या पाच कारणामुळे Pitbull जातीचा कुत्रा चुकूनही घरी सांभाळू नये असं म्हणतात | Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari

कुत्रा, एकतर तुमच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय नायतर अतिशय रागाचा तरी.. पण कुत्रं पाळण हे आपल्या गावाकडं म्हणा किंवा शहराकडं म्हणा एकप्रकारे स्टेटस सिम्बॉलचाच विषय झालाय.. त्यात बी आता त्या कुत्र्यांच्या जातींवरून टस्सल सुरु झालीय.. पण ह्याच स्टेटस सिम्बॉल बनलेल्या कुत्र्याच्या एका आक्रमक जातीची काही काळापासून भयंकर चर्चाय.. म्हणजे बघा आपण कुत्र्याला अतिशय इमानदारी आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक मानतो. पण ह्या एका जातीच्या कुत्र्यांन मात्र त्याच्या मालकांवरच हल्ले करून त्यांना आपलं शिकारं बनवलयं.. ती कुत्र्याची जातंय पीटबुल.. तुम्हीही ह्या जातीचं नाव नक्कीच ऐकलंअसेल. 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला, सहा वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला, तरुणाच्या गुप्तांगावर हल्ला, त्याचबरोबर स्वतःच्याचं मालकावर हल्ला अशा किती तरी न्यूज मागच्या काही दिवसात पिटबूलच्या बाबतीत येऊन गेल्यात. कदाचित तुम्ही त्या बघितल्याही असतील. म्हणूनच आज आपण पिटबूल घरात सांभाळावा का नाही आणि तो कशामुळे असे हल्ले करतोय ? त्यामागची नेमकी कारण कायत ? घरी आपण कोणत्या जातीची कुत्री आणि कशी सांभाळायला हवीत ? सगळंच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत..

( Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari )

pitbull,pitbull dog,pitbull songs,pitbull attack,pitbull dog fight,pitbull kutta,pitbull fight,pitbull pitbull,pitbull vs rottweiler real fight,pitbull dog attack,pitbull ki video,pitbull vs tiger,pitbull puppy,pitbull vs street dog fight,dog race,dog race vishaych bhari,rajmudra dog race,ladu dog race,vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,पिटबुल डॉग रेस

तर सुरुवात करूया आपण पिटबुल ह्यो कोणत्या प्रकारचा कुत्रायं आणि तो इतका अग्रेसीव्ह का आहे इथपासून. मंडळी प्राणी हक्काचं संरक्षण करणाऱ्या PETA संस्थेनं गेल्या वर्षी जुलैमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी पिटबुल हे अतिशय धोकादायक जातीचं कुत्रं असल्याचं म्हटलं होतं. खरं तर त्याच्या आक्रमक स्वभावासाठीच लोकांनी पिटबूलला पाळायला सुरुवात केलीये. पण पिटबुल जातीच्या कुत्र्याची उत्पत्ती ‘बुल अँड बेअर बायटींग’ या खेळाच्या प्रकारातून झालीय. ‘बुल अँड बेअर बायटींग’ हा एक खेळ असून या खेळात कुत्र्याला एका बंदिस्त बैल किंवा अस्वलावर हल्ला करायला प्रवृत्त केलं जातं. ‘बुल अॅंड बेअर बायटींग’ हा इंग्लंडमधील एक धोकादायक खेळाचा प्रकार होता पण १८३५ मध्ये यां खेळावर बंदी घालण्यात आली.  तर बघा भटक्या आणि जखमी कुत्र्यांची काळजी घेणार्‍या ‘फ्रेंडिकोज’ या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करणार्‍या तंद्राली कुली यांनी ‘इंडियन एक्स्प्रेसला या वृत्तसंस्थेला सांगितलं होतं की, ‘पिटबुल’ हा शब्द सामान्यतः कुत्र्यांच्या चार वेगवेगळ्या जातींसाठी वापरला जातो. यामध्ये अमेरिकन पिटबुल टेरियर, स्टॅफोर्डशायर टेरियर, बुल टेरियर, आणि अमेरिकन बुली अशा कुत्र्यांचा समावेश होतो. आता मंडळी पिटबुल कुत्र्याची पैदास कशी झाली ?  तर बघा पिटबुल कुत्र्याची पैदास ही बुलडॉग आणि टेरियर्स या दोन जातींपासून करण्यात आलीयं.

( Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari )

त्यामुळ पिटबुल कुत्र्याकडे बुलडॉग या कुत्र्याची अफाट ताकदयं आणि टेरियरप्रमाण त्याच्यात जिद्द आणि दृढता भरलेलीय. दृढता म्हणजेचं त्या पिटबूलने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. म्हणजे त्यानं ठरवलं हे करायचं की ते केल्याशिवाय तो शांत होतं नाही अशी त्याची खासियतयं आणि या कुत्र्याची पैदासचं मुळात बैलांशी लढण्यासाठी करण्यात आली होती, असंही कुली यांनी सांगितलं. त्यासोबतच पाळीव प्राण्यांचे अभ्यासक एरॉन डिसिल्वा यांनी सांगितलं की, हरियाणाच्या काही भागांमध्ये होणाऱ्या कुत्र्यांच्या लढाईत पिटबुल्सचा वापर केला जातो. पिटबुल कुत्रा शक्तीशालीयं अस तिथल्या लोकांना वाटतं. त्यामुळचं भारतात आता या कुत्र्याचं स्थानिक पातळीवर प्रजनन घडवून आणलं जातयं. पण तरीसुद्धा भारतात पिटबुल्सची होणारी पैदास फारशी चांगली नसल्याचं मत डिसिल्वा यांनी व्यक्त केलंय. आता ह्याच्या पुढचा प्रश्न हा आहे की हे कुत्रे इतके आक्रमक का असतात ? तर मंडळी प्रत्येक कुत्र्याची जात ही वेगळी असते. आता बघा काही कुत्र्यांच्या जाती इतर प्राण्यांसोबत किंवा माणसांसोबत मैत्रीपूर्ण आणि अधिक नम्र असतात. काही कुत्र्यांना लोकांच्या सभोवताली राहायला आवडतं. तर काही कुत्रे लहान घरांमध्ये राहणं पसंत करतात. अगदी सेम तसच पिटबुल जातीच्या कुत्र्याचाही एक वैशिष्ट्यपूर्ण स्वभावयं आणि त्याचा तो स्वभाव रागीट, आक्रमक आणि दृढयं. तो स्वभाव त्याच्यात त्याला ज्या कुत्र्यांच्या क्रॉस मधून निर्माण केलाय त्यांच्या वैशिट्यानमधून आलाय. मंडळी डिसिल्वा यांच्या मते अलीकडच्या काळात लोकांना पिटबुल कुत्रा पाळण्याचं भलतंच वेड लागलंयं. घरात पिटबुलसारखा कुत्रा पाळणं त्या सांभाळणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना प्रतिष्ठेचं वाटू लागलंयं. पिटबूल ताकदवान आणि तंदुरुस्त असल्यानं लोक या कुत्र्याला विकत घेतात. पण या कुत्र्यांच्या गरजांकडं मात्र लोकांकडून फार दुर्लक्ष केलं जातं. अशा कुत्र्यांना बहुतेक लोक तर बांधूनचं ठेवतात. पण पिटबुल हे भयाण ताकद आणि भूक असलेलं कुत्रंयं. पण मालकांच्या अज्ञानामुळ या कुत्र्याची देखभाल नीट होत नाही.

( Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari )

pitbull,pitbull dog,pitbull songs,pitbull attack,pitbull dog fight,pitbull kutta,pitbull fight,pitbull pitbull,pitbull vs rottweiler real fight,pitbull dog attack,pitbull ki video,pitbull vs tiger,pitbull puppy,pitbull vs street dog fight,dog race,dog race vishaych bhari,rajmudra dog race,ladu dog race,vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,पिटबुल डॉग रेस

या कुत्र्यांना विशिष्ट प्रमाणात व्यायामाची आवश्यकता असते. पण त्यांना बांधून ठेवल्यान त्यांना व्यायाम मिळत नाही. परिणामी हे कुत्रे घातक किंवा आक्रमक होण्याची शक्यता असते. शिवाय अशा कुत्र्यांना योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाचीही आवश्यकता असते. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलं नाही की हे कुत्रे घातक ठरतात. त्यामुळं या कुत्र्यांच्या सवयिंकडे त्यांच्या गरजाँकडे लक्ष देणं फार महत्वाचंय.. मंडळी गाझियाबाद आणि गुडगावमध्ये ज्या घटना मागच्या काही काळात घडल्या होत्या त्या संबंधित कुत्र्यांच्या मालकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २८९ सह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेचा उल्लेखयं. कुत्र्याच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर आपल्या कुत्र्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत असेल, तर त्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मालकानं त्वरित पावलं उचलण आवश्यक आहे. कारण जर एखादी अशी दुर्घटना घडली तर याला कायद्याच्यादृष्टीन त्या कुत्र्याचा मालक जबाबदार आहे. मंडळी अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे. इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया या देशात आणि बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या काही तूरळक भागात हा कुत्रा पाळण्याला बंदी आहे. या देशांमध्ये पिट बुलचं संगोपन, व्यापार, प्रजनन या सगळ्यांवरतीच बंधन घालण्यात आलीयेत.

( Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari )

मंडळी अमेरिकेत पिटबूलच्या हल्ल्याची आकडेवारी तर भयानकयं. अमेरिकेतील एकूण कुत्र्यांच्या लोकसंख्येपैकी पिट बुल्सची संख्या केवळ 6 टक्के आहे, तर 68 टक्के लोक गेल्या 40 वर्षांत या पिटबूलच्या हल्ल्याचे बळी ठरलेयेत. खरंतर सगळा खेळ हा आपण त्यांना ट्रेन कसं करतोय यावरचं आहे. पण तरीसुद्धा यामध्ये छोटीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरवू शकते. म्हणून तर मंडळी बऱ्याच घटनांमध्ये कुत्रा दोषी नसून त्याचा मालक दोषी ठरतो. काही मोजक्याचं गोष्टी आहेत ज्या मालकानी आपला कुत्रा सांभाळताना कटाक्षान पाळल्या पाहिजेत. जसं की घरातील मादी किंवा नर कुत्र्याची नसबंदी झालीयं का हे चेक करा. नसेल झाली तर एकदा चांगल्या वेटरनरी डॉक्टरशी बोलून, कुत्र्याला दाखवून निर्णय घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या कुत्र्याला पुरेसा वेळ देताय का? त्याला फिरायला घेऊन जाताय का? त्याला व्यायाम मिळतोय का? हे ही प्रश्न एकदा स्वतःला विचारा. या प्रश्नांची उत्तर नकारात्मक असतील तर आजपासूनच स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. मंडळी तुमचा कुत्रा सोशलाईज होतोय का?  त्याला तुम्ही नवनवीन माणसांना भेटवताय का? नवनवीन आवाज, गाड्या, गर्दी, इतर प्राणी,पक्षी यांची त्याला सवय होते आहे का? आणि नसेल होत तर तुम्ही चुकताय. तुम्ही घरी आल्यावर कुत्रा जोरजोरात उड्या मारतोय, भुंकतोय, यात तुम्हाला अभिमान, कौतुक वाटत असेल तरीही तुम्ही चुकताय, कारण अश्या उड्या मारताना घरातल्या वस्तू फुटू शकतात, कोणाला इजा होऊ शकते, खुद्द कुत्र्यालाही दुखापत होऊ शकते. तेव्हा मंडळी सोशलाईज झालेला कुत्रा हा आदर्श कुत्रा ठरतो , तर घरात कोंडून ठेवलेला कुत्रा अधिक हिंस्र होतो. आता घरात कोंडून ठेवलेला कुत्रा चार भिंतीत तुमच्या काही गोष्टी ऐकेलही पण तो कुठे बाहेर नेताना तुम्हाला अधिक त्रास देईल.

( Pitbull Dog Attack Reality| Vishaych Bhari )

pitbull,pitbull dog,pitbull songs,pitbull attack,pitbull dog fight,pitbull kutta,pitbull fight,pitbull pitbull,pitbull vs rottweiler real fight,pitbull dog attack,pitbull ki video,pitbull vs tiger,pitbull puppy,pitbull vs street dog fight,dog race,dog race vishaych bhari,rajmudra dog race,ladu dog race,vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,पिटबुल डॉग रेस

म्हणून कुत्र्याला डॉमिनेट करून देऊ नका. तुम्ही घराचे प्रमुख आहात हे त्याला तुमच्या वागण्यातून दिसूद्या. सोबत काही पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ पुढे असंही म्हणतात कि, कुत्र्याला जेवण भरवू नका, ही अतिशय वाईट सवय आहे, त्याचं त्याला खाऊ द्या हा आता त्याचं जर योग्य असं वर्तन नसेल तर जबरदस्ती करण्यापेक्षा तो शांत झाल्यावर त्याला खायला द्या. खातानाही तुम्ही कमांड दिल्यावरच तो खाईल अश्या पद्धतीने त्याला ट्रेन करा. आता यात तुम्ही कोणत्याच प्रकारे तुमच्या कूत्र्यावर खरंतर जुलूम करत नाही. तर हे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि कुत्र्यासाठी महत्वाचं आहे.कारण कुठलाही कुत्रा हा उत्तम ट्रेनिंग आणि शिस्तप्रिय पालक या दोन गोष्टी मिळूनचं उत्कृष्ट बनू शकतो. पण जर असं झालं नाही तर लाखो रू. खर्च करून घेतलेला महागड्या जातीचा कुत्रा सुद्धा फेल जाऊ शकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे आक्रमक आणि बलदंड जातीचा कुत्रा घ्यायची हौस असेल तर मग तशी जबाबदारी पण घ्यायला हवी . एकूणच काय तर तुम्ही कुठल्याही जातीचा कुत्रा घ्या पण तुम्ही जर त्याला व्यवस्थित ट्रेन नाही केलं, त्याला योग्य सवय नाय लावली तर तो कुत्रा तुमच्यासाठी जीवघेणाचं ठरु शकतो. त्यामुळं काळजी घ्या. कुत्रे सांभाळताना त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या. शक्यतो आक्रमक कुत्रे संभाळायच्या नादी लागू नका. कारण मागे एका वर्षापूर्वी लखनऊमध्ये पिटबूलच्या हल्यातुन असाच एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुत्रे सांभाळताना नक्कीच शक्य ती सगळी काळजी घ्या. बाकी पिटबुल बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्ये मात्र आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. कुत्र्यासंदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कळवा. जर हि माहिती आवडली असेल तर लाईक आणि  शेअर करा.

या पाच कारणामुळे Pitbull जातीचा कुत्रा चुकूनही घरी सांभाळू नये | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *