मंडळी कोणत्याही माणसाच आयुष्य घ्या. ते कायम चढउतारांनीच भरलेलं असत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कभी ख़ुशी कभी गम हे सुरूच असत. अगदी संघर्ष सुद्धा त्याच्या पाचवीलाच पुजलेला असतोय. पण अशा संघर्षमय गोष्टीतून जो सकारात्मकपणे बाहेर पडतो त्यालाच आपण खरा बाजीगर, जिगरबाज, योद्धा अस काय बाय म्हणतो. पण एखाद्या वेळी मात्र परिस्थिती ही फारच वेगळी असते. ती तुमच्या बाजूने नसते. कधी कधी काय होत तर सगळ काही ठीकठाक सुरु असत पण अचानकच अस काहीतरी घडत आणि एका मिनिटातच होत्याच नव्हत होऊन जात. अशावेळी तुमच्या हातात काहीच नसत आणि अशावेळी त्या परीस्थितीसोबत लढण्याची तुमची क्षमताही उरलेली नसते. कारण तो धक्काच इतका मोठा असतो कि तुमच्या आयुष्यान डायरेकट तिथ यु टर्नच घेतलेला असतो. मग अशावेळी शेवटी फक्त एकच गोष्ट उरते आणि ती म्हणजे असते आशा. सगळ काही नीटनेटक होईल, आपण यातून सहीसलामत बाहेर पडू याच आशेवर आपण पुढचे दिवस ढकलतो. खरतर हाच आशावाद आपल्याला पुढे नेतो, जगवतो. विषयच भारीच्या आजच्या या Blog मध्ये सुद्धा तुम्ही अशाच एका आशावादी माणसाच्या जीवनाची गोष्ट बघणार आहात. जी तुम्हाला नक्कीच तुमच्या दैनदिन जीवनात लढायला शिकवेल. एवढच नाय तर परिस्थिती कशीही असुदे त्याचा शेवट गोड व्हावा यासाठी काय केल पाहिज्ये हे सुद्धा शिकवेल.
( Story Of Prichard Colon | Vishaych Bhari)
प्रिचर्ड कोलन मेलन्डेझ. हे नाव तुमच्यापैकी कदाचितच कोणीतरी ऐकल असेल किंवा ऐकलही नसेल. पण या नावाचा इतिहास मात्र खूप मोठाय. कारण काही दिवसांपूर्वी या व्यक्तीचा एक विडीओ भयान वायरल झाला होता. प्रिचर्ड एक फेमस बॉक्सर होता. एका फाईट दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन तो कायमचाच या बॉक्सिंग क्षेत्रापासून दूर झाला. याचीच ती वायरल व्हिडीओ होती. त्याची ती दुखापत इतकी गंभीर होती कि त्याच्या मेंदूत भरपूर रक्तस्त्राव झाला. बर त्याचा परिणाम सुद्धा इतका वाईट झाला कि तो कायमचाच ब्रेन ला जबर इजा झाली होती. म्हणजे त्याला हालचाल करता येते. पण त्याच्या आसपास काय सुरुय हे मात्र त्याला अजिबात समजत नाही. त्याच हसतखेळत आयुष्य एका मिनिटात उद्ध्वस्त झाल होत. त्याचही आन त्याच्या घरच्यांचं ही. कारण तो त्याच्या यशाच्या अत्युच्च शिखरावर होता. त्याच्या एकूण ११७ फाईटस पैकी त्याचे फक्त १६ लॉस होते. त्याच्या स्वप्नासाठी त्याच आख्ख कुटुंब झटत होत. त्यामुळे त्याची आई बहिण तर या प्रसंगामुळे पूर्णपणे कोसळले होते. तो काळ त्यांच्या सगळ्यांसाठीच खूप वाईट होता. मंडळी प्रिचर्डचा जन्म १९ सप्टेंबर १९९२ चा. तो पेशान व्यावसायिक बॉक्सर. त्याचा जन्म मैटलँड, फ्लोरिडा इथ झाला. त्याचे आईवडील रिचर्ड आणि निव्हस कोलन एका हॉटेलमध्ये वेटरच काम करायचे. प्रिचर्ड वयाच्या १० व्या
वर्षी असतानाच त्यांच्या वडिलांनी पोर्तो रिको या बेटावर जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलान त्या बेटाच प्रतिनिधित्व कराव अस त्यांना वाटायचं. प्रिचर्डला तिकडेच बॉक्सिंगची ओळख झाली. तो आपल्या धाकट्या बहिणीसोबत आणि पप्पांसोबत तिथ गेला, तर त्याची आई आणि मोठा भाऊ हे फ्लोरिडामध्येच राहिले. कोलनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात पोर्तो रिकोमधल्या सॅलिनास इथल्या अल्बेर्ग्यू ऑलिम्पिको इथल्या स्पर्धेत केली आणि तिथच त्याला डिजीट हे टोपणनावसुद्धा मिळाल. तिथ हायस्कूलच शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कोलनने सॅन जुआन, पोर्तो रिको इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ द साक्रेड हार्टमध्ये बिजनेस एडमीनिस्ट्रेशनच शिक्षण घेतलं.
( Story Of Prichard Colon | Vishaych Bhari)
आपल्या हौशी कारकिर्दीत कोलनन 141 आणि 152 पौंड या दोन्ही विभागात 5 राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकल्या आणि तिथूनच खेळात तो नावारूपाला आला. पुढ त्यान २०१० च्या पॅन अमेरिकन युथ चॅम्पियनशिपमध्ये ६४ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल. पण 2012 मध्ये, कोलनन व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घ्येतला. 23 फेब्रुवारी 2013 रोजी त्याची पहिली लढत झेवियर लासेल याच्या विरुद्ध झाली. कोलनन पहिल्या फेरीतच लासेलला पराभूत केल. तिथून पुढे कोलन त्याच्या व्यावसायिक बॉक्सिंग मध्ये चांगलाच व्यस्थ झाला. त्याची सगळ्यात जबरदस्त लढत 9 सप्टेंबर 2015 ला झाली, जेव्हा तो त्याच्यापेकशा अनुभवी असणार्या व्हिव्हियन हॅरिस याच्याशी लढला. टोरंटोमधल्या रिकोह कोलिझियम इथ ही लढत झाली आणि कोलनन चौथ्या फेरीतच हॅरिसला नॉकआउट करून संपवल. हळू हळू कोलनच बॉक्सिंग करिअर आकार घेत होत. पण अशातच तो दुर्दैवी दिवस उजाडला.17 ऑक्टोबर 2015 ला त्याची व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स इथल्या ईगलबँक अरेना अंडरकार्ड लढतीत कोलनची टेरेल विल्यम्सशी फाईट ठरली. खरतर हि फाईट मुळात तिथल्या स्पर्धेच्या शेड्यूलचा भाग नव्हती, पण आंद्रे डिरेलन हा वैद्यकीय कारणास्तव ब्लेक कॅपेरेलोसोबतच्या लढाईतून बाहेर पडल्यामुळ अचानक ही फाईट ठरली. कोलनच्या व्हिव्हियन हॅरिसविरुद्धच्या शेवटच्या फाईटनंतर फक्त एक महिन्यानंतरच ही फाईट झाली.
( Story Of Prichard Colon | Vishaych Bhari)
पण तिथून पुढ एप्रिल २०१७ पर्यंत, कोलन persistent vegetative state या अवस्थेत गेला. या अव्स्थेत त्याला त्याच्या आजूबाजूला काय सुरुय हे समजत नव्हतं. 2017 मध्ये, प्रिचर्ड कोलनच्या आई वडिलांनी त्या match च्या रिंगसाइड डॉक्टर आणि रेफ्रींकडून 50 लाख डॉलर पेक्षा जास्त नुकसान भरपाईसाठी खटला दाखल केला . पण 2019 पर्यंत खटला निकाली निघाला नाही आता प्रिचर्ड कोलनची आई निवस कोलन यांचा सुद्धा असा विश्वास आहे की तो कधीच निकाली निघणार नाही. सप्टेंबर 2017 च्या मुलाखतीत, कोलनच्या दुखापतीबद्दल बोलताना त्याचा प्रतिस्पर्धी विल्यम्स म्हणाला कि मी प्रिचर्डसाठी दररोज प्रार्थना करतोय. त्यात मी कधीही खंड पडू देणार नाही. प्रिचर्डच्या बाबतीत जे घडल ते कोणाच्याही बाबतीत घडाव अस कोणालाही वाटत नाही. माझे सर्व बॉक्सर भाऊ आहेत. पण आजही विल्यम्सला मात्र कोलनच्या या अवस्थेसाठी जबाबदार पकडलं जात. जुलै 2018 मध्ये कोलनच्या आईन कोलनचा एक व्हिडिओ तिच्या Facebook वर पोस्ट केला. ज्यामध्ये तो शारीरिक उपचार घेताना आणि तोंडी orders ना प्रतिसाद देताना दिसतोय. पुढ त्याच्या आईन असही सांगितल की तो सध्या कॉम्प्युटर द्वारे कस communicate करायचं हे शिकतोय. नुकताच त्याच्या आईन एक व्हिडीओ सुद्धा शेअर केलाय ज्यात त्याची आई त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय. पण मंडळी एकूणच कोलन आता त्याच्या उपचारांना चांगलाच प्रतिसाद देतोय. लवकरच तो बराही होईल. पण त्याचा प्रवास मात्र वाटतोय तितका सोप्पा राहिलेला नाहीये.
( Story Of Prichard Colon | Vishaych Bhari)
त्याचं इथून पुढचं आयुष्य खडतर आहे.पण कोलननं अजूनही त्याचं फाईटिंग स्पिरीट सोडलेलं नाहीये. त्याच्या आई वडिलांना तर खूप मोठा सल्युटय कारण त्यांनी त्यांच्या आशा शेवटपर्यंत अजिबात सोडलेल्या नाहीयेत. त्याची आई तर प्रिचर्ड कोलनसाठी अहोरात्र प्रयत्न करतेय. बाकी प्रिचर्डन त्याची बेडवरची तर फाईट जिंकलीय असच आता म्हणाव लागेल. तो लवकरच पूर्णपणे बरा होईल हीच आशा आपण करूयात. त्याची फाईटिंग स्पिरीटची ही कहाणी नक्कीच अनेकांना प्रेरणा देईल ही खात्रीय ! बाकी तुम्हाला ही प्रिचर्ड कोलनची दर्दनाक कहाणी कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांग.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply