शरद पवारांनी आज बीडच्या सभेतून हे ३ मास्टरस्ट्रोक मारलेत | Sharad Pawar Speech in Beed | Vishaych Bhari

येवल्याच्या सभेनंतर आज शरद पवारांची तशीच सेम सभा बीड मध्ये पार पडली. सभेपूर्वी शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं .आणि त्यानंतर सभेतही त्यांच्यासह संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार या मंडळीनि अजित दादा गटासह सरकारवर जोरदार टीका केली. पण शरद पवार यांनी आजच्या सभेतून नेमकं काय साध्य केलंय ? त्यांचं बीडसाठीचं एकूण काय प्लॅनिंग आहे ? हेच आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
नंबर एकची गोष्ट ओबीसी ध्रुवीकरण :

( Sharad Pawar Speech in Beed | Vishaych Bhari )
तर बघा शरद पवार यांचं आजपर्यंतच राजकारण हे मराठा आणि इतर बहुजनांची मोट बांधणार राहीलं आहे. पण आता शरद पवार यांना पक्क माहितेय कि पुन्हा सत्तेत यायचं असेल तर ओबीसी मतदार हे आपल्या सोबत असणं अतिशय महत्वाच आहे. कारण ओबीसी हा देशातील एक बहुसंख्य प्रवर्ग आहे. आणि ओबीसी ज्याच्या बाजूने तो पक्ष सत्तेत असतो, हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं गेल्या बऱ्याच काळापासून वैशिष्ट्य राहील आहे. अर्थात बीजेपीन ओबीसीना जवळ करण्यासाठी माधवा पॅटर्न राबवला होता. आता भाजपच्या राजकारणाचा तोंडावळा हा हिंदुत्ववादी राहिला आहे. आणि आता तोच जर ब्रेक करायचा असेल तर मराठा, मागास मतांसोबतच ओबीसी मतदारांचा पाठिंबा असणे मस्ट आहे. हे शरद पवार यांना पक्क माहितेय. म्हणून तर त्यांनी त्यांच्यातुन फुटून अजित दादा गटात गेलेल्या आणि ओबीसी असलेल्या नेत्यांनाच आज जोरदार टार्गेट केलं आहे. सुरुवातीला म्हणून तर त्यांनी येवल्यात जाऊन छगन भुजबळांविरोधात शक्ती प्रदर्शन केलं. तर आता बीड मध्ये येऊन त्यांनी आणि इतर नेत्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.
नंबर दोनचा फायदा म्हणजे आपण इंडिया आघाडीसोबतच आहोत हे त्यांनी सिद्ध केल :
( Sharad Pawar Speech in Beed | Vishaych Bhari )
मागच्या काही काळात शरद पवार यांच्या भूमिकेतील संभ्रमामुळे कार्यकर्ते गोंधळात होते. शरद पवार आणि अजित दादा एक आहेत कि वेगवेगळे आहेत. हेच त्यांना कळत नव्हतं. म्हणजे शरद पवार यांचं केजरीवाल यांची विनंती धुडकावून नरेंद्र मोदींच्या पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहणं, पुण्यात शरद पवार आणि अजित दादा यांची कथित गुप्त भेट, या सगळ्यामुळे शरद पवारांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. कार्यकर्ताही स्पष्टता नसल्यामुळे या सगळ्याला वैतागलेला होता. अगदी इंडिया आघाडीनं ही शरद पवार यांच्या या डबल स्टॅंड कृती बद्दल नाराजी व्यक्त केली होती. पण आता शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनीही केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत शरद पवार इंडिया आघाडीतच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात 2024 ला देशात सत्ता बदल होईल अशील लाईन पकडली होती . शरद पवार यांनीही मणिपूर आणि लोकशाही मूल्यावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. आता यामुळे शरद पवार इंडिया आघाडीसोबतच आहेत, मोदी किंवा भाजपसोबत नाहीत ,हा मेसेज मात्र त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहे.
आणि पवारांनाही आजच्या सभेतून हेच अपेक्षित होतं.
नंबर तीनचा फायदा म्हणजे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील प्रमुख विरोधक म्हणून जागा व्यापली आहे :

( Sharad Pawar Speech in Beed | Vishaych Bhari )
जसं कि आपण आता बोललो कि शरद पवार यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे कार्यकर्त्यांसह त्यांच्या सहकारी पक्षातील नेतेही नाराज होते. म्हणजे शरद पवार आणि अजित दादा यांच्यात गुप्त भेट झाली या कथित घटनेनंतर ठाकरे गटाने लोकसभेच्या सर्व 48 जागांवर उमेदवार उभे करण्याच प्लॅनिंग सुरु केलं आहे.. आता खरंतर शरद पवार यांच्या अस्पष्ट भूमिकेनंतर ठाकरे गटाने स्वबळाचा नारा देत शरद पवार गटालाच इशारा दिला आहे. त्यामुळेच आपण भाजप सोबत नाही असं दाखवण्यासाठी मोदींच्या अनेक धोरणावर पवारांनी टीका करत ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील भाजप विरोधाचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरे नाही तर शरद पवार असतील हे सुद्धा त्यानी सिद्ध केलंय. एकूणच पुन्हा एकदा डागाळलेली त्यांची इमेज शरद पवार यांनी सुधारून ग्लोरिफाय केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्वःताला सेंट्रलाईज करण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत.
असो ,तर आता शरद पवार गटाच्या या स्वाभिमान यात्रेला उत्तर देणारी अजित दादांची परिक्रमा यात्राही येत्या काळात महाराष्ट्रात पार पडणार आहे.,एकूणच सवाल जवाबाच्या फैरी महाराष्ट्रात पुढच्या काळात झडणार आहेत. आज आव्हाडांनी तर संदीप क्षीरसागर यांना वंजाऱ्याचं पोर म्हणत शरद पवारांच्या ओबीसी धुर्वीकरणाच्या गेमला अधिकच मजबूत केलं आहे. उदृया परवा कदाचित बीडमध्ये अजित दादा आणि धनंजय मुंडे यांचीही सभा होईल. पण या सगळ्यात शरद पवारांच्या मागे अजित दादांची फरफट होईल. अगदी पंकजा मुंडेही खडसेंसारखी वेगळी वाट चोखाळतील. असो पण एक मात्र नक्की की अजित दादा vs शरद पवार या बायनरीत पुढच्या काळात महाराष्ट्रात चर्चा फक्त राष्ट्रवादीचीच राहील. आणि हेच कदाचित पवारांना अपेक्षितही असेल. पण तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रात येत्या काळात नेमकी हवा कोणाची असेल शरद पवार कि अजित दादांची ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply