पॅन कार्ड क्लबनं 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | Pan Card Club Fraud | Refund Process


हर्षद मेहता, अब्दुल करीम तेलगी ,विजय माल्ल्या, नीरव मोदी या सगळ्यांनी केलेला स्कॅम सांगून झाला, महादेव बुक app आणि शेअर मार्केटचा fraud सांगून झाला, गेला बाजार चेन मार्केटिंगमध्ये पोरं कशी फसतात आणि पर्ल्स कंपनीनं सहा कोटी कुटुंब कशी उध्वस्त केली ते सुद्धा सांगून झालं. पण आता मागच्या काही दिवसांपासून आपल्या दर्शकांनी PCL fraud बद्दल माहिती सांगा म्हणून कमेंट करायला सुरवात केलीये. आता त्यो PCL fraud नेमका हाय काय याची आम्ही जेव्हा सखोल माहिती घेतली तेव्हा आम्हांला कळलं की ह्ये प्रकरण सुद्धा दिसतंय तेवढं सरळसोट नाय.

तब्बल 51 लाख लोकांना गंडा घालून PCL म्हणजेच pan कार्ड क्लबनं जवळपास सात हजार 35 कोटी रुपयांचा fraud केलाय.

तब्बल 51 लाख लोकांना गंडा घालून PCL म्हणजेच pan कार्ड क्लबनं जवळपास सात हजार 35 कोटी रुपयांचा fraud केलाय. पण लगा pan कार्ड क्लब ह्ये प्रकरण नेमकं हाय तरी काय आणि त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं कशी काय फसली  ?  ज्यांचे पैसे त्यात गुतलेत त्ये लोक त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी काय धडपड करतायत, चला सगळंच या Blog मधून नीट समजून घेवूयात,

PCL PAN CARD CLUB

(Pan Card Club Fraud | Refund Process)


मंडळी भारतात एक स्कॅम उघडा पडला की स्कॅमर लोक वेगवेगळ्या मार्गानं लोकांना गंडा घालण्याचे प्रकार शोधून काढतात. पण मोस्ट ऑफ स्कॅममध्ये लोकं पैशांची दामदुप्पट स्कीम आणि फॉरेन ट्रीपला बळी पडत्यात असं दिसून आलंय. लोकांच्या त्याचं मानसिकतेचा अभ्यास करून पोन्झी स्कीमसारखी एक खतरनाक योजना घेऊन १९९० साली एक कंपनी भारतात establish झाली. तिचं नाव होतं pan कार्ड क्लब. त्या कंपनीच्या मूळ मालकांबद्दल माध्यमांमध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रामानोरा प्रोडक्शन या यु ट्यूब चॅनेलवर त्या कंपनीच्या दहा वर्षांपूर्वीच्या एका प्रमोशनल जाहिरातीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये या सहा मराठी कलाकारांनी काम केलंय. त्या जाहिरातीत त्या कलाकारांनी pan कार्ड क्लब कंपनी कशी काम करते आणि कंपनीचे चेअरमन कोण आहेत याच्याविषयी भाष्य केलंय. त्यात त्यांनी सुधीर मोरवेकर नावाच्या एका माणसाचं नाव घेतलंय. ज्यामध्ये ते असं सांगतायत की त्या माणसानं अतिशय गरीब परिस्थितीमधून पुढं येत ही कंपनी उभी केली होती अन तसंच यश कुणीही ही या कंपनीद्वारे प्राप्त करू शकतो. आता त्या नावाला दुजोरा देणारा आणखी एक दुवा म्हणजे insider biz आणि क्विक कंपनी डॉट इन या दोन वेबसाईट. कारण त्या वेबसाईटवर pan कार्ड क्लब कंपनीच्या ६ डिरेक्टर्रस ऑफ management ची नावं दिलेली आहेत. ती अशी मनीष कालिदास गांधी, सुधीर शंकर मोरवेकर, चंद्रसेन भिसे रामचंद्रन रामाकृष्णन, शोभा रत्नाकर बर्डे आणि उषा अरुण तारी.  आणि त्या कंपनीचं मुख्य रजिस्टर्ड ऑफिस ह्ये मुंबईच्या प्रभादेवी मध्ये असल्याचं ही वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय.

(Pan Card Club Fraud | Refund Process)

पण मंडळी 2017 मध्येचं pcl चे फाऊंडर आणि चेअरमन सुधीर मोरवेकर या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी आली होती. असो, तर १९९७ साली कंपनी सुरु झाल्यापासून तिच्याबद्दल कंपनीच्या संचालकांकडून असं सांगण्यात येत होतं की, पॅनकार्ड क्लब लिमिटेड ही कंपनी मुंबई शेअर बाजारातील पॅनारॉमिक समुहाचा एक भाग आहे. तसच त्या कंपनीच्या मालकीची भारत, अमेरिका, न्युजीलंड अशा काही ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. पण ज्या लोकांची Pan कार्ड क्लब मध्ये गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाली त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की कंपनीच्या मालकीची तशी कोणतीही हॉटेल्स किंवा रिसोर्ट्स परदेशात नव्हती. दरम्यान एका गुंतवणूकदारानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की pan कार्ड क्लब मार्फत लोकांना दोन हॉलिडे स्कीम प्रोव्हायड केल्या जात होत्या. त्यापैकी एक होती पॅनारॉमिक हॉलिडेज अन दुसरी होती मॅजिक हॉलिडेज. त्या दोन्ही स्कीममार्फत कंपनी लोकांना advance मध्ये रूम बुक करण्याची facility प्रोव्हायड करून द्यायची. त्यांचे एजंट आम्हांला असं सांगायचे की तुम्ही कंपनीत पैसे गुंतवून बुक केलेली रूम वापरली नाही तर तुम्हांला तुमच्या पैशावर तीन वर्षात ५० टक्के तर सहा वर्षात शंभर टक्के रिटर्न मिळणार. काही जणांना तर त्यांनी नऊ वर्षासाठी १५० ते २०० टक्के रिटर्न द्यायचं ही कबूल केलं होतं. दरम्यान तुम्ही बुक केलेल्या रुमवर तुम्हाला इंटरेस्ट मिळत राहील आणि त्यामुळं तुमचे पैसे आमच्याकडं सुरक्षित राहतील असंही त्यांचं म्हणणं होतं. तसच तुम्ही आपल्या देशात किंवा परदेशात बुक केलेली रूम तुमच्या हॉलिडेसाठी, लग्नसमारंभासाठी, बिजनेस मीटिंगसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यासाठी तुम्ही वापरू शकता अशीही कपंनी ऑफर द्यायची. जर कुणाला कंपनीसाठी काम करायचं असेल तर मार्केटिंग कामाचा अनुभव असणारा कोणताही १२ वी पास माणूस कंपनीसोबत काम करू शकतो. फक्त त्यानं अधिकाधिक माणसांना कंपनीसोबत जोडायचं, त्यांना कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला लावायची अन असं करून संबधित माणसानं त्याचं टार्गेट पूर्ण केलं तर त्याला कंपनी मोफत परदेशवारी करून आणणार.

PCL PAN CARD CLUB

(Pan Card Club Fraud | Refund Process)


एकूण अशा पद्धतीनं कंपनी लोकांना तुम्हाला खोऱ्यानं पैसे मिळणारेत असं पटवून देत होती अन लोकं त्यत अडकत होती. फसवणूक झालेल्या काही गुंतवणूकदारांनी माध्यमांना सांगितलं की आम्हाला कंपनीनं बुक केलेल्या रुमांमध्ये इंटरेस्ट नव्हता. तर आम्ही गुंतवलेल्या पैशांवर जो ५० टक्के, १०० टक्के रिटर्न मिळत होता, त्याच्यात आम्हाला जास्त रस होता. म्हणून आम्ही PCL मध्ये पैसे गुंतवले. सुरुवातीला ज्या ज्या लोकांनी कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली त्यांना pan कार्ड क्लबकडून चांगले रिटर्न दिले गेले त्यामुळं लोकांना असा विश्वास बसला की पुढं जाऊन ही कंपनी त्यांच्या कस्टमर्सना चांगला रिटर्न देत राहील. त्यामुळं लोकांच्यात pan कार्ड क्लबबद्दल एकप्रकारे मोठं आकर्षण तयार झालं होतं. कंपनीची माऊथ पब्लिसिटी जबरदस्त होती. दरम्यान पुढं जाऊन कंपनीनं एजंट सिस्टीम सुरु केली अन त्यांना भरघोस कमिशन आणि फॉरेन ट्रीपचं गाजर दाखवून आणखी लोकांना जोडण्यास सांगितलं. त्याचा कंपनीला चांगला रिजल्ट मिळाला. नंतर कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या सिटीजमध्ये जाऊन तिथल्या हॉटेल्स आणि रिसॉर्टवर सेमिनार, मीटींग्ज आयोजित केल्या. त्या मीटींग्ज आणि सेमिनारमध्ये त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना अलिशान घरं, लक्झरी कार्स यांची स्वप्नं दाखवली. मीटिंग्जमध्ये कंपनीची माणसं असं सांगायची की ज्या ज्या लोकांनी आधी आमची हॉलिडेज पॅकेजेस घेतलीयेत ते आता त्यांच्या स्वतःच्या ऑडी अन मर्सिडीजमधून फिरतायत. त्ये ऐकून लोकांना हुरूप यायचा आणि लोकं PCL मध्ये पैसे गुंतवायला तयार व्हायचे. याचा सगळ्यात जास्त प्रभाव होता गावाकडच्या लोकांवर. त्या भोळ्या भाबड्या लोकांनी मग दुप्पट तिप्पट पैशांच्या अमिषानं अगदी हजार दोन हजार रुपयांपासून कंपनीत पैसे गुंतवले. एवढचं नाही तर अधिकाधिक कमिशन मिळेल यासाठी त्यांनी आपले नातेवाईक, पै पाहुणे यांनाही PCL मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितलं. बघता बघता 51 लाख पंचावन्न हजार पाचशे सोळा लोकांनी pan कार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली. Maharashtra, Goa, Gujarat, Haryana, Madhya Pradesh, Rajasthan, Kerala, Karnataka, Tamil Nadu, Uttarakhand, and West बंगाल यांसारख्या राज्यात हे पॅन कार्ड क्लबचं जाळं पसरलं होतं.

(Pan Card Club Fraud | Refund Process)

पुढं जाऊन अनेक सेलेब्रिटी लोकांना घेऊन PCL ने मोठ्या जाहिराती ही करायला सुरुवात केली. Pan कार्ड क्लबची ग्रोथ भयानक होती. दरम्यान एक प्रसिद्ध न्यूजसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, २००२ ते २०१४ या काळात कंपनीनं सात हजार कोटी रुपयांच्या आसपास पैशांची जमवाजमव करून अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज खरेदी केल्या होत्या. पण नंतर एक घटना घडली. पुणे, मुंबईतील ज्या ज्या लोकांची तीन वर्ष, सहा वर्ष किंवा नऊ वर्षे मुदत पूर्ण झाली होती त्यांनी आपली दामदुप्पट रक्कम रिटर्न घेण्यासाठी pan कार्ड क्लबचं ऑफिस गाठलं. पण तिथं गेल्यावर काही जणांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तर काही जणांना पैशांचे चेक दिले पण बँकेत गेल्यावर ते चेक बाऊन्स झाले. तेव्हा अनेकांना कळलं की आपल्यासोबत धोका झालाय. मग लोकांनी तातडीनं कायद्याचा आधार घेत pan कार्ड क्लबविरुद्ध तक्रारी दाखल करायला सुरुवात केली. देशभरातून जवळपास चार पाच हजार तक्रारी आल्यावर मग सेबीची त्या प्रकरणी एन्ट्री झाली. 2012 साली गुंतवणुकदारांना परतावा मिळत नसल्यानं ठिकठिकाणी आंदोलनं ही करण्यात आली होती. भव्य मोर्चा काढून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. पुढं अनेक तक्रारीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी pcl ला धारेवर धरलं. सेबी आणि तक्रारदारांनी मिळून कंपनीला लवादात खेचलं. तेव्हा असं निदर्शनास आलं की गुंतवणुकदारांकडून मिळालेल्या कोट्यावधी रुपयांतून पॅन कार्ड क्लबनं विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केलीय. राज्यातील जवळपास 52 लाख गुंतवणूकदारांना त्या घोटाळ्याची झळ सोसावी लागलीय आणि त्या घोटाळ्याची रक्कम 7035 कोटी इतकी आहे. तेव्हा लवादानं सेबीला त्या पॅनकार्ड क्लबची सगळी मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सेबीनही दिलेल्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव सुरू केला. मात्र, तो लिलाव मूळ किमतीपेक्षा कमी दरात केला जात असल्याचं काही गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं. त्या विरोधात मग राघवेंद्र मोघावेरा यांनी हायकोर्टात धाव घेत त्या विरोधात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ठाणे आणि गोव्यातील मालमत्तेचा मूळ किमतीपेक्षा ही कमी किंमतीत लिलाव केल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळं सेबीनं केलेल्या लिलावांवर आक्षेप घेऊन ते लिलाव तात्काळ थांबवण्यात यावेत अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली होती. दरम्यान त्या मालमत्तेच्या मुल्यांकनाचा अहवाल सादर करावा अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.

SEBI

(Pan Card Club Fraud | Refund Process)


पुढं मग 2017 साली पॅनकार्ड क्लबच्या अन्य सात योजनांमध्ये नव्यानं गुंतवणूक करण्यावर सेबीकडून मर्यादा घालण्यात आली आणि SAT ने पॅन कार्ड क्लब बंद करण्याचे आदेश दिले. त्याप्रकरणी जवळपास 334 बँक खाती फ्रीझ करण्यात आली होती.  त्यानंतर, कंपनीचे सर्व व्यवहार गोत्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या एकूण 68 मालमत्तांपैकी काही मालमत्ता परदेशातही असल्याची माहिती आहे. त्यापैकी काही मालमत्तेचा सेबीकडून लिलाव करण्यात आला होता पण याचिकाकर्त्यांच्या मागणीनंतर लवादानं जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावावर स्थगिती आणल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान सेबीनंतर ईओडब्ल्यू म्हणजेचं आर्थिक गुन्हे शाखेनं ही पॅनकार्ड क्लब्सच्या मुसक्या आवळल्या होत्या. ईओडब्ल्यूनं कंपनीच्या सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला होता. ईओडब्ल्यूच्या तपासात प्रभादेवीमधलं कंपनीचं कार्यालय बंद असल्याची बाब समोर आली होती.  त्यामुळं ईओडब्ल्यूनं भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुढं पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीचं त्ये सगळं प्रकरण National Company of Law Tribunal म्हणजेचं NCLT कडे सोपवण्यात आलं. नंतर मग 26 मार्च 2021 रोजी, SEBI ने PCL आणि त्याच्या स्वतंत्र व गैर-कार्यकारी संचालकांना 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. ऑगस्ट 2021 रोजी, मुंबई उच्च न्यायालयानं पॅनकार्ड क्लबच्या शोभा बर्डे आणि चंद्रसेन भिसे या दोन संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. 17 ऑगस्ट 2022 रोजी, सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसनं PCL कंपनीविरोधी एक अर्ज नोंदवला पण NCLT नं तो ऐकून घेतला नाही. पुढं NCLT ने  एक समिती नेमून गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न करण्यासाठी प्रोसेस सुरू केली.

(Pan Card Club Fraud | Refund Process)

हे पण विषय भारी वाच भाऊ

एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund |PACL Refund Status

करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality

लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam

Narendra Modi आल्यापासून Adani यांच्या संपत्तीत खरोखर शंभरपटीने वाढ झालीय का | Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari

(Pan Card Club Fraud | Refund Process)

त्यासाठी मागच्या वर्षी लोकसत्ता पेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांना त्यांच्या गुंतवणूकीच्या पुराव्यासह क्लेम अर्ज भरण्याचं आव्हान करण्यात आलं होतं. 10 डिसेंबर 2022 त्या अर्जाची शेवटची तारीख होती आणि योग्य पडताळणीनंतरचं परताव्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. पण अद्याप ती प्रक्रिया सुरू झालं नसल्याचं गुंतवणूकदारांकडून सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, NCLT पडताळणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करत असल्याचं बोललं जातंय. त्यानंतरचं गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे रिटर्न भेटण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी सर्वाना आशा आहे. पण त्यासाठी गुंतवणूकदारांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज भरलेला असणं आवश्यक असल्याचं सांगण्यात येतंय. मंडळी जगातील कुठलीचं संस्था तुम्हाला वार्षिक सरासरी ८ ते १२ टक्क्यांच्यावर परतावा देऊ शकत नाही अन हे गुंतवणूकदारांनी आधी व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे असं मत वेळोवेळी आर्थिक तज्ञाकडून व्यक्त केलं जातं पण आपल्यात आर्थिक गोष्टीची जागरूकता निर्माण झाली नसल्यामुळं बरेच लोकं अशा फ्रॉडला बळी पडत आहेत. असो, तुम्हाला पॅन कार्ड क्लबची माहिती कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Pan Card Clubने 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | PanCard Club Refund Process

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *