कुस्त्यांचा फड ते विधानसभा पैलवान महेश लांडगे यांचा प्रवास जबराटय | MLA Mahesh Landge Biography in Marathi

काल कॉन्टॅक्टमधल्या किमान 50 जणांच्या स्टेटसला आमदार महेशदादा लांडगे यांच्या विधानसभेतला भाषणाचा व्हिडीओ होता. औरंगजेब प्रकरणावरून त्यांनी आबू आझमी यांच्या विरोधात घेतलेला स्टॅंड आणि त्यांचा रुद्रावतार अनेकांना खूपच आवडला. आता महेशदादा लांडगे म्हणजे लाल मातीत घाम गाळलेला पैलवान माणूस, त्यामुळं कुस्तीचा आखाडा असो निदान विधानसभेचा, षड्डू ठोकूनचं विरोधकाच्या पुढ्यात उभं राहायचं असा Mahesh Dada Landge यांचा करारी बाणा. अन म्हणूनचं कालपासून महेशदादा लांडगे यांची सोशल मीडियावर भयाण चर्चा सुरूय. त्यानिमित्तानं आज आपण पैलवान ते लोकप्रिय आमदार असा महेशदादा लांडगे यांचा राजकीय प्रवास कसा झाला त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात….

( MLA Mahesh Landge Biography in Marathi )

mahesh landge,mahesh landge speech,mahesh landge live,mahesh landge status,mahesh landge song,mahesh landge dance,mahesh dada landge,mahesh landage,bjp mahesh landge,aamdaar mahesh landge,bjp aamdaar mahesh landge,mahesh landge pro kabaddi,mahesh dada landge dance,mahesh landge angry,mahesh landge on pune,mahesh landge birthday,mahesh landge viral video,mahesh landge on abu azami,mahesh landge viral speech,mahesh landge speech today

मंडळी तसं पाहिलं तर लांडगे कुटुंब ह्ये राजकारणापेक्षा कुस्ती साठी जास्त ओळखलं जातं. अगदी आमदार महेशदादा सुद्धा स्वतः सांगतात की त्यांच्या घरी कुस्ती एक नंबरला अन राजकारण दोन नंबरला येतं. घरात पहिली चर्चा ही कुस्तीची असते. 27 नोव्हेंबर 1975 ही महेशदादा लांडगे यांचा जन्मदिवस. भोसरीतील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महेश किसनराव लांडगे हे त्यांचं पूर्ण नाव. अगदी त्यांच्या पणजोबांपासून घरात कुस्तीची अविरत परंपरा सुरू होती. त्यामुळं साहजिक कळत्या वयाचं झाल्यापासून महेश लांडगे यांना त्यांच्या घरच्यांनी कुस्ती शिकण्यासाठी तालमीत टाकलं. स्वतः त्यांचे चुलते बाळासाहेब लांडगे सर भारतीय कुस्ती संघटनेचे सचिव आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राहिलेले आहेत. तशी बाळासाहेब लांडगे सरांची कुस्ती कारकीर्द काढायची म्हणलं तर असे दोन व्हिडीओ कमी पडतील एवढं मोठं त्यांचं कामय. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. सध्या ते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कुस्तीच्या समृद्धीसाठी ताकदीनं काम करत आहेत. त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, कुस्ती भूषण पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आता अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनात महेशदादा पैलवान म्हणून घडले म्हणल्यावं त्यांच्या गेमचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्यांनी गावातल्या लालमातीपासून राष्ट्रीय लेव्हलपर्यंत अनेक कुस्तीची मैदान गाजवली. कुस्ती खेळताना त्यांना लागलेली व्यायामाची आवड आजतागायत कायमय. आज सुद्धा न चुकता पहाटे पाच वाजता उठून महेशदादा लांडगे जीमला जातात. जीमवरून माघारी आलं की रोज पहिला सूर्याला नमस्कार आणि पक्षी व माश्यांना खाऊ घालतात.

( MLA Mahesh Landge Biography in Marathi )

महेशदादांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल खूप प्रेमय. दरम्यान पैलवान म्हणून कारकीर्द करत असतानाचं त्यांचा राजकारणाकडं ओढा वाढला. ते सुद्धा कॉलेजात शिकत असताना. विद्यार्थीदशेत असताना ते एन. एस. यू. आय.चे अध्यक्ष राहिले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते खूप नेटानं बाजू मांडायचे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कुस्तीनं मला आयुष्यात खूप काही दिलं. कुस्तीमुळंच माझ्यात संघटन कौशल्य आलं. कारण कुस्ती खेळत असताना मी गणेश मंडळाचा अध्यक्ष राहिलो होतो. त्या संघटन कौशल्यामुळं माझ्यासोबत माणसं जोडली गेली. मला लोकांचे प्रश्न कळू लागले आणि मी ते सोडवण्यासाठी माझ्यापरीने प्रयत्न करू लागलो.

त्यामुळं काय झालं तर तरुणांमध्ये महेश लांडगे यांची क्रेझ वाढू लागली. दरम्यान पुढं ते २००२ साली पिंपरी काँग्रेसचे शहराध्यक्ष झाले. २००२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडूनच आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली. तेव्हा ते विलास लांडे यांच्याकडून पराभूत झाले. २००४ मध्ये लांडे ‘हवेली’ विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांनी स्वत:च्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागली. त्यावेळी Mahesh Dada Landge पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र तेव्हा ते काँग्रेसकडून नाही तर राष्ट्रवादीकडून लढले होते.

mahesh landge,mahesh landge speech,mahesh landge live,mahesh landge status,mahesh landge song,mahesh landge dance,mahesh dada landge,mahesh landage,bjp mahesh landge,aamdaar mahesh landge,bjp aamdaar mahesh landge,mahesh landge pro kabaddi,mahesh dada landge dance,mahesh landge angry,mahesh landge on pune,mahesh landge birthday,mahesh landge viral video,mahesh landge on abu azami,mahesh landge viral speech,mahesh landge speech today

नगरसेवकपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढं मात्र जोमानं सुरू राहिला. त्यानंतर ते पिंपरी पालिकेवर 2007 पासून 2014 पर्यंत राष्ट्रवादीकडून सलग तीन वेळा निवडून आले. २०१३-१४ साली तर त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं. त्या काळात भोसरी परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडे भोसरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली, मात्र तेव्हाही विलास लांडे यांनाच उमेदवारी दिली गेली. दरम्यान त्यामुळं महेशदादा लांडगे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. पण तरूण वर्गात असलेल्या आकर्षणामुळं आणि त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळं महेश लांडगे भोसरी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यावेळी सगळी मोदी लाटेचं वातावरण असतानाही ते अपक्ष म्हणून निवडून आले. विलास लांडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा त्यांनी पराभव केला. पुढं 2017 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा ग्राफ कायम चढता राहिला. २०१७ मध्येच पिंपरी पालिकेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा ही लांडगे यांचा करिश्मा पुन्हा दिसून आला. त्यांच्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास ४० जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्या पट्टयातून शिवसेनेला साधं आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. त्या विजयामुळं तेव्हापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पिंपरी पालिकेची सत्ता भाजपकडे आली. त्याचं श्रेय जेवढं चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना जातं तितकंच ते आमदार Mahesh Dada Landge यांनाही जातं असं तिथले त्यांचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात.

( MLA Mahesh Landge Biography in Marathi )

पालिकेच्या माध्यमातून भोसरीत झालेली भरीव कामं आणि पाच वर्षांत मतदारसंघावरच लक्ष केंद्रित केल्यामुळं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महेशदादा लांडगे भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडून आले. त्यावेळी ही त्यांनी विलास लांडे यांचा तब्बल ७५ हजार मतांनी पराभव केला. खेड, चाकण, आळंदी, मंचर या भागात महेश लांडगे यांनी उत्तम संघटनात्मक काम केलं. मैदानी खेळांची आवड असणारे, कोणत्याही क्रीडाप्रकारांतील खेळाडू असो, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे, शक्य होईल तितकी खेळाडूंना मदत करणारे क्रीडाप्रेमी आमदार अशी आमदार महेश लांडगे यांची भागात ओळख झालीय. ‘महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील अनेक गरजवंतांना वेळोवेळी मदत केली. इंद्रायणीथडी जत्रा, मेगा आषाढ मेजवानी किंवा जम्बो आखाड पार्टी सारखे अनेक भव्यदिव्य आणि अराजकीय उपक्रमही त्यांनी राबवले. कबड्डी, कुस्तीप्रमाणेच आता त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या खेळाकडं ही आपलं लक्ष केंद्रित केलंय. मागच्या दोन तीन वर्षात त्यांनी भरवलेल्या घाटातल्या शर्यत मैदानांची महाराष्ट्रात बेक्कार चर्चा झाली. त्यांच्याइतकी मोठी मैदानं घाटात कुणीचं भरवली नाहीत असं आज सुद्धा कित्येक बैलगाडा शौकीन अभिमानानं सांगतात. अगदी जेसीबी पासून ट्रॅक्टर, बुलेरो, टू व्हीलर गाड्या त्यांनी मैदानात बक्षीस म्हणून ठेवल्या होत्या. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र फिल्म अभिनेते प्रविण तरडे यांनीही त्यांच्या त्या बैलगाडा मैदानाला हजेरी लावली होती.

( MLA Mahesh Landge Biography in Marathi )

mahesh landge,mahesh landge speech,mahesh landge live,mahesh landge status,mahesh landge song,mahesh landge dance,mahesh dada landge,mahesh landage,bjp mahesh landge,aamdaar mahesh landge,bjp aamdaar mahesh landge,mahesh landge pro kabaddi,mahesh dada landge dance,mahesh landge angry,mahesh landge on pune,mahesh landge birthday,mahesh landge viral video,mahesh landge on abu azami,mahesh landge viral speech,mahesh landge speech today

मागं एप्रिल महिन्यात महेश लांडगे यांच्यासोबत एक किस्सा घडला. त्याचं झालं असं भोसरी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केलीय. नागरीक त्या हेल्पलाईन नंबरवर अथवा व्हाट्सअपवर आपली तक्रार पाठवू शकतात किंवा मदत मागू शकतात. त्याद्वारे आजपर्यंत त्यांनी हजारो लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. अगदी त्यांचं ऑफिस सुद्धा रोज लोकांनी गच्च भरलेलं असतं. आपल्या दारातून कुणीचं निराश मनानं परत जाणार नाही असा महेश लांडगे यांचा संकल्पय. त्यांनी तसं बऱ्याचदा माध्यमांनाही सांगितलंय. तर त्या हेल्पलाईन नंबरवरून एके दिवशी स्वतः महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी आली. म्हणजे नंबरच्या व्हाट्सअपवर 30 लाखाची खंडणी दे, अन्यथा तुझ्या जीवाला धोका होईल अशी धमकी देणारा मेसेज आला होता. पुढं त्या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी इफ्तिकार शेख नावाच्या माणसाचं नाव समोर आल्याचं सांगितलं होतं. पण चार पाच दिवसांनी कोंढव्यातील गुरुवार पेठमध्ये राहणाऱ्या शाहनवाझ रौफ गाजी खान या व्यक्तीनं तो फोन केल्याचं उघड झालं. नंतर मग पोलिसांनी त्यांना अटक केली. तशी तर आमदार महेश लांडगे यांची कारकीर्द वाद कमी काम जास्त अशीचं राहिलेलीय. पण यावेळी औरंगजेब प्रकरणावरून त्यांनी अबू आझमी यांच्याविरोधात घेतलेली भूमिका विधानसभे बरोबरच महाराष्ट्रात ही खूप गाजली. बऱ्याच जणांनी त्यांना सपोर्ट दर्शवला. त्या लोकप्रियतेच्या जोरावरच आता यावेळी महेशदादानी मला शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवायची अशी इच्छा बोलून दाखवलीये. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्ता असून अमोल कोल्हे तिथले खासदार आहेत. पण जर भाजप श्रेष्ठीच्या मनात आलं आणि महेशदादांना शिरूर लोकसभेचं तिकीट मिळालं तर अमोल कोल्हेना 2024 ची निवडणूक जड जाणार ह्ये नक्की. आता आणखी खास माहिती सांगायचं म्हणजे 2016 साली त्यांना न्यूजपेपर असोसिएशन ऑफ इंडियाने बेस्ट आमदाराचा किताब दिलाय. यावरून त्यांच्या कामाचा आवाका तुमच्या लक्षात येऊ शकतो. आमदार महेश लांडगे यांचा आजवरच्या राजकीय प्रवासाबद्दल नेमकं तुमचं मतं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडीओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद

कुस्त्यांचा फड ते विधानसभा पैलवान महेश लांडगे यांचा प्रवास जबराटय | MLA Mahesh Landge Biography in Marathi

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *