Narendra Modi आल्यापासून Adani यांच्या संपत्तीत खरोखर शंभरपटीने वाढ झालीय का | Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari

मंडळी त्यादिवशी मला घराजवळच एका कामानिमित्त जायचं होतं पण तरीसुद्धा कंटाळा आला म्हणून मी आपली मोठी गाडी बाहेर काढली. तेवढ्यात माझ्या मागून आमचे पप्पा आले आन मला म्हणाले काय अदानीच्या घरी जन्माला आलाय का ? मोठी गाडी घेऊन चाललाय. गाडी कोणती न्यायची हे राहिलं बाजूला मला मात्र वेगळ्याचं गोष्टीचं आश्चर्य वाटलं. नाही म्हणजे मला असं वाटलं की आर इथं पप्पानी तर अंबानीच नाव घ्यायला पाहिज्ये होतं ना. मग तरी पण आमच्या पप्पानी अदानीचं नाव कस काय घ्येतलं. तस तर बऱ्याच वर्षांपासून अंबानीच्या घरी जन्माला आलायस का हाचं वाक्यप्रचार घरोघरी रूढ झालायं. मग असं काय झालं की लोक अलीकडं अदानीचं नाव घ्यायला लागलीत. अंबानीच्या नावाची जागा आता अदानीनं कशी काय घेतलीये? गौतम अदानी नुकतेच एलोन मस्क नंतर जगातले 2 नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे काय झालेत ? त्यांची वाढलेली श्रीमंती हे त्यांचं कर्तृत्व आहे का झोलझाल? आणि अदानी हे इतक्या कमी काळात इतके कसे काय श्रीमंत झालेत? चला, सगळं काही इन डिटेलमध्ये समजावून घेऊयात.

( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
मंडळी तसं तर कुठल्याही गुजराती कुटुंबांत आज पहिल्या पिढीचे उद्योजक फारसे सापडत नाहीत. सगळे दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या पिढीतले उद्योजक आहेत. कारण, त्यांच्या उद्योगाची सुरुवात ही त्यांच्या वडील किंवा आजोबांनी 1970-80 आसपास केलेली असते आणि मग पुढे जाऊन जेंव्हा 1990 च्या दशकांत अर्थव्यवस्था खुली झाली तेंव्हा मग त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचे छोटेखानी उद्योग मोठे केलेले असतात. गुजराती कुटुंबातली अशी भरपूर उदाहरणं सापडतील. पण, यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर 2000 पासून अदानी कुटुंबानचं आपला डंका आधी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि मग पुढे जागतिक पातळीवर पिटला.तस तर रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना अंबानी उद्योगसमुहाचा अधिकार धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळालाय. पण, गौतम अदानी यांच्या बाबतीत गोष्टी फार वेगळ्या आहेत. कारण तसं असतं तर ते आज वारसा हक्काने एखाद्या कापडाच्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेले बघायला मिळाले असते. पण त्यांनी त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीचं त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. ते निर्णय कोणते होते ते आपण पुढे बघूच पण त्याआधी अदानींचं सुरूवातीचं आयुष्य नेमकं कसं राहिलं होतं ते आपण बघुयात.तर बघा गौतम अदानी यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद इथं २४ जून १९६२ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. शांतीलाल आणि शांती अदानी असे त्यांच्या आई-वडिलांचं नाव. गौतम यांना सात भावंडयत. त्यांच्या वडिलांचा कापडाचा बिजनेस होता. त्यामुळं परिस्थिती फारशी अशी काही ग्रेट नव्हती. त्यांच कुटुंब हे खरंतर गुजरातच्या उत्तरेकडील थराड शहरातून स्थलांतरित झालं होतं.
( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
गौतम यांचं शिक्षण गुजरात मधील सेठ चीमनलाल नागिंदास विद्यालया मधून पूर्ण झालयं. मंडळी तसं गौतम अदानी यांचं शिक्षण फारस झालेलं नाहीये. शालेय शिक्षणात जास्त इंटरेस्ट नसल्यामुळेच त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर अभ्यासक्रमाला दुसऱ्याच वर्षी सोडचिठ्ठी दिली. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ते बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाचे ड्रॉप आऊट आहेत.हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा सगळ्यात पहिला निर्णय होता. आणि दुसरा म्हणजे अदानी हे त्यांच्या वडिलांचा कापडाचा व्यापार नाकारून ,हिरे व्यापारात उतरण्यासाठी मुंबईला आले तो निर्णय . खरंतर त्यांच्या वडिलांचा कापड व्यवसाय हा तसा ठिकठाक चालत होता पण गौतम यांचं स्वप्न त्याहून मोठं होतं . मात्र गौतम यांना मदत करण्याची ताकद शांतीलाल यांच्यात नव्हती. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला आशीर्वाद, शंभर रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले. मग अहमदाबादहून वयाच्या वीसाव्या वर्षीच गौतम अदानी मुंबईत आले. ते सालं होतं 1987चं. मग वेळ न घालवता त्यांनी हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार गाठला. तिथं सुरुवातीला त्यांनी महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉटर म्हणून काम केल. तिथं दोन तीन वर्षे काम केल्यानंतर गौतम अदानी यांनी जवेरी बाजारात स्वतःची डायमंड ब्रोकरेज कंपनी सुरु केली. आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली आणि विशीतच अदानी मिलियनेअर झाले. मंडळी मुंबईत हिरे व्यापारात जम बसत असतानाच अदानी यांचा मोठा भाऊ मनसुखलाल अदानी यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. तेंव्हा त्यांनी त्यांचे बंधू गौतम यांना मदतीसाठी बोलावलं. तेंव्हा त्यांच्याकडे या कंपनीच्या मॅनेजमेंटची बऱ्यापैकी जबाबदारी होती.

( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
मंडळी गौतम अदानी यांनी 1981 मध्ये ह्या प्लास्टिक फॅक्टरीच्या माध्यमातून अधिकृतपणे संघटित उद्योग क्षेत्रात हे असं आपल पहिलं पाऊल ठेवलं होतं.पण ही प्लास्टिक फॅक्टरी सांभाळताना सुद्धा त्यांना या बिजनेसमधलं भविष्य दिसत होतं. त्यांनी त्यांच्या प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं आणि यातूनच 1988 मध्ये अदानींच्या ‘अदानी एक्सपोर्ट’चा जन्म झाला जी कम्पनी आता ‘आदानी इंटरप्राईजेस’ म्हणून ओळखली जाते आणि हीच अदानी समूहाची मुख्य कंपनी सुध्दाय.1991 मध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आणि खाजगीकरण शक्य झाल्यावर अदानी यांना आपल्या व्यवसायाच्या विस्ताराची नवीन स्वप्नं दिसू लागली किंवा असं म्हणूया की त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला लागली. कारण त्यांनी तेंव्हा धातू ,कापड आणि कृषी उत्पादनाच्या व्यापारात व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली. पुढं 1994 मध्ये गुजरात सरकारनं मुद्रा बंदराच्या व्यवस्थापकीय आउटसोर्सिंगची घोषणा केली आणि 1995 मध्ये आदानीना या बंदराचे कंत्राट मिळाले. पण हे कंत्राट मिळण्यामागं मोदी अदानी मैत्री कारणीभूतयं असं काही राजकीय तज्ञाचं म्हणणयं. खरंतर गुजरात दंगलीनंतर राज्यात काय देशात सुद्धा नरेंद्र मोदींसाठी अनुकूल वातावरण नव्हतं. अशावेळी 2002 मध्ये मोदींनी उद्योगधंद्यांना त्यांच्या राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला होता. एक प्रकारे मोदींच्या राजवटीचा निषेध करण्याचाचं तो एक प्रकार होता. शिवाय जिथं नुकतीच दंगल उसळलीयं त्या भागात गुंतवणूक करणं आपल्याला फायदेशीर ठरणार नाही असा विचारही उद्योजकांच्या मनात तेंव्हा आला असावा.
( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
पण, अशा अवघड परिस्थितीत सुद्धा गौतम अदानी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले होते. त्यांनी त्यांच्या उद्योजकांच्या त्या गटाला गुजरातमध्येच गुंतवणूक करण्यासाठी पटवलं. तेंव्हाही त्यांच वाटाघाटींच स्किल कामी आलं. इतरांसोबत त्यांनीही स्वतःच्या अदानी उद्योग समुहाच्या वतीन राज्यात भरीव गुंतवणूक केली आणि तेंव्हाच नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मुंद्रा बंदर चालवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं.कदाचित मोदी अदानी ही मैत्री इथूनच दृढ झाली असावी. आज ही कंपनी (APSEZ) या नावाने ओळखले जाते. ही कंपनी सर्वात मोठी खाजगी मल्टी पोट ऑपरेटर आहे . आता मुद्रा बंदरं हे भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात मोठे बंदर आहे ज्याची क्षमता दरवर्षी सुमारे 210 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याची आहे. आता जल मार्गानं व्यापार करण्यासाठी देशातील बंदरांचा विकास करणं हे शालेय जीवनापासून त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. कारण, शाळेत असताना कांडला बंदरावर सहलीसाठी गेले असताना तिथे चालणारा व्यापार त्यांनी बघितला होता. पुढे अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्स च्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यावर रेल्वेमंत्री नितिश कुमार यांनी देशातली प्रमुख बंदरं रेल्वेमार्गाने जोडण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं. तसं झालं तर व्यापाराला कशी चालना मिळेल हे प्रात्यक्षिकासह दाखवल्यामुळे पुढच्याच अर्थसंकल्पात नितिश कुमार यांनी देशातल्या सहा बंदरांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. हे अदानी यांनी केलेलं एक जबरदस्त डील होतं. त्यांची ही डिलिंग पॉवर म्हणूनच त्यांना एक जबरदस्त बिजनेसमॅन बनवते. थोडक्यात काय तर आपला मुद्दा अगदी महत्त्वाच्या लोकांना पटवून देण्याचा हातखंडा गौतम अदानींकडे होता आणि त्याच्या जोरावरच त्यांनी काही राजकीय धोरणं आणि निर्णय आपल्या बाजूने वळवून त्याचा औद्योगिक फायदा करून घेतला असं काही राजकीय तज्ञ म्हणतात. बिझनेस क्षेत्रात यालाच ‘व्हिजन’ किंवा ‘दूरदृष्टी’ म्हणतात.पुढे 1996 मध्ये अदानी समूहानं ऊर्जा क्षेत्रात आपला जम बसवायला सुरुवात केली.

( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
त्यातलीच ऊर्जा व्यवसाय शाखा अदानी पावर ही त्यांनीच स्थापन केली होती. अदानी पावर कडे आजच्या घडीला 4620 मेगावॉट क्षमतेचे थर्मल पावर प्लांट आहेत जे की देशातले सर्वात मोठे खाजगी औष्णिक वीज उत्पादक प्लांट आहेत.आणखी पुढे 2006 मध्ये अदानी यांनी वीज निर्मिती व्यवसायात सुद्धा प्रवेश केला आणि 2009 पासून 2012 पर्यंत तो विकसितही केला. ऊर्जा व्यवसायात सुद्धा त्यांच्या काही स्मार्ट डील्स त्यांना फायदेशीर ठरल्या. 2015 मध्ये, त्यांच्या अदानी पॉवर कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प 6,300 कोटी रुपयांना विकत घेतला होता. ती डील फक्त 100 तासांत संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी केला होता. विचार करा इतका मोठा निर्णय होण्यासाठी आणि तो पार पडण्यासाठी काही वर्षं लागू शकतात. असे निर्णय अदानीनी काही तासातच घेतले होते.2020 मध्ये अदानी यांनी 6 अब्ज डॉलर किमतीच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) द्वारे जगातील सर्वात मोठी सौर बोली जिंकली. 8000 मेगावॉटचा Photovoltaic पावर प्लांट प्रकल्प अदानी ग्रीन द्वारे हाती घेतला. सप्टेंबर 2020 मध्ये अदानी यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 74% हिस्साही विकत घेतला जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा बिझी असलेला एअरपोर्ट आहे. सरकारशी असलेल्या जवळीकीचा त्यांनी त्यांच्या उद्योगधंद्यांमध्ये चांगलाचं वापर करून घेतला असं बोललं जातं. कारण 2018 मध्ये जेंव्हा केंद्रसरकारनं 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लीगल टेंडर सुद्धा काढलं. पण, ते टेंडर काढताना अशा कामांचा पूर्वानुभव असण्याची अट जी की पूर्वी होती ती यावेळी काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे मग जेव्हा कंत्राटाची घोषणा झाली तेव्हा अशा कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या अदानी उद्योग समुहाला त्रिवेंद्रम विमानतळाच्या देखभालीचं कंत्राट मिळालं. त्यावेळी दिलेली अट शिथिल करण्यात आली होती, ती अदानींना फायदा मिळावा यासाठीच शिथिल झाली असा आरोप तेव्हा मीडियामध्ये झाला. त्रिवेंद्रममध्ये यावरून डाव्या पक्षांनी मोर्चेही काढले होते. फक्त त्रिवेंद्रमच नाही तर इतर पाच विमानतळांची कंत्राटंही अदानी यांनाच मिळाली. हे सगळं मोदींशी अदानींच्या असणार्या मैत्रीमुळे शक्य झालं असं देखील तेव्हा म्हणलं गेलं. पण नरेंद्र मोदींच्या जगजाहीर मैत्रीमुळे अदानी बऱ्याचदा वादातही अडकलेत. उदाहरण द्यायचं झाल्यास,नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबादहून ते नवी दिल्लीला एका खाजगी विमानाने गेले . आणि या प्रायव्हेट जेटवर अदानी हा शब्द मोठ्या अक्षरात लिहला होता.
( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
अर्थात, नरेंद्र मोदी अदानी यांच्या विमानातून दिल्लीला गेले होते. दोघांमधली मैत्री जगजाहीर झाली आणि यावरून तेव्हा विरोधकांनी हल्लाबोल केला होता. एका अर्थाने दोघांमधल्या भविष्यातल्या संबंधांची ती नांदी होती. कारण, पुढे अदानी समुहाने आपली कॅचलाईन बदलून ‘बिल्डिंग नेशन’ अशी केली आणि बांधकाम क्षेत्रात उतरून आपल्या समुहाचा विस्तारही केला.मध्यंतरी राहुल गांधीनी लोकसभेत हीच इमेज दाखवून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला.आता अदानी समूहाच्या श्रीमंतीबद्दल बोललं जात असलं तरीही कर्जात बुडालेला अदानी समूह असाही आरोप त्यांच्यावर अलीकडेच करण्यात आलाय. कारण उद्योग उभारणीसाठी अडाणी समुहाने वारेमाप कर्जं घेतल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं होत. मागच्या दहा वर्षांत उभारलेल्या मोठ-मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांनी बाँड्स आणि कर्जाच्या स्वरुपात तब्बल 30 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज उचलल्याचं काही मीडिया रिपोर्ट्स मधून सांगितलं गेलं. पर्यावरण विरोधाचा ठपका सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. खासकरून ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड प्रांतात खाणकामासाठी अदानी यांनी कंत्राट कसं मिळवलं यावरून बराच गदारोळ झाला होता. तिथल्या पर्यावरण नियामक मंडळातल्या अधिकाऱ्यांकडून आदानींनी जमीन खाणकामासाठी योग्य असल्याचा चुकीचा परवाना मिळवला असं सिद्ध झाल्यावर त्यांना 20,000 डॉलरचा दंडही भरावा लागला होता. झारखंडमध्ये सुद्धा अदानी यांनी उभारलेल्या कोळसा प्रकल्पाचा वाद आजही न्यायालयात प्रलंबितयं. आजच्या घडीला अदानी समूहाबद्दल बोलायचं झाल्यास अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, सरगुजा रेल कॉरिडोर ह्या काही त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत.

( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
मंडळी तसं यशस्वी उद्योजक असण्यासोबतच अदानी एक व्यक्ती म्हणूनही लोकप्रियेत. 26/11 चा दहशदवादी हल्ला झाला तेव्हा अदानी ताज हॉटेलमध्येच होते. त्यावेळी कठीण परिस्थितीत ते शांत राहिले. स्वतःच्या सुटकेसाठी पोलीस, हॉटेलचा कर्मचारी वर्ग आणि एकूणच यंत्रणेवर कोणताही दबाव न टाकता त्यांनी अतिशय संयम ठेवला. कोरोना काळात सुद्धाउद्योजकांप्रमाणेचं अदानी समूहानेही केंद्र आणि काही राज्यसरकारांना एकूण 114 कोटी रुपयांची मदत केली आहे. फोर्ब्ज च्या यादीनुसार गौतम अदानी जेफ बेझोज यांना मागे टाकत जगातले दोन नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा झाले होते. मंडळी जर आता गौतम अदानी यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलायचं झालंच तर त्यांनी प्रीती अदानी यांच्याशी विवाह केलेला आहे. करण आणि जीत अदानी अशी त्यांच्या मुलांची नाव आहेत. त्यामध्ये करण अदानी हे Adani Ports चे अध्यक्ष आहेत.असो, तर मंडळी आज गौतम अदानी यांनी आज आपला बिजनेस वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरवला आहे. विद्युत निर्मिती, कोळशाच्या खाणी, रियल ईस्टेट, लॉजिस्टिक, ऍग्रो प्रॉडक्ट, ऑइल, गॅस या सर्व क्षेत्रांमध्ये गौतम अदानी यांच्या कंपन्या आहेत ज्यांच र्टन ओव्हर करोडोंच्या घरात आहे. त्यामुळेच गौतम अदानी हे आपल्या भारताच्या सर्व युवा तरुणांसाठी एक रोल मॉडेल आहेत.स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या बळावर त्यांनी आपला हा इतका मोठा व्यवसाय उभा केलायं. वडिलोपार्जित व्यापार करण्याची संधी मिळत असताना सुद्धा त्यांनी ती संधी स्वतःहून नाकारली.
( Gautam Adani Net Worth 2023 | Vishaych Bhari )
अर्थात हा व्यवसाय पुढे घेऊन जाताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागलं. एकदा तर त्यांना किडनॅप करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता. बऱ्याच लोकांनी त्यांचे यश बघून त्यांच्या रस्त्यात संकट निर्माण केली पण या सगळ्या प्रसंगांना अतिशय आत्मविश्वासानं सामोरं जाऊन आजही त्यांच्या व्यवसायाची घोडदौड यशस्वीरित्या सुरूच आहे. मध्यंतरी हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानींच्या साम्राज्याला सुरूंग लागणार असं म्हणलं जाऊ लागलं.पण तसं अद्याप झालं नाही. अलीकडच्या दहा वर्षाच्या काळात तर त्यांनी आपलं नाव प्रचंड मोठं केलंय. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आज त्यांचा उद्योग क्षेत्रात दबदबाय.मध्यंतरी गौतम अदानी हे शरद पवार यांच्या घरी देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अगदी त्यावेळी रोहित पवार यांनी गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य केल्याचं आपण बघितलं. आपल्या भारताला गौतम अदानी यांच्यासारख्या कौशल्य आणि जिद्द असणाऱ्या अनेक उद्योजकांची खरच गरजयं हे नक्की.पण सत्तेचा गैरवापर करून अदानी एवढ्या उंचीपर्यंत पोहोचले असाही आरोप आज त्यांच्यावर होतो. त्यांनी उचललेलं वारेमाप कर्ज चुकलं गेलं नाही तर त्याचा भुर्दंड सर्वसामान्यावर पडू शकतो . कारण मध्यंतरीअदानी समूहाने एल आयसीचे तब्बल १८ हजार ३०० कोटी बुडवले असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला होता.बाकी तुम्हाला गौतम अदानी यांचा हा प्रवास कसा वाटला त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.गौतम अदानी हे एक यशस्वी उद्योजक आहेत कि त्यांच्या यशस्वी होण्यामागं सर्वसामान्यांची फसवणूक आहे? हे ही आम्हाला कमेंट करून सांगा…
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply