परळी वैद्यनाथ कारखान्यावर 19 कोटींची जप्ती | Pankaja Munde यांना कोण संपवतंय | Vishaych Bhari


मंडळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयान मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विभागान मागे एप्रिल महिन्यातसुद्धा कारखान्यावर छापेमारीची कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा कारवाई झाल्यान राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलंय. मागे 6 महिन्यांपूर्वी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयान छापेमारी करून काही कागदपत्र तपासली होती. यामध्ये या कारखान्यान 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बुडवल्याच स्पष्ट झाल होतं. पण आता आजच्या या कारवाईमुळे पंकजा मुंडेंचं पंख नेमकं पडद्यामागं राहून कोण कापतंय का? अशी चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.‌. आता बऱ्याच दिवसापासून भाजपमधल्याही काही नेत्यांकडून त्यांना साईडलाईन केल्याचं बोललं जातं होतं. वेगवेगळ्या गोष्टीतून ते सिद्धही झालं होतं. पण मग अशावेळेस पंकजा मुंडेचं राजकीय करियर संपवण्याचा तर हा प्लॅन नाही ना अशी शंका नक्कीच पंकजा समर्थकांकडून व्यक्त केली जातेय. पण असं असेल तर मग पंकजा मुंडेना नेमक संपवतय कोण ? वैद्यनाथ कारखान्याच हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ? सगळंच सविस्तरपणे समजून घेऊयात
.

Pankaja Munde

(Pankaja Munde | vaijnath karkhana | Vishaych Bhari)

मंडळी छत्रपती संभाजीनगर इथल्या जीएसटी आयुक्तालयान वैद्यनाथ सहकारी साखर काखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय . या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. खरंतर केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी वैद्यनाथ साखर कारखान्याची बरेच दिवस झालं चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती. तर कारखान्यातली कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेल एक पत्रक सुद्धा जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या गेटवर नुकतंच लावण्यात आलय. या लावलेल्या पत्रकानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याच देखील जीएसटी विभागान म्हंटलय. केंद्रीय जीएसटी आयोगाच्या संभाजीनगर आयुक्त कार्यालयाच्या पथकान वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. पण या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्यान गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यात या कारखान्यान बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल होत. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात या कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी अस मिळून एकूण १९ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याच समजतय. मंडळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाण्याची स्थापना केली होती. या कारखान्यान कधीकाळी राज्यात सर्वाधिक ऊसाचं गाळप केल्याचं रेकॉर्ड आहे. याच कारखान्याच्या अंतर्गत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला घेतले होते. याच कारखान्यात तयार झालेली साखर कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना विकण्यात आली. मात्र त्याचा जीएसटी मात्र केंद्र सरकारकडे न भरल्यान जीएसटीचे अधिकारी थेट वैद्यनाथ कारखान्यात पोहोचले. जीएसटीचा नियम असा सांगतो की प्रत्येक महिन्याला जी साखर विक्री केली जाते त्याचा जीएसटी महिन्याच्या महिन्याला जमा करावा. परंतु जीएसटी भरला नसल्यान ही कारवाई करण्यात आली आहे

(Pankaja Munde | vaijnath karkhana | Vishaych Bhari)


मागेही या कारखान्याच युनियन बँकचं खात जुलै २०२१ मध्ये सील करण्यात आल होत. पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीन वैद्यनाथ कारखान्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली होती. पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मुकदम, ट्रक मालक आणि कामगार या सगळ्यांचच वेतन थकल्यामुळे कारखाना आर्थिक संकटात होता. या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांनी लगेचच प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या “हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्याला कुलूप लावलं आहे. कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. २०११ पासून कारखान्यातील सातत्याने झालेलं कमी उत्पादन, २०१३-१५ अशा तीन वर्षातील प्रचंड दुष्काळ, उसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत आहे. गोपीनाथ मुंडेंनाही तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रीय बँकांकडून अधिकच्या व्याजाने कर्ज घ्यावं लागलं. या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम आहे. ही सगळी तांत्रिक कारणं आहेत. सध्या कारखान्यात कोणीच कामं करत नाहीये , त्यामुळे मी स्वत: कुलूप उघडून त्यांना कागदपत्रे दिली आहेत. हा तपास नेमका कसला आहे? हेही मला माहीत नाही.याबाबत मलाही हळुहळू कळेल,” पण एकूणच आताच्या या कारवाईमुळे पंकजा मुंडेना राजकीयदृष्ट्या संपवायचा तर हा प्लॅन नाही ना असा प्रश्न पंकजा मुंडे समर्थकांमध्ये निर्माण झालाय. कारण याआधीही बऱ्याच वेळा पक्षान आणि पक्षातील नेत्यांनी त्यांना डॅमेज केलेलं दिसून आलंय. अगदी 2015 सालापासून ते आता 2023 पर्यंत टप्याटप्यान त्यांना साईडलाईन करण्यात आलंय. खरंतर मे 2015 मधलं पंकजा मुंडे यांच वक्तव्य त्यांच्या या राजकीय ऱ्हासाला कारणीभूत ठरलंय असं म्हणतात. त्या तेव्हा म्हणाल्या होत्या की मला मुख्यमंत्री होता आलं नसलं तरीही जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे. त्याचं हे वक्तव्य तस तर राज्य नेतृत्वालाचं आव्हान देणार होतं. तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. मंडळी 201५ ला पंकजा मुंडे मोठ्या मताधिक्यान विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तेंव्हा पक्षान त्यांना ग्रामविकास, महिला व बालकल्याण आणि जलसंधारण ही बडी खाती दिली होती.

Epfo office

(Pankaja Munde | vaijnath karkhana | Vishaych Bhari)

याचं काळात स्थानिक राजकारणातही त्यांनी बीडमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये विजयही खेचून आणला आणि गोपीनाथ मुंडेनंतर एक स्ट्रॉंग OBC नेता म्हणून त्या बीडमध्ये उदयाला आल्या. यामुळेच त्याकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे भाजपच्या प्रमुख राजकीय नेत्या म्हणून पुढं आल्या. गोपीनाथ मुंडेनंतर त्यांच्या प्रमुख राजकीय वारसदार, बीडच्या स्थानिक राजकारणतला त्यांचा मोठा दबदबा आणि मुंडेनंतर एक स्ट्रॉंग ओबीसी नेत्या म्हणून उदय अशा बऱ्याच कारणांमुळं त्यांच्या राजकीय महत्वकांक्षा वाढल्या असं त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं. पण यामुळे पंकजा मुंडे यांची राजकीय पॉवर वाढेल आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला टार्गेट करतील अशा विचारानं भाजपच्याच काही प्रमुख नेत्यांनी त्यांना संपवण्याचा प्लॅन केला असू शकतो असं बोललं गेलं. भाजप नेते आणि त्यांच्यातली धुसपूस काही लपून राहिलेली नाही. पण पंकजा मुंडे खुलेपणाने फार बोलल्या नाहीत. पण वेळोवेळी त्यांच्या समर्थकांकडून २०१९ च्या निवडणूकीतील पराभवासाठी फडणवीसांना जबाबदार धरलं जाऊ लागलं. आता मागच्या काही दिवसांपासुन पंकजा मुंडे बाजूला पडल्याचंच दिसून आलंय.‌ म्हणजे मराठवाड्यात फडणवीसांचा मागे जलआक्रो्श मोर्चा झाला पण तिथं पंकजा मुंडे यांना निमंत्रण नव्हतं. 2024 च्या निवडणुकासाठी संभाजीनगर इथं भाजप अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथही त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. विधानपरिषद असेल, राज्यसभा असेल प्रत्येक ठिकाणी त्यांना डावलण्यात आलं. उलट त्यांचे अंतर्गत राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या भागवत कराड आणि रमेश कराड यांना ही संधी देण्यात आली. पण आपण टप्प्यान टप्प्यान जर बघितलं तर त्यांच्या मुख्यमंत्री बणन्याच्या स्टेटमेंट पासूनच खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उत्तरंड लागली आहे. म्हणजे बघा 2015 साली त्यांच्यावर चिक्की घोटाळा प्रकरणी आरोप ठेवण्यात आला . त्यामुळे पक्षान पुढं त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं. त्यानंतर 2017 साली स्थानिक बाजार समितीही त्यांच्या हातून गेली आणि 2019 ला तर काय थेट आमदारकीच. पण त्यांच्या या पराभवाला भाजप नेत्यांनीच प्रयत्न केले होते अशी तेंव्हा बरीच चर्चा होती. तेंव्हा फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या मतभेदावर उघडपणे बोललं जाऊ लागलं होतं. पण आता परिस्थिती पुढे गेलीय. आणि लोकसभा विधानसभा तोंडावर आल्या असतानाच विरोधातले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सत्तेत बसलेत. आता बीडमध्ये आधी शरद पवार यांची सभा झाली तर त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तिथे उत्तरसभा घेतली. पण या दोन्ही नेत्यांवर प्रतिक्रिया न देता पंकजा मुंडे यांनी सेफ गेम खेळला. सगळ्याच बाजून त्यांची कोंडी झाल्यावर त्यांनी 2 महिन्याची राजकीय सुट्टी जाहीर केली. पण या सुट्टीत त्यांनी 11 दिवसांची शिवशक्ती यात्रा काढली .‌ आणि एकप्रकारे त्यांच राजकीय पूनरागमन करण्याचाच प्रयत्न केला.

(Pankaja Munde | vaijnath karkhana | Vishaych Bhari)


आता पंकजा मुंडेंच्या या देवदर्शन परिक्रमा दौर्‍यामुळे त्यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा झळाळी मिळालीये.‌ त्यांची बार्गेनिंग value वाढली आहे. त्या शरद पवार गटात जाऊ शकतात या चर्चा जोर धरू लागल्यात.‌सोबतच पंकजा मुंडेंना १० १५ आमदारांचा पाठिंबा असेल तर आम्हीही त्यांना पाठिंबा देत राज्यात वेगळी आघाडी काढू असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी म्हणलंय. पण पंकजा मुंडेनी हा देवदर्शन दौरा सुरू काढला म्हणून तर त्यांच्यावर कारवाई झाली असं बच्चू कडू महणाले. एकूणच बऱ्याचदा संधी असूनही पक्षान आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी 2019 च्या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करण टाळलं. त्यामुळंच या कारवाईदरम्यान पंकजा मुंडेना जाणून बुजून संपवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष काही लपून राहिलेला नाहीये. . पण मध्ये त्यांनी एकमेकातलं राजकीय वैर संपलं असं म्हणलं होतं. आता ते त्यांनी कितीही जाहीर केलं असलं तरी बीडच्या राजकारणात प्रमुख OBC चेहरा बनण्याची दोघांचीही महत्वाकांक्षा आहे. दोघांनाही राजकीय दृष्ट्या बीडमध्ये मजबूत बनायचंय .आता भाजपने यामुळेच कदाचित बीडमधून धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ केलंय. आता त्यामुळेच परळीतून धनंजय मुंडे हे महायुतीचा पुढचा चेहरा बनावे अशी भाजपचीच इच्छा आहे का? आजची कारवाई ही आर्थिक आहे की राजकीय ? पंकजा मुंडे या सगळ्यातून बाहेर पडत पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात आपला जम बसवू शकतील का? त्यांच्या आजच्या कारवाईमागं नेमका कोणाचा हात असू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

परळी वैद्यनाथ कारखान्यावर 19 कोटींची जप्ती | Pankaja Munde यांना कोण संपवतंय | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *