दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | Maharashtra Kesari Laxman Wadar Kusti

मित्रांनो कर्तृत्ववान व्यक्तीचं कर्तृत्व हे त्यांच्या संघर्षान सिद्ध झालेल असत. जितका संघर्ष मोठा तितक यश मोठ. पण या अतिशय कष्टदायक संघर्षात टिकायला मात्र वाघाच काळीज लागत. बिकट परिस्थिती असली तरी वाघासारखी झुंज द्यायला लागते. असाच धगधगता संघर्ष करून, वेळप्रसंगी दगड फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या वडार समाजातील पै. लक्षमण वडार यांची हि गोष्ट आज आपण बघणार आहोत…

( Maharashtra Kesari Laxman Wadar Kusti )

kusti,
laxman wadar,
pailwan,
vishaych bhari kusti
lakshman wadar,
pailwan laxman wadar,
pai lakshman wadar
maharashtra kesari
महाराष्ट्र केसरी 
लक्ष्मण वडार
Maharashtra Kesari Laxman Wadar Kusti

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले या गावात एका वडार समाजातील कुटुंबात पै. लक्षमण वडार यांचा जन्म झाला. दगडी फोडणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. त्यांचे वडील श्रीपती वडार हे जोतिबाच्या डोंगरावर दगडाच्या खाणीत काम करायचे. परिस्थिती बेताची असल्याकारणाने पोटाची खळगी भरता यावी म्हणून लहानपणी लक्ष्मणरावानाही दगडी फोडण्यासाठी जोतिबाच्या डोंगरावर जायला लागायचं. खेळा बागडायाच्या वयात आपल्या हातात भला मोठा हातोडा घेऊन लक्ष्मण वडार दगडी फोडायचे. लहान वयातचं मोठा हातोडा टणक दगडांवर मारून मारून त्यांचे शरीर सुद्धा दगडासारखे कठीण झाले होते. मग पुढे दगडासारखं शरीर झालेल्या लक्ष्मण वडार यांना पैलवान व्हायची स्वप्न पडू लागली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गावातल्या टेलरकडून लंगोट शिवून घेतला आणि गावच्याच जय हनुमान तालमीत कुस्ती खेळण्यासाठी आपलं पहिलं पाऊल ठेवलं. पण गावचे लोक मात्र लक्ष्मण वडार आणि त्यांच्या वडिलांवर हसु लागले. गावच्या लोकांनी त्या दोघांनाही वेड्यात काढलं.


“आरं लेका पैलवान सांभाळायचं एवढ सोप वाटलं का… पैलवान पोसायचा म्हंजी हत्ती पोसण्यासारख हाय.. लक्ष्मणला पैलवान करण्याएवढा पैसा हाय का तुझ्याकड… हे नसत खूळ डोक्यातनं काढ ” असा सल्ला ही काही लोकांनी लक्ष्मणच्या वडिलांना दिला.


पण लक्ष्मणराव काही केल्या ऐकायला तयार नव्हते. काही झालं तरी कुस्ती सोडायची नाही ही त्यांची जिद्द होती. मग अखेरीस पोराच्या हट्टापुढ वडिलांनी हात टेकले. मग मिळेल ती शिळी भाकरी खाऊन लक्ष्मण वडार सराव करू लागले. कुठला ही पैलवानकीचा खुराक नसताना ही गावातल्या चांगल्या खात्या पित्या घरच्या पोरांना तालमीत लक्ष्मणराव आस्मान दाखवायला लागले. पोराचा खेळ बघून मग मात्र त्यांच्या वडिलांनी पण त्यांना कोल्हापूरच्या काळा इमाम तालमीत कुस्तीचा सराव करण्यासाठी पाठवून दिलं. लक्ष्मण केर्ले इथं रहायचे. दिवसभर ते जोतिबाच्या डोंगरावर दगडी फोडायचं काम करायचे आणि मग केर्ले ते कोल्हापूर हे १४ किलोमीटरचं अंतर धावत जाऊन तालीम गाठायचे. रक्ताचं पाणी करत तालीम करणाऱ्या या मेहनती पोराकड मग काळा इमाम तालमीचे वस्ताद मन्नू कोळी यांनी ही विशेष लक्ष दिल. त्याला कुस्तीचं तंत्र शिकवलं. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, जिद्द याच्या जोरावर मग लक्ष्मण वडार यांनी अल्पावधीतच कुस्तीच तंत्र अवगत केलं. दिवसेंदिवस लक्ष्मण यांचा खेळ बहरायला लागला. लक्ष्मणरावांचं कुस्तीत हळूहळू नाव होऊ लागलं. पण त्यांच्या कारकिर्दीला खरे चार चांद लागले ते १९७२ सालच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत.

kusti,
laxman wadar,
pailwan,
vishaych bhari kusti
lakshman wadar,
pailwan laxman wadar,
pai lakshman wadar
maharashtra kesari
महाराष्ट्र केसरी 
लक्ष्मण वडार
Maharashtra Kesari Laxman Wadar Kusti


त्यावर्षी खासबाग मैदान येथे भरवलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी वर्ध्याच्या मोहनसिंग भिसे यांना हरवून थेट महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. लक्ष्मण राव एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढच्याचं वर्षी अकोलयात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पण त्यांनी अहमदनगरच्या रघुनाथ पवार या पैलवानाला पराभूत करून डबल महाराष्ट्र केसरी होन्याचा बहुमान मिळवला.

पुढे महान भारत केसरी दादू मामा चौघुले, सांगलीचे आमदार आणि कुस्तीशेत्रात बिजली मल्ल अशी ओळख असणारे पैलवान संभाजी पवार, पैलवान गुलाब बरडे, या त्या काळच्या टाॅपच्या मल्लासोबत त्यांच्या कुस्त्या झाल्या. इतकंच काय तर सत्पालसिंग सारख्या उत्तरेच्या मोठ्या पैल्वानासोबत पण त्यांनी पस्तीस मिनिट झुंज दिली. सतपालसिंग सारख्या वादळा सोबत 35 मिनिटे लढणे म्हणजे काय खायचं काम नव्हत. कारण काही मिनिटातच निकाल लावण्यात त्यावेळी सत्पाल माहीर होता.

खरतर पैलवान लक्ष्मण वडार यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक कुस्त्या गाजवल्या पण १९८४ साला नंतर मात्र पै. लक्षमण वडार यांची जोड कमी झाल्यान त्यांना कुस्त्या मिळण बंद झालं आणि त्यांच्या प्रगतीला उतरती कळा लागली. कुस्त्या मिळत नसल्यान त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्याना पुन्हा एकदा नाईलाजास्तव पोटाची खळगी भरण्यासाठी हातात हातोडा घ्यावा लागला. डबल महाराष्ट्र केसरी होऊनसुद्धा लक्षमण वडार पुन्हा एकदा दगड फोडू लागले. त्यांची परिस्तिथी इतकी बिकट झाली होती कि त्यांनी एक वेळेस आपली महाराष्ट्र केसरीची गदा पण विकायला काढली. अशा या महान मल्लाची २७ ऑक्टोबर २०१३ साली हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत माळवली अन सगळं कोल्हापूर धाय मोकलून रडलं. तर मित्रानो महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार यांचा हा कुस्तीप्रवास तुम्हांला कसा वाटला ते आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद !!

दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | Maharashtra Kesari Laxman Wadar

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *