जवानचा तो डायलॉग मारून शाहरुख खानने समीर वानखेडेंशी पंगा घेतलाय का | Jawan Movie Review | Shahrukh Khan vs Sameer Wankhede
शाहरुख नाम तो सुना ही होगा, जिसके फिलमोका इंतजार सिर्फ फॅन ऑर ट्रोलर्सही नही, देशकी पुरी पब्लिक करती है. वो है शाहरुख खान. त्याला बॉलीवूडचा किंग म्हणतात, बादशाह म्हणतात आणि त्याच थाटात तो त्याचे सिनेमेही घेऊन येतो. मधल्या काळात अनेकांनी त्याचे सिनेमे बायकॉट करायचा प्रयत्न केला, शाहरुख संपलाय आस जाहीर केल. त्याचे सिनेमे लोकांनी बघू नये म्हणून सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याची बदनामी केली. पण तो शाहरुख आहे, तो थांबला नाही, आधी पठाण आणि आता जवान मधून तो तितक्याच ताकदीने परत आलाय. लोक जवान सिनेमाला गर्दी करतायत, पहिल्याच दिवशी या सिनेमाने छप्परतोड कमाई केलीये. सगळीकडे जवानचे शो हाऊसफुल चाललेत. आत्तापर्यंतच्या साउथच्या सगळ्या रेकॉर्डब्रेक सिनेमांच रेकॉर्ड शाहरुखकचा जवान हा सिनेमा तोडेल अस म्हंटल जातय. हे खर आहे का? जवान सिनेमा खरच इतका जबराट आहे का? गल्ली पासन दिल्ली पर्यंत जवानचीच का चर्चा आहे, हेच आपण आज जाणून घेणारय…
( Jawan Movie Review | Shahrukh Khan vs Sameer Wankhede | Vishaych Bhari )
रेडी… असं म्हणत साऊथ स्टाईल मध्ये आधी शाहरुख च्या जवानचा फर्स्ट लूक आला ज्यात पट्टी बांधेलेला शाहरुख, आजूबाजूला बंदूका, काडतूस, आणि एका वॉकी टॉकी मधून एक मुलगी ” गुड टू गो चीफ” म्हणते , ज्याला शाहरुख ” रेडी” असं म्हणत प्रतिसाद देतो. हा टीजर बघतानाच सगळ्यांची खात्री पटली होती, की शाहरुख काय तरी जाळ आन धूर संगटचवाल खतरनाक घेऊन येतोय. त्यानंतर मग सिनेमा रिलीज व्हायच्या फक्त ७ दिवस आधी ट्रेलर. लोक तर आसही म्हंटले ट्रेलर मध्येच एवढं दाखवलं तर सिनेमात काय बघायच. हेच उत्तर तुम्ही सिनेमा ज्यांनी बघितलाय त्यांना ईचारा. लोक पार यडीच झालीयेत, शाहरुखच्या फोटोला हार काय घालतायत, केक काय कापतायत, सिनेमात शीट्ट्या काय वाजवतायत. शाहरुखच्या एन्ट्रीला आरडाओरडा काय करतायत. संगळचं विषयच भारी. त्यांच्यामुळच शाहरुख पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस चा किंग व्हायला रेडी झालाय आस म्हंटल तर त्यात वावगं ठरणार नाही. जवान सिनेमाच्या सुरवातीलाच भारताच्या एका ईशान्येकडील गावावर अटॅक होतो, त्या गावात शाहरुख खानवर उपचार चालू असतात. ज्यांनी त्या गावावर अटॅक केलाय, ते लोक गावातल्या माणसांना मारतयात, इतक्यात सगळ्या चेहऱ्याला पट्टी गुंडाळलेला शाहरुख तिथे येतो, त्यांना वाचवतो. आणि गावातल्या माणसांना विचारतो.. मी कोण आहे .. आन तेवढ्यात स्क्रीनवर नाव येत शाहरुख खान.. मग काय थेअटर मध्ये पब्लिकचा नुस्ता धिंगानाच, शिट्या, टाळ्या आन नुस्ता कालवा. त्यानंतर तीन तास नुस्त एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट आणि एंटरटेंमेंट. हा सिनेमा आपल्याला हसवतो, रडवतो, तर कधी सुन्न करतो, यात सस्पेन्स आहे, थ्रील आहे, रोमान्स आहे, इमोशन आहेत, थोडक्यात काय तर सगळच आहे. कोल्हापुरी मटणात पण वापरत नसतील एवढा मसाला ह्या सिनेमात आहे. हा सिनेमा खुर्चीला खिळवून ठेवतो, सामाजिक समस्यांवर बोलतो. विचार करायला प्रवृत्त करतो. देशात जे काही चुकीच चाललय त्याच्यावर भाष्य करतो.
( Jawan Movie Review | Shahrukh Khan vs Sameer Wankhede | Vishaych Bhari )
शाहरुख यात वेगवेगळ्या रोल मध्ये आपल्याला दिसतो, ते का हे मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही सिनेमातच बघा , पण एवढ सांगेन, शाहरुखन आज पर्यंत त्याच्या कुठल्याच पिक्चरमध्ये केली नसल अशी action या सिनेमात केलीये. आणि त्यान ती इतक्या स्टाईलनं केलीय की तुमच्या डोळ्याच पारणच फिटतं. त्याचा चार्म आपण सगळ्यांनी आजपर्यंत बघितलायच , पण ह्या वेळी त्याच्या जोडीला जबरदस्त साऊथ स्टाईल ऍक्शन आहे. आजपर्यंत शाहरुख रोमॅंटिक हीरो म्हणून जास्त फेमस होता, पण जवान सिनेमा शाहरुखला भारतातला सगळ्यात मोठा मास अॅक्शन हीरो बनवू शकतो. यातल्या डायलॉग त्याबद्दल तर बोलायलाच नको.. बेटेको हाथ लगानेसे पेहले बापसे बात कर, ह्या डायलॉगचा तर स्वॅगच वेगळा आहे. एकच मन आहे भावा कितिवेळा जिंकणार आसच हयो पिक्चर बघताना म्हणावस वाटतं. या सिनेमाची कथा पहिल्या सीन पासूनच आपल्या मनाची पकड घेते. मग त्यात शाहरुख ची एन्ट्री, मेट्रो चा सीन, पकडा पकडीचा रंगलेला खेळ, शाहरुख नयनतारा यांची जुगलबंदी, विजय सेथुपतीच क्रूर रूप, त्याची कॉमेडी, सगळच कमाल आहे. इंटरवलला तर अक्षरश : आपण चकित होत खुर्चीवर शांत बसून राहतो. इंटर्वलला येणारं रोमांचक सरप्राइज बघताना प्रेक्षक थिअटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतात. आपल्या अंगावर काटा येतो. यात शाहरुख खानचा जितका वाटा आहे, तितकाच वाटा या सिनेमाचे दिग्दर्शक अॅटली यांचाय. दिग्दर्शक ॲटली नेहमीच सामाजिक विषय मनोरंजन करत मांडतो.. बिगील, मेर्सल, थेरी हे त्याचे तिनही तमीळ सिनेमे असेच होते… पण मनोरंजनात तसुभरही कमी नव्हते.. “जवान” हा त्याच पठडीतला पण सर्वार्थाने पॅन इंडीया सॉरी पॅन भारत असा सिनेमा आहे.
( Jawan Movie Review | Shahrukh Khan vs Sameer Wankhede | Vishaych Bhari )
ॲटलीने शाहरुखला ना कुणी विचारही केला नव्हता, अशा अवतारात प्रेक्षकांसमोर आणलय, हा सिनेमा जेवढा शाहरुखचा आहे तेवढाच किंवा त्याहुन जास्त ॲटली चा आहे. मास सिनेमा कसा बनवावा, हे खरंच ॲटलीकडून शिकल पाहिजे. याची कथा, पटकथा ही प्रत्येक प्रेक्षकाला जवळची वाटेल अशीच आहे. मनोरंजन आणि सामाजिक संदेश ही दोन्ही कामे या सिनेमाने उत्तम पार पडलीयेत. यानंतर आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे साऊथ स्टार विजय सेथुपती. त्याने व्हिलन असा साकारलाय की त्याला पाहताना एक वेगळीच मजा येते. तो खुनशी, मतलबी, आणि क्रूर तर आहेच पण हे सगळ करताना तो आपल्याला हसवतोही. त्याचं ते एक वेगळच सायको कॅरक्टर आहे. जे कधी काय बोलेल, काय वागेल आपण काहीच अंदाज लावू शकत नाही. त्याच्या वाट्याला खरतर आणखी काम हव होत, पण तरीही त्याला जे काही मिळालय, त्यात तो रंग भरतोय. लेट येतो पण थेट येतो, आसच म्हणाव लागेल. यानंतर साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा, हीला लेडी सुपरस्टार का म्हणतात हे हा सिनेमा बघितल्यानंतरचं कळतं. तिने पण तोडीस तो अॅक्शन या सिनेमात केलीये. तीला पाहण्यासाठी सिनेमागृहात येणारा तीचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. तीचा या सिनेमातला वावर कमालीचा सुंदर आहे.. प्रियमनी , सान्या मल्होत्रा , आपली मराठी मुलगी गिरीजा ओक या शाहरुखच्या गॅंग मधल्या गर्ल्सनीही भारी काम केलय. त्याच बरोबर दीपिका पडूकोनने तिचा कॅमिओ रोलही चांगला केलाय. ह्या सिनेमात आणखी एका गोष्टीच कौतुक करायला पाहिजे, ती म्हणजे याच बिजीएम.. background म्युझिक.. हे बीजीएम सिनेमाला एकदम वरच्या दर्जाला घेऊन जातं. सिनेमॅटोग्राफी पण उत्तम आहे , जी की आपले डोळे सुखावते. थोडक्यात काय तर संगळच जाम भारी आहे. म्हणूनच ह्या सिनेमाला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळलीये. साऊथचा डिरेक्टर आणि बॉलीवूडचा बादशाह एकत्र आल्याने हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल, मास आणि क्लास दोघांनीही ज्याला आजवर डोक्यावर घेतलय, बायकॉट गँगला फाट्यावर मारून ज्याने त्याचे सिनेमे हीट करून दाखवलेत. त्या शाहरुखचा हा सिनेमा पण सुपर हीट होईल. हा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर मास मुव्ही ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या बॉलीवूडच्या, साऊथच्या सगळ्या सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड मोडेल, अशाच चर्चा सगळीकडे रंगतायत. तुम्हाला काय वाटतं, जवान खरच सगळे रेकॉर्ड तोडेल का ? तुम्ही जवान बघितलं असेल तर तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply