गांधीना आदर्श समजणाऱ्या Nathuram Godase नं गांधींच्या हत्येचा प्लॅन कसा आखला | Vishaych Bhari


आज 2 ऑक्टोबर. महात्मा गांधीची जयंती. पण दुर्दैवानं महात्मा गांधीच्या जयंतीदिवशी समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या मृत्यूचीचं चर्चा जास्त होते. कारण त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीनं गांधीजींची हत्या केली होती. 30 जानेवारी 1948 रोजी त्यानं महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेनं तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. नथुरामनं देशद्रोही काम केलंय असं समजून तेव्हाच्या न्यायव्यवस्थेनुसार त्याला त्याच्या कृत्याची गंभीर शिक्षा ही देण्यात आली होती. खरं तर तेव्हापासूनचं गांधींना मानणारा एक वर्ग नथुरामला देशद्रोही मानतोय तर काही प्रखर हिंदुत्ववादी लोकांकडून नथुराम गोडसेचा देशभक्त म्हणून गौरव केला जातोय. अगदी काल परवा सुद्धा जळगावच्या अमळनेर गावात एका उत्सवादरम्यान नथुराम गोडसेच्या फोटोची मिरवणूक काढून त्याच्या नावाचा जयघोष करण्यात आल्याची घटना घडली. एवढंच काय आज गांधी जयंती असून सुद्धा कित्येक जणांनी मोबाईलला नथुराम गोडसेचे व्हाट्सअप स्टेटस ठेवलेले आहेत. पण प्रश्न असाय की यातलं नथुराम गोडसेचं खरं रूप कोणतं. आजकाल हिंदुत्ववादी म्हणतात तसा तो खरंच देशभक्त होता की देशद्रोही. उच्च शिक्षित असलेला नथुराम जो कधीकाळी गांधींना त्याचा आदर्श मानत होता तोच पुढं जाऊन गांधीचा मारेकरी कसा बनला ? त्याला गांधीजींबद्दल एवढा राग का होता ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणारे,

Nathuram Godse,  
Mahatma Gandhi,

(Mahatma Gandhi Death | Nathuram Godse vs Mahatma Gandhi)


मंडळी सुरवात आपण नथुराम गोडसे याच्या जीवन प्रवासापासून करू. तर नथुरामचं खरं नाव होतं रामचंद्र. त्याचा जन्म पुणे जिल्ह्याच्या बारामती गावात चितपावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट खात्यात कामाला होते तर आई लक्ष्मी गोडसे या गृहिणी होत्या. आता रामचंद्राचं नाव नथुराम पडण्याची पण एक ऐकीव गोष्टय. त्याचं झालं असं,की रामचंद्राच्या आधी जन्मलेल्या तीन मुलांचं अकाली निधन झालं होतं. तेव्हा त्याच्या आई वडिलांना कुणीतरी असं सांगितलं की तुमच्या घराला एका वाईट आत्म्याचा शापय. जो फक्त मुलांना म्हणजे तुमच्या वारसाला टार्गेट करतोय. त्यामुळं आता यापुढं जर मुलगा झाला तर तुम्ही त्याला मुलगी म्हणून वाढवा. तरच तो वारस जगेल. त्यानंतर जन्म झाला रामचंद्रचा. मग घरच्यांनी लहानपणी रामचंद्रला मुलगी सारखं वागवायला सुरवात केली. मुलींची कपडे घालण्यापासून अगदी नाक टोचून नथनी घालण्यापर्यंत घरच्यांनी सगळे प्रकार केले. अन मग तेव्हापासून रामचंद्रचा नथुराम झाला. घरच्यांपासून बाहेरचे सगळे लोक त्याला नथुराम याचं नावानं हाक मारू लागले. दरम्यान नथुरामला एक भाऊ आणि एक बहीणदेखील होती . त्याच्या भावाचं नाव होतं गोपाळ गोडसे. नथुरामचं पाचवीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर त्याला एका नातेवाईकासोबत पुण्याला पाठवण्यात आलं. पुण्यात आल्यानंतर त्यानं हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकली. भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्याकाळी नथुरामवर चक्क महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. इतकच नाही तर महात्मा गांधी हे त्याचे मुख्य आदर्श होते. इतिहासात मिळालेल्या माहितीनुसार मुळातच नथुरामचा स्वभाव शांत होता. तो अतिशय कुशाग्र बुद्धीचा मुलगा होता. १९३० साली नथुरामच्या वडिलांची रत्नागिरीला बदली झाल्यामुळं त्याचं संपूर्ण कुटुंब तिथं राहायला गेलं. अन नेमकं त्याचवेळी नथुरामची भेट झाली विनायक दामोदर सावरकर यांच्याशी . त्यानंतर नथुरामच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, नथुराम जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होता तेव्हा त्याला सामाजिक कार्य करण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळं त्यानं त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि हिंदू महासभा तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू लागला असं खुद्द नथुराम गोडसेच्या नातेवाईक सत्यकी गोडसेनी माध्यमांना सांगितलंय. दरम्यान हिंदू महासभेचं काम करत असतानाचं ‘अग्रणी’ या वृत्तपत्रासाठी ही त्यानं काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्या वृत्तपत्राचं नाव बदलून ‘हिंदू राष्ट्र’ ठेवण्यात आलं. त्यावेळी महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला हिंदू महासभेनं पाठिंबा दिला होता. कालांतरानं हिंदू महासभेनं त्या आंदोलनापासून फारकत घेतली अन त्यासोबतचं नथुरामनं सुद्धा त्याची भूमिका बदलली. त्यावेळी तो थेट गांधीजींच्या विरोधात गेला. कारण त्यावेळी त्याचं असं मत झालं होतं की गांधीजी बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्य मुस्लिमांमध्ये भेदभाव करतायत अन अल्पसंख्याक मुस्लिमांप्रती ते नेहमी झुकती भूमिका घेतायत. अल्पसंख्याक समुहातील लोकांना खुष ठेवण्याच्या प्रयत्नात ते बहुसंख्य हिंदूंच्या हिताकडं दुर्लक्ष करत असल्याचंही त्याचं म्हणणं होतं.

(Mahatma Gandhi Death | Nathuram Godse vs Mahatma Gandhi)


एवढंच नाही तर भारताच्या फाळणीला सुद्धा महात्मा गांधीच जबाबदार असल्याचं तो काम करत असलेल्या हिंदू महासभेचं म्हणणं होतं. महात्मा गांधींच्या त्या भूमिकेमुळं देशाची फाळणी झाली अन त्या फाळणीमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला अशीही त्याची धारणा होती. त्याचाचं राग मनात धरून मग पुढं त्यानं गांधीना मारण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टात कबूल केलं होतं. पण नथुरामनं गांधीची हत्या नेमकी का आणि कशी केली होती. तर ऐका, गांधींचे नातू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार 13 जानेवारी 1948 रोजी दुपारी जवळपास 12 वाजता महात्मा गांधी दोन मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. त्यापैकी पहिली मागणी अशी होती की भारतानं पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे आणि दुसरी मागणी अशी की दिल्लीत मुस्लिमांवर होणारे हल्ले थांबवावेत. आता ते 55 कोटी कुठले तर फाळणीच्या करारावेळी भारतानं पाकिस्तानला विनाअट 75 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं होतं. त्यापैकी 20 कोटी रक्कम आधीचं दिली होती पण 55 कोटी रक्कम शिल्लक होती. मात्र पाकिस्तानला उर्वरित रक्कम देण्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं पॉजिटीव्ह मत नव्हतं. कारण तसं झालं तर हिंदू मुस्लिम असा नवा संघर्ष देशात उभा राहिलं आणि त्याचे देशाला वाईट परिणाम भोगावे लागतील. शिवाय भारतालाही याचा बराच आर्थिक तोटा सहन करावा लागणार होता. पण गांधीना असं वाटतं होतं की पैसे दिले नाही तर करारावेळी दिलेल्या शब्दाचं पालन होणार नाही आणि त्यामुळं पाकिस्तानची फसवणूक केल्यासारखं होईल. त्यामुळं ते उपोषणाला बसले होते. तुषार गांधींच्या मते गांधींचा उद्देश फक्त पाकिस्तानला पैसे देण्याचा नाही तर पुढील काळात होणारा संघर्ष टाळून धार्मिक सलोखा राखण्याचा होता. बापू मानवतावादी विचार करत होते. पण हिंदू महासभेला गांधीची ती भूमिका पटली नव्हती. त्यामुळं प्रखर हिंदूंच्या मनात गांधींबद्दल राग होता. त्याचं रागातून गोडसेनं गांधींची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तुषार गांधीच्या मते 18 जानेवारी 1948 रोजी दिल्लीच्या बिरला भवनमध्ये गांधीची जीं प्रार्थना सभा होती त्या सभेदरम्यानचं गांधींना संपवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी काही मारेकरी दिल्लीला येऊन पोहोचले सुद्धा होते. एका हॉटेलात त्यांनी मुक्काम केला होता. साधारण 20 जानेवारीला, दिगंबर बडगे नावाचा माणूस गांधींना मारणार होता पण प्लॅन फसला 1944 साली साताऱ्याच्या पाचगणी गावात महात्मा गांधी यांची प्रार्थना सभा सुरू होती. त्यावेळी सुद्धा एका तरुणानं चाकू घेऊन गांधीजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण भीकू दाजी भिलारे नावाच्या व्यक्तीनं गांधीजींचा जीव वाचवला होता. पण गांधीजीचे नातू तुषार गांधी यांनी त्या घटनेचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं बोललं होतं. तर काही जणांच्या मते तो चाकू हल्ला करणारा व्यक्ती नथुरामच होता आणि त्यानं १९४४ नाही तर 1947 साली गांधींवर जीवघेणा हल्ला केला होता. पण तो ही प्रयत्न फसला होता.


Mahatma Gandhi,

(Mahatma Gandhi Death | Nathuram Godse vs Mahatma Gandhi)

पुढं मग नारायण आपटे आणि नथुराम गोडसे यांनी ती जबाबदारी उचलली. दरम्यान 27 जानेवारी १९४८ रोजी गोडसे आणि आपटे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दोघेही ट्रेननं ग्वाल्हेरला पोहोचले आणि रात्री डॉ. दत्तात्रय परचुरे यांच्या घरी थांबले. दुसऱ्या दिवशी तिथूनच इटालीयन बनावटीची काळ्या रंगाची ऑटेमॅटिक बॅरेटा माउजर त्यांनी विकत घेतली आणि 29 जानेवारी रोजी ते दिल्लीला पोचले. दोघेही दिल्लीच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्याच एका खोलीत थांबले. तिथंच त्यांना करकरे भेटले. 30 जानेवारी रोजी त्यांनी बिरला भवनाच्या पाठीमागील जंगलात पिस्तूल शूटिंगची प्रॅक्टिस केली आणि बरोबर संध्याकाळी 5 वाजता बिरला भवनमध्ये प्रवेश मिळवून त्यानं गांधीवर तीन गोळ्या झाडल्या. गांधीमुळं अखंड भारताचे तुकडे झाले असं त्याचं मत होतं. हल्ल्यानंतर नथुराम पळून न जाता तिथंच थांबला आणि त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याला अटक झाली मात्र आपटे आणि करकरे पुन्हा एकदा दिल्लीहून मुंबईला पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण पुढं दोघांनाही 14 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशामध्ये दंगे सुरू झाले होते. ब्राह्मण आणि मुस्लिम समूहामध्ये ही दंगे पेटले होते. खास करून महाराष्ट्रातील सांगली, मिरजमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली होती.असं म्हणतात. महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण गोडसेचा हिंदू महासभा आणि संघाशी संबंध असल्याचं बोललं जातं होतं. पण पुढं महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएस जबाबदार असल्याचे पुरावे सापडले नाहीत आणि तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४९ मध्ये संघावरील निर्बंध मागे घेतले. अनेकांनी गांधींजींच्या हत्येमागे भारत सरकारचाचं म्हणजे तत्कालीन काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप करत त्यांना दोषी ठरवलं होतं. त्यावेळी तत्कालीन सरकावर भयंकर टीका ही झाली होती. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर २७ मे १९४८ पासून नथुरामवरील खटल्याला प्रारंभ झाला. न्यायालयात नथुरामनं स्वतःचा बचाव करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यानं सुनावणी दरम्यान हसत हसत महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं मान्य केलं. त्या खटल्याची शेवटची सुनावणी ८ नोव्हेंबर १९४९ मध्ये झाली. त्यामध्ये नथुरामला १५ नोव्हेंबर रोजी फाशी देण्यात यावी, असा निकाल देण्यात आला. त्या गुन्ह्यामध्ये नथुरामसोबत नारायण आपटेदेखील आरोपी होत

(Mahatma Gandhi Death | Nathuram Godse vs Mahatma Gandhi)

त्यामुळं त्याला देखील देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्टया, गोपाळ गोडसे आणि दत्तात्रय परचुरे या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्या. आत्माचरण यांनी सर्व दोषींना शिक्षा सुनावली होती. त्याप्रकरणी सावरकरांचं ही नाव समोर आलं होतं पण नंतर न्यायमूर्तींनी सावरकरांची निर्दोष मुक्तता करत त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर नथुरामला शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा नथुराम म्हणाला होता की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थींचं विसर्जन करू नये. जेव्हा भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकत्र होतील म्हणजे अखंड भारत होईल तेव्हा सिंधू नदीमध्ये त्याच्या अस्थींचं विसर्जन केलं जावं. पण त्याची ती इच्छा कधीच पूर्ण झाली नाही . जेलमध्ये असताना नथुरामनं ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हे पुस्तक लिहिलं. ज्या दिवशी नथुरामला शिक्षा सुनावली त्याच्या आदल्या दिवशी त्यानं ८० पानांचा जबाब नोंदवला. त्यामध्ये आपण महात्मा गांधीं यांची हत्या का केली याचा सविस्तर खुलासा केला होता. नथुरामनं एका जागी पाच तास उभं राहून तो जबाब न्यायालयात वाचून ही दाखवला होता. त्यानं सांगितलं की, ‘केलेल्या कृत्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. मला गांधीच्या कार्याबद्दल आदर होता म्हणून तर मारण्याआधी मी गांधीना नमस्कार केला होता. परंतु नथुरामच्या पुस्तक प्रकाशनावर बंदी घालण्यात आल्याचं समजतय. गांधी हत्येनंतर नथुरामला देशद्रोही म्हणून ओळख मिळालेली होती जीं आजपर्यंत कायमय. पण अलीकडे नथुराम गोडसेला देशभक्त ठरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जाऊ लागलाय. अगदी कालीचरण महाराजांनी तर स्टेजवरून गांधी को मारनेवाले गोडसेजीं को मेरा नमन है म्हणत हात ही जोडले होते. त्याचंप्रमाण आजवर नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून  नथुराम गोडसे याची देशभक्त म्हणून छबी उभी करण्यात आल्याचे प्रयत्न सातत्यानं होतायत. गोडसेला ज्या दिवशी फाशीची शिक्षा झाली तो दिवस त्याचे समर्थक ‘बलिदान दिवस’ म्हणून साजरा करताना ही दिसून आलेत. मध्य प्रदेशात तर गोडसेचं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तिथल्या राज्य सरकारनं त्यावर बंदी घातल्यामुळं ते मंदिर झालं नाही. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं, गांधींना मारणारा गोडसे हा देशभक्त होता की देशद्रोही ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
..
  

गांधीना आदर्श समजणाऱ्या Nathuram Godase नं गांधींच्या हत्येचा प्लॅन कसा आखला | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *