म्हणून भारतापेक्षा आफ्रिकेतल्या गणपती विसर्जनाची चर्चा जास्त असते | Ganpati Festival in Africa | Ganpati Visarjan Miravnuk

तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनांच्या नाथा । अवघ्या दिनांच्या नाथा ! अवघ्या विश्वात जिथे जिथे दिन दुबळे लोक आहेत, त्यांचा नाथ, त्यांचा तारणहार, त्यांना तारणारा. गणपती बाप्पा. महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे गणपती बसवला जात नाही, महाराष्ट्राच्या कुठल्याच शहरात अशी गल्ली नाही, जिथे गणेशाची प्रतीष्ठापणा केली जात नाही. महाराष्ट्रच काय? देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीतीए का? फक्त महाराष्ट्रच नाही किंवा फक्त भारतच नाही, तर अवघ्या देशभर आपला हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. चायना, जापान, इंग्लंड, नेपाळ, अमेरिका, पाकीस्तान या सोबतंच सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा होतो अफ्रिकेत .

Africa ganpati visarjan

(Ganpati Festival in Africa Ganpati Visarjan Miravnuk)

अफ्रिका आणि भारताचं एक विषेश नातं आहे, जातीभेद आणि वर्णभेदाच्या चळवळीचे केंद्र ठरलेल्या भारत आणि अफ्रिकेतील चळवळी थोड्या फार फरकाने सारख्याच होत्या. स्पृश्या-अस्पृश्याचे चटके दोन्ही देशाने सहन केले. गांधीजी सुद्धा अफ्रिकेच्या चळवळीचा भाग होते. त्यांनी तिथून प्रेरणा घेत भारतात अनेक कार्यक्रम आखले. आणि ह्याच दरम्यान किंवा ह्याच्याही पूर्वी इथे हिंदू धर्माचा प्रसार प्रचार सुरु झाला होता. कारण साउथ अफ्रिकेत आपल्याला गणपतीचं दगडी बांधकामातलं भव्य मंदीर आढळतं, जे 1898 मध्ये आर्कीटेक्चर क्रिसतप्पा रेड्डी यांच्या मार्फत बांधलं गेलंय. म्हणजे इथे आठराशेच्या पूर्वी पासूनच हिंदू धर्माचा प्रसार सुरु झाला होता. ह्या मंदीरा मध्ये नंदी सुद्धा आहे. कोरीव काम करुन अन्य देवी-देवतांचे देखील काही प्रसंग रेखाटले गेले आहेत. इथेच 1912 मध्ये कोथानर रामसामी पिल्ले यांच्या मार्फत महादेवाचं सुद्धा मंदीर बांधण्यात आलं. दिवाळी, दसरा किंवा रंगपंचमी साजरा करत ह्या देशातल्या अनेक भागात हिंदू संस्कृती आपले पाय रोवत आहे. आज भारत भरात गणेशोत्सव चालू आहे. नुकताच अफ्रिकेतील घानामध्ये स्थित आक्राचा गणेशोत्सवाचा व्हिडीयो व्हायरल झालेला आपण पाहिला असेल.

(Ganpati Festival in Africa Ganpati Visarjan Miravnuk)

घानात 1970 मध्ये हिंदू धर्माच्या प्रसाराला सुरवात झाली. पण इथे ही सुरवात कोणी आणि का केली? जसं मी तुम्हाला व्हिडीयोच्या सुरवातीला सांगीतलं की, सामाजिक आणि राजकिय दृष्ट्या अफ्रिका आणि भारताची परिस्थिती थोड्या फार फरकाने सारखीच होती. आपल्याकडे जंगल बचावसाठी चालणारी आदिवासी बांधवांची आंदोलनं जर अभ्यासली, तर त्याची मुळं आपल्याला अफ्रिकेत सापडतील. “अनटेचबल” ह्या शब्दावर भारतात प्रचंड लिखाण झालं, बोललं गेलं. हा शब्द देखील अफ्रिकेचीच देणं आहे. ह्या किंवा अशा काही तत्सम घडामोडींमुळे आफ्रीकेच्या अभ्यासकांनी भारत, तर भारताच्या अभ्यासकाने अफ्रिकेच्या चळवळीचा, तिथल्या सामाजिक परिस्थीतीचा अभ्यास करायला सुरवात केली आणि इथूनच दोन्ही देशांमध्ये सांस्कृतीक, वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक देवाण-घेवाण वाढली जिथुन हिंदू धर्माने अफ्रिकेत आपली मेढ रोवली. हा तर आपण बोलत होतो, अफ्रिकेच्या गणेशोत्सवावर, इथे गणपती 3 दिवस बसवले जातात. वाजत-गाजत गणेशाचं आगमन करतात, त्याची प्राणप्रतीष्ठापणा करतात. त्यासाठी मोदकाचा प्रसाद केला जातो. केळीचे खांब उभा केले जातात. फुलवाती बनवल्या जातात. दुर्वा देखील वाहिल्या जातात. कलश उभा केला जातो, त्यावर स्वास्तिक काढली जाते. नागिलीचे पानं ठेवले जातात. तिथली 5 फळं मांडली जातात, आणि मह्त्वाचं म्हणजे 11 , 21 , 51 , 101 किंवा 501 ह्या संख्येनंच गणपतीचे मोदक, वर्गणी, फुलवाती, दुर्वा जमा केल्या जातात. थोडक्यात काय, तिथला गणेशोत्सव सेम टू सेम आपल्या सारखा असतो.

africa ganapti ustav

(Ganpati Festival in Africa Ganpati Visarjan Miravnuk)

गेल्या कित्येक वर्षा पासून मनोभावे गणपतीची स्थापना करणार्‍या बारते अकोऊसा गन्साह सांगतात की, “गणपतीचे 3 दिवस खुप प्रसन्न असतात, तो खरच सुखकर्ता आणि दुखहर्ता आहे, त्याच्या येण्यानं आमच्या गावात नवं चैत्यण्य येतं. त्याच्या आगमणी आम्ही पाऊल्या खेळतो, फुगड्या खेळतो, रांगोळ्या, प्रसाद, पाहूण्यांची ये जा. अशी तिन दिवस उत्साही रेलचेल असते.” अफ्रिकेत गणपती बसवल्या नंतर सत्य नारायणाची पूजा देखील घातली जाते. भगवे वस्त्र परिधान करुन गणेशा समोर लोटांगण घालत, आरती केली जाते. आपले वाद्य पखवाज, टाळ वाजवून गणपतीला आळवलं जातं. तिसर्‍या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जनाची मिरवणूक काढली जाते, गुलाल उधळत सगळे दंग होऊन नाचतात. समुद्रात गणेश मुर्तींचं विसर्जन केलं जातं. आणि समुद्रात गणेशाचं विसर्जन करण्यामागे अफ्रिकन लोकांची भावना अशी आहे की, गणेशाने समुद्रा मार्फत आपला आशिर्वाद जगभर पोहचवावा. वा.. खरंच किती निर्मळ आणि निस्सीम भावना आहे. हिच भावना प्रत्येकाच्या मनात येऊ दे.. तुझा आशिर्वाद प्रत्येकावर राहू दे.. बोला गणपती बाप्पा मोरया..

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *