धाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari


मंडळी, आपण आजपर्यंत सातारा,माढा, शिरूर, हिंगोली, कोल्हापूर,अमरावती, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमका कुठला नेता पावरफूलंय, याची माहिती घेतली. तसेच २०२४ च्या निवडणूकीत नेमका कुठला नेता त्या संबंधित मतदारसंघातून खासदार होऊ शकतो,याचाही ताकदीच्या निकषावर तुमच्या पुढे अंदाज बांधला. ज्याला अर्थातच तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.‌ असो तर आज आपण धाराशिव या अजून एका महत्त्वाच्या मतदारस़घाबदृदल माहिती घेणार आहोत. म्हणजे इथून नेमकं कोण पावरफूलंय. ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर की मग भाजपचे राणा जगजीत सिंह पाटील.‌चला इन डिटेल मध्ये या मतदारसंघाच्या मुळापर्यंत जाऊ.‌

Omraje Nimbalkar ,
Rana Jagjit Sinha Patil

(Omraje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari)

धाराशिव मतदारसंघात निंबाळकर vs पाटील ही खडाजंगी कायम पहायला मिळते. पवनराजे निंबाळकर आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यात सुरूवातीला स्नेहाचे संबंध होते. ‌ पण नंतर त्यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले.‌आणि शेवटी तर पवनराजे यांचा दुर्दैवाने खून झाला. पवन राजेंच्या खूनाचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. आणि तिथूनच इथं पाटील vs निंबाळकर ही rivalary सुरू झाली. आपण त्याच्यावर आधीच एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पहायला मिळेल. आता मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओमराजे नाईक निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजीत सिंग पाटील यांच्यातील खडाजंगी तुम्ही पाहिली असेल.‌ ओमराजे इथून सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या तापट स्वभावामुळं ,फिटनेसमुळं किंवा भाषणातील कार्यकर्त्यांच्या एखाद्या गाडीच्या जॅकच्या किस्यामुळं. पण दुसर्‍या बाजूला राणा जगजीत सिंग देखील इथून आक्रमक असे नेते मानण्यात येतात ‌ . पण आता या दोन्ही नेत्यांमध्ये actualy कोण पावरफुलय .‌तसेच येणारी २०२४ ची निवडणूक कोण जिंकू शकतं? तर बघा, ओमराजे नाईक निंबाळकर हे इथून ठाकरे गटाचे सीटिंग खासदार आहेत. त्यांनी २०१९ ला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेल्या राणा जगजीत सिंग पाटील यांचा तब्बल.१२७५६६… मतांनी पराभव कैला होता.वंचितच्या व्होट डिव्हीजनमुळे इथे राणा जगजीत सिंग यांचा खेळ बिघडला.खरंतर प्रसिद्धी,लोकसंपर्क,आक्रमकता आणि लोकांची अचूक नस पकडणे हा खासदार ओमराजेंचा मेन युएसपी आहे. त्यामुळे तेच २०२४ साठी इथून strong candidate आहेत. शिवाय महाविकास आघाडी म्हणून फाईट झाली तर पवार आणि ठाकरेंची सहानुभूती हा factor ही ओमराजेंसाठी इथं अतिशय पोषक ठरणार आहे. पण दुसरीकडे राणा जगजीत सिंग हे सुद्धा आक्रमक नेते आहेत.‌त्यामुळे ही फाईट नक्कीच टफ असणार आहे. आता आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा विचार करू.‌तर बघा या लोकसभा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील,तुळजापूर,परांडा, धाराशिव आणि उमरगा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो. आता आपण लोकसभेबद्दल बोललो पण तिथं विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकं कसं बलाबल आहे ते एकदा पाहूयात.

(Omraje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari)

सूरूवात आपण धाराशिव विधानसभा मतदारसंघापासूनच करूयात.तर बघा ठाकरे गटाचे कैलास घाडगे पाटील हे इथून आमदार आहेत. त्यांनी २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय निंबाळकर यांचा १३४६७ मतांनी पराभव केला होता.‌आता हे कैलास घाडगे तेच जे शिंदे गटासोबत सूरतला गेले होते मात्र त्यांनी आणि आमदार नितीन नांदगावकर यांनी आपल्याला फसवून तिकडं नेलं असल्याचं मागाहून सांगितलं होतं. असो तर कैलास घाडगे पाटील हे अतिशय मितभाषी आमदार आहेत. त्यांची political छबी उत्तम आहे. आता महाविकास आघाडी असल्याने तसेच ते ओमराजेंचे जवळचे मित्रही असल्याने इथून कैलास घाडगे पाटील हे ओमराजेंच्या मागे पाठबळ उभे करतील. पण आता इथून भाजप ,शिंदे गट मात्र राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मागे राहण्याचीच शक्यता व्यक्त करण्यात येतेय. इथून राणा जगजीत सिंग पाटील हे २०१९ लोकसभेला राष्ट्रवादीतून उभे होते. शिवाय पद्मसिंह पाटील यांचं राजकारणही राष्ट्रवादी पक्षातून उभं राहिलंय. त्यामुळे पाटील घराण्याला ती राष्ट्रवादीची मोट भाजपच्या दिशेने वळवता येतेय किंवा मग इथं पद्मसिंह पाटील vs शरद पवार या factor मध्ये शरद पवार element उजवा ठरतोय का, हे देखील आपल्याला पहावं लागेल. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे. तुळजापूर. .इथे भाजपचे राणा जगजीत सिंह पाटील आमदार आहेत. त्यांनी २०१९ ला कांग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा तब्बल २३१६९ मतांनी पराभव केला होता. आता मधुकर चव्हाण हे इथून २००९ ,२०१४ साली निवडून आले होते. पण २०१९ ला त्यांचा पराभव झाला. आता राणा जगजीत सिंग हे जरी इथून आमदार असले तरीही त्याअगोदर त्यांचा लोकसभेला ओमराजे निंबाळकरांकडून मोठ्या मार्जिनने पराभव झाला होता. पण मग त्यांनी विधानसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

PADMASINH PATIL,
 SHARAD PAWAR,

(Omraje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari)


आणि निवडणूक लढवली. त्यात त्यांना अखेर यश आलं .आता लोकसभेला पुन्हा राणा जगजीत सिंग उभे राहिले किंवा मग पाटील घरातलं कुणी दुसरं उभं राहिलं तर त्याला राणा जगजीतसिंह पाठिंबा देतील.‌ पण इथं मधुकर चव्हाण अधिक ओमराजेंच्या तगड्या विरोधाला, राणा जगजीतसिंहाना भेदावं लागेल. तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे. परांडा.परांडा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत,
तानाजी सावंत. त्यांनी २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोते यांचा तब्बल ३२९०२ मतांनी पराभव केला होता. आता या लीड वरून तानाजी सावंत हे परांड्यातून किती strong candidate आहेत हे आपल्याला कळलं असेल. पण त्यांच्या शिंदे गटात जाण्यावरून जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला होता. तेव्हा त्यांना या गोष्टीचा इथे किती फटका बसतोय हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. एकूणच तानाजी सावंत इथून तगडे प्लेयर आहेत. ते राणा जगजीतसिंह यांच्या मागे ताकद पुरवू शकतात. पण चर्चा अशीही आहे की ही जागा शिंदे गटाला मिळावी अशीही पक्षाची तिथे भुमिका आहे. आता नेमकं तिथे काय घडतंय ते काही काळात कळेलच. पण इथून ओमराजेंना मतांसाठी तीव्र संघर्ष करावा लागू शकतो. पण इथली शिंदे गटाची मतं ठाकरेंच्या सहानुभूती च्या मुद्यावर फिरवण्यात जर ओमराजे यशस्वी ठरले तर फायनल व्होट कांऊटिंगला त्याचा त्यांना निर्णायकी फायदा होऊ शकतो. त्यांच्या साठी एक गोष्ट फायदेशीर आहे आणि ती म्हणजे गेल्या वेळीं इथून विरोधात असलेली राष्ट्रवादी इथून मविआ म्हणून सोबत असेल. चौथा मतदारसंघ आहे , उमरगा.उमरग्यातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत. त्यांनी मागे शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता ज्ञानराज चौगुले यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दत्ता भालेराव यांना तब्बल २५५८६ मतांनी हरवलं होतं . आता इथूनही ज्ञानराज चौगुलेंविरूद्ध वातावरण करायला ओमराजे यशस्वी झाले तर मग शिवसैनिकांची मतं ओमराजेंच्या दिशेने वळतील. तर इथून कांग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबाही ओमराजेंसाठी महत्वाचा असा ठरू शकतो. पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे, औसा. हा मतदारसंघ लातूर जिल्ह्यात येतो. इथून भाजपचे अभिमन्यू पवार है आमदार आहेत.‌त्यांनी कांग्रेसच्या बसवराज पाटील यांचा २६,७१४ मतांनी पराभव केला होता.‌आता बसवराज पाटील हे इथून कांग्रेसचे strong नेतै मानले जातात. ते माजी मंत्रीही राहिलेत. विलासराव देशमुखांच्या राजकारणाचा त्यांच्यावर प्रभाव आहे ‌. म्हणून तर अमित देशमुख यांनी या मतदारसंघात आता विशेष लक्ष घातले आहे ‌

(Omraje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari)

.धाराशिवमध्ये त्यांनी अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकही घेतलीय. बसवराज पाटील यांना पुढील लोकसभा इलेक्शनला मविआ तर्फे तिकीट मिळावं अशी अमित देशमुख यांची मागणी आहे. पण आता ओमराजेंना बाजूला करून मविआ कांग्रेसला इथून तिकीट देईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात लिंगायत मतांना grab करण्याची बसवराज पाटील यांची क्षमता हा कांग्रेसचा जागावाटप बार्गेनिंग मधला युएसपी आहे. पण प्रश्न हा उरतो की जर मविआचं तिकीट ओमराजेनाच मिळालं तर मग बसवराज पाटील किंवा आमित देशमुख आघाडी धर्म पाळणार का तसेच बसवराज पाटील यांना तिकीट मिळालं तर ओमराजे, बसवराज पाटील यांना सपोर्ट करणार का हा प्रश्न आहे ‌. दुसरीकडे मात्र ओमराजे आणि बसवराज पाटील यांच्यामध्ये अंतर पडावं हे इथले आमदार अभिमन्यू पवारांना वाटत असणार कारण कांगेस आणि ठाकरे गटातील दुहीचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदाच होऊ शकतो. पण एकूणच लोकसभेचा विचार करता अभिमन्यू पवार है राणा जगजीतसिंहानाच पाठिंबा देतील. कारण ते फडणवीसांचे कधीकाळी पीए राहिलेले होते. तसेच फडणवीसांच्या अतिशय जवळचे नेते,असं त्यांना आज मानण्यात येतं . सहावा विधानसभा मतदारसंघ आहे. बार्शी. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो. राजेंद्र राऊत हे इथून अपक्ष आमदार आहेत. त्यांचा आजपर्यंत कांग्रेस शिवसेना पक्षातून प्रवास झालेला आहे. २०१९ ला इथे दिलीप सोपल हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. आता दिलीप सोपल यांना तिकीट मिळताच राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढत अवघ्या ३०७६ मतांनी तिथे त्यांनी निसटता विजय मिळवला . आता राजेंद्र राऊत हे फडणवीसांच्या जवळचे नेते मानण्यात येतात परिणामी त्यांना बार्शीतून भाजपकडून पुढच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण म्हणून ते लोकसभेसाठी राणा जगजीतसिंहानाच पाठिंबा देतील, हे ठामपणे सांगता येत नाही‌ .दुसरीकडे दिलीप सोपल हे शिवसेनेत असले तरी त्यांनी ते शिंदे सोबत आहेत की ठाकरेंसोबत ही भूमिका अद्याप उघड केलेली नाहीये. पण राऊत भाजपमध्ये गेले तर मग सोपल नक्कीच मविआसोबत येतील . पण ते आधी राष्ट्रवादीत होते तेव्हा त्यांचे विरोधक निंबाळकर होते. त्यामुळे आता जरी ते ओमराजेंसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असले तरीही यामुळे ते लोकसभेला ओमराजेंनाच सपोर्ट करतील हे सांगणं घाईचं ठरेल

Omraje Nimbalkar ,
Rana Jagjit Sinha Patil ,

(Omraje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari)


दुसरीकडे राजेंद्र राऊत हे फडणवीसांच्या जवळ असले म्हणून ते ही लोकल लेव्हलवर राणांना सपोर्ट करतील असं म्हणणंही उतावीळपणाचं ठरेल . त्यात ओमराजे आणि राजेंद्र राऊत यांचे संबंध चांगले मानण्यात येतात. एकूणच बार्शीचं राजकारण बरंच गुंतागुंतीचं आणि लोकल लेव्हलवर प्रचंड खडाजंगीचं आहे. त्यामुळे पक्षापल्याड जाऊन इथली स्थानिक गणितं जुळवणं हा ओमराजे आणि राणा जगजीतसिंह या दोघांसमोरचाही मोठा टास्क असणार आहे. आता बार्शीतून भाऊसाहेब आंधळकर , निरंजन भूमकर, विश्वास बारबोले यांचा पाठिंबा कोण मिळवतंय , हे ही महत्वाचं असं असणार आहे. कारण बार्शीतील हीच मतं ओमराजे किंवा राणा जगजीतसिंह यांच्यासाठी ऊद्या महत्वाची ठरतील. तर धाराशिवमध्ये एकूण असं पक्षीय बलाबल आहे. हा लोकसभा मतदारसंघ सध्या ठाकरेंकडे आहे ‌ पण विधानसभेची फक्त एकच सीट सध्या ओमराजेंसोबत आहे. बाकी इथून शिंदे गटाचे २ आमदार, ठाकरे गटाचा १,अपक्ष १ तर भाजपचे २ आमदार आहेत . एकूणच इथे भाजप शिंदे गट प्रभावी आहे. पण आता बंडखोरीनंतर इथला मतदार ठाकरेंच्या एकनिष्ठेला मतदान करतोय की स्थानिक नेतृतवाच्या प्रभावाला हे जोखणं आवश्यक असं आहे. सोबतच इथून भाजप काय डिव्हाईड and rule plan वापरतोय, हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. एकूणच अमित देशमुख, ओमराजे निंबाळकर पद्मसिंह पाटील,राणा जगजीतसिंह, दिलीप सोपल, अभिमन्यू पवार, तानाजी सावंत, हे इथून प्रभाव टाकणारे नेते आहेत ‌.आता ओव्हर all या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास अजित दादा यांचा या मतदारसंघातील प्रभावही महत्वाचा ठरू शकतो. कारण ही त्यांची सासरवाडी आहे . पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, धाराशिवमधून खासदारकीसाठी कोणता उमेदवार strong असेल , तुमच्या मनातील धाराशिवच्या भावी खासदाराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा .तसेच आमचं हे लोकसभेचं मतदारसंघनिहाय स्पेशल कव्हरेज तुम्हाला कसं वाटतंय, आमच्या कडून तुम्हाला अजून कुठल्या मतदारसंघांची माहिती हवीय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा .

धाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *