शेतकऱ्याच्या पोरानं गावात राहून कशी उभारली करोडोंची कंपनी | Farmer Success Story | शेतकरी यशोगाथा | Vishaych Bhari

मंडळी आज आपण एका विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय आहे कांद्याच्या बियाण्याचा. तर मंडळी पिंपोडे बुद्रुक नावाचं सातारा जिह्यात दुष्काळी पट्ट्यातलं एक गावय.. आता इथं दुष्काळ जरी असला तरी आज या गावात अनेक संघर्षमय कहाण्या जन्माला येतायत.. म्हणजे आज इथं आकाशातन पावसाच्या धारा जरी कमी पडत असल्या तरी कर्तृत्ववान लोकांच्या घामाच्या धारा मात्र इथं जरूर पडतायत.. कारण कर्तृत्वान लोकांचा या गावात भरपूर सुकाळय.. त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिंपोडे गावातील जाधव टेलर फार्म… शून्यातून सुरुवात झालेल्या या फार्मची आज लाखो करोडोंमध्ये उलाढालंय.. कधीकाळी फक्त अंगावरच्या कपड्यावर गावात आलेल्या रामराव जाधव यांनी आज पिंपोडे गावात हा लाखो करोडो रुपयांचा बिजनेस उभा केलाय.. आता हे ऐकायला आपल्याला चांगल जरी वाटत असल तरी या मागं रामराव जाधव आणि त्यांचे चिरंजीव राहुल जाधव यांचे बेफाम कष्टयेत.. त्यामुळेच जाधव टेलर फार्मने त्यांचा परंपरागत कांदा बियाणाचा करोडो रुपये उलाढाल असलेला व्यवसाय कसा उभा केला आणि देशभरात आज या छोट्याशा गावाचा कांदा बियानात कसा डंका वाजतोय हेच आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातूनन जाणून घेणार आहोत..

( Farmer Success Story | Sheti Business Ideas | शेतकरी यशोगाथा | Vishaych Bhari )

राही सीड्स
rahee seeds,
rahi seeds,
शेतकरी यशोगाथा 
shetkari yashogatha,
farmer success story,

मंडळी रामराव बाजीराव जाधव, जाधव टेलर फार्मचे सर्वेसर्वा हे मूळचे सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी गावचे. पण 5 वी मधून शाळा सोडल्यानंतर अंगावरच्या कपड्यावर त्यांनी थेट त्यांच आजोळ असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक हे गाव गाठलं.. तिथं जाऊन सर्वात पहिल्यांदा ते टेलरिंग शिकले.. वाई, सातारा भागात टेलरिंग व्यवसाय केल्यानंतर ते पिंपोडे गावांत स्थायिक झाले.. सुरुवातीला टेलरिंग करत करत त्यांनी थोडी फार शेती खरेदी केली आणि टेलरिंग सोबत ते शेतीही करू लागले.. शेती करता करताच त्यांनी 1990 साली कांदा बियाणांचा व्यवसाय सुरु केला.. त्यांच्या पत्नी सौ. सारिका जाधव यांनी रामराव जाधव यांना या व्यवसायात पहिल्यापासूनच बहुमोल अशी साथ दिली. हळू हळू साल दरसाल शेतकर्यांकडून बियाणांची मागणी वाढत गेली.. त्यामुळं मग त्यांनी आणखी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन अजून बियाण उत्पादन वाढवल.. हळू हळू हा बियाणे विक्रीचा व्यवसाय आणखीचं वाढत गेला आणि 2020 अखेर तर 12 राज्यातील एकूण 15,000 शेतकऱ्यांना जाधव टेलर फार्म कडून बियाण पुरवलं गेलं.. अगदी पंजाब, हरियाणा, UP, MP, बिहार, बंगलोर साईडहून लोक जाधव बाबांचं बियाण घ्यायला यायचे.. हे सगळं करताना रामराव जाधव यांना त्यांचा मुलगा राहुल जाधव याचीही मदत होतं होती.. राहुल जाधव हे राहुरी कृषी विद्यापीठामधून कृषी पदवीधर आहेत.. पण राहुल जाधव यांची अशी इच्छा होती की हे असं लूज मध्ये बियाण विकण्यापेक्षा आपण ते पॅकिंग मध्ये विकायला हवं.. पण यासाठी वडिलांचा सुरूवातीला विरोध होता.. त्याचं कारण म्हणजे पॅकिंग करायला खूप मोठं भांडवलं, खूप मोठी यंत्रणा लागणार होती.. पण तरीही राहुल जाधव यांच्या दृष्टीने संपूर्ण देशभरात जाधव बाबांच्या बियानाला जी मागणी होती त्याला एक ब्रँड स्वरूप आनणं गरजेचं होत…

( Farmer Success Story | Sheti Business Ideas | शेतकरी यशोगाथा | Vishaych Bhari

मग काही काळाने राहुल जाधव हे पंजाब नॅशनल बँकेत कृषी अधिकारी पदावर रुजू झाले .. पण घरातल्या या पारंपरिक व्यवसायाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती . कामावर असले तरीही ते पंधरा दिवसातून एकदा बियाण्यांचं काम बघायला घरी यायचेच. अखेर तीन वर्षानंतर काम सोडून राहुल हे पूर्णवेळ व्यवसायाकडं वळले ‌.. मग ठरल्याप्रमाणे 2020 साली राहुल जाधव यांनी कृषी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ हा कांद्याच्या बियाणांचा व्यवसाय करण्यासाठी द्यायचं ठरवलं आणि त्यातूनच त्यांनी 5 मार्च 2021 रोजी राही नॅचरल सिड्सची स्थापना केली.. मंडळी एक शेतकऱ्याच पोरगं लाख रुपये पगाराची नोकरी सोडून गावाकडं येत काय आणि कोट्यवधी रुपयांची रिस्क घेऊन गावाकडं कंपनी सुरु करत काय.. हे धाडस खऱ्या अर्थान सोप्प नाय.. पण राहुल जाधव आज नुसती कंपनी सुरु करून थांबले नाहीत तर त्यांनी आज ह्या बियाणांच्या क्षेत्रात ट्रेसएबीलिटी नावाचं नवीन तंत्र सुद्धा आणलय.. या ट्रेसएबीलिटी तंत्राच्या साहाय्यानं शेतकऱ्यांना आता बियाण्याचं मुळ उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत जाता येणारे.. त्यासोबतच लागवडीसाठी लावलेला कांदा कोणत्या प्रकारचा होता.. लागवड कोणत्या क्षेत्रात केली होती.. पाणी, खत, फवारणी व्यवस्थापन कसे होते याचीही माहिती याद्वारे ग्राहकांना मिळू शकणारे..

( Farmer Success Story | Sheti Business Ideas | शेतकरी यशोगाथा | Vishaych Bhari

राही सीड्स
rahee seeds,
rahi seeds,
शेतकरी यशोगाथा 
shetkari yashogatha,
farmer success story,

मंडळी राहुल जाधव यांना या ट्रेसएबीलिटी तंत्राची गरज का वाटली तर लूज कांदा बियाण विकताना त्यांना शेतकऱ्यांना खूप पटवून द्यावं लागायचं.. त्यांना बियाण्याच्या प्लॉटचे फोटोग्राफ दाखवावे लागायचे.. त्याचबरोबर काही दलाल लोक जाधव बाबांच्या नावाखाली खराब आणि फेक बियाण सुद्धा विकायचे पण आता या पॅकिंग आणि ट्रेसएबिलीटी तंत्रामुळे या सगळ्याचं गोष्टींना आळा बसणारे .. शेतकर्यांचा जाधव बाबांच्या बियाण्यावर प्रचंड विश्वास तयार झालाय.. पण या सगळ्यासाठी जाधव पितापुत्रांनी आयुष्यभर कष्ट उपसलेत. जाधव टेलर फार्मला शेतकऱ्यांची कायमच पसंती राहिलीय . त्यामुळे बियाण्याचं उत्पादन वाढवण गरजेचं होतं. ही गरज ओळखूनच राहुल जाधव यांच्या या राही सिड्सने 250 एकर क्षेत्र आणि 180 शेतकरी यांच्या माध्यमातून विक्रमी बियाण्याच उत्पादन घेतलय.. चालू वर्षी या क्षेत्रात साधारण एकूण 6 ते 8 कोटींची उलाढाल होईल असा अंदाज आहे. रामराव जाधव यांना आज एक नात आहे आणि तिच्याच नावाने राही सिड्सचीं स्थापना झालीय आज राही सीड्सचं यश म्हणजे, सर्वात जास्त कांदा उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात राही सिड्सचं नाव पहिल्या तीन कंपन्यामध्ये घेतलं जातंय. आज पिंपोडे बुद्रुक गावात जवळपास 3 कोटी बजेट असलेल्या फॅक्टरी आणि ऑफिसच काम सुरूय.. फक्त एवढंच नाय तर जाधव टेलर फार्मची आज एक एकर चंदनाची आणि अडीच एकर नारळाचीही बागय..

( Farmer Success Story | Sheti Business Ideas | शेतकरी यशोगाथा | Vishaych Bhari

शेतीमध्ये कायम प्रयोगशील राहणारे रामराव जाधव आणि त्यांचे चिरंजीव राहुल जाधव आज सातारा जिल्ह्यात अनेकांसाठी प्रेरणा झालेत.. कारण आजकाल गावाकडचा शहरात शिकलेला सुशिक्षित तरुण पुन्हा गावाकडं परत यायचं म्हणजे कमीपणा समजतो.. पण तरीही आज बँकेतील उच्चपदस्थ नोकरी सोडून गावाकडं राहून गावातच राही सिड्स नावाचा ब्रँड उभं करणं काय खायचं काम नाय मंडळी.. बेरोजगारी बेरोजगारी म्हणून आपण व्यवस्थेला दोष देत बसतो.. पण आपल्या आसपास असणाऱ्या गोष्टींमध्ये नाविन्य आणलं आणि त्याचं व्यवसायाच व्यवस्थित ब्रॅण्डिंग केलं, सातत्य ठेवलं तर गावाकडे राहून सुद्धा एक चांगला बिजनेस उभा राहू शकतो हे राही सिड्सने आज सिद्ध केलय.. बाकी तुम्हाला राही सिड्सच्या या यशाबद्दल काय वाटत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.. सोबतच तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर राही सिड्सचं कांदा बियाण हवं असेल तर फोटोमध्ये दिलेल्या आणि कमेन्ट मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच तुम्ही जर आपल्या विषयच भारी या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडीओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचाट वर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद !

शेतकऱ्याच्या पोरानं गावात राहून कशी उभारली करोडोंची कंपनी | Farmer Success Story | Sheti Business Ideas | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *