हिंगोलीत ताकद नेमकी कोणाची जास्तय, संतोष बांगर कि उद्धव ठाकरे | Udhhav Thackeray Hingoli Sabha | Santosh Bangar kawad Yatra
एकीकडे शरद पवार यांची परवा कोल्हापुरात सभा झाली तर दुसरीकडे काल बारामतीत अजित दादांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल. पण या दोन गोष्टीत उद्धव ठाकरेनीही महाविकास आघाडीच्या ओंजळीने पाणी न प्यायचं ठरवत थेट हिंगोलीत जाऊन आज सुमडीत जोरदार सभा घेतलीय. आता दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांचे हिंगोलीत स्वागत करू असं म्हणण्यासोबतच उद्धव ठाकरे गटाला इशाराही दिला होता. या निमित्तानेच हिंगोलीत ताकद नेमकी कोणाची जास्तय संतोष बांगर कि उद्धव ठाकरे गटाची ? हेच आपण इन डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत.

( Udhhav Thackeray Hingoli Sabha | Santosh Bangar kawad Yatra )
तर उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीतील रामलीला मैदानावर सभा पार पडली. या सभेला हिंगोलीकरानी तुफान प्रतिसाद दिला. पण या मतदारसंघात खरंच उद्धव ठाकरे यांची करंट नोटवर ताकद दिसून येतेय का ? चला पाहूयात. . खरंतर लोकसभेचा विचार करता शिंदे गटाचे हेमंत पाटील हे हिंगोलीतुन खासदार आहेत. 2019 ला ठाकरेंच्या पाठिंब्यावरच त्यांनी इलेक्शनमध्ये यश मिळवलंय पण नंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत जाताच हेमंत पाटील यांनीही टर्न घेत ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेतली. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली. पण तसं असलं तरीही हिंगोलीतील अनेक सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने राहिलेले दिसलेत. म्हणून तर जेव्हा हेमंत पाटील शिंदे गटात गेले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोलीत त्यांना जोरदार विरोध केला होता. विधानसभेचा विचार करता हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड किनवट हदगाव वसमत कळमनुरी आणि हिंगोली हे सहा मतदारसंघ येतात. यापैकी उमरखेड मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात येतो . किनवट, हदगाव नांदेड जिल्ह्यात येतो . तर बसमत, कळमनुरी, हिंगोली हे तीन मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यात येतात. उमरखेड मध्ये भाजपचे नामदेव ससाणे हे आमदार आहेत. किनवट मधून भाजपचे भीमराव केराम हे आमदार आहेत. हदगाव मधून काँग्रेसचे माधवराव पवार हे आमदार आहेत. वसमत मधून राष्ट्रवादीचे चंद्रकांत उर्फ राजूभय्या नवघरे हे आमदार आहेत. हिंगोलीतुन भाजपचे तानाजी मुटकुळे तर कळमनुरीतुन शिंदे गटाचे संतोष बांगर हे आमदार आहेत.
( Udhhav Thackeray Hingoli Sabha | Santosh Bangar kawad Yatra )
आता या लोकसभा मतदारसंघाचा विचार करता इथल्या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडलीय. शिवाय या मतदारसंघातून भाजपचे तीन, काँग्रेसचा एक राष्ट्रवादीचा एक तर शिवसेनेचा एक आमदार आहे. आता यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार महाविकास आघाडी म्हणून ठाकरेना साथ देतील पण उरलेले चार आमदार हे भाजप शिंदे आणि अजित पवार आघाडी सोबत राहू शकतील. पण भविष्याचा विचार करता शिंदे फडणवीस पवार जागावाटपात काही नाराज नेते ठाकरे गटात आले तर नवल वाटायला नको. एकूणच ठाकरेंची हिंगोलीत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ताकद दिसून येत नसली तरी सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न आणि महागाई बेरोजगारी सारख्या मुद्यावर ठाकरेंनी आज लोकांना जोरदार साद घातलीय शिवाय गद्दारांना माफी नाही अशा त्यांच्या नोट मधून त्यांनी संतोष बांगर यांनाही थेट इशारा दिलाय. या गोष्टी लोकांना आवडल्या आणि उद्या सर्वसामान्य लोक ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले तर हिंगोलीत भाजप आणि शिंदे गटाच्या सीटा नक्कीच कमी होतील. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हिंगोलीत भाजप शिंदे गट strong दिसून येत असला तरीही अजित दादा असो की शरद पवार गट दोन्ही राष्ट्रवादींची ताकद इथे तुलनेनं कमीच दिसून येते. अर्थात मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानण्यात येतो. हिंगोलीतही 1985 नंतर दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा impact राहिला आहे. गाव तिथे शाखा यावर बाळासाहेबांनी तेव्हा भर दिला होता. पण गेल्यावर्षी त्यांच्या पक्षाला अंतर्गत ब़डामुळे मोठा सेट बॅक बसला.

( Udhhav Thackeray Hingoli Sabha | Santosh Bangar kawad Yatra )
आता उद्धव ठाकरेना त्यांच्या प्रति असणारी सहानुभूती, भाजपवर लोकांचा असणारा रोष. या गोष्टी प्लस ठरू शकतील. पण जर त्यांना तिथून पक्ष म्हणून उभ राहायचं असेल तर काँग्रेसची भक्कम साथ असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हिंगोलीत तरी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत रहावंच लागेल. अर्थात राष्ट्रवादी इथं कमकुवत दिसत असली तरीही भाजप आणि शिंदे गट इथं कशाप्रकारे हिंगोलीकरांना आपलसं करतोय हे महत्त्वाचं ठरणार आहे. तरीपण महाविकास आघाडीत रहायचंही पण आपली राज्यभर स्वतंत्र ताकद दाखवून देण्याची statergy सगळेच पक्ष अवलंबताना दिसतायत . ठाकरेंनीही तोच डाव हिंगोलीत खेळत शरद पवार गट तसेच कांग्रेसला इशारा दिला आहे. सोबतच जसं शरद पवारांनी त्यांच्या हुकमी गडात जाऊन ताकद दाखवलीय तसंच तसंच ठाकरेंनी मराठवाड्यातील हा जिल्हा निवडून आपल्या मिशन मराठवाड्याला पुढं नेलं आहे. आता हिंगोलीनं मागे नेहमीच बाळासाहेबांना मदत केली आहे. त्यामुळे ठाकरेंना त्यांचं मराठवाडा मिशन नक्कीच तारू शकेल. कारण इथे शिवसेनेला मोठे केडर आहे. पण आता शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. त्यांची इथं उद्यापासून कावड यात्रा सुरू होणार आहे. पण आता हिंगोलीतील लोकं संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवतील की मग आज उद्धव ठाकरेंनी जी बांगर यांची नाव न घेता इमेज डॅमेज केलीय ती गोष्ट लक्षात ठेवतील हा प्रश्न आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय. हिंगोलीतील लोकं उद्धव ठाकरेंना साथ देतील का ? ठाकरेंचं मिशन मराठवाडा पूर्ण होईल का? आणि तुमच्या लेखी हिंगोलीत ताकद कोणाची जास्तंय, संतोष बांगर की उद्धव ठाकरेंची ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply