पहिल्या दुभत्याला 5000 लिटर दूध देणाऱ्या या ५ गाईंच्या जाती माहितीयेत | Gai Palan Marathi


शेतकरी मित्रांनो पशुपालन हा शेतीसोबत केला जाणारा मुख्य जोडव्यवसाय आहे. खरंतर या जोडव्यवसायानं बऱ्याच गरीब शेतकऱ्यांना तारलं आहे. दूध, शेणखत, लोकर, मांस हे आणि अशा प्रकारचे बरेच बायप्रोडक्टस आपल्याला या पशुपालन व्यवसायातून मिळत असतात. पण त्यातल्या त्यात प्रामुख्याने दुधाचाच व्यवसाय करणारे शेतकरी तुम्हाला तुमच्या आसपास मोठ्या प्रमाणावर दिसतीलं आणि त्यात सुद्धा गाई आणि म्हैशी पाळणारे शेतकरी तुम्हाला जास्त मिळतील. मंडळी या दोन जनावरांच्या दुग्धव्यवसायातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतात. पण या व्यवसायात कोणत्या जातीच्या गाई पाळायला हव्यात जेणेकरून तुम्हाला जास्त उत्पादन मिळेलं. याबाबतीत मात्र त्यांना संभ्रम असतो. त्याचबरोबर गाईचं व्यवस्थापन करण्याची योग्य पद्धत कोणती असते हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं. म्हणूनच आजच्या Blog मध्ये आपण गाईंच्या काही 5 बेस्ट जाती बघणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या दुधाच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ करून देतील.

Five Best cow

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

तर बघा सगळ्यात पहिली जात येते ती म्हणजे होलस्टेन फ्रिजियन म्हणजेच आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर HF ही गाय. तर बघा HF हा एक युरोपियन गोवंश असून हा प्रामुख्यानं हायब्रीडसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हायब्रीड जातीच्या गाईंमध्ये होल्स्टेन फ्रीजियन ही जगातली सगळ्यात व्यापक गुराची जात आहे. विशेष सांगायचं म्हणजे हा युरोपियन गोवंश १५० पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतो. पण मंडळी HF जातीच्या गाई ओळखायला काही विशिष्ट खुणा असतात. काळा, पांढरा किंवा लाल, पांढरा रंग, काही ठिकाणी अगदीच क्वचित ठिकाणी  पांढऱ्यासह काळा आणि लाल असे दोन्ही रंग या गाईवर असतात. होल्स्टीन फ्रिजियन या जातीच्या गाई मोठ्या असतात. एखाद्या प्रौढ गायीच सरासरी वजन हे 500 ते 650 किलोग्राम इतकं असत. या जातींचे बैल तर याहून मोठे असतात. HF जातीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची दूध उत्पादन क्षमता. मंडळी गाईची ही जातं जगातली सर्वाधिक दूध उत्पादकांपैकी एक आहे. जिचं वार्षिक सरासरी 5,000 ते 6,000 लिटर दुध मिळत. काही प्रगतीशील दुग्धव्यवसायिकांनी तर हे आकडे सुद्धा क्रॉस केलेले आहेत. स्वभावाचं म्हणाल तर HF गायी ह्या जनरली शांत आणि विनम्र स्वभावाच्या असतात. ज्यामुळे त्या व्यावसायिक दुग्धव्यवसाय करण्यासाठी एकदम परफेक्ट असतात. पण त्यासाठी तुम्हाला उत्तम व्यवस्थापन करावं लागतं. अगदीच सांगायचं झालं तर या गायींना संतुलित आहार देण महत्त्वाचंयं. चांगल दुध उत्पादन हवं असेल तर त्यांच्या आहारातून प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनर्ल्सची पूर्तता व्हायला हवी. त्याचबरोबर या गाईचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी त्यांची नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि रोग प्रतिबंधक उपाय करण आवश्यक आहे. मंडळी hf या जातीनं जगभराच्या दुग्धव्यवसायामध्ये क्रांती घडवून आणलीय. महाराष्ट्रातले बऱ्यापैकी शेतकरी ही जात वापरतात त्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्यात ही जातं फेमसय.

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

मंडळी यानंतर दोन नंबरला गाईची ती जातं येते तिचं नाव सारखं आपल्या तोंडात असतं. ती म्हणजे जर्सी. मुळातचं जर्सी ही विदेशातली म्हणजेचं आयलँड ऑफ जर्सी या बेटाचं मूळ स्थान असलेली आकाराने लहान असलेली गाईची जातं आहे. हा तसा मूळचा ब्रिटिश गोवंश आहे. दुधाळ जनावरांमध्ये आकारानं सर्वात लहान पण शरीराच्या आकाराच्या तुलनेत उत्तम आणि जास्त प्रमाणात दूध देणारी गाय म्हणून जर्सीची ओळखय. जर्सीच्या दुधातल फॅटचं प्रमाण हे ५.५ टक्क्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकत. इतर विदेशी जनावरांच्या मानान या जातीच्या गाई उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे तग धरून राहू शकतात. या गाईंचा दूध देण्याचा कालावधी हा साधारण ३०० दिवसांचा असून सरासरी दुधाचं उत्पादन हे ४००० ते 5000 लिटर इतकं असतं. तर दुसऱ्या बाजूला त्यांचं सरासरी आयुष्य हे १२ वर्षापर्यंत असत. मंडळी जर्सी सारख्या विदेशी जनावरांमध्ये पाठीवर वशिंड नसत. मानेखाली लोंबकळणारी पोळी सुद्धा नसते. या गाईच्या जातीचा रंग लाल किंवा फिक्कट लाल किंवा अगदी काळा पांढरा असा सुद्धा आढळून येतो. जर्सी गायीचं कपाळ रुंद असून डोळ्यांचा आकार मोठा असतो. या गायी मध्यम आकाराच्या असतात. या या गायी दिवसाला १२ ते १४ लिटर दूध देत असतात. या गायीचे कान ताठ असतात. जर्सीची शिंग आकाराने छोटी असतात आणि मादीचे वजन ४५० किलो तर नराच वजन ५०० किलोपर्यंत असते.

Five Best cow

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

यानंतर पुढचा गाईची जातं आहे साहिवाल. या गायीचं मूळ स्थान पाकिस्तानामधला साहिवाल जिल्हा असल्यानं तिथं ही जातं जास्त प्रमाणात आढळून येते. मंडळी या गायीचं शरीर मोठ असत, कातडी लांबलेली असल्यान तिला मुलतानी असंही म्हटल जात. छोट डोक आणि छोटी शिंग ही सुद्धा या जातीची वैशिष्ट्यत. या गायींचे पाय हे छोटे असतात आणि शेपटी लहान असते. लाल आणि भुऱ्या रंगाच्या या गायी असतात. या गायींच्या पाठीवर वशिंड असतो. साहिवाल गायींच वजन साधारण ३०० ते ४०० किलो असत. सहिवाल गायीचा दूध देण्याचा कालावधी हा ३०० दिवस असून सरासरी दूध उत्पादन हे २१०० लिटर असत. त्यांच सरासरी आयुष्य हे १५ वर्षांचं असतं. एका वेळेची दूध उत्पादन क्षमता १० ते १६ लिटर इतकी असते. उत्तम व्यवस्थापनात एका वेतात या गायी २२७० लिटरपर्यंत दूध देऊ शकतात

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

चौथ्या क्रमांकाची गाईची जातं आहे आपल्या भारतीय वंशाची गीर गाई. मंडळी गीर गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेषतः गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ही जात गुजरातमधील गीर टेकड्या आणि काठियावाड जिल्ह्यातील जंगलातल्या गाईंची जात आहे. ही प्रमुख झेबू जातींपैकी एक आहे. या गाईंची दूध देण्याची क्षमता २० ते २५ लिटर प्रतिदिन इतकी आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४० ते ५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवली गेली आहे. गीर गायीच वजन हे साधारण 400 ते 450 किलो असत आणि गीर बैलाच वजन हे 550-650 किलो असत. मूळ गीर गाय ही तिच्या विशिष्ट स्वरूपावरून ओळखता येते. तिचे गोलाकार, घुमटाकार कपाळ असते. गीर गायीला लोंबकळलेले आणि लांब कान असतात जे टोकाला पानांसारखे दुमडलेले असतात. तिला वाकलेली आणि मागे वळलेली शिंगे असतात. मूळ गीर गायीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे लांब शेपूट. बऱ्यापैकी गीर गाईंचे लांब शेपूट असते. गीर गायीचा रंग सामान्यत: लाल ते पिवळा ते पांढरा या श्रेणीमध्ये येतो. त्यांची त्वचा सैल, गुळगुळीत आणि चमकदार असते.

Five Best cow

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

यांनंतर सगळ्यात शेवटी पाचव्या नंबरला येते ती म्हणजे थारपारकर जातीची गाई.  थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने सुद्धा ओळखल जातं. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातेच्या शरीर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास पांढरा रंग, मांसल शरीर, मध्यम ते उंच शरीर. पाठीवर खांद्यावर राखाडी रंग किंवा राखाडी पट्टे, लांब कान, लांब काळी झुपकेदार शेपटी, मध्यम आकाराचे डोके आणि छोटी शिंगे, ही या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत. मंडळी यां गाईंची दूध देण्याची क्षमता उत्तम असून या गाईंचे बैल हे शेतीकामासाठी सुद्धा खूप मजबुत असतात. भारतातल्या उत्तम दूध देणाऱ्या गाईंमध्ये थारपारकर या गाईची गणना होते. उष्ण आणि शुष्क वातावरणात आणि मध्यम खुराक अशा प्रकारच्या परिस्थितीत सुद्धा गाईची जातं सहज टिकते. यामुळे या गाईला दुधारू गाईंची कामधेनू अस म्हणतात. यांची उंचपुरी आणि मोठी देहयष्टी, चांगली रोगप्रतिकारक शक्ती, यामुळे थारपारकर गाई विदेशात पण मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या गेल्या.

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

Five Best cow
Five Best cow

(Gai Palan Marathi | Vishyach Bhari )

तर बघा या अशा दोन विदेशी आणि तीन देशी अशा एकूण 5 गाईंच्या जाती आपण पहिल्या ज्या जातींचा तुम्ही आम्ही नव्या गाई विकत घेताना नक्कीच विचार करू शकतो. याव्यतिरिक्त लाल सिंधी, ब्राऊन स्विस, देवणी या आणि अशा बऱ्याच जाती आहेत ज्या तुम्हाला चांगल उत्पादन देऊ शकतात. पण चांगल्या जातींसोबत तुम्ही तुमच्या गोठ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्यामध्ये गोठ्यांची स्वच्छता , गुरांची स्वच्छता, संतुलित आहार या काही छोट्या छोट्या गोष्टींकड आपण व्यवस्थित दिलं लक्ष पाहिजे. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेतीविषयक अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तो विषय सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

पहिल्या दुभत्याला 5000 लिटर दूध देणाऱ्या या ५ गाईंच्या जाती माहितीयेत | Gai Palan Marathi

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *