रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे पर्मनंट खासदार ? | Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari


मंडळी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा कायमच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचं निशाण फडकवलं होतं. पण सध्याच्या घडीला माढ्यातली गणितं जरा गुंतागुतीची झाली आहेत. पण तरीसुद्धा निंबाळकर आपला गड अभेद्य राखतील असं राजकीय जाणकार सांगतायत. पण मग कशाच्या आधारावर रणजितसिंह निबाळकर माढा लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखतील? असं म्हणलं जातंय. चला काही मुद्द्यांच्या आधारे पाहुयात.

ranjitsinh naik nimbalkar,

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)

तर बघा आक्रमक वक्त्तृत्वशैली, मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना ओळखंलं जातं.मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी खरंतर भाजपमध्येही आपलं स्थान आता मजबूत केलं आहे. एवढंच नाही तरं फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणूनही त्यांची ओळखय. अगदी पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जाते. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आता मागेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिलाय. निंबाळकरांचं कौतुक करताना बावनकुळे म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात जास्त निधी देऊन निंबाळकरांवर विशेष प्रेम दाखवलंय. देशातील टॉप 10 खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे. मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत. याच्यातील मतभेद दूर होतील. कोणीही बॅनर लावले, काही केले तरी  एकदा पक्षाने उमेदवार दिला की त्याच्या मागे सर्वांनी उभे राहावं लागेल. आता मागेही मोहीते आणि निंबाळकर यांच्यातला संघर्ष मिटावा यासाठी घेतलेल्या बैठकीत फडणवीसांनी निंबाळकर यांचं कामं करावं लागेल असं जाहीर केलयं. एकूणच काय तर त्यांनी एकप्रकारे रणजितसिंहनिबाळकर यांच्या उमेदवारीला दुजोराचं दिलाय.

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)


बाकी भारतीय जनता पार्टीचा आपण पूर्वइतिहास पाहिला तर भाजप जेंव्हा एखाद्या उमेदवाराला प्रोजेक्ट करतं तेंव्हा त्याची उमेदवारी निश्चितचं असते असं अनेक राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे भाजप अंतर्गत मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना कितीही विरोध झाला तरी भाजपकडून त्यांना तिकीट निश्चित असेल असं बोललं जातंय. कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मागे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारिला विरोध दर्शवला होता. पण ते सुद्धा चहाच्या पेल्यातलं युद्धयं असं स्थानिक कार्यकर्त्यांच म्हणणंय. त्याचबरोबर भाजप अंतर्गत असणारं हे बंड जोमाने मोडून काढेल असा निंबाळकर समर्थकांना विश्वासयं.पण आता दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. 2019 च्या निवडणुकीत मागे किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आता तत्कालीन परिस्थितीत विचार केला तर अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याची साथ मिळाल्यानेचं मागे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.हे खरं असलं तरी , आता मोहिते-पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याने निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच निर्माण होईल अशी चर्चा होती. पण आता भाजपचे रणनीतीकार श्रीकांत भारतीय यांनी मोहिते पाटील यांच्या बँनरबाजीवर कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन त्यांना निंबाळकर यांचं कामं करण्याचे आदेश दिलेत असं बोललं जातंय.आता याव्यतिरिक्तही असे काही मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर निंबाळकरंचं माढ्याचे पुढील खासदार असतील. असं मानलं जातंय.यातला सगळ्यात पहिला मुद्दाय तो म्हणजे निंबाळकरांची जिंकून येण्याची क्षमता.

ranjitsinh naik nimbalkar, mohite patil,

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)

खऱतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीयच आहे. सोबतच ऐतिहासिक घराण्याची त्यांची लीगसी सुद्धा आहे. रणजितसिंह यांचे वडील हिंदूराव नाईक-निंबाळकर हे 1996 मध्ये शिवसेनेकडून साताऱ्याचे खासदार होते. मार्च 2022 मध्ये त्यांचे निधन झाले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यादेखील राजकारणात सक्रिय आहेत. त्या देखील सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. आता या व्यतिरिक्त नाईक-निंबाळकरांची वडिलोपार्जित आर्थिक सुबत्ता आहे. समशेरबहाद्दर नाईक-निंबाळकर हे त्यांचे बंधू असून ते फलटण नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबाने तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या गटाचं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.आता याव्यतिरिक्त रणजितसिंह निंबाळकर हे एक राजकारणी असण्यासोबतचं एक यशस्वी व्यावसायिक देखील आहेत.स्वराज साखर कारखाना, स्वराज्य इंडिया उद्योगसमूह असे त्यांचे शेतीशी निगडीत विविध उद्योग, व्यवसाय आहेत. याव्यतिरिक्त या 5 वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांची फळी देखील उभी केलीय. मतदारसंघातला जनसंपर्क आणि लोकांशी असलेला कनेकट यामुळे मतदारसंघात निंबाळकरांना मानणारा वर्ग तयार झालेलाय. मतदार संघात त्यांची अशी स्वतःची ताकदयं. त्याचंबरोबर आक्रमक वक्त्तृत्वशैली, मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा चेहरा लोकांना प्रमिनंट  वाटतो. त्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता वाढते.आता यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दाय तो म्हणजे विरोधी गटातला विस्कळीतपणा.

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)

मंडळी माढ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम आहे. आता महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे असं बोललं जातं असलं तरी तिथून शरद पवार कोणाला संधी देणार याबाबत अजूनही साशंकता आहेत. कारण पवारांनी मागे महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला होता. पण जानकरांनी मात्र तशी तयारी सुरु केली नव्हती . पण आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार तर जानकर महायुतीसोबतच राहणार आहेत. असं कळतंय . रासपला महायुतीकडून एक जागा सोडण्यात आलीय. त्यामुळे जानकर आता परभणीतून लढण्याची शकयता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे शरद पवार गटाच्या या डावावर आता पाणी फिरलं आहे. आता दुसरीकडे आपले 50 वर्षांचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना अद्यापही दुखावले नाही.मोहिते पाटलांचं खरं दुखणं अजित पवार होते पण आता ते बाजूला गेले आहेत. तर राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत. त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन मोहीते पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आता मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय. विशेषतः धैर्यशील मोहीते पाटलांनी माढा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून  ‘वाजवा तुतारी’चा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे. पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहीते पाटील यांनीही त्यांचा प्रचार थांबवलेलायं. आता महाविकास आघाडीकडून शरद पवार डॉ. अनिकेत देशमुख यांचही नावं पुढं करण्याची शक्यताय असं बोललं जातंय. पण एकूणच माढा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विस्कळीतपणा दिसून येतोय. इथल्या उमेदवारी बाबत विरोधी गटात निश्चितता नाहीये. त्यामुळे फायदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना होऊ शकतो.यानंतर पुढचा मुद्दाय तो म्हणजे मोदी फडणवीसांनी रणजित निंबाळकरांना पुरवलेली ताकद आणि विकास कामं.

sharad pawar,ajit pawar,

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)

मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात सभा घेऊन रणजितसिंह निंबाळकरांना मागेच ताकद पुरवली होती. एवढंच नाही तर नीरा देवघर प्रकल्पासंदर्भात फडणवीसांनी निंबाळकरांच कौतुक देखील केलं होतं. त्याचबरोबर रणजितसिंह निंबाळकर हे फडणवीसांच्या मर्जितले नेते देखील मानले जातात. आता या व्यतिरिक्त माढा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल अथवा सातारा जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याचा मुद्दा असेल खासदार निंबाळकर यांनी या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिलंय. सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव हे दुष्काळी तालुके असल्याने त्यांनी या भागात पाणी पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. असं म्हणतात. त्यामध्ये टैंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना असेल, नीरा देवघरचे पाणी नियमबाह्यपणे डाव्या कालव्यातून बारामतीला जात होते ते पाणी त्यांनी उजव्या कालव्याच्या माध्यमातून फलटणच्या शिवारात खेळवल्याचीही जोरदार चर्चा आहे. तसेच निरा देवघरच्या सिंचनाच्या कामासाठी त्यांनी निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे.त्याचं टेंडर ही झालं आहे. याच बरोबर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस गती देण्याचे कामही त्यांनी केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात . फलटण -पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामाचाही यात समावेश आहे. . कोरोनाकाळातही मतदारसंघातील जनतेला आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वराज्य उद्योगसमूहाची यंत्रणा कामाला लावली होती. याशिवाय मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सगळ्या विकासकामांच्या छबीमुळेच रणजितसिंह निंबाळकर यांची लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. याच चांगल्या प्रतिमेच्या जोरावर रणजितसिंह निंबाळकर माढ्यात टफ फाईट देतील असं बोललं जातंय.यासोबतच  देशातला हिंदुत्वाचा मुद्दाही रणजितसिंह निंबाळकरांनी वेळोवेळी बोल्ड केलेलाय. त्यामुळे हिंदुत्वाचं वातावरणही त्यांच्या शेवटी पथ्यावर पडणारे.

(Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)

Manoj Jarange Patil यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तर हे ७ खासदार निवडणुकीत पडतील | Vishaych Bhariशरद पवार नगरच्या खासदारकीला राधाकृष्ण विखे पाटील यांची अशी विकेट काढणार | Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych BhariLoksabha Election मध्ये BJP चं मिशन ४५ कसं पूर्ण होणार, हे आहेत १५ मुद्दे | Fadnavis OBC Andolanदेवेंद्र फडणवीस आणि Shinde मिळून Ajit Pawar यांची गेम करतायत का ? | Latest Marathi News | Vishaych Bhari

एकूणचं काय तरं रणजितसिंह निंबाळकर आपल्या हिंदुत्व, विकासकामं या छबीच्या जोरावर माढ्यातून विजयी होऊ शकतात असं बोललं जातंय. विरोधी गटातही हालचाली कमियेत त्याचाही फायदा निंबाळकरांना होऊ शकतो . अर्थात त्यांची मूळची ताकदही स्ट्रॉंग आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक निंबाळकरांच्या बाजूने झुकती होण्याच्या मार्गांवर आहे. असं कळतंय .
अर्थात जानकरांना सोबत घेऊन भाजपने इथं रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात मजबूत केलेत. असं म्हणलं जातंय.
मराठा+ धनगर हे सोशल इंजिनिअरिंग त्यामुळेनिंबाळकरांच्या पथ्यावर पडू शकतं. तर रामराजे+ मोहिते पाटील हे समीकरणंही यामुळे बोथट होऊ शकतं.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे पुढील खासदार होतील का ? कोणकोणते मुद्दे या निवडणुकित त्यांच्या पथ्यावर पडतील ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Ranjitsinh Naik Nimbalkar माढ्याचे पर्मनंट खासदार ? | Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *