात बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख हे राज्यमंत्री पदी विराजमान झाले.‌ गृह,कृषी,शिक्षण अशी राज्यमंत्री पदं त्यांनी भूषवली.‌१९८६ ला मात्र त्यांच्याकडे ग्रामविकास, कृषी, उद्योग यासारखी cabinet खाती आली. विलासरावांनी पण संधीच सोनं केलं. त्यांचं महाराष्ट्रभर नाव होऊ लागलं. पण १९९५ ला विलासराव देशमुखांना पहिल्यांदा दणका बसला . आणि ते त्यावेळची विधानसभा निवडणुक हरले. शिवाजीराव कवेकर यांनी त्यांचा पराभव केला. हा काळ विलासरावांसाठी फार जिकीरीचा होता. यानंतर लगेचच राज्यात विधानपरिषदेची निवडणूक लागली. पण तेव्हा कांग्रेससकडुन पडलेला उमेदवार म्हणून विलासराव यांना साईडलाईन केलं गेलं. शरद पवार यांनी तेव्हा विलासराव यांच्याऐवजी त्यांच्या मर्जीतल्या छगन भुजबळ यांचं नाव सुचवलं. तेव्हा चिडलेल्या विलासरावांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांना त्यावेळी चक्क शिवसेनेनं साथ दिली होती. विलासरावांनी तेव्हा भुजबळांना तगडी फाईट दिली पण त्या निवडणुकीत विलासराव फक्त अर्ध्या मताने पडले.

( Vilasrao Deshmukh Biography in marathi | Vishaych bhari )

आता विधानसभा आणि विधानपरिषद या दोन ठिकाणी झालेल्या पराभवाने विलासराव संपले असंच त्यांच्या विरोधकांना तेव्हा वाटलं असेल. पण विलासरावांनी पुन्हा कंबर कसली.‌ यादरम्यान विलासरावांना शिवसेनेत या अशी ऑफर होती पण विलासरावांनी ही offer धुडकावली. आणि माझ्या रक्तातलं कांग्रेस तुम्ही कसं संपवणार? असा प्रतिसवाल केला. या काळात खचून न जाता विलासराव केंद्रीय हायकमांडच्या संपर्कात राहिले. पण याचा त्यांना फायदाच झाला. १९९९ ला ते आमदार म्हणून निवडून आले . आणि थेट पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणूनच नियूक्त केले. यानंतर विलासरावांनी राज्याच्या हिताचे अनेक एकहाती निर्णय घेतले. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या छगन भुजबळांविरोधात विलासराव लढले तेच छगन भुजबळ विलासरावांसोबत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीने आघाडीत असताना छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील,आर आर पाटील आणि पुन्हा छगन भुजबळ हे चार उपमुख्यमंत्री बदलले. पण विलासरावांनी एकट्याने मुख्यमंत्री म्हणून खिंड लढवली. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्रीही महाराष्ट्रानं पाहिली.‌ विरोधात असूनही दोस्ती कशी निभवायची हे या दोन नेत्यांनी देशाला दाखवून दिलं. म्हणून तर मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अडचणीत असताना विलासरावांनी गोपीनाथ मुंडेना मदत मागितली आणि विलासरावांविरोधातला उमेदवार मागे घेऊन गोपीनाथ मुंडेनीही तेव्हा दोस्ती निभावली.‌

( Vilasrao Deshmukh Biography in marathi | Vishaych bhari )

vilasrao deshmukh death,
vilasrao deshmukh photo,
vilasrao,
vilasrao deshmukh images,
vilasrao deshmukh jayanti,
vilasrao deshmukh death anniversary,
vilasrao deshmukh,
vilasrao deshmukh biography,
vilasrao deshmukh mahiti,
vilasrao deshmukh biography in marathi,

त्याकाळी सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना मीडियानं तर दो हंसो का जोडा असंच नाव‌ दैऊन टाकलं.‌ कांग्रेसची ही जोडी तेव्हा विशेष लोकप्रिय ठरली. विलासरावांनी वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मांड ठोकली.
पण २००८ साली झालेल्या मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र विलासरावांची कारकीर्द कोलमडली. कारण त्यानंतर लगेचच राम गोपाल वर्मा आणि रितेश देशमुख या दोघांच्या नवीन एका प्रोजेक्टला विलासरावांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असं बोललं जाऊ लागलं. या घटनेनंतर लोकांचा मोठा रोष विलासरावांना सहन करावा लागला. आणि विलासरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.‌ त्यांच्यासोबत आर आर आबाही त्यांच्या एका स्टेटमेंटमुळे अडचणीत आले आणि अशा पद्धतीने विलासराव देशमुख, राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले. पण कांग्रेसने त्यांना राज्यसभेत घेतलं शिवाय केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, ग्रामविकासही खातीही त्यांना दिली. पण २०१२ वर्ष हे त्यांच्यासाठी घातकी ठरलं.‌ राजकारणातील सततच्या धावपळीमुळे विलासरावांचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे सुरूवातीला त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल केलं गेलं. पण तिथं त्यांनी नीटसा response दिला नाही. म्हणून मग त्यांना चेन्नईच्या सुप्रसिद्ध अशा ग्लोबल hospital मध्ये admit केलं गेलं. तिथं मात्र लिव्हर आणि किडनीचा त्यांचा त्रास अधिक बळावला. पण किडनी transplant करण्याच्या आधीच विलासरावांनी चेन्नईच्या या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.‌

( Vilasrao Deshmukh Biography in marathi | Vishaych bhari )

त्यांचं निधन झालं तेव्हा ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही विलासरावांच्या निधनानंतर दुःखी झाले.‌ विलासरावांसाठी आम्ही गुजरातहून लिव्हर पाठवणार होतो पण त्यापूर्वीच ही दुर्दैवी बातमी कळाली असे तै तेव्हा म्हणाले. महाराष्ट्रात त्यादिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी बाभूळगावला जाऊन विलासरावांना आदरांजली वाहिली. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय बाभूळगावात त्यादिवशी पोहोचला होता. आपल्या आवडत्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी लोकं खूप लांबून लांबून आली होती. लातूर मधल्या एकूण एक माणसाच्या डोळ्यात त्यादिवशी पाणी होतं. तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग सुद्धा तेव्हा बाभूळगावात दाखल झाले होते.‌ ३५ वर्षाचा धगधगता लाव्हा अखेर शांत झाला होता. आज विलासरावांच्या पश्चात अमित देशमुख, धीरज देशमुख राजकारणात आहेत. रितेश देशमुख सिनेमात नाव कमावतोय. त्याची बायको जेनेलियाही सिनेमा क्षेत्रात काम करतेय. पण लातूरचं राजकारण खऱ्या अर्थाने बदलून टाकलं होतं ते विलासरावांनीच.. त्यामुळेच आजही विलासराव देशमुख हा factor लातूरमध्ये वर्क करतो. असो, महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान भूषवणार्या या नेत्याला विषयच भारी टीमकडून मानाचा सलाम.‌.‌त्यांचा हसमतमुख स्वभाव, हजरजबाबीपणा आणि त्यांची बोलण्याची लकब महाराष्ट्रातील लोकं कायम आपल्या स्मरणात ठेवतील. यात शंका नाही. बाकी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *