साऊथचे हे पाच सिनेमे, जे येणाऱ्या काळात राडा करतील | Upcoming Top 5 South Movies in 2023 | Vishaych Bhari

मंडळी मी आज ज्या एस्टीन निघालोवतो, त्या एस्टीत भयाण राडा झाला.. मला आधी वाटल एखाद्या पोरीवरन त्या पोरांच्यात भांडण लागली आसत्याली, पण मग त्यो राडा शांत झाल्यावर त्या पोरांकडन कळलं की हयो सगळा राडा सध्याला कुठला साऊथचा पिक्चर बॉलीवूडला टफ देणारय याच्यावरण झालावता.. तसच तिथं बॉलीवूड आन साऊथ आस दोन गट पडलवत… पण त्यात बी साऊथच्याचं बाजून लई जण हुती.. आसणारच म्हणा कारण मागच्या काळात साऊथच्या पिक्चरांनी नुसता धुराळा उडवून दिलाय.. बाहुबली एक – दोन, पुष्पा, आर आर आर, केजीएफ एक-दोन… कांतारा ह्या सिनेमांनी बॉलीवूडचा बाजारच उठवलावता, त्यामुळ आता साऊथचा नवीन येणारा कुठला पिक्चर धिंगाणा घालणार ह्येजीच सगळीकड चर्चाय, आन जिथ चर्चा, तिथ विषयच भारी.. म्हणूनच आम्ही तुम्हाला साऊथच्या अशा पाच सिनेमानबद्दल सांगणारय, जे येणाऱ्या काळात हवा करणारयत… चला तर मग बघूया कुठल हायत ते सिनेमे..   त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा…

Upcoming Top 5 South Movies in 2023 | Vishaych Bhari

आ आंटे आमलापुरे, ई आंटे इच्छापुरे.. गाणं असलेल्या आर्या पिक्चरने सगळ्यात पयल्यांदा महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना साऊथच्या सिनेमाची ओळख करून दिलीवती… आन त्यो पिक्चरमजी आर्या.. तवा पश्चिम महाराष्ट्रातली लोक या पिक्चरवर पाक तुटून पडत हुती.. जिकड तिकड तवा फक्त आर्याचीच चर्चा होती.. तेज्या नंतर अपरिचित बी महाराष्ट्रात निब्बार बघितला गेला, पण त्यांनंतर वातावरण शांत होत, पण मागच्या काळात परत साऊथच्या पिक्चरची जी काय लाट आली, ती काय आता थांबता थांबना… तीन सगळ्यांचाच बाजार उठवलाय. त्यांच्या स्टाईलचा, फाईटचा आणि स्टोरीचा तर वाईच बी नाद नाय करायचा… म्युझिक वर तर आपलंबी आंग आपोआप डुलतय, हिरो हेरॉईनबद्दल इचारूच नका.. नुसत बघतचं बसाव वाटतय.. आन ह्याच कारणानमूळ ही पिक्चर करोडो रुपय कमावत्यातय.. आन आता इथून पुढं येणार पिक्चर तर संगळच रेकॉर्ड मोडत्याल आस म्हंटल जातय..

आता त्यातला पहिला पिक्चरय.. पुष्पा पार्ट टू.. ( Pushpa – 2 – Allu Arjun ) 

pushpa, aalu arjun upcoming movies, pushpa 2, pushpa 2 trailer. pushpa 2 trailer review, pushpa release date

मै झुकेंगा नही साला ! हा पुष्पा मधला डायलॉग आजपण लोकांच्या तोंडावरय.. अल्लू अर्जुनची स्टाइल आन रशमिका मांदनाची स्माईल तवा लोकासनी लईच आवडलीवती.. त्याचाच आता दुसरा पार्ट येतोय..  त्याच्या पोस्टरवरण आता संगळीकड चर्चा सुरू झाल्यात.. त्यात बी आपला पुष्पा आरध्या बाईच्या आन आरध्या पुरुषाच्या वेशातय, त्यामुळं ही सगळी भानगड काय हाय ही कुणालाच कळणा झालय.. इचार करून करून लोकांच्या डोसक्याचा पाक भुगा झालाय.. त्यामुळ कधी एकदा हयो पिक्चर इतुय आन थियेटरला जाऊन बघतूय आसचं सगळ्यांना झालय.. त्यामुळ ह्यो पिक्चर बी पण पुष्पाच्या पहिल्या पार्ट सारखाचं सुपरहिट हुईल, त्याच्यापेक्षा पण जास्त पैसे कमवल, अशी चर्चा हाय…

Upcoming Top 5 South Movies in 2023 | Vishaych Bhari

ह्याज्यानंतर दूसरा पिक्चरय सालार.. ( Salaar – Prabhas )

ह्या सिनेमाच्या टीझरपासनच ह्या सिनेमान सगळीकड हवा करायला सुरवात केलीय.. केजीएफचा दिग्दर्शक प्रशांत नील आन अभिनेता प्रभास हे कॉम्बिनेशन या सिनेमाच्या माध्यमातन पडद्यावर आग लावणार आसच सगळ्यासणी वाटतय..  प्रभासचा आदिपुरुष जरी फ्लॉप ठरला आसला तरी हयो पिक्चर त्याला बाहुबली सारखी प्रसिद्धी मिळवून दिल, आस म्हंटल जातय… त्याच बरोबर दिग्दर्शक प्रशांत नील ह्यांचे आधीचे दोन सिनेमे, केजीएफ एक आणि दोन, तूफान चालले होते, त्यामुळ हा सिनेमा पण संगळीकड राडा करणार आस बोलल जातय…

त्याज्यानंतर तिसरा पिक्चरय लिओ..( Leo – Thalapathy Vijay )

leo movie, thalapthy vijay new movie,
leo release date, leo trailer review

मंडळी हा सिनेमा घेऊन येतोय आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता थलापती विजय ज्याचे वरीसू, मेरसल, सरकार, मास्टर, बिस्ट असे बरेच चित्रपट या आधी ब्लॉक बस्टर ठरलेत.. आता तो लिओ, ब्लडी स्वीट या चित्रपटातून लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणारे.. या चित्रपटात आपल्याला संजय दत्त, कमल हसन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणारय.. हा एक पावर पॅक ॲक्शन थ्रीलिंग ड्रामाय.. हा सिनेमा विजयला भारतभर ओळख मिळवून देईल आसचं म्हंटल जातय…

Upcoming Top 5 South Movies in 2023 | Vishaych Bhari

जेलर ( Jailer – Rajnikanth )

यापुढचा सिनेमाय अशा व्यक्तीचा ज्याला साउथची लोकं देव मानतात, पिक्चर येण्याआधीच त्याज्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला जातो, जो मुळचा मराठी माणूस असून साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय.. तुम्ही ओळखलच आसल मी कुनाबद्दल बोलतोय..  सुपरस्टार रजनीकांत… रजनीकांतचा सिनेमा म्हणलं की पिक्चरचं महिनाभर आधी बुकिंग सुरू होत म्हंजी होतच…. सगळ्यात जास्त कलेक्शन जमवलेल्या सिनेमांमध्ये रजनीकांतचे सिनेमे टॉपलायत.. लवकरच त्याचा जेलर ( Jailer – Rajnikanth ) हा सिनेमा येतोय.. तामिळ भाषेत असलेला हा ऍक्शन कॉमेडी सिनेमा सुद्धा थिएटरवर धुमाकूळ घालणार हे नक्की…

आता पाचवा आन सगळ्यात शेवटचा सिनेमाय कल्की.. ( Kalki – Prabhas )

kalki south movie, kalki prabhas movie,
 prabhas new movie, kalji release date,

ज्यात मोठ मोठे  सुपरस्टार्स पाक खच्चून भरलेत.. या सिनेमाचीही प्रचंड चर्चाय.. अस म्हणतात कल्की हा विष्णूचा दहावा अवतारय..असं म्हणतात की कलियुगात जेव्हा सगळीकड पाप वाढल तवा ह्या कलियुगाचा अंत करायला कल्की जन्म घेईल आन  इथ धर्मयुग स्थापन करल.. आता कल्की या सिनेमाची गोष्ट पण याच विषयाच्या भोवती फिरतेय का , हे बघायला लोक मायंदाळ उत्सुकयेत… या सिनेमांत परत  एकदा लीड रोल मध्ये प्रभासय, त्याच्या बरोबरच  अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हसन, दिशा पटाणी अशी तगडी स्टारकास्टय आहे… त्यामुळ आत्तापासणच संगळीकड या सिनेमाचा बोलबाला सुरू झालाय… हया सिनेमाच्या टिझरन लोकांना याड लावलय. हा सिनेमा पण छप्परतोड कमाई करणार आसचं सगळ्यांनाच वाटतय.. तर हे होते साऊथचे पाच सिनेमे, जे येत्या काळात रान पेटवणारयत, याच बरोबर केजीएफ 3, आरआरआर 2,  कंगुवा, मार्टिन, कॅप्टन मिलर, इंडियन २ असे बरेच साऊथचे चित्रपट आहेत, जे येणाऱ्या काळात धुरळा करतील, आता तुम्हाला यातला कुठला पिक्चर गाजल आस वाटतय आन तुम्हाला यातला कुठला पिक्चर बघायची इच्छा झालिया हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसंच तुमचा साऊथचा फेवरेट पिक्चरचं नाव पण आम्हाला कमेंट करून नक्कीसांगा. हा लेख आवडला आसल तर लाईक आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ( Upcoming Top 5 South Movies in 2023 | Vishaych Bhari )

साऊथचे हे पाच सिनेमे येत्या काळात धुरळा करणारेत | Upcoming top 5 South Movies | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *