सुजय विखे पाटीलच नगर दक्षिणचे पुढील खासदार होतील ? ७ कारणे | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
मंडळी सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून लोकसभेच्या 9 जागा लढवल्या जाणार आहेत. त्यात नगर दक्षिण लोकसभेची जागा निलेश लंके यांनी लढवावी यावर शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याचं कळतंय. अर्थात महायुतीतील भाजपकडून याआधीचं नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळं यंदा नगर दक्षिणमध्ये विखे पाटील vs लंके यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणारे. खरं तर निलेश लंके यांनी महायुतीत असतानाचं उमेदवारीसाठी दंड थोपटल्यानंतर त्यांच्या आगामी राजकारणाची दिशा कशी असणार आहे याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आला होता. त्यामुळं लगेचचं सुजय विखे पाटील आणि भाजपनं नगरमध्ये प्रचाराची राळ उठवून दिली होती. कारण कोरोना काळात केलेल्या कामानंतर नगर जिल्ह्यात आमदार निलेश लंके यांची लोकप्रियता वाढलेलीय आणि त्याचा येत्या काळात विखे पाटलांना फटका बसू शकतो अशा चर्चा रंगल्या होत्या. पण लढाई अटीतटीची असली तरीही अद्याप नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. आजच्या या व्हिडीओत आपण आगामी निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या पथ्यावर पडू शकणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्यांच्या विरोधात जाऊ शकतील अशा गोष्टी कोणत्या आणि विखे पाटील vs लंके यांच्या रायव्हलरीचा नगरच्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होवू शकतो, कोणत्या पाच कारणांमुळे सुजय विखे लंकेवर तिथे भारी पडू शकतात त्याचाच घेतलेला हा आढावा

(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
मंडळी पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार अशीअहमदनगर लोकसभा मतदारसंघाची ओळखय. सहकार क्षेत्राची जन्मभूमी ते सध्याच्या घडीला प्रचंड राजकीय हालचालींचं केंद्र म्हणून नगर जिल्ह्याकडं पाहिलं जातं. त्यामुळं नगर जिल्ह्याचं राजकारण हा कायमच राज्यात चर्चेचा विषय राहिलेलाय. लोकसभेचा विचार करता नगर जिल्हा हा दक्षिण आणि उत्तर या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलाय. त्यातल्या त्यात नगर दक्षिणमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच राजकीय धुरळा उडणारय हे स्पष्ट झालंय. कारण निलेश लंके यांच्या रुपात नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्यासमोर आव्हान असणारय. नगरमधील राजकीय समीकरणं पाहता राष्ट्रवादीतील फूट, भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाच्या चर्चा, थोरात, शिंदे समर्थकांचा विखेंना विरोध आणि त्यांचा लंकेंना असलेला पाठिंबा यामुळं यंदा सुजय विखेंना शक्ती पणाला लावावी लागणार असं दिसतंय. पण सेम परिस्थितीत निलेश लंके यांच्यासाठी देखील इथली वाट बिकट असणारय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नगरमध्ये पक्षाची ताकद विभागलेलीय. निलेश लंके अजितदादा गट सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्यानंतर अजितदादांनी लंकेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. आता तू नगरमध्ये कसा निवडून येतो तेच पाहतो म्हणत त्यांनी लंकेंना इशारा दिला. असो, तुर्तास आपण सुजय विखे पाटील निलेश लंकेना कसे भारी पडतील हे जाणून घेण्याआधी थोडक्यात नगर मतदारसंघाच्या राजकारणाचा इतिहास जाणून घेऊ.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
मंडळी नगर म्हणलं की गडाख, विखे पाटील, थोरात, जगताप या प्रमुख घराण्यांची नावं आणि त्यांच्या राजकारणाची चर्चा होते. कारण त्या कुटुंबाभोवतीच मतदारसंघातलं राजकारण फिरत राहिल्याचं पाहायला मिळालंय. 1952 पासून ते 1996 पर्यंत तो मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इतर कोणत्याही पक्षाला त्याठिकाणी अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली नव्हती. यशवंतराव गडाख हे सलग तीन वेळा तिथून खासदार राहिले. पण 1998 साली युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यानंतर भाजपकडून दिलीप गांधींनीही तीन वेळा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४ सालीही ते भरघोस मतांनी निवडून आले होते. पण २०१९ ला भाजपने भाकरी फिरवली आणि सुजय विखे पाटील या तरुण तडफदार नेतृत्वाला संधी देण्यात आली. सुजय विखे पाटील यांनी तो विश्वास खरा करून दाखवला आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा जवळपास तीन लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्यानं पराभव केला. त्यानंतर गेल्या पाच वर्षात सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघावर कमांड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या विधानसभा निहाय विचार करता त्याठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 भाजपचे आमदार निवडून आले होते. पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीची गणितं बदलेलीयेत. अन ती गोष्ट सुजय विखे पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते असं बोललं जातंय. दरम्यान आता आणखी कोणत्या गोष्टी सुजय विखेंच्या पारड्यात प्लसमध्ये जाऊ शकतात त्या आपण एक एक करून जाणून घेऊ

(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
सर्वात पहिलं कारण म्हणजे विखे पाटील घराण्याची लीगसी. मंडळी सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून विखे पाटलांची पिढी राजकारणात active आहे. विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी तत्वावर चालणारा प्रवरा हा आशिया खंडातला पहिला साखर कारखाना नगरमध्ये उभारला होता. त्यानंतर लोक त्यांना नगरचे विकासपुरुष म्हणून ओळखायला लागले होते. विखे−पाटील हे १९७८ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी पुढं ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केलं होतं. त्यांच्या पश्चात् त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमांतून अनेक शिक्षणसंस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गावोगावी माध्यमिक विद्यालये आणि कला अकादमी अशा अनेक संस्था उभ्या राहिल्या. दरम्यान त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे−पाटील, नातू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तो वारसा समर्थपणे पुढे चालवला. विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारनं त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला होता तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान केली होती. सध्या आपल्या पणजोबांचा तोचं वारसा सुजय विखे पाटील पुढं घेवून जात आहेत. विखे पाटलांच्या चार पिढ्यांनी नगर जिल्ह्यात आपला प्रभाव राखल्यामुळे अनेक मतदार आजही त्यांच्या घराशी एकनिष्ठ आहेत. याचा आगामी निवडणुकीत सुजय विखेंना मागच्या निवडणुकीप्रमाणे चांगला फायदा होवू शकतो असं बोललं जातंय.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
दुसरं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांचं भांडवल. मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील स्टेशन रोडवरील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचा प्रश्न नियोजित वेळेआधीच निकालात काढणे, नगर शहरातील पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करणे, भुयारी गटार योजना मार्गी लावणे, नगर शहरातील रस्ते, आणखी दोन उड्डाणपूल आणि बायपास रस्त्याची कामं, ज्यामुळं ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी कमी झालीय , नगर करमाळा महामार्ग, कोविड महामारी काळात ऑक्सिजन प्लांटची उभारणी, जिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आलेले आयुष हॉस्पिटल, तळागाळातल्या वयोज्येष्ठ जनतेचं जीवन सुखकर व्हावं म्हणून सामान्यांपर्यन्त पोहोचवलेली वयोश्री योजना, विखे पाटील हॉस्पिटलमुळे गरजूंना अल्पदरात मिळत असलेले उपचार, तसच राज्य शासनाच्या माध्यमातून नगर एमआयडीसी चा विस्तार, सावळी विहीर आणि श्रीगोंदा इथं नवीन एमआयडीसीची मिळालेली मंजुरी अशी अनेक विकासकामे विखेंच्या माध्यमातून झाल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. दरम्यान या गोष्टींच भांडवल करण्याचा आणि विकासाचा मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुजय विखे नक्की करतील. म्हणूनचं त्यांच्या मागील पाच वर्षांतील विकासकामांची घोडदौड पाहता सर्व जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि पुन्हा एकदा त्यांना खासदार बनवून विकासाच्या दिशेने वाटचाल करेल असा त्यांच्या समर्थकांचा दावाय. पण साखळाई पाणी योजना, ताजनापूर पाणी या योजनांना मंजुरी मिळूनही रखडलेल्या कामावरून मात्र विरोधक सुजय विखेना घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
तिसरं कारणय विरोधी पक्षातला विस्कळीतपणा. मंडळी सुरुवातीच्या टप्प्यात ठाकरेंनी समर्थन दिलेले शंकरराव गडाख हे खासदार विखेंच्या विरुद्ध अपक्ष उभे राहतील अशी चर्चा होती. पण शरद पवार मात्र नगरची दावेदारी सोडण्यास तयार नव्हते. दरम्यान पुढं रोहित पवार यांच्या नावाची ही शरद पवार गटाकडून चर्चा सुरु होती. पण पुढं निलेश लंके यांनी नगरच्या उमेदवारीवर दावा ठोकला आणि ऐनवेळी निलेश लंके हेच शरद पवार गटात जातील आणि तेच नगर लोकसभेचे उमेदवार असतील अशा वावड्या उठू लागल्या. मागच्या काही दिवसापूर्वी महायुतीत नाराज असलेल्या लंकेनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि परवाच्या शरद पवार गटाच्या बैठकीत निलेश लंके यांनीचं नगरची जागा लढवावी यावर एकमत झालं. पण गंमत म्हणजे, निलेश लंके हे वैयक्तिकरित्या नगर लोकसभेसाठी इच्छुक नसून त्यांच्या पत्नी रानी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. असं कळतंय म्हणजे विरोधकांमध्येचं अजून उमेदवारीवरून विस्कळीतपणा दिसून येतोय. काल शंकरराव गडाख अजितदादांच्या भेटीला गेल्याची ही चर्चा आहे. बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अपक्ष लढून काँग्रेसशी बंडखोरी केली. त्यामुळं मतदारसंघात थोरातांचं वर्चस्व असलेल्या काँग्रेसमध्ये ही सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी सुजय विखे पाटील यांच्या पथ्यावर पडू शकतात हे नक्कीय.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
पुढं चौथ कारण म्हणजे यंग आणि सुशिक्षित नेतृत्व. मंडळी सुजय विखे पाटील ह्ये न्यूरोसर्जन असून त्यांची मतदारसंघात उच्चशिक्षित अशी ओळखय. २०१९ सालीही भाजपला सुजय विखे पाटील यांची ती इमेज लोकांसमोर नेण्यात यश आलं होतं. त्या जोरावरचं त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना धोबीपछाड दिलं होतं. दरम्यान यंदा यंग आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून मतदारसंघात सुजय विखे यांच्याबद्दल गेल्या वेळेइतकंच positive वातावरणय. सुजय विखे पाटील यांचा मोठ्या प्रमाणावर मतदारसंघातल्या तरुणांशी असलेला कनेक्ट याचाही त्यांना आगामी निवडणुकीत फायदा होवू शकतो असं बोललं जातंय. अर्थात ते मतदारांच्या मनातील anti incumbency चं काय करतात हे मात्र आपल्याला पहावं लागेल.त्यांनतर पाचवं कारणय नरेंद्र मोदींची प्रतिमा मंडळी विखे पाटील घराण्याच्या प्राबल्यामुळेनरेंद्र मोदींनी कायम या मतदारसंघावर लक्ष ठेवल्याचं बोललं गेलं. नगर आणि शिर्डीमध्ये मध्यंतरी त्यांचा दौरा झाला. शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचं उद्घाटनही झालं. त्या विकासात्मक वरद हस्तासोबतच अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापणेनंतर मोदींची झालेली हिंदूत्ववादी नेता या सर्वोच्च प्रतिमेचा सुजय विखे पाटलांना देखील इथे फायदा उठवता येऊ शकतो.नंबर सहा आहे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील फॅक्टर. मंडळी राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या राज्य सरकार मध्ये महसूल मंत्री आहेत. पशुसंवर्धन सारख्या महत्वाच्या खात्यांवर ते काम करत आलेत. सोबतच त्यांची या मतदारसंघावर चांगली कमांड आहे. परिणामी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावामुळेही इथं विखे पाटलांना फाईट सोपी जाऊ शकते.

(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
नंबर सातचा मुद्दा म्हणजे – मराठा नेतृत्व .विखे पाटील हे नगरमधील एक प्रस्थापितराजकीय कुटुंब आहे. मराठा समाजावर त्यांची विशेष कमांड आहे. मध्यंतरी मराठा आंदोलनावेळीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या बाजूने रोखठोक भूमिका घेताना छगन भुजबळ यांना धारेवर धरायला मागेपुढे पाहिलं नव्हतं. अर्थात भाजपनं प्रस्थापित मराठा नेतृत्व+ सहकारी चळवळीतले अग्रणी नेते म्हणून विखे पाटलांना नगरमध्ये सोबत घेतलंय. त्यामुळे वातावरण कितीही फिरलं म्हणलं तरीही नगरचे मतदार पुन्हा एकदा विखे पाटलांच्या पारड्यात आपलं मत झुकवतील असं दिसतंय. पण अर्थात निलेश लंके यावेळी त्यांना टफ फाईट देतील हे निश्चितंय.आता या झाल्या सुजय विखे यांच्या पथ्यावर पडणाऱ्या सात गोष्टी. आता आपण सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही लढाई कशामुळे टफ होवू शकते त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुजय विखेंविरोधात सुरु असलेलं गटातटाचं राजकारण. भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपमधला डॉ. सुजय विखे विरुद्ध राम शिंदे हा संघर्ष तिथ चर्चेचा मुद्दाय. राम शिंदे यांनीही खासदारकी लढवण्याची तयारी केली होती पण भाजपनं पुन्हा एकदा विखेंनाचं पसंती दिलीय. तसंच श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे हे भाजपचे दोन आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून विखेंना ताकद पुरवली जाईल. त्यातल्या त्यात मागची रायव्हलरी विसरून अजितदादा गटाचे संग्राम जगताप हे आता सुजय विखेसोबत आल्यानं तो एक सुजय विखेंसाठी प्लस पॉईंट ठरू शकतो. याउपर सुजय विखेंनी या मतदारसंघात त्यांचा विरोध मोडून काढत मोट कशी बांधायची याची जुळणी केलीय असं म्हणतायत.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
जरांगे पाटलांच्या सभांमुळे मराठा समाजाचे हे ५ नेते पडतील | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhariहे ११ आमदार शरद पवारांशी कट्टरयेत | Ajit Pawar Bandkhori | Sharad Pawar Resigns | Vishaych Bhariजरांगे + धनगर युती मागं शरद पवारांचा हात | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhariगोपीचंद पडळकर वादग्रस्त की झुंजार नेतृत्व | Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar
दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे आणि पारनेरमध्ये स्वतः निलेश लंके यांच्या प्रभावामुळे सुजय विखेना तिथून किती ताकद मिळेल हा चर्चेचा मुद्दाय. पण तिथंही लंकेंचे कट्टर विरोधक असणाऱ्या विजय औटींना सोबत ठेवण्याचा मास्टरस्ट्रोक सुजय विखे मारू शकतात. त्याशिवाय भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे, बाळासाहेब थोरात हे सुद्धा लंके यांना मदत करत असल्याच्या चर्चा आहेत. पण तरीही सुजय विखे पाटलांनी त्या नेत्यांच्या विरोधातल्या गटाची मोट बांधायचं धोरण अवलंबल्यांचं कळतंय. अर्थात तुम्हाला नेमकं काय वाटतंय. निलेश लंके यांचं आव्हान मोडून काढत सुजय विखे पाटीलच पुन्हा एकदा नगरचे पुढील खासदार होऊ शकतात का ! तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply