मंडळी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जाहीर झाल्यात तसं आता निवडणुका लढवण्याऱ्यांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळतेय. इच्छुक उमेदवारांनी आता त्या त्या पक्षाच्या पक्षश्रेष्टीच्या गाठीभेटी देखील घ्यायला सुरुवात केलीय. त्यामध्ये मग आता सोशल मीडिया इन्फलूयेन्सर यांनी देखील उडी घेतलेलीयं. नुकतच रिल्स स्टार धनंजय पोवार यांनी हातकंणगले लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली होती. त्यातच आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं कराळे गुरुजी म्हणाले आहेत. पुण्यात आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. वर्धा मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचं बोललं जातंय. म्हणूनच मग कराळे मास्तर यांना उमेदवारी मिळू शकते का ? उमेदवारी मिळालीच तर ते वर्ध्यातून निवडून येऊ शकतात का ? याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा.
(Nitesh Karale | Vishaych Bhari)
.मंडळी व्हिडीओच्या सुरुवातीला आपण माध्यमांशी बोलतांना कराळे गुरुजी नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात. तर बघा माध्यमांशी बोलताना कराळे गुरुजी म्हणाले की “मी मागे काही भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर वर्ध्यामध्ये मी लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडीमधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचं कराळे गुरुजी म्हणाले आहेत. पुढे बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले की, “असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहे. एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावं असं पवार यांचे मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे, संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आत्ता सांगता येणार नाही,” असेही कराळे गुरुजी पूढे म्हणाले आहेत. एकूणच काय तर वऱ्हाडी भाषेतून शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आता लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. वर्ध्यातून लढण्यासाठी कराळेंनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठीचं खरंतर पुण्यात कराळेंनी पवारांची भेटही घेतली आहे. त्यासोबतच वर्ध्यातून त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीटाची मागणीही केली आहे. खरंतर याआधीही एकदा त्यांची शरद पवारांसोबत यासंदर्भात भेट झालीये.
(Nitesh Karale | Vishaych Bhari)
आता याचसंदर्भात शरद पवार गट आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे. आता वर्ध्यातून भाजपकडून रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत आणि भाजपनं पुन्हा त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केलीये. त्यामुळं वर्ध्यातून रामदास तडसांचा सामना शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात होईल. अर्थात त्यातच कराळे मास्तरांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झालीये.आता नितेश कराळे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते वर्ध्यात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतात. संपूर्ण महाराष्ट्रभर कराळे मास्तर म्हणून त्यांची ओळखय. वऱ्हाडी भाषेतील शिकवणीमुळं कराळे मास्तर सोशल मीडियात चांगलेच व्हायरल आहेत. विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी रस्त्यावर उतरुन कराळे आंदोलनात सक्रीय देखील असतात. कराळेंनी 2020 मध्ये नागपूर पदवीधर निवडणूकही लढवली होती. पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी तिसऱ्या क्रमांकांची 8500 एवढी मतं घेऊन सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता शिकवणी क्लासेसच्या व्यतिरिक्त व्हिडीओतून कराळे मास्तरांचा सूर, भाजप सरकारच्या विरोधीच राहिलेला आहे. आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक प्रश्नावर देखील भाष्य करत असतात. एकूणच काय तर कराळे गुरुजी त्यांच्या व्हिडीओजच्या माध्यमातून सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असतात. त्यांचे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओही नेहमी चर्चेत असतात. ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सोबतच, राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात. त्यांचे व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात. त्यामुळे याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत देखील मिळू शकतो असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.मंडळी आता वर्धा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस कडून उभ्या असलेल्या चारूलता टोकस यांचा रामदास तडस यांनी पराभव केला होता.
(Nitesh Karale | Vishaych Bhari)
आता तसं तर २०१४ पासूनचं भाजपचे मतदारसंघावर वर्चस्व आहे.भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची आघाडी असल्याने येथे मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या मदतीने खासदार रामदास तडस निवडून येत आलेत अस बोललं जातं. रामदास तडस यांना निवडून येण्यामागं आणखी एक महत्त्वाचे कारण आहे आणि ती म्हणजे त्यांची जात. २०१९ च्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदार संघात जातीचा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरला होता. कारण वर्धा जिल्ह्यामध्ये कुणबी व तेली हा समाज एकमेकाचा राजकीय प्रतिस्पर्धी आहे. भाजपाकडून तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर कॉंग्रेसकडून कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना मैदानात आणल गेल होत. शिवाय बसपा कडून उभ्या असणार्या शैलेश अग्रवाल यांच्या मुळे विभागलेल्या मतदारांचा फटका कॉंग्रेसला मागच्या वेळी बसला अस सुद्धा सांगितल जात. पण आता मागच्या दोन वर्षातील घडामोडी पाहता २०२४ ची लोकसभा निवडणूक खासदार रामदास तडस यांना मागील निवडणुकीपेक्षा जड जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण १० वर्ष खासदार असून सुद्धा तडस यांना मतदार संघात स्वतःची छाप पाडता आली नाही अस राजकीय विश्लेषकांच मत आहे. आपल्या खासदारकीच्या १० वर्षांच्या काळात त्यांनी मतदार संघात महत्त्वाचे उद्योग आणले नाहीत, मोठ्या प्रमाणावर असणार्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत अशी टीका सुद्धा त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून केली जाते. शिवाय तडस हे स्वतः तेली महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी विरोध दर्शविला होता. आता ही गोष्ट त्यांना तिथं फायदेशीर ठरू शकते की तोट्याची हे येत्या काळात कळेलच. पण आता दुसऱ्या बाजूला कराळे मास्तर यांचा ऑनलाईन जितका प्रभाव आहे तितका ग्राउंडवर आहे का यावर साशंकता आहे. पण सोशल मिडीयाच्या ताकदीवर जर कराळे मास्तर यांनी तिकीट मागितली असेल तर ती त्यांची राजकीय आत्महत्या असेल असं राजकीय जानकारांचं मतंय. पण आता वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. आता तसं तर हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. पण यंदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे हा मतदारसंघ गेला आहे.
(Nitesh Karale | Vishaych Bhari)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे. आता वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इतर उमेदवारांची चर्चा आता थांबण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकण्यास तयार झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उमेदवारींवर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत . पण कराळे मास्तरांनी पवारांच्या भेटीचं सत्र सुरुचं ठेवलं आहे. अर्थात कराळे मास्तरांना चुकून माकून तिकीट मिळालंच तर मात्र त्यांना ग्राउंड लेव्हलला जाऊन मोठ्या प्रमाणात कामं कराव लागण्याची आवश्यकता आहे. आता इथं काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे जर शरद पवार प्लस काँग्रेस असं गणित जुळलं तर भाजपच्या विनिंग सिटला इथं कराळे मास्तर सुरुंग लावू शकतात. पण एकूणच बघायला गेलं तर अमर काळे यांना अल्मोस्ट तिकीट फायनल झाली असताना अखेरच्या क्षणी जरी कराळे मास्तर यांना तिकीट मिळालं तरी ते त्याचा फार फायदा उठवतील अशातली गोष्ट नाही असं राजकीय जानकारांच म्हणणयं. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कराळे मास्तर यांना तिकीट मिळू शकत का? आणि मिळालंच तरं ते निवडून येऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा.
(Nitesh Karale | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
8 ठरले पण एकनाथ शिंदे यांच्या या ५ खासदारांचं तिकीट कापलं गेलंय का ? | Loksabha Election 2024 News|Eknath Shindeया ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhariया ५ लोकसभेच्या जागांसाठी एकनाथ शिंदे आजंही भाजप सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News| Eknath Shindeजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply