नाशिकमध्ये पॉवरफुल कोण शरद पवार की छगन भुजबळ | Sharad Pawar vs Chhagan Bhujbal
अजित दादांच्या सत्तानाट्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना टार्गेट करायची एकही संधी सोडलेली दिसत नाही. आणि म्हणूनच शरद पवार आज पहिल्यांदाच नाशिकातील येवल्यामध्ये भुजबळांविरोधात सभा घेतायत . तर प्रत्युत्तरात भुजबळही नाशिकात शक्ती प्रदर्शन करताना दिसतायत. पण आता येवल्यात किंवा एकूण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तसेच नाशिक जिल्ह्यात ताकद नेमकी कोणाची जास्तंय, शरद पवार की छगन भुजबळ यांची हेच आपण नीटपणे समजावून घेणार आहोत.
खरंतर येवला हा Chhagan Bhujbal यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो. म्हणजे या मतदारसंघातून छगन भुजबळ हे गेल्या कित्येक टर्म झालं सलग निवडून येतायत. आधी ते शिवसेना मग काँग्रेस आणि नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्याने जिल्ह्यात या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांसोबत छगन भुजबळ यांचं जुनं कनेक्शन आहे .हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. अर्थात छगन भुजबळ फक्त येवल्यात नाही तर नाशिक जिल्ह्यातील इतर मतदारसंघावरही प्रभाव टाकतात. अर्थातच म्हणूनच भाजपने राष्ट्रवादीचे असे मास लीडर सोबत असावेत असा विचार केला असावा. कारण भुजबळ एक ओबीसी नेते आहेत. ज्यांचा राज्यभरही प्रभाव आहे. पण Sharad Pawar यांची येवल्यात सभा होतेय त्याचा नाशिक तसेच दिंडोरीवर काय परिणाम होतोय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तिथं actual मध्ये नेमकी कोणाची ताकदंय. शरद पवारांची कि छगन भुजबळ यांची हे ही समजून घ्यायला हवं. तर बघा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी. अर्थात इथून कळवण मधून नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर तर दिंडोरीतून नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीचेच चार आमदार आहेत. ते चारही अजित दादा गटाचे समर्थक आहेत. पैकी आमदार नितीन पवार यांनी या आधीही Ajit Pawar यांच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं.

दिलीप बनकर तर शरद पवारांपेक्षा अजित दादांना कसे मानतात असा एक नुकताच किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना सांगितला होता.दिंडोरीतील या चार मतदारसंघाव्यतिरिक्त चांदवडमधून राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहेत. पण ते सध्या जरी शिंदे फडणवीस पवार सरकार सोबत असले तरीसुद्धा लोकल लेव्हलवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांचा विषय येत्या काळात तापू शकणार आहे. नांदगावबद्दल बोलायचं झाल्यास सुहास कांदे हे तिथून एक आक्रमक नेते आहेत. त्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंची साथ द्यायचं ठरवलं पण तरीसुद्धा भुजबळांवरील कारवाईवरून सुहास कांदेंनी विधानसभेत फडणवीसांना मध्यंतरी घेरलं होतं. आणि आता तर तेच भुजबळ सत्तेत वाटेकरी झाल्याने सुहास कांदे आक्रमक होणार हे साहजिक आहे. भाजपच्या भारती पवार या दिंडोरीच्या खासदार आहेत. शिंदे गटाचे धनराज महाले हे भारती पवारांविरोधात मागे उभे होते. आता त्यांची भूमिका ही महत्वाची अशी असणार आहे. आता अर्थात या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार आमदार, तर भाजप शिवसेनेचा एक एक आमदार आहे. राष्ट्रवादीचे चार आमदार अजित दादांसोबत आहेत. त्यामुळे दिंडोरीतून अजित दादा आणि छगन भुजबळ यांची या पातळीवर तरी ताकद दिसते . पण भाजपचे राहुल आहेर असतील किंवा शिवसेनेचे सुहास कांदे यांचं लोकल लेव्हलचं politics यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतील हा एक वेगळा प्रश्न येत्या काळात उभा राहू शकणार आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिंदे गट आज सत्तेत एकत्र असले तरी नांदगावमधून सुहास कांदे विरूद्ध पंकज भुजबळ अशी शिवसेना vs राष्ट्रवादी ही जुनी फाईट बरकरार आहे. तसेच येवला, निफाडमधूनही हा संघर्ष उद्या मोठा ठरणार आहे.
पण आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे आता स्वतः शरद पवार यांनी अजित पवार गटाविरूद्ध रान पेटवायला सुरूवात केलीय. आज त्यांची पहिलीच सभा येवल्यात संपन्न होतेय. अर्थात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा राष्ट्रवादीच्या बिग प्लेयरांविरोधात शरद पवार थेट मैदानात उतरलेत. अर्थात शरद पवार यांच्यासारखा वयोज्येष्ठ नेता मैदानात उतरल्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत सहानुभूतीही आहे. मागे २०१९ लाही शरद पवार यांनी पाऊसातील एक सभा गाजवून राज्यभर हवा केली होती. पण आताही मागच्यासारखीच जर शरद पवारांनी परत सहानुभूती मिळवली.तसेच अजित दादा गटाला क्रिमीनलाईज करण्यात ते यशस्वी झाले तर मग शरद पवार नावाचं वादळ फक्त येवल्यात नाही तर पुन्हा राज्यभर घोंघावू शकतं. खरंतर नाशिक जिल्ह्याचा विचार करताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही आपण विचार करायला हवा. कारण तिथेही भुजबळ factor अस्तित्वात आहे असं म्हणतात. पण आज देवळालीत मात्र शरद पवार यांचं जंगी स्वागत झालंय. या लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सिन्नर, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
त्यापैकी सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या सरोज अहिरे या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित दादांना फुल सपोर्ट आहे . कारण खूप आधीपासून ज्या आमदारांनी अजित दादांसोबत जायचं ठरवलं होतं त्यापैकी एक नाव माणिकराव कोकाटे यांचं आहे . पण या मतदारसंघात नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे, आणि नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत. तर इगतपुरी या आदिवासी बहुल भागातून कांग्रेसचे हिरामन खोसकर हे आमदार आहेत . एकूणच या मतदारसंघात भाजपचे आमदार हे सर्वाधिक आहेत . आता हे भाजपचे आमदार लोकल लेव्हलवर राष्ट्रवादीला सत्तेत किती सहसोबत करतील हा प्रश्न आहे. तसेच नाशिक मधून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे हे सीटींग खासदार आहेत. त्यांनी मागेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. राज्यातील शिंदे गटाच्या सत्तेतील गळचेपीमुळे ते कदाचित भाजप विरुद्ध भूमिका घेतील हा अंदाज बांधणं घाईचं ठरू शकतं. पण हेमंत गोडसे तसे तुल्यबळ नेते आहेत कारण त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ तर २०१९ ला समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. पण एकूणच या मतदारसंघात भुजबळ विरूद्ध पवार ही नवी rivalary बघायला मिळणारं हे मात्र निश्चित. कारण जर भाजप आणि राष्ट्रवादी ही यूती टिकली तर भविष्यात जागावाटपावरून मोठा घोळ होऊ शकतो. त्यावेळेस जर राष्ट्रवादीच्या काही चेहर्यांना संधी मिळाली तर मग अगदी भाजपचे मातब्बर नेतेही ऐनवेळेस शरद पवार यांच्याकडे उडी मारतील असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तसेच आता राष्ट्रवादी शिंदे गट एकत्रित असला तरीही सिन्नर मधून राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटें विरूद्ध शिवसेनेचे राजाभाऊ वाजे, देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरें विरोधात ठाकरेंच्या सेनेचे योगेश घोलप हा संघर्ष उभा राहणार आहे.

पण सध्याचा विचार करता शरद पवारांचा सरळथेट लढा छगन भुजबळ आणि अजित दादांविरूद्ध आहे. नाशिकातून ठाकरे factor ही येत्या काळात महत्वाचा असणार आहे. अर्थात शरद पवार अधिक ठाकरेंची सहानुभूती एक झाली तर महाराष्ट्रात वेगळं चित्र ही येत्या काळात बघायला मिळू शकेल ही देखील इथं विशेष नोंद घेण्यासारखी गोष्टंय. कारण कुठल्या पक्षाकडे सध्या किती आमदार किंवा खासदार आहेत. यावरून कदाचित त्या पक्ष किंवा व्यक्तीची सध्याची ताकद दिसेल. पण खरा लढा तर येत्या काळात जनतेच्या कोर्टातच होईल. असो,घोडा मैदान लांब नाही. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, तुमच्यालेखी नाशिकमधून पावरफुल नेमकं कोणंय. छगन भुजबळ कि शरद पवार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा . सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब च्यानेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फाॅलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply