कोयता मारून नाय कोयता अडवून हिरो झालेला Leshpal Jawalge | Pune Crime News

पुण्याच्या सदाशिव पेठेत जीवाच्या आकांतानं पळणारी मुलगी, हातात कोयता घेऊन तिच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेला नराधम आणि आजूबाजूला ते सगळं उघड्या डोळ्यानं पाहणारी, मुलीच्या तोंडावर दुकानाची कवाड बंद करून घेणारी दगडाच्या काळजाची माणसं.. सगळंच भयानक आणि निराशावादी चित्र. पण त्या निराशेच्या अंधकारात ही दोघेजण होते ज्यांनी त्या मुलीचा जीव वाचावा म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. पुढं सरसावून त्यांनी त्या नराधमाच्या हातातला कोयता हिसकावून घेतला आणि त्या मुलीला एकप्रकारे जीवनदान दिलं. दिल्लीच्या साक्षी प्रकरणात सुद्धा अशीच कुणीतरी हिमत दाखवली असती तर कदाचित आज साक्षी आज जिवंत असती. असो सध्या पुण्याच्या सदशिव पेठेतल्या त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतोय. पण काल नेमकी काय घटना घडली, त्या नराधमाच्या मुसक्या आवळून माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देणारे ते दोन साहसीवीर कोण होते, सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेवूयात…


मंडळी मागच्या काही दिवसापूर्वी राजगडाच्या पायथ्याशी घडलेलं एम पी एस सी Toper दर्शना पवारचं हत्याकांड ताजं असतानाचं काल सकाळी पुणेकरांच्या काळजात धडकी भरवणारं दृश्य पुणेकरांना पाहायला मिळालं. खरं तर दर्शना पवार हत्याकांडामुळं अजूनही सगळ्यांच्या मनात भीतीच वातावरणय. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलं इतक्या खालच्या थराला जावू शकतात याची आता समस्त पालकांनी धास्ती घेतलेलीय. दरम्यान त्या गंभीर प्रकरणाची अजून पुरती चौकशी हि झालेली नाही तोच आज पुण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका सनकी तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली. शंतनू लक्ष्मण जाधव असं त्या हल्ला करणाऱ्या तरुणाच नाव असून तो मुळशीच्या डोंगरगाव भागातील रहिवाशी आहे. त्याचं वय फक्त २२ वर्षाचंय हि गोष्ट लक्षात घेण्यासारखीय. दरम्यान मागच्या काही काळात पुणे, मुळशी आणि मावळ भागात या कोयत्याने अनेकांचे बळी घेतल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळं सगळीकड कोयत्याची दहशत पसरलेलीय आणि यामुळं पुण्याच्या नागरीकासोबत पुणे पोलीस प्रशासनाची चिंता वाढलीये.

darshana pawar news

असो, आता नेमका प्रकार काय घडली ते आपण पाहू. माध्यमात आलेल्या माहितीनुसार, आरोपी शंतनू आणि २० वर्षीय युवती गेले दोन वर्षांपासून प्रेम संबंधात होते. दोघे कोथरूडमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी तरुणीने सदाशिव पेठेतील एका विद्यालयात ऍडमिशन घेतलं होतं आणि शंतनू हा कर्वेरोड येथे शिक्षण घेत होता. बराच काळ दोघांनी एकत्र काळ घालवल्यानंतर अचानक दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. दोघांच्या आपसी मतभेतामुळे दोघांचे प्रेमसंबंध ही तुटले होते. मात्र त्या संबंधित तरुणीने शंतनूशी असलेले सगळे सहसंबंध तोडल्यानंतर ही वारंवार फोन करून शंतनू हा त्या तरुणीला शिवीगाळ करत होता. त्यामुळं दोघांच्यात असलेली नाराजी आणि राग टोकाला पोहोचला होता. काल सकाळी शंतनू जाधव हा त्या तरुणीच्या कॉलेजबाहेर येवून थांबला होता. तरुणी कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिची वाट अडवून तो मला तुझ्याशी बोलायचंय असं म्हणाला. पण तरुणीने त्या गोष्टीला साफ नकार दिला. नंतर काहीवेळाने त्या तरुणीने तिच्या मित्राला बोलवून घेतलं आणि ते दोघेजण गाडीवर बसून तिथून निघून गेले. त्यावेळी शंतनू त्यांचा शिव्या देत रस्त्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होता. दरम्यान काही अंतर पुढं गेल्यानंतर तरुणीसोबत असलेल्या मित्राने गाडी थांबवली आणि शंतनूला शिव्यांचा जाब विचारला.

मात्र, त्याच क्षणाचा फायदा घेत शंतनू याने आपल्या बॅगेतून कोयता बाहेर काढला आणि तरुणीच्या मित्रावर पहिला वार केला. वार होताच तो मित्र घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान घाबरलेली तरुणी ही तिथून सैरावैरा पळत सुटली. ते पाहून शंतनू देखील त्या मुलीच्या मागे कोयता घेऊन पळू लागला. भर रस्त्यात हा भयानक प्रकार सुरु होता. मुलगी जीवाचा आकांताने पळत होती. पाठीमागून शंतनू तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होता. एक ते दोन वार झाले ही. मुलीच्या खांद्यावर कोयत्याचा वार बसला. पळता पळता तरुणी २ वेळा धडपडून जमिनीवर पडली. उठून पुन्हा धावू लागली. शंतनू मागे हातात कोयता घेऊन पळत होताच. दरम्यान धावता धावता जीव वाचावा म्हणून ती एका बेकरी दुकानात घुसण्याचा प्रयत्न करू लागली पण बेकरीवाल्याने तिच्या तोंडावर दुकानाच शटर खाली ओढून घेतलं. हा सगळा प्रकार आजाबाजूची माणस पाहत होती. त्यापैकी काही जणांनी आरोपीचा प्रतिकार करण्याचा ही प्रयत्न केला. पण त्या सगळ्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा शंतनूने प्रयत्न केला. दरम्यान घाबरलेली माणस दूर पळू लागली. बेकरीवाल्याने शटर खाली ओढल्यानंतर घाबरलेली मुलगी दारातचं अडखळून पडली.


मागून शंतनू हातात कोयता घेऊन तिच्याजवळ पोहोचला.तो तिच्या डोक्यात कोयता घालणारचं होता तेवढ्यात पी एस आय परीक्षेचा अभ्यास करणारा लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथं पोहोचला.त्याने रस्त्याने चालताना घडलेला सगळा प्रकार पाहिला होता. पुढ त्याने क्षणाचा ही विलंब न करता आपली खांद्यावरची bag खाली टाकली अन हल्ला करणाऱ्या शंतनूजवळ जावून त्याला त्यानं मागे ओढलं. त्याच्यासोबतीला पुढ हर्षद पाटील नावाचा तरुण धावून आला आणि त्याने शंतनूच्या हातातील कोयता हिसकावून घेतला.

Pune latest News
Leshpal Jawalge
Harshad patil

नंतर जमलेल्या आणि रागावलेल्या गर्दीने शंतनुला पकडून बेदम मार दिला. हाताला येईल त्या वस्तूने चोप दिला. मात्र लेशपालनं लोकांना कायदा हातात घेवू नका, आपण त्याला पोलिसात देवू असं सांगितलं आणि गर्दी पांगली. पुढ लेशपाल आणि हर्षद पाटील यांनी त्या आरोपीलादेखील पोलीस स्टेशनला नेलं. तिथं त्याला पोलीस स्टेशनच्या एका खोलीत कोंडून ठेवलं. १५ मिनिटानंतर पोलीस अधिकारी तिथं आले  आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर आता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस त्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लेशपाल आणि हर्षदच्या साहसामुळं आज एका मुलीचा जीव वाचला. त्यापैकी लेशपाल हा माढा तालुक्याचा रहिवाशी असून सध्या तो पुण्याच्या सदशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. खर तर लेशपाल आणि हर्षदने दाखवलेलं हेच साहस काही दिवसापूर्वी दिल्लीतल्या लोकांनी दाखवलं असतं तर आज साक्षी देखील आपल्यात जिवंत असती.

असो, लेशपाल आणि हर्षदच्या या साहसाच आता संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. अगदी पुणे पोलसांनी हि त्यांचा गौरव केलेलाय. पुण्यातल्या वेगवगेळ्या सामाजिक संस्थांनीही त्यांचा पुरस्कार देवून सन्मान केलाय. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही तरूणांना याबद्दल प्रत्येकी रूपये ५१ हजार रूपयांचं बक्षीस जाहीर केलंय. जितेंद्र आव्हाड म्हणतात की बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना नक्कीच मदत होईल. राज ठाकरेंनी मात्र राज्यसरकारला यावरून घेरलं. सुशोभीकरणाचं झालं आता कायदा सुव्यवस्थेचं बघा असं ते म्हणतात.‌ त्याचसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या घटनेबद्दल tweet केलं. त्या म्हणाल्या,

लेशपाल, आज तुझ्यामुळे एक जीव वाचला ,तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहेस.

आता राज्याच्या सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी राज्यभरातून केली जातेय. कारण आता त्यांच्या कामाचा सन्मान झाला तर भविष्यात अशा गंभीर प्रसंगी माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी लोकं जास्तीत जास्त धडपड करतील अशी लोकांना खात्री आहे. खर तर कुठल्याच मुलीवर पुन्हा असा प्रसंग येवूचं नये ही काळजी राज्याच्या कायदा सुव्यव्स्थेमार्फत घेतली गेली पाहिजे. कारण एकतर्फी प्रेम प्रकरणातून मागच्या वर्षात खूप जणींना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळ या प्रकरणी गुन्हे करणाऱ्या आरोपींना कडक शासन करण्याची तरतूद करण्यात यावी अशी ही लोकांकडून मागणी केली जातीये.पीडीत तरूणीची आई तर माध्यमांसमोर बोलताना भावनिकच झाली. ती दोन पोरं नसती तर माझी पोरगी वाचली नसती असं त्या म्हणाल्या. आता जाता जाता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, अगदी रामायण किंवा महाभारत या पुराण ग्रंथाचा दाखला घ्या.

Pune Koyta Halla News

दुर्योधनानं द्रोपदीच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न केला म्हणून श्रीकृष्णानं द्रोपदीला साडी पुरवली. माताभगिनींचं संरक्षण करणं हा आपला संस्कार आहे.‌ म्हणून तर आपण आज त्यांना दैवत म्हणून पुजतो. आता ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना त्रास दिला, त्यांच्या इज्जतीवर घाला घातला त्यांच्यापेक्षा ज्यांनी स्त्रियांचं रक्षण केलं, त्यांची इज्जत वाचवली त्यांच्या नावाचा आज जयजयकार होतो.हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांच्या मुलींच्या मतांचा आदर केला पाहिजे आणि जरी असा काही बांका प्रसंग घडला तर मग लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील सारख्या भावांसारखं मदतीला धावून गेलं पाहिजे. या दोन्ही भावांचंही असंच म्हणणं आहे.

ते म्हणतात, आम्हाला सत्काराला नका बोलवू पण असा काही प्रसंग घडला तर त्यावेळी इतरांच्या मदतीला नक्की धावून जा‌.

खरंय, या दोघांनी माणसांना माणुस म्हणून वागायची शिकवण दिलीये. म्हणून या दोघांसारखी पोरं महाराष्ट्राच्या घराघरात तयार झाली पाहिजेत असं सगळ्यांना वाटतं. या दोघांनाही विषयच भारी टीमचा कडकडीत सलाम आहे. बाकी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांच्या साहसाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते ही आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.

घटनेची संपूर्ण माहिती या व्हिडीओमधून जाणून घ्या

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *