शरद पवार यांची आजची कोल्हापूरमधील पूर्वनियोजित सभा नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीचे अनेक नेते या सभेत बोलले. पण या सभेत दोन नावं चर्चेत राहिली एक अर्थात शरद पवार यांचं तर दुसरं सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार्या शाहू छत्रपती महाराजांचं. आता शाहू छत्रपती सभेचे अध्यक्ष आहेत म्हणल्यावर ते उद्याचे शरद पवार गटाचे खासदारकीचे उमेदवार असतील असे अनेक तर्क लोकांनी लावायला सुरुवात केलीय. आता त्याबद्दल आपण आधी चर्चा केलीये. दोन्ही व्हिडिओंची लिंक तुम्हाला कमेंट मध्ये बघायला मिळेल. असो, तर बीड आणि येवल्याच्या सभेतून शरद पवारांनी ओबीसी धुर्वीकरणाचा जोरदार प्रयत्न केलेला दिसला. पण मग कोल्हापूरच्या सभेद्वारे त्यांनी नेमकं काय साधलंय ? चला हेच ३ मुद्यांद्वारे समजून घेऊयात
तर नंबर एकचा विषय आहे शाहू महाराज कनेक्शन आणि जातीय ध्रुर्वीकरण.

( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
शरद पवार यांच्या राजकारणाचा बेस शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आहे असं आपण म्हणतो म्हणजे नेमकं काय तर
राजकीय दृष्ट्या शरद पवारांचं politics हे या ३ महापुरुषांआडुन ओबीसी, मागास वर्ग आणि मराठा असं ३ जातसमूहांची मोट बांधणारं आहे. असा त्याचा वास्तविक अर्थ असतो.म्हणून तर बीड, येवल्यात २ हेवीवेट ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यानंतर शरद पवारांनी कोल्हापूरचा option निवडला आहे. इथं येऊन मराठा धुर्वीकरणाचा मार्ग शरद पवारांनी अवलंबला आहे. आता शाहू महाराजांना अपेक्षित मराठा केंद्रित राजकारण ज्यात सर्व जातसमूहांना स्थान आणि ओळख आहे. अशी back of the theory ठेवून शरद पवारांनी आज मांडणी केली. दुसरं म्हणजे आता राजष्री शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरात त्यांची लीगसी सांगणार्या वंशजालाच म्हणजेच शाहू छत्रपतींना सोबत घेतल्यामुळे शरद पवार यांच्याकडे automaticaly शाहू महाराजांच्या विचारधारेमागची जातीय ध्रुर्वीकरणाची समीकरणं चालून आली आहेत. आणि हेच शरद पवारांनी आजच्या सभेतून कमवलं आहे.
दुसरा विषय म्हणजे हिंदूत्वावर उपाय – पुरोगामी चळवळ.
( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
मागच्या काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरात हिंदूत्ववादी संघटनांनी लव्ह जिहादवरून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. काही काळापूर्वी कोल्हापूरात या सगळ्या वरून हिंसाचारही प्रचंड वाढला. आता एका बाजूला हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लव्ह जिहाद वरून आक्रमक झालेत . तर दुसर्या बाजूला अनेकांनी कोल्हापूरातील वाढत्या हिंसाचारावर चिंता व्यक्त करून राजष्री शाहू महाराजांची आठवण काढली होती. आता कोल्हापूरसह राज्यभरातील हिंदुत्वाचा कार्यक्रम ब्रेक करायचा असेल तर राजष्री शाहू महाराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे शरद पवारांनीही ओळखलं. आणि म्हणूनच शाहूनगरी कोल्हापूरात आजची ही शरद पवारांची सभा पार पडली . आता कोल्हापूरातील हीच शाहु विचाराचं जातीय आणि political मूव्हमेंटचं narratives राज्यभर नेता येईल. आणि भाजपच्या हिंदूत्वाच्या अजेंड्याला ब्रेक करता येईल असा सूक्ष्म विचार शरद पवार यांनी केलेला असावा. या सभेतून त्यांनी हीच cast politics ची गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
तिसरी गोष्टंय, ठाकरे गट, भाजपला इशारा आणि कांग्रेस राष्ट्रवादीची मोट बांधली.

( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
आजच्या सभेतून शरद पवारांनी एकाच वेळी ठाकरे गट आणि भाजपला इशारा दिला आहे. तो कसा तर शरद पवार यांनी आजच्या सभेतून
शाहू छत्रपती हेच कोल्हापूरचे पुढचे खासदारकीचे उमेदवार असतील असं वातावरण त्तयार केलंय. पण त्यामुळे इथली सीटिंग सीट असणार्या ठाकरे गटाच्या शिवसेनेवर दबाव आला आहे. आता महाविकास आघाडीत कोल्हापूरच्या सीटवर दावा करत असतानाच तिकडे विरोधी पक्षातील शिंदे गटाची शिवसेना ही अजित दादा आणि भाजपची मोट बांधताना दिसत आहे. पण आता नुकतंच अजित दादा आणि शरद पवार एकच आहेत असं अनेक पक्षातील नेत्यांनी सांगितल्यामुळे विरोधी पक्षात नक्कीच चलबिचल झाली असणार आहे. परिणामी ते तिन्ही पक्ष एकत्रित न बांधले जाऊन अजित दादा गटाचे कार्यकर्तेही आज शरद पवार गटाच्या सभेला आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांना confuse ठेवणे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीत सुप्रीमसी ठेवणे या दुहेरी गोष्टी शरद पवार यांना भन्नाट जमत आल्यात. कोल्हापूरातंही त्यांनी त्यांचा तोच formula कायम ठेवला आहे. तर शरद पवारांनी या अशा ३ गोष्टी आजच्या या कोल्हापूरच्या सभेतून साध्य केल्यात. म्हणून तर आजची संपूर्ण सभा ही शरद पवार आणि शाहू छत्रपतींभोवतीच फिरत राहिली होती. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, शरद पवार यांच्या आजच्या सभेमुळे कोल्हापूरचं राजकारण बदलेल का ? कोल्हापूरकर शाहू छत्रपती आणि शरद पवार यांच्या मागे उभे राहतील की नाही ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply