शाहू छत्रपती कोल्हापूरचे पुढचे खासदार | असाय शरद पवारांचा गेमप्लॅन | Sharad Pawar on Shahu Chatrapati Kolhapur | Vishaych Bhari

येवला आणि बीडच्या सभेत शरद पवारांनी भुजबळ आणि धनंजय मुंडेंविरोधात जोरदार फिल्डींग लावलेली दिसली. आता या दोन सभांपाठोपाठ शरद पवार यांची येत्या २५ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. आता त्या सभेचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू छत्रपती. आता यावरूनच शरद पवार गटाचे कोल्हापूरमधील खासदारकीचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींचं नाव चर्चेला आलंय. पण खरंच शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे कोल्हापूरमधून लोकसभेचे पुढचे उमेदवार असतील का? आणि जर असतील तर त्यांच्या असण्याने शरद पवार गटाला काय फायदे होऊ शकतात? शाहू छत्रपतींची कोल्हापूरात नेमकी ताकद किती आहे ? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत….

sharad pawar,
sharad pawar hd image,
sharad pawar beed sabha,
sharad pawar beed today shakti pradarshan,
sharad pawar photo,
sharad pawar age,
sharad pawar family tree,
sharad pawar news,
sharad pawar latest photo,
sharad pawar png,
shahu maharaj,
shahu maharaj chatrapti,
shahu chatrapti kholhapur,
shahu chhatrapati kolhapur,
sharad pawar shahu chhatrapati

( Sharad Pawar on Shahu Maharaj Kolhapur | Vishaych Bhari )

खऱतर कोल्हापूरच्या राजकारणाचं नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते बंटी पाटील विरूद्ध धनंजय महाडिक ही फाईट .आणि हीच इथली खरोखरची बिग फाईटही आहे. या व्यतिरिक्त संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, समरजीतसिंह घाटगे हे इथले बडे प्लेयर आहेत. आता संभाजीराजे छत्रपती राजकारणात active असले तरीही कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचं नाव कंसिस्टंट राजकारणी म्हणून येत नाही.
शिवाय त्यांच्या अनेक भूमिकाही संदिग्ध मानण्यात येतात. म्हणजे २००९ ला राजेंनी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली पण त्यात त्यांना अपयश आलं. मग नंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी ते पूर्णवेळ राजकारणाच्या बाहेर गेले. पण पुढे २०१६ साली भाजपकडून ते राज्यसभेचे खासदार झाले. पण गेल्यावर्षी कार्यकाळ संपल्यावर मात्र त्यांना भाजपकडून काही खासदारकीचं तिकीट मिळालं नाही. राजेंची संदिग्ध भूमिका, भाजपवरील टीका, शिवसेना किंवा भाजप मध्ये जायला त्यांनी दिलेला नकार आणि त्याचवेळी स्वराज्य पक्षाची केलेली स्थापना यामुळे राजेंएवजी ऐनवेळी भाजपच तिकीट हे धनंजय महाडिक यांना मिळालं तर शिवसेनेकडून संजय पवार मैदानात उतरले. आता त्यावेळेस राजांच्या या संदिग्ध भूमिकेवर खुद्द त्यांचे वडील शाहू छत्रपतींनीही बरीच टीका केली होती आणि एवढ्यावरच न थांबता संभाजीराजांनी विरोध केलेल्या शिवसेना आणि संजय पवारांना त्यांनी एकप्रकारे सपोर्टच दर्शवला होता. अगदी त्यावेळेचे शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांनीही तेव्हा त्यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शाहू छत्रपती आणि संभाजीराजे या पिता पुत्रांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादी आणि शाहू छत्रपती यांच्यातील जवळीकता लपून राहिली नव्हती.

( Sharad Pawar on Shahu Maharaj Kolhapur | Vishaych Bhari )

खरंतर शाहू छत्रपतींनी वेळोवेळी भाजपवरही टीका केली होती. एकप्रकारे त्यांना संभाजीराजेंनी मागे भाजपसोबत गेलेलं आवडलं नव्हतं असंच दिसत होतं. असो ,तर आता शाहू छत्रपतींचे हेच विचार ओळखून शरद पवार हे त्यांना पुढील खासदारकीचे उमेदवार म्हणून बघत असतील अशी एक जोरदार चर्चा कोल्हापूरात सुरू झाली आहे. कदाचित म्हणूनच त्यांना येत्या २५ आॅगस्टच्या शरद पवार यांच्या सभेचं अध्यक्षस्थानही मिळालं असावं,अशी चर्चा आहे. पण मग प्रश्न पडतो की शाहू छत्रपतींना पुढील खासदारकीची उमेदवारी दिली तर शरद पवार यांना काय फायदा होऊ शकतो? तर बघा, किमान राजकारणापुरतं बोलायचं झाल्यास शरद पवार यांच्या राजकारणाचा बेसच शाहू फुले आंबेडकर यांची ideology राहिलेला आहे. आता त्यामुळे जर राजश्री शाहू महाराजांच्या वंशजालाच थेट तिकीट दिलं तर राजर्षी शाहू महाराजांची जातीय आणि वैचारिक चळवळीची लीगसी ही automatic शरद पवार यांच्याकडे चालून येईल. आणि त्यांची राजकारणातील पुरोगामी वैचारिक चळवळ अधिक मजबूत होईल. ज्याचा शरद पवारांना त्यांच्या जातीय ध्रुर्वीकरणासाठी बराच फायदा उचलता येईल.‌ दुसरं म्हणजे शरद पवार हे बहुधा संस्थानिकांना संधी देत असतात. कारण त्यांच्या पारंपरिक राजेशाहीमुळं जी एक संबंधित संस्थानाशी निगडीत लाॅयल आणि रेडीमेड व्होटबॅंक आहे . त्याला पवारांना grab करता येते.‌ निवडणूकीसाठी होणारा अतिरिक्त खर्चही ही मंडळी बेअर करू शकतात. आता या सगळ्या निकषात शाहू छत्रपती परफेक्ट बसतायत. याशिवाय शाहू छत्रपती़चं कोल्हापूरात अजातशत्रू असणं आणि त्याचवेळेस महाडिक vs ब़टी पाटील गणितात बंटी पाटील यांचा सपोर्ट मिळवणं इझी होणं. कांग्रेस , राष्ट्रवादी पलीकडेही अगदी वेळ पडली तर भाजपचे समरजीतसिंह घाटगे तसेच ठाकरे गटाचे संजय पवार यांचा पाठिंबा मिळवणं. या सगळ्यामुळे शाहू छत्रपतीच पवारांच्या लेखी संभाव्य निवडणूकीतील परफेक्ट चेहरा आहेत. आता त्यासोबतच ठाकरे प्लस पवार यांची सहानुभूती जर वर्क झाली तर मग शाहू छत्रपतीच कोल्हापूरातुन प्रमुख विजेतेपदाचे दावेदार ठरतील. मागे आमचं ठरलंय म्हणत बंटी पाटलांनी ठरवून महाडिकांचा कार्यक्रम केला होता. तसेच संजय पवारदेखील सध्या form मध्ये आहेत. या दोन्ही गोष्टीही शाहू छत्रपतींसाठी प्लस point ठरू शकणार आहेत.

sharad pawar,
sharad pawar hd image,
sharad pawar beed sabha,
sharad pawar beed today shakti pradarshan,
sharad pawar photo,
sharad pawar age,
sharad pawar family tree,
sharad pawar news,
sharad pawar latest photo,
sharad pawar png,
shahu maharaj,
shahu maharaj chatrapti,
shahu chatrapti kholhapur,
shahu chhatrapati kolhapur,
sharad pawar shahu chhatrapati

( Sharad Pawar on Shahu Maharaj Kolhapur | Vishaych Bhari )

फक्त यात ब़ंटी पाटील आणि अजित दादा गटाचे हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची कोंडी शाहू छत्रपतींना भेदता यायला पाहिजे.असो, पण तुर्तास तरी कोल्हापूरातून शाहू छत्रपती नक्कीच निर्विवाद लीड मिळवू शकतात. असं प्राथमिक लेव्हलवर म्हणता येऊ शकतं. आता फक्त संजय मंडलिक इथले शिवसेनेचे सीटिंग उमेदवार आहेत पण ते शिंदे गटात आहेत या धर्तीवर महाविकास आघाडीत ठाकरे गट विरूद्ध शरद पवार गट अशी उमेदवारीची रस्सीखेच होऊ शकते. कारण राष्ट्रवादी vs शिवसेना अशीच इथली पारंपरिक फाईट आहे. तसंच सेम वे अजित दादा, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी म्हणून कोणाचा से कोल्हापूरात चालणार हा ही इथला भविष्यातला मोठा प्रश्न असणार आहे. पण आता मीडियाशी बोलताना आपल्याला अशा कुठल्याही उमेदवारीची कल्पना नाही असं शाहू छत्रपतींनी म्हणलंय. तसेच आपल्याला या पूर्वी खासदारकी हवी होती. पण तेव्हा तिकीट मिळालं नाही, असं म्हणत to be or not to be ची भूमिका त्यांनी घेतलीय. पण येत्या काळात त्यांची भूमिका लवकरच स्पष्टपणे कळू शकेल अशीच आशा आपण व्यक्त करूयात. बाकी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मते कोल्हापूरातून शाहू छत्रपती हे पुढील खासदार होऊ शकतील का? नसेल तर तुमच्या मनातील कोल्हापूरच्या पुढील खासदाराचं नावही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

शाहू छत्रपती कोल्हापूरचे पुढचे खासदार | असाय शरद पवारांचा गेमप्लॅन | Sharad Pawar on Shahu Chatrapati Kolhapur | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *