देवेंद्र फडणवीस आणि Shinde मिळून Ajit Pawar यांची गेम करतायत का ? | Latest Marathi News | Vishaych Bhari
काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले . तर अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. आता शिंदे फडणवीस यांच्यासोबत दादा दिल्लीला गेले नाहीत. तर दुसरीकडे ते त्यांच्या गटाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. दादा आजारी असल्याचं त्यांची बाजू मांडताना काल सुनील तटकरे म्हणाले. पण हे आजारपण शारीरिक नसून राजकीय आहे असंच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणलंय. सुप्रिया सुळेंनीही याप्रकरणी अजित दादा गटावर टीका केलीय . पण आता यानिमित्तानं सध्या अजित दादा गटात चाललंय काय? या तीनही पक्षात काय धुसफुसतंय? पुढे त्याचा काय परिणाम होऊ शकतो? खरंच अजित दादा गट फुटलाय का ? अजित दादा पुन्हा शरद पवार गटाकडे परततील का? या ट्रिपल इंजिन सरकारमधून बाहेर पडतील का? पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे तेवढ्यावरच दादा खूश होतील का?चला सगळंच पाहूयात.
Devendra Fadnavis | Shinde| Ajit Pawar| Latest Marathi News | Vishaych Bhari
कालचं हे फडणवीसांचं स्टेटमेंट बघा ते म्हणतात की भाजप हाच मोठा भाऊ आहे. तसं त्यांचं हे वक्तव्य जुनंच आहे. पण तेव्हा त्यांच्या सोबत ठाकरेंची शिवसेना असायची पण आता सोबतीचे पक्ष आणि संदर्भ बदललेत. म्हणजे भाजपनं मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जास्तीच्या जागा त्यांच्याकडे असणारी मोदींची इमेज यामुळे त्यांचं जास्त जागांसाठीचं क्लेम हे तसं योग्य देखील आहे. पण हे सगळं सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित दादांना मान्य होईल का? कारण मागच्या निवडणुकीत जरी भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून आले असले तरीही
भाजप शिवसेनेच्या युतीला मागे लोकांनी मतदान केलं होतं असं एकनाथ शिंदे म्हणू शकतात. तर दुसरीकडे अजित दादा तर मागे
कांग्रेस राष्ट्रवादी या आघाडीत होते. तिथे तेच कांग्रेसला दादा म्हणजे फडणवीसांच्या भाषेत मोठा भाऊ होते. तेच आघाडीत जागा वाटपातील किंगमेकर होते पण आता त्यांनाच भाजपबरोबर जागा वाटपात घासाघीस करावी लागणार आहे. अशावेळी जागा ४८ आणि सोबतीला पक्ष ३ . ते ही मोठे पक्ष.अशावेळी गोष्टी अधिक complicated होऊ शकणार आहेत. त्यामुळेच महायुतीमध्ये अस्वस्थता आहे हे नक्कीय. परिणामी हा विषय जागावाटपाच्या विषयावर जास्त चिघळणार है नक्कीय. उदाहरणच घ्यायचं झाल्यास कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती पण
इथून अजित दादा गट उमेदवार उभा करेल की भाजप हा मोठा वादाचा विषय होऊ शकतो. तिथे सीटिंग उमेदवार म्हणून एकनाथ शिंदेही नक्कीच दावा ठोकतील. तशीच परिस्थिती ही विधानसभेला होईल जसं की इंदापूरातून अजित दादा गटाचे दत्ता मामा भरणे उभे राहतील की मग भाजपचे हर्षवर्धन पाटील. पण आता जागावाटपात अजित दादा गट आणि शिंदे गट बार्गेनिंगमध्ये मागे पडलाय . कारण हे दोन्ही पक्ष भाजपसोबत गेलेत. भाजप त्यांच्यासोबत आलं नाही. आता हेच सिद्ध करण्यासाठी फडणवीसांनी काल भाजप मोठा भाऊ असल्याचं अधोरेखित केलंय . आता जागावाटप हाच महायुतीमधील मुख्य अस्वस्थतेचा भाग आहे.पण याव्यतिरिक्त पालकमंत्री पदाच्या जबाबदारीवरूनही महायुतीत अस्वस्थता आहे. त्याच्या दोन बाजू आहेत. खरंतर अजित दादा गटातील नेत्याची ताकद कमी करण्याचाच हा डाव आहे जसं की अजित दादा हे बारामतीचै नेते आहेत मात्र त्यांना पालकमंत्री पद दिलं होतं दुसरीकडचंच . दुसरं म्हणजे याचा बदला म्हणून अजित दादा पुण्याचे पालकमंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांचं काहीही न ऐकता सुपरपाॅवर झाल्यासारखं करत होते . मध्यंतरी तर मी अर्थमंत्री पदावर किती दिवस राहतोय हे त्यांनी केलेलं स्टेटमेंट असो की अजित दादांना सोबत घेऊन भाजप कसं चुकलंय असं भाजप गोटातून आलेलं वक्तव्य दोन्ही पक्षात फाटत चाललंय असंच आता दिसू लागलं होतं.
Devendra Fadnavis | Shinde| Ajit Pawar| Latest Marathi News | Vishaych Bhari
नंबर एक म्हणजे अजित पवार भाजपमध्ये रहाणे
म्हणून तर आता शिंदे फडणवीस काल अचानक दिल्लीत गेले असं बोललं गेलं. पण यामध्ये अजित दादा आजारी होते आणि हा विषय जर राजकीय होता तर मग अजित दादा गटातील इतर नेत्यांना जसं की सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना का समाविष्ट केलं गेलं नाही हा प्रश्न आहे. कदाचित भाजप अजूनही अजित दादांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असावं. कारण ते जरी भाजपसोबत आले असले तरी मध्यंतरी प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवारांसोबत आलेला फोटो, दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके यांचं शरद पवार यांच्यासोबत स्टेज शेअर करणं या सगळ्या गोष्टी डाऊटफुल आहेत. आता त्यामुळे अजित दादांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रशन आहे. आता त्यात भरीस भर म्हणजे छगन भुजबळ यांनी ओबीसी प्रश्नावरून अजित दादांसोबत वाद घातला ही सुद्धा बातमी पुढे आली. आता याचाच एक भाग म्हणून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्याची बातमी येते. कारण इतर कोणीही उमेदवार दिला तर अजित दादा सुप्रिया सुळेंना मदत करू शकतील.सुनेत्रा पवार असल्या की तसं होणार नाही हे भाजपला पक्कं माहीतेय. याचा अर्थ भाजपचा अजित दादांवर अजूनही विश्वास नाहीये असाच होतो. आता याच्यातील एक गुंता नुकताच सुटल्याचं कळतंय म्हणजे आता अजित पवारांना अपेक्षित असणारी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपनं अजित दादांवर सोपवलीय. पण यामुळे आता चंद्रकांत पाटील यांचे पंख मात्र पद्धतशीरपणे छाटले गेल्याचं लक्षात येतंय पण आता या सगळ्याचे काय काय परिणाम होऊ शकतात. सगळ्यात पहिली शक्यता सांगितली जाते ती म्हणजे अजित दादा भाजपसोबतच राहतील आणि शिंदे गटापेक्षा आपणच भाजपच्या कसे उपयोगाचे आहोत हे दाखवून देतील. म्हणजे बघा बहुमत असूनही अजित दादांना भाजपनं सोबत घ्यायचं कारणच एकनाथ शिंदेच्यामुळे न होणारा फायदा असं आहे. उलट एकनाथ शिंदेमुळे भाजपच्या सीट्स घटतील असाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे सांगतोय. आता या अर्थानं अजित दादा सोबत आल्यामुळे त्याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो कारण अजित दादा हे संस्थानिक आणि सहकारी चळवळीशी घनिष्ठ नातं असणारे नेते आहेत. शिवाय शिंदेबद्दल जे गद्दार असं परसेप्शन तयार झालं ते अजित दादांबद्दल झालेलं दिसलं नाही. शरद पवारांनीही तसं होऊ दिलं नाही आणि एका लिमीटच्या पलीकडे अजित दादांवर टीका केली नाही. असो. पण सांगण्याचा मुद्दा हाच की जर अजित दादांना भाजपसोबत रहायचंच असेल आणि जागाही वाढवून हव्या असतील तर मग त्यांना भाजपला आपली राजकीय उपयुक्तता दाखवून द्यावी लागणार आहे. आता भाजपला से असल्यामुळे ते त्यांच्या जागा proper पदरात पाडून घेतील.अडचण शिंदे आणि अजित दादांच्या जागांची होणार आहे. त्यात कोण सरशी घेणार आणी कोणाच्या तिकीटा कापल्या जाणार हा प्रश्न आहे. आता यावरून कदाचित भाजप vs अजित दादा गट तसेच शिंदे गट विरूद्ध अजित दादा गट अशीही लढाई होऊ शकते. अजित दादांना मात्र टिकायचं असेल तर ही सगळी लढाई पार करावीच लागेल.
Devendra Fadnavis | Shinde| Ajit Pawar| Latest Marathi News | Vishaych Bhari
नंबर दोन म्हणजे शरद पवार गटात सामील होणे.
आता हा option वाटतोय तेवढा सोपा नाही. कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. नंबर एक म्हणजे शरद पवारांनी एकदा चूक झाली आता पुन्हा नाही असं म्हणत पहाटेच्या शपथविधीनंतर अजित दादांची झालेली घरवापसी अंडर लाईन केली. आता अजित दादा गटाकडून शरद पवार यांची या ना त्या मार्गाने भेट झाली. कधी ती वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झाली कधी ती राज्यसभेत प्रफुल्ल पटेल आणि दोघांची झाली कधी ती दिलीप वळसे पाटील आणि त्यांची जाहिर कार्यक्रमात झाली तर कधी ती अजित दादा आणि दोघांची कथित गुप्त बैठकीत. पण आता या सगळ्यात दोन मुख्य गोष्टी आहेत. की पहाटेच्या शपथविधीसारखंच जर शरद पवार हेच अजित दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला for असतील तर मग ते कदाचित अजित दादांचं पुन्हा स्वागत करतील. पण जर खरंच या दोघांमध्ये दुही असेल तर मग अजित दादांनी भाजपसोबत गेल्यानंतर केलेल्या जहरी टीकेचं काय? आता शरद पवार ती गोष्ट नक्कीच ध्यानात ठेवतील आणि त्याचा मोठा राजकीय फटका अजित दादांना सहन करावा लागू शकतो. म्हणजे शरद पवार आता दादांना स्वीकारतील पण नंतर हून त्यांचे पंख निश्चित छाटतील. पण अजित दादा माघारी परतल्यामुळे शरद पवारांना सध्या काही राजकीय फायदा होईल असं दिसत नाही उलट त्यांना तोटाच होईल. म्हणजे एकतर अजित दादा सोडून गेल्यामुळे शरद पवारांना जनतेतून सहानुभूती मिळालीय. ती ब्रेक होईल. दुसरं म्हणजे आता अजित दादा सोबत आले तरी हे टाईमिंग उत्तम नाही. कारण भविष्यात दोन्हीकढून अधिकचे उमेदवार जिंकून एकत्र येणं हीच ती उत्तम वेळ असेल. त्यासाठी निवडणुकीत अजित दादा आणि
शरद पवार छुपी युतीही करू शकतील . त्यामुळे आताच्या घडीला एकत्र येणे हा निर्णय दोन्ही गटांसाठी आत्मघातकी ठरू शकतो. पण अजित दादा आता लगेच माघारी फिरले तर ही शरद पवारांचीच गेम आहे या हिशोबाने पवारांची क्रेडिबिलिटी अजूनच ढासळेल. शिवाय अजित दादांनाही शरद पवारांसोबत येऊन आपली बार्गेनिंग गमवावी लागेल. शरद पवारांचं नेतृत्व आणि निर्णय मान्य करावेच लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात काम करावं लागेल. त्यामुळे ही गोष्टही तशी अवघड अशीच आहे. पण पवारांचं damage होणं भाजपच्या मात्र निश्चितच पथ्यावर पडू शकतं.
Devendra Fadnavis | Shinde| Ajit Pawar| Latest Marathi News | Vishaych Bhari
तिसरा पर्याय म्हणजे अजित दादा स्वतंत्र गट म्हणून राहतील.
आता असं करणंही वाटतं तेवढं सोपं नाही. कारण यावेळी भाजपच्या प्रत्यक्ष दबावतंत्राला अजित दादा गटाला बळी पडावं लागू शकतं . अजित दादा गटच नाही तर शिंदे गटानेही असा स्वतंत्र विचार केला तर जबर फटका बसू शकतो. पण अजित दादा पुरतं बोलायचं झाल्यास भाजपसोबत येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. शिखर बँक सहित जरंडेश्वर प्रकरणाचाही त्यांच्याकडून सतत उल्लेख होत होता. पण आता सत्तेत सोबत आल्यापासून हा सगळा फुफाटा खाली बसला आहे. तो पुन्हा डोके वर काढू शकतो.शिवाय स्वतंत्र जागा लढवल्या तर मग अजित दादा गटाचा फायदा होण्याऐवजी दोन्ही गटाचा पर्यायाने राष्ट्रवादीचा तोटाच होउ शकतो. एकूण यातून राष्ट्रवादी damage झालं तर भाजपला बाजी मारण्याचीच नामी संधी मिळू शकते आता हे झाले काही परिणामांविषयीचे राजकीय अंदाज. पण लोकसभा विधानसभेचे जागावाटप, पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या हेच या अस्वस्थतेचं प्रमुख कारण आहे. यातला पालकमंत्री पदाचा विषय आज काही अंशी निकालात निघालाय. पण यामुळे एकनाथ शिंदे गट किती खूश आहे हा चिंतनाचा विषय आहे. कारण अलीकडेच शिंदे गटाच्या अखत्यारीतील खात्यातंही अजित दादा गट कसं लक्ष घालतोय अशी शिंदे गटानं तक्रार केली होती. असो , पण आता यामुळे तिन्ही पक्षांचं जरी वरून बरं वाटत असलं तरी आतून फार काही ठीक चाललं नाही असंच दिसतंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे सरकार या चढाओढ आणि घासाघीसीमुळे कोसळू शकतं का ? अजित दादा सरकार मधून बाहेर पडू शकतात का ? ते भविष्यात नेमकी काय भूमिका घेतील? अजित दादा आणि शरद पवार यांची छुपी युती आहे का? दादा भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री होतील का? की पुण्याचं पालकमंत्रीपद भेटण्यातच ते खूश आहेत? अजित दादांच्या मनात नेमक चाललंय तरी काय? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply