जगलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा जरांगे पाटील असं का म्हणाले | Manoj Jarange Patil Latest News | Jalna Maratha Andolan News
मंडळी मनोज जरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्रात कुणाला माहीत नसेल असं होणार नाही. कारण गेल्या नऊ दिवसं झालं मराठा आरक्षणासाठी त्यांचं जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण सुरूय. पण त्यांचं हे आंदोलन तेंव्हा चर्चेत आलं जेव्हा पोलिसांनी तिथं उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि तिथूनच हा सगळा विषय प्रचंड प्रमाणावर चिघळला. त्यानंतर सरकार आणि विरोधी पक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या संपूर्ण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचं नाव मात्र सेंट्रलला राहिलय . अनेक राजकीय व्यक्तींनी अंतरवली सराटी गावाला जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. पण आज आंदोलनाला 9 दिवस उलटून गेलेले असताना सध्या अंतरवली सराटी गावात सध्या काय सुरूय ? मनोज जरांगे पाटलांची तब्येत नेमकी किती खालावलीय ? ह्या सगळ्या प्रकारानंतर सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काही ठोस पाऊलं उचललीत की नाही ? सगळं सविस्तर जाणून घेऊयात….

( Manoj Jarange Patil Latest News | Jalna Maratha Andolan News )
मंडळी गेल्या 9 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्या अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेत. दरम्यान पोलिसांबरोबर चर्चा चालू असतानाच अचानक आंदोलनातील नागरिकांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज चालू करताच जोरदार गोंधळ उडाला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले. ही घटना घडल्यामुळे त्यांनतर या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले.
प्रत्येक जिल्ह्यात ठिकाठिकाणी आंदोलन करून लोकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि मग मनोज जरांगे हे नाव महाराष्ट्रात सेंट्रल पॉईंटला आलं. आता त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली पाऊलं ही अंतरवली सराटी गावाकडे वळवली. सगळ्यात आधी संभाजीराजे छत्रपती तिथे पोहोचले. मग छत्रपती उदयनराजे भोसले त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही तिथे भेट दिली. अगदी राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर इम्तियाज जलील अशोक चव्हाण हे सगळे नेते आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी सरकारच्या लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच सरकारवर मुख्यत्वे फडणवीसांवर जोरदार टीका केली. यानंतर फडणवीस यांनी बेहती गंगा में हात धोनै यावरून विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे मनोज जरंगे पाटील चिडले. त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नितेश राणे आणि गिरीश महाजन हे सरकारच्या वतीने तिथे आले असताना त्यांनी लाठीचार्ज दरम्यान आंदोलकांवर झालेल्या गोळीबारादरम्यानची गोळी दाखवली.
( Manoj Jarange Patil Latest News | Jalna Maratha Andolan News )
आता गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जरांगे पाटील ठाम राहिले. आणि दोन दिवसात gr द्या मगच उपोषण सोडू असा सरकारला इशारा दिला. पण दोन दिवसात gr निघणं अशक्य आहे असं गिरीश महाजन यांनी सांगितलं तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपण उद्यापासून पाणी ही पिणार नाही असं सांगितलं. पण आता परवा राज्य सरकारनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली . तर अजित पवार यांनी आमच्या तिघांपैकी कोणी आदेश दिला असेल तर आम्ही राजकारणातून बाजूला होऊ असं सांगितलं. पण त्यावर गोळीबार केलाच नाही तर माफी का मागितली असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला. तसेच त्यांना उपोषण स्थळी येण्याबाबतीतही आव्हान दिलं. पण आता एकाबाजूला सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगानं हालचाली करायला सुरुवात केलीय . पण दुसरीकडे आता नववा दिवस होऊनही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांचं उपोषण सुरूच आहे. ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धारच त्यांनी जणू केला आहे. तर त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आलं आहे. सरकारने जरांगे पाटील यांना वाचवावं. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असं कळकळीचं आवाहन मराठा आंदोलकांनी केलं आहे. जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी विशेषतः त्यांच्या मुलाने आणि वडीलांनी मनोज जरांगे यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलंय. मनोज जरांगे यांच्या मुलाने तर पप्पांना आधी समाजाची काळजी आहे मग आमची. पण आम्ही पप्पांच्मा कायम सोबत आहोत ,असं म्हणलंय. मी आंदोलन स्थळी गेलो नाही कारण मी तिथं गेलो तर पप्पा इमोशनल होतील आणि आम्हाला ते नकोय असं म्हणलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीनेही नऊ दिवस झालं आपण त्यांना भेटलो नसल्याचं म्हणलंय.

( Manoj Jarange Patil Latest News | Jalna Maratha Andolan News )
पण सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा. जर त्यांना काय झाले तर त्याला पूर्णतः सरकार जबाबदार असल्याचंही मनोज जरांगे यांच्या पत्नी म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांचे वृद्ध वडीलांनीही मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा आहे, सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हणलंय. हे सगळं बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात त्यांच्याप्रती तीव्र काळजी होती. आता खरंतर पहिल्या काही दिवस त्वेषाने बोलणारे जरांगे पाटील यांच्या अंगात आता ताकद उरली नाहीये . त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. कालपर्यंत ते उठून बसत होते पण आता ते झोपूनच आहेत . त्यांना आता डाॅक्टरांनी सलाईनही लावली आहे. पहाटेच त्यांना ही सलाईन लावली गेलीय . त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला आहे . तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता सगळीकडे पसरल्याने जालना, संभाजीनगरसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी झालेली पहायला मिळतेय. याबद्दल डाॅक्टर सचिन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांचा बीपी आणि शुगर नाॅर्मल अवस्थेत आहे. त्यांचा बीपी १३५ – ८० असा सध्या तरी स्टेबल असा आहे. पण त्यांच्या लिव्हर आणि किडनीला सूज आली असून तिथे enzymes वाढल्याची माहिती या डाॅक्टरांनी दिली आहे. त्यांच्या l e f t आणि k f t चाचण्या करण्यात आल्या असून कुपोषणाच्या दरम्यान ही valueढासळत असल्याने याबद्दल नवीन sample घेतलं गेलं आहे. अशीही माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. त्यांना सध्या ओरली antibiotics आणि iv fluid देण्यात येत आहे . तसेच त्यांची शूगर लेव्हल ही ११२ तर oxygen लेव्हलही ९६ अशी आहे. ते सध्या स्टेबल असले तरीही अशा अवस्थेत संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
( Manoj Jarange Patil Latest News | Jalna Maratha Andolan News )
एकूणच जरांगे पाटील यांच्या किडनीत सध्या असंतुलन दिसून येतंय. मी जगलो तर कुटुंबीयांचा अन् मेलो तर समाजाचा असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारलाच थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.यावरून सरकार आता अडचणीत आले असून, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी उपोषण स्थळाला भेट दिलीय. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांचं म्हणणंही शांतपणे ऐकून घेतलं. आंदोलकांनी शांतता राखण्याचं त्यांनी आवाहन केलं. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अचानक घटनास्थळी आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.कारण चार दिवसांपूर्वी पोलीस फाटा गावात पोहोचल्यानंतर आंदोलन कसं चिघळलं होतं हे सगळ्यांनी बघितलं आहे. पण आता मराठा आंदोलकांना प्रश्न असा पडतोय की सरकारचे मंत्री चार चार वेळा भेटूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा का निघत नाहीये ? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन देखील अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत. जीआरमध्ये फक्त कॉमा टाकायचा आहे, असं खोतकर म्हणाले होते. तो कॉमा आज तिसऱ्या दिवशीही न निघाल्याने मराठा आंदोलक संतापले आहेत. एकूणच आता सगळीकडेच तणावाचं वातावरण आहे. एका बाजूला सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड कात्रीत सापडले आहे. आता सरकार आरक्षण देईल का ? आणि दिलं तर कसं देईल हा मोठा प्रश्न आहे.कारण त्यांच्याकडे दोनच option आहेत. एक म्हणजे मराठा समाजाला सरसकटपणे ओबीसी अंतर्गत आरक्षण देणे तर दुसरा म्हणजे केंद्रसरकारने घटनादुरुस्ती विधेयक आणून आरक्षणाची मर्यादा वाढवणे . आणी त्या वाढलेल्या रेंज मध्ये मराठ्यांना आरक्षण देणे .पण आता दुसरा विषय हा किचकट असा आहे. तर पहिला विषय भाजपला राजकीय दृष्ट्या परवडणारा ठरणार नाही. कारण यामुळे मराठा आणि ओबीसी वर्गात संघर्ष उभा राहू शकतो. अगदी शरद पवार यांनीही ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे. अशावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला मराठा विरोधी इमेज करून घेणे शिवाय निर्णयाला दिरंगाई करणे या दोन्हीही गोष्टी परवडणार्या असणार नाहीत. अशावेळी सरकार एक वटहुकूम काढू शकेल . पण हा वटहुकूम तात्पुरत्या पातळीवर प्रश्न सोडवेल . पण कोर्टात ते आरक्षण टिकेल का हा पुन्हा एक मोठा प्रश्न असणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय.मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या तब्येतीतल्या बिघाडाला कोण जबाबदारंय ? कुठल्या नेत्याने मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अधिक जटील करून ठेवलाय तर कुठला नेता मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सोडवू शकतो ?एकंदरीत मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कधी सूटू शकतो ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply