जळालेले चेहरे, तुटलेले हातपाय, मृतदेहांचे थर | Hiroshima Nagasaki Atom Bomb हल्ल्याची भयानक गोष्ट
6 ऑगस्ट 1945, अमेरिकेनं मानव इतिहासातलं सर्वात अमानवी कृत्य केलं. जपानवरचा राग काढण्यासाठी त्यांच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. तेव्हा जपानमध्ये जिवीताची, साधन संपत्तीची भयंकर मोठी हानी झाली होती. त्याचा धसका जपानी जनतेच्या मनातून गेला नव्हता तोच पुन्हा बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर आणखी एक अणुबॉम्ब टाकला. आजपासून बरोबर 78 वर्षापूर्वी. आज 9 ऑगस्ट, नागासाकी हल्ल्याचा दिवस. ते दोन हल्ले इतके भयंकर होते की जपानला त्यातून सावरण्यासाठी तब्बल चाळीस वर्षे मेहनत घ्यावी लागली. खरं तर आजही जपान त्यातून व्यवस्थितपणे सावरलेलं नाहीयेच. कारण आजही जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी भागात अपंग आणि कमजोर शरीरयष्टीची मुलं जन्माला येतायत. न्यूक्लिअर बॉम्बनं त्यांच्या तीन पिढ्यांची आयुष्य उध्वस्त केली. त्या निमित्तानं बनवलेला आजचा हा व्हिडीओ. या व्हिडीओत आपण त्या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब पडल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं होतं ? किती लोकांचा तात्काळ बळी गेला होता, किती जणांना पुढं जाऊन मृत्यूला सामोरं जावं लागलं ? स्फ़ोटानंतर ती दोन्ही शहरं पुन्हा कशी उभी राहिली याबद्दलची सगळी सविस्तर माहीती जाणून घेणारय…
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )

मंडळी ७ डिसेंबर १९४१ चा दिवस. दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या जपानी वायुदलानं अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या पर्ल हार्बर बेटावर हवाई हल्ला केला. आणि त्या हल्ल्यात अमेरिकेची ३०० पेक्षा जास्त विमानं आणि १८ पेक्षाही अधिक मोठी जहाजं नष्ट झाली. त्या हवाई हल्ल्यानं जपाननं अमेरिका आणि ब्रिटनविरोधात युद्ध पुकारलं. त्या हल्ल्याच्या दुसऱ्याच म्हणजेच 8 डिसेंबर या दिवशी अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धात अधिक सक्रिय झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे १९४५ रोजी त्यांनी जपानवर अणूबॉम्ब टाकला. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब हल्ले केले. आता हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये exact त्यादिवशीची तिथली नेमकी काय परिस्थिती होती याची आपण खरं तर कल्पनाही करू शकत नाही. तर बघा 6 ऑगस्ट 1945 चा दिवस. वेळ सकाळी 7 वाजताची. जपाननं त्यांच्या रडारमध्ये अमेरिकेचं B-29 हे विमान टिपल. पण हे विमान काय हेतून आपल्याकडे आलय याची जपानी लोकांना काडीमात्र कल्पना नव्हती. जरी रडारने हे विमान टिपल असलं तरीही दुसऱ्या महायुद्धामुळं तिथं परिस्थिती एवढी वाईट होती की जपानकड एवढं पेट्रोल सुद्धा नव्हतं की त्या विमानामागे ते एखाद त्यांचं जपानी विमान पाठवतील. तोवर जपानमधले घोक्याचे सायरन वाजु लागले होते. तस तर जपानच्या लोकांना युद्धजन्य परिस्थितीची सवयचं झाली होती. चहा, कॉफी, अंडी, पेट्रोल असल्या वस्तू तिथल्या मार्केटमधून केंव्हाच गायब झाल्या होत्या. तिथला व्यापार पूर्णपणे संपला होता. पण आज एक वेगळाच धमाका तिथं होणार होता. जो धमाका काही सेकंदातच तिथं होत्याच नव्हतं करणार होता. सकाळचे आठ वाजले होते.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )
धोक्याचे सायरन वाजून केंव्हाचेचं बंद झाले होते. Enola Gay बॉक्सकार म्हणजेच B- 29 विमानाचा पायलट Paul Debit त्याच्या सहकाऱ्यांना आदेश दिला. I have Got it. मला ते ठिकाण मिळालंय. आपला गॉगल घालून घ्या. 8 वाजून 15 मिनिटांनी विमान टार्गेट स्थळी आलं आणि 12500 किलोटन ताकदीचा लिटल बॉय विमानातून खाली आला आणि 43 सेकंदाचा प्रवास करून जमिनीपासून 2000 फूट उंचीवरती आला. आकाशात जणू सूर्यच फुटावा असा लिटल बॉय तिथं फुटला. नाव जरी लिटल बॉय असलं तरी त्यानं केलेला स्फ़ोट हा खरंतर विचारच नं केलेला बरा. लिटल बॉय फुटल्यामुळ वातावरणाचं तापमान थेट 4000 डिग्री सेन्टीग्रेडवर जाऊन पोहचल होतं. B-29 विमान पुढे निघून गेलं तस धुराचा एक महाकाय भडका वर उठून आला. विमानाचा सहपायलट रॉबर्ट लुईसनं त्याच्या लॉग बुक मध्ये एक ओळ लिहली. Ohh my god what we have done ? म्हणजेच हे देवा हे आपण काय केलं? विमानात बसलेला जवान बॉब कॅरेन यानं त्या भयानक दृष्याचे फोटोग्राफस घेतले. कित्येक किलोमीटर त्या बॉम्बच्या आगीचा भडका उडालावता. विमानाचा पायलट Paul Debit यान bbc या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की ‘ हे असं काही होतं ज्याची आपण कधीच कल्पना करू शकत नाही. जसा बॉम्ब फुटला तस मी मागे वळून त्याच्याकडे एकदा बघितल आणि पुढे निघालो. धुरांचे ढगच्या ढग उफाळून येत होते. हे फार विलक्षनीय होतं. ” हिरोशीमाच्या जवळपास 70 टक्के इमारती ह्या क्षणारधात उद्धवस्त झाल्या होत्या. शहरांमधल्या काही मोजक्याच कॉन्करीट इमारती सोडून तिथलं सगळंच गायब झालं होतं. हिरोशिमाच्या रेल्वे स्टेशनवर असणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी चिंग को क्लाईंन बचावली. तिन तिच्या अनुभवात सांगितलं की जसा स्फ़ोट झाला तस काही काळ मी बेशुद्ध झाले. अंगावर भाजलेल होतं. काही काळानं मला जशी जाग आली तशी मी घराच्या दिशेन धावू लागली.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )

रस्त्यावरून जाताना मला फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. प्रत्येक गोष्टीचा कोळसा झाला होता. नद्यामधून मृतांचे खच वाहत होते. नुसती जळलेली पोळलेली शरीर आणि मदतीसाठी ओरडणारी माणसं बस्स इतकंच होतं. स्फ़ोटापासून माझे बाबा दूर होते त्यामुळं ते वाचले पण माझी आई खूप वाईट जखमी झाली होती. लोकांना तर सूर्यच फुटला असं वाटलं होतं ” द जपान टाइम्स या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार जवळपास 66,000 लोक या स्फ़ोटात जागीच मृत्युमुखी पडले. पण खरा आकडा आजवर कधीच समोर आलेला नाहीये. एकूण 69,000 लोक जखमी झाले. पण काही काळानंतर जे वाचले त्यांना उत्सर्जित किरनामुळं कायमच अपंगत्व आलं. काही काळानं मृतांचा आकडा जवळपास दीड लाखानवर पोहोचलाम अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष Haris Truman यांनी रेडिओ वरून जाहीर केलं. अमेरिकन विमान B-29 यांन नुकतच जपानच्या हिरोशिमा शहरावर बॉम्ब टाकलाय आणि त्या बॉम्बने दुश्मणाच्या क्षेत्रात भरपूर विधवन्स केलाय. आपण ज्या ताकदीचा bomb टेस्ट केला होता त्याच्या 2000 पट जास्त मोठा बॉम्ब आपण जपानवर टाकलाय. आता आपल्याकडे जगातल सगळ्यात विधवन्सक हत्यार आलंय आणि त्याच्या पुनृत्पादनासाठी आपण आता पुढची पाऊल उचलतोय. ” पुढे दोन दिवस उलटले. पण अमेरिका मात्र काय थांबायला तयार नव्हती. 8 ऑगस्ट 1945 ची रात्र संपत आली होती आणि अमेरिकेच्या बी-29 सुपरफोर्ट्रेस बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता. एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारख्या या बॉम्बचं वजन 4,050 किलो इतकं होतं. विन्स्टन चर्चिल यांचा संदर्भ घेऊन या बॉम्बचं नाव ‘फॅट मॅन’ असं ठेवण्यात आलं होतं. जपानमधलं कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष्य असणार होतं. जपानमधले सर्वांत मोठे व सर्वाधिक दारूगोळ्याची निर्मिती करणारे कारखाने इथे होते.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )
सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी विमानाच्या पायलटला कोकुरा शहर दिसू लागलं. या वेळी बी-29 हे विमान 31 हजार फूट उंचावरून उडत होतं. आणि बॉम्ब सुद्धा इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता. पण कोकुरा शहरावर मात्र ढगांचं सावट आलेलं होतं. म्हणून मग बी-29 एक गिरकी घेऊन पुन्हा एकदा शहराच्या वर आलं. पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचं आणि ढगाचं आवरण आलेलं होतं. कारण विमानाच्या खालच्या बाजूला विमानभेदी तोफा आग ओकत होत्या. बी-29 मधलं इंधन सुद्धा भयंकर वेगान संपत आलं होतं. परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलंलेल होतं.
या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चेशर यांनी सांगितल्यानुसार, “आम्ही सकाळी नऊ वाजता उड्डाण सुरू केलं. मुख्य लक्ष्यस्थळी पोचलो तेव्हा तिथ ढग होते. तेव्हाच आम्हाला बॉम्बहल्ल्याचा संदेश मिळाला, मग आम्ही दुसऱ्या लक्ष्यस्थळाकडे म्हणजे नागासाकीकडे निघालो. पायलटने बॉम्ब टाकणारं ऑटोमॅटिक मशीन सुरू केलं आणि काहीच क्षणांतच तो महाकाय बॉम्ब वेगाने खाली निघाला. 52 सेकंदांनी, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 फुटांवर असतानाच या फॅटमॅन बॉम्बचा स्फोट झाला. त्या वेळी 11 वाजून दोन मिनिटं झाली होती. आगीचा प्रचंड मोठा लोट उठला होता. धुराच्या लोटाचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला होता. नागासाकीच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत असणारी जहाजं आणि बंदरावर उभ्या असणाऱ्या होड्यांना आग लागली. नक्की काय झालंय हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळत नव्हतं. खरंतर काय होतय हे सगळं दिसण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता.

नागसाकी शहराबाहेर काही ब्रिटिश युद्धकैदी खाणींमध्ये काम करत होते, त्यातल्या एकान सांगितल्यानुसार, “संपूर्ण शहर निर्जन झालं होतं. सगळीकडे नुसता सन्नाटा. जिकडे बघेल तिकडे लोकांच्या प्रेतांचा खच पडलेला. काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळलं. लोकांचे चेहरे उतरले होते, हातपाय गळाले होते. त्याआधी कधी अणुबॉम्बबद्दल आम्ही काही ऐकलं नव्हतं.” नागासाकी शहर हे डोंगरांन वेढलेलं असल्यामुळ केवळ 6.7 चौरस किलोमीटर प्रदेशातच त्याचा विध्वंस पसरला होता. या अणुबॉम्बमुळे नागासाकीममध्ये सुमारे 74 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. क्रेक कोलीनं त्याच्या त्याच्या एका पुस्तकात लिहलं होतं की तो अणुबॉम्ब फुटला तेंव्हा लोकांना सूर्यच फुटल्यासारखच वाटल होतं. सगळीकडून नुसते आगीचे भडके उडत होते. चारी बाजूला नुसता मलबा होता. मंडळी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष Haris Truman पुन्हा एकदा रेडिओ वरती आले आणि म्हणाले आतापर्यंत जपानी लोकांना कळलं असेल की आम्ही काय करू शकतो. त्यामुळं जपाननं लवकरात लवकर आत्मसमर्पण करावं. नाहीतर पुढच्या परिणामाना तयार राहावं. हितोशी टोकाई नावाच्या एका त्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीन असं लिहलंय की ” काहीतरी भलं मोठं घडलं होतं, तुम्ही जर कधी नरकाची कल्पना केली नसेल किंवा कधी कोणी नरक बघितला नसेल तर त्यादिवशी नागासाकीचा नरक झालाय की काय असच वाटत होतं. पुढे सहा दिवसातच जपानचे सम्राट हिरोहीतो यांनी अमेरिका आणि मित्रदेशांपुढे आत्मसमर्पण केलं.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )
जर्मनीचा सुद्धा पाडावं होऊन 2 सप्टेंबरला दुसरं महायुद्ध थांबलं. पण मंडळी एवढं भलं मोठं अस्मानी संकट कोसळून सुद्धा ही दोन्ही शहर त्यातून खूप शिथापीन बाहेर पडली. पुढे जाऊन ही शहर आहे त्यापेक्षा सुंदर पद्धतीन उभी राहिली. चला आता आपण ही शहर यां महाभयंकर हल्यानंतर पुन्हा कशी उभी राहिली. याचीच गोष्ट बघुयात. तर बघा ही गोष्ट सुरू होते, बँक ऑफ जपानच्या हिरोशिमा शाखेपासून. स्फोटात त्यांनीही त्यांचे १८ कामगार आणि १२ कर्मचारी गमावले होते. अतिभक्कम बांधकामामुळे ती इमारत तग धरू शकली होती. स्फोटानंतर दोनच दिवसांत या बँकेन त्याचं कामकाज सुरू केल. बर ते पण काय फक्त स्वतःपुरत नाही, तर स्वतःची जागा गमावलेल्या शहरातील अन्य ११ बँकशाखांनाही आपल्याच आवारातली मोकळी जागा देऊन ! भर पावसातही छत्र्या घेऊन या बँकांचे कर्मचारी काम करत राहिले. तीन दिवसांनंतर म्हणजे ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाला त्या दिवशी हिरोशिमातील टॅक्सी सेवाही सुरू झाली. दळणवळणाची गरज लक्षात घेऊन स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी मर्यादित रेल्वेसेवाही सुरू करण्यात आली. मंडळी तस बघितल तर हे आव्हान जरा फारच मोठ होत. कारण शहराच्या खुद्द महापौरांनाच या स्फोटात प्राण गमवाव लागल्यान स्थानिक प्रशासन नेतृत्वहीन झालं होतं. शहरातील १६ पैकी १४ रुग्णालय आणि १९८ पैकी १७० डॉक्टर स्फोटानंतर या शहराच्या सेवेत राहिले नव्हते. मंडळी दुर्दैव बघा आता अणुबॉम्बच्या जोडीला या शहरावर त्यावेळेस नैसर्गिक संकट सुद्धा आलं होतं.

म्हणजे तेंव्हा १७ सप्टेंबरला इडा या वादळान या शहरातल्या ३,००० जणांचे बळी घेतले होते. पण नशीब सुद्धा किती बलवत्तर असतं बघा अणुस्फोटामुळे शहरभर साठलेला राडारोडा या वादळामुळ झालेल्या जोराच्या पावसात धुवून समुद्रात गेला. एव्हाना, आपत्तीतून मदत व पुनर्वसनाच्या मानवी प्रयत्नांनाही गती मिळालीवती. मित्र देशांच्या वसाहतवादी फौजांनीच हिरोशिमाच्या मदत-पुनर्वसन कार्यात सहकार्य करायला सुरुवात केली. स्थानिक प्रशासनान पाच वर्षांचा पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला. चुगोकू शिंबून या स्थानिक वृत्तपत्रान हिरोशिमाच्या फेरउभारणीसाठीच्या कल्पना वाचकांकडून मागवल्या. शांतता स्मारक, ग्रंथालय, संग्रहालय यांसारख्या कल्पना त्यातून साकारत गेल्या. परंतु घटत्या करसंकलनाच्या आव्हानामुळे स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना तशा मर्यादाचं येत होत्या. हिरोशिमाचे नवनियुक्त महापौर शिंझो हमाई यांनी हे चित्र बदलण्यासाठी नेटान प्रयत्न केले. आपल शहर शांततेच प्रतीक म्हणून विकसित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच जपान सरकारन १९४९ मध्ये हिरोशिमा शांतता स्मृतिस्थळ निर्माण कायदा करून शहरविकासाला आणखी चालना दिली. दुर्दैवान, हिरोशिमातील उद्योगांच्या चाकांना खरी गती १९५० मधील कोरियन द्वीपकल्पातील युद्धामुळे वाढलेल्या मागणीतूनच मिळाली ! एका अर्थाने युद्धाच्या ज्वाळांमधनच हिरोशिमातल्या चुलीसुद्धा पेटू लागल्या आणि त्यामुळंच शांततेचा पुरस्कार करणार शहर ही त्याची नवी ओळख निर्माण होण्यालाही विध्वंसाची धगधगती किनारच गरजेची ठरली.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )
एक तप उलटून गेलं. १९५८ पर्यंत हिरोशिमाची लोकसंख्या पुन्हा एकदा अणुस्फोटाच्या अगोदरच्या स्तरापर्यंत पोहचली. स्फोटाच्या विनाशकेंद्रापासून सर्वाधिक जवळची जी इमारत त्यातून बचावली होती, ते हिरोशिमा औद्योगिक प्रोत्साहन केंद्र हे हिरोशिमा शांतता स्मारक उद्यानाचा भाग म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली. जगभरातल्या पर्यटकांच ते आकर्षणकेंद्र होऊ लागल. १९९६ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत हिरोशिमातील ए-बॉम्ब डोम समाविष्ट झालं. केवळ पाच दशकांत हे शहर अक्षरशः राखेतून फक्त पुन्हा उभच नाही राहिलं, तर प्रगतीच्या वाटा दाखवणार जगभरातलं शांततेचं प्रतिकही झालं. जपानन नव्या दिशांनी नव्या वाटा शोधायला केलेली सुरुवातसुद्धा हिरोशिमाच्या या प्रगतीच्या वाटचालीला पूरक ठरली. मंडळी १९४५ ते १९५६ जपानसाठीचाच हा पूर्ण फेरउभारणीचा काळ होता. त्यात यश मिळवत हा देश प्रगत देशांशी स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत आला. १९४९ मध्ये स्थापन केलेल आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालय हे यासाठी सरकारी आणि खासगी उद्योग क्षेत्रांमध्ये मेळ साधू लागल. युद्धसमाप्तीनंतरच्या ११ वर्षांतच हा देश दरडोई उत्पादनाच्या बाबतीत युद्धपूर्व स्थितीपर्यंत पोचला. पण फक्त फेरउभारणीपुरतच न थांबता आधुनिकीकरणाची कास धरत जपानन १९७३ पर्यंत अशीच घोडदौड कायम ठेवली. त्यासाठी या देशाने शिक्षण आणि रोजगारसंधी या सगळ्याचा अगदी व्यवस्थित मेळ घातला. नागरी कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करत स्थलांतराला प्रोत्साहन दिल. गावांमधून स्थलांतर करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाला एकत्रितरीत्या रोजगारसंधी उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. पण १९७३ च्या आखाती संघर्षानंतर तेलाच्या किमतींनी वाट लावायची ठरवली. त्यातनच जपानची आर्थिक घोडदौड स्थिरावली.

तरीसुद्धा १९९१ मध्ये या देशान दरडोई उत्पादनाच्या बाबतीत जवळपास अमेरिकेला गाठलच. मंडळी हिरोशिमाची आजची लोकसंख्या सुमारे २१ लाख इतकी आहे. राजेशाहीच्या काळातल हे लष्करी केंद्र आता औद्योगिक केंद्र झालय. मंडळी आज जवळपास प्रत्येक वर्षी 1 कोटी 11 लाखांहून अधिक पर्यटक हिरोशिमातल्या विविध पर्यटनस्थळांना भेट देतांत. त्यातले जवळपास 5 लाख तीस हजार पर्यटक हे विदेशी असतात. अणुस्फोटाच्या रेट्यान काही काळ उलटी कालगती अनुभवावी लागलेल्या हिरोशिमाची ही गोष्ट “पुनश्च हरिओम” करणाऱ्या प्रत्येकासाठीच आज प्रेरणादायी ठरतेय. हिरोशिमा सोबतच नागासाकी शहारानं सुद्धा अशाच पद्धतीने त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे प्रगती केली. 1949 च्या सुरुवातीला, नागासाकीच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा पुनर्रचना कायदा निर्माण करण्यासाठी national diet मिटिंगसाठी टोकियोला धाव घेतली. 10 मे ला नॅशनल डायट मिटिंगने हिरोशिमा पीस मेमोरेशन सिटी बांधकाम कायदा तसचं नागासाकी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक शहर बांधकाम कायदा मंजूर केला. मंडळी बांधकाम कायद्याच्या संमतीमुळेच नागासाकीच्या पुनर्बांधणीला प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी अधिकचा निधीसुद्धा उपलब्ध झाला. नागासाकीन 1955 मध्ये पुनर्रचना कायद्याच्या मार्गदर्शनाखाली नागासाकी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक हॉल नावाच एक स्मारक संग्रहालय बांधल, जे नंतर नागासाकीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ बनल. पुढे त्याची जागा 1996 मध्ये नागासाकी अणुबॉम्ब संग्रहालयान घेतली. 1969 पर्यंत, नागासाकीला पर्यटकांची सरासरी वार्षिक संख्या 25,00,000 पर्यंत पोहोचली.
( Hiroshima Nagasaki Atom Bomb Attack in Hindi / Marathi )
मग या बहरलेल्या अर्थव्यवस्थेमुळेचं शहराची लोकसंख्या 1950 पर्यंत 241,818 पर्यंत वाढण्यास मदत झाली, जी अणुबॉम्बस्फोटापूर्वी 270,000 इतक्या लोकसंख्येच्या जवळपास होती. हळू हळू हिरोशिमा जसं शांततेच प्रतीक बनलं तस नागासाकी त्या देशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं. त्यामुळं मंडळी आपत्ती कोणतीही असो ती त्याला देशाला अधोगतीकडेच नेते. पण तरीसुद्धा हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं यातून बाहेर आली. त्यांनी प्रगतीच्या वाटा पकडल्या. त्यातच अडकून न राहता नवा दृष्टिकोन घेऊन अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची केली त्या दोन्ही शहरांची पुनरबांधणी केली. त्या भयानक हानीनंतरही आता जपान तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं जगात अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, इंग्लंड नंतर सर्वात प्रगत देशय. सर्वात वेगवान बुलेट ट्रेन असो निदान इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली प्रगती असो, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान सगळ्या जगासाठी एक आदर्शय. आपल्या हिरोसोबत जोडलेलं होंडा, DSK सोबत जोडलेलं टोयोटा, मारुती सोबत जोडलेलं सुझुकी, सोनी, पॅनॉसोनिक, निस्सान, तोशीबा असे कितीतरी जापनीज ब्रँड भारतात हिट झाले ते काय उगाचच नाय. बाकी तुम्हाला हिरोशिमा नागासाकीच्या संघर्षाची यशोगाथा कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply