मराठा मुद्द्यावरून पवार शिंदे फडणवीस सरकार पडणार का | Manoj Jarange Patil Maratha Arakshan | Jalna Maratha Protest
जालन्यातील अंतरवली सराटी गावात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता मराठा आंदोलकांनी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. बऱ्याच ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं. मुंबईतही दादर येथे सरकारच्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलक एकत्र जमले होते. त्यात राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस असल्याने आंदोलकांनी आता फडणवीसांना टार्गेट केलं आहे. अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. आता काही आंदोलकांकडून तर फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोवर हे आंदोलन सुरु राहील असं म्हणलंय.आता मराठा आंदोलकांवर झालेल्या भीषण लाठी हल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार ब्याकफुटला गेल्याच लक्षात येतंय. पण खरंचआता देवेंद्र फडणवीस याप्रकारणी राजीनामा देऊ शकतात का? त्यांच्यावर तसा काही दबाव येऊ शकतो का? मराठा आंदोलनामुळे हे शिंदे फडणवीस सरकार पडू शकतं का? हे सगळंच आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

( Manoj Jarange Patil Maratha Arakshan | Jalna Maratha Protest )
सगळ्यात आधी अंतरवाली सराटी गावातील घटनेचे राज्यभर कसे परिणाम झालेत ते आपण जरा समजून घेऊयात.तर बघा, जेव्हा ही घटना घडली तेव्हा राज्यभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारचा निषेध केला. बीड माजलगाव, धाराशिव, जळगाव, माढा, यवतमाळ, धुळे – सोलापूर रस्ता या सगळ्याच ठिकाणी मराठा समाजाने आक्रमक होऊन सरकारचा विरोध केला. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री इथे तर सरपंच मंगेश साबळे यांनी सरकारच्या निषेधात स्वतःची गाडीच पेटवून दिली. अगदी दुसऱ्याच दिवशी आंदोलनस्थळाला संभाजीराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी भेट दिली.आता वातावरण चिघळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना गोवारी हत्याकांड झाले, 113 लोक गेले तेव्हा शरद पवार तिथे का गेले नव्हते असा प्रतिसवाल केलाय. तेव्हा यावर शरद पवार यांनी याच घटनेला धरून जेव्हा गोवारी हत्याकांड घडलं होतं तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मधुकर पिचड हे आदिवासी कल्याण मंत्री होते. तेव्हा या घटनेचं गांभीर्य बघून तेव्हा पिचड यांनी स्वतः हुन माझ्याकडे राजीनामा दिला होता असं शरद पवार म्हणाले. आता जालना येथे घडलेल्या घटनेची जबाबदारी कोणाचीय? असं म्हणून त्यांनी फडणवीसांवार जोरदार प्रहारही केला. आता या दोघांमधील हे युद्ध त्यांच्या पुरतं उरलं नाही तर आता राज्यातील वेगवेगळ्या भागातून फडणवीसांवर टीका होतेय. त्यांनी या घटनेचं गांभीर्य बघूंन तातडीने राजीनामा दयावा असं अनेक मराठा आंदोलकांचं म्हणणंय.उद्धव ठाकरेंनी ही पवारांचीच लाईन पकडत फडणवीसांवर अजूनच जहरी टीका केली.त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या महिन्यात वारकर्यांवर लाठीहल्ला झाला, बारसु येथील आंदोलकांवर ही सरकारने काठी चालवली.
( Manoj Jarange Patil Maratha Arakshan | Jalna Maratha Protest )
आता या सरकारने मराठा आंदोलकांवर ही लाठीचार्ज केलाय. यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही ,. आता कुठल्याही आदेशाशिवाय हा हल्ला होऊच शकत नाही असंही ते पुढे म्हणाले. आता असं म्हणताना त्यांचा संपूर्ण रोख हा फडणवीस यांच्यावरच होता , हे काही लपून राहिलेले नाही.पण आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. 12 पोलीस या हल्यात जखमी झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय. संजय राऊत यांनी तर हा येत्या काळातील निवडणुकीच्या दृष्टीने दंगल भडकवण्याचा कट आहे असं म्हणलंय. एकनाथ शिंदेनी मात्र याबद्दल चौकशीसाठी उचस्तरीय समिती गठीत करण्याचं ठरवलं आहे. एकंदरीत सध्या भाजप शिंदे सरकार मराठा आंदोलनाच्या मुद्यावरून ब्याकफुटला गेलं आहे. तर विरोधक मात्र मराठा हा मुद्दा आपल्याभोवती जोडू पाहतायत. आता फडणवीसांनी संबंधीत प्रकरणाबद्दल राजीनामा द्यावा ,असं मराठा आंदोलक तसेच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांकडून वारंवार म्हणलं जातंय. पण आता अशा नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा या आधी कुणी दिलाय का , तर हो . म्हणजे बघा ज्यावेळी लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी रेल्वे अपघात दुर्घटना झाल्यानंतर जबाबाबदारी स्वीकारून आणि नैतिकता म्हणून रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. गोवारी हत्याकांडात तब्बल 11४ बळी गेल्यानंतर आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनीही स्वतः हून त्यावेळेसचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. अशी काही दुर्दैवी घटना घडली कि नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देणं हा आजपर्यंतच्या सरकारनं पाळलेला संकेत आहे. हा आता असा राजीनामा दयावाच असं काही कुणावर बंधन असत नाही. पण सरकार अशा मुद्यावर किती संवेदनशील आहे हे यातून सिद्ध होत असतं.

( Manoj Jarange Patil Maratha Arakshan | Jalna Maratha Protest )
पण भाजप नेत्यांच्या किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेन्ट वरून ते राजीनामा देतील असं दिसत नाही. पण आंदोलक शिंदे फडणवीस विशेषत: फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच सध्या तरी प्रकर्षाने दिसून येतंय.भाजपचा मागचा track रेकॉर्ड बघता फडणवीस राजीनामा देतील ही गोष्ट अशक्य अशीच आहे. तशानं पक्ष backfoot ला जातो अशी कदाचित यामागची पक्षश्रेष्ठींची धारणा असावी. कारण भाजप सरकारमधील कोणीच असा राजीनामा मागच्या बऱ्याच काळापासून दिला नाही. पण या निमित्ताने फडणवीस आणि शिंदे फडणवीस सरकारवर प्रेशर क्रियेट करण्याचं काम विरोधक जोरदारपणे करताना दिसतायत, फडणवीस आणि एकनाथ शिंदेची छबी मराठा विरोधक करण्यासाठीही हे राजकीय प्रयत्न सुरु आहेत.असाही आरोप केला जातोय. पण फडणवीस गृहमंत्री असल्यापासून मागच्या काही काळापासून क्राईम रेट वाढला असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे. राज्यभरातील वाढत्या कोयता हत्या, नगर दलित अत्याचार, मान खटावमधील महिला मारहाण प्रकरण, अशा रोज काही ना काही मोठ्या क्राईमच्या घटना आजूबाजूला घडताना दिसतायत. धर्माच्या नावावर कोणी कसंही स्टेटमेंट केले तरी त्याला अभय दिलं जातंय. अशावेळी फडणवीसांना याप्रकरणीही टार्गेट करणं कोणीही सोडत नाहीये. आता कुठला फासा कुठल्या दिशेने पडतोय हे येत्या काळात कळेलच. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय , या सगळ्या घडल्या प्रकारामुळे शिंदे फडणवीस सरकार अडचणीत आलंय का ? या चिघळलेल्या आंदोलनाची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी खरंच गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा का ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply