18 लाख कुटुंबं, ८००० कोटींचा Fraud, Royal Twinkle Club ची गोष्ट | Maharashtra Scam Story


मंडळी बऱ्याच लोकांच्या मागणीनंतर आम्ही रॉयल ट्विंकल स्टार क्लब या कंपनीच्या फ्रॉडचा ए टू झेड बायोडाटा घेऊन आज तुमच्यासमोर आलोय. रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीनं फक्त फ्रॉड केला नाय तर तब्बल 18 लाख लोकांचा विश्वासघात करून त्यांच्या पैशांचा आणि पर्यायानं स्वप्नांचा ही चुराडा केला. एकट्या मुंबईत 4500 कोटी रुपयांना चुना लावून कंपनीनं पुढं सेबीच्या रडारवर आल्यानंतर ही टोट्टल 8000 कोटींचा तो भला मोठा फ्रॉड होता. त्यामुळं राज्यातली लाखो घरं बरबाद झाली अन पुन्हा कधीच त्यांच्या संसाराची गाडी नीट पटरीवर येऊ शकली नाही. आजही आपला पैसा परत मिळेल ही आशा मनात ठेवून पश्चाताप करण्यापलीकडं त्यांच्या हातात दुसरं काहीचं नाहीये. असो, आजच्या या Blog मध्ये आपण रॉयल ट्विंकल स्टार क्लबनं गरीब अडाणी लोकांपासून अर्थसाक्षर लोकांपर्यंत सगळ्यांनाच कसा गंडा घातला आणि आता ज्यांची फसवणूक झालीये ते लोक त्यांचा पैसा परत मिळवण्यासाठी काय करतायत याची सविस्तर माहिती जाणून घेऊ,

Fraud, Royal Twinkle Club

( Fraud, Royal Twinkle Club | Maharashtra Scam Story)


मंडळी Blog वाचण्यापुर्वी तुम्हाला सांगतो याआधी आपण 60000 कोटींचा पर्ल्स घोटाळा, 7000 कोटींचा पॅन कार्ड क्लब फ्रॉड, चेन मार्केटिंगचे स्कॅम, 5000 कोटींचा महादेव बुक ऍप घोटाळा, तेलगी, माल्ल्या, नीरव मोदी हर्षद मेहता स्कॅम, फँटसी ऍप आणि रमी गेम्सची रिऍलिटी यांसारखे अनेक माहितीपर Blogs बनवलेले आहेत. त्या Blogs च्या लिंक खाली दिल्या आहेत नक्की जाऊन वाचा.

हे विषयच भारी वाचलेस का भावा !


Fraud, Royal Twinkle Club

( Fraud, Royal Twinkle Club | Maharashtra Scam Story)

मंडळी रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड ही 2008 साली मुंबईच्या वडाळामध्ये establish झालेली कंपनी. 06/05/2008 रोजी ती रजिस्टर झाली होती. ओमप्रकाश गोएंका हा माणूस त्या कंपनीचा संचालक होता. दरम्यान नीट अभ्यास केला तर याआधी आपण जो पॅन कार्ड क्लब लिमिटेडबद्दल व्हिडीओ बनवलाय ती कंपनी अन रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड या दोन्ही कंपन्याच्या कार्यशैलीत जवळपास साम्यता दिसून येते. कारण दोन्ही कंपन्या स्वतःला आपण हॉटेल आणि रूम व्यवसायात अग्रेसर असल्याचं लोकांना सांगत होत्या. फरक फक्त इतकाचं की पॅन कार्ड क्लब लोकांना परदेशी हॉटेल आणि रूम्स ची स्वप्न दाखवायची तर रॉयल ट्विंकल स्टार क्लब देशी हॉटेल्स व्यवसायात आम्ही टॉप आहोत अस लोकांना सांगायची. एवढंच नाही तर आम्ही देशभरात वेगवेगळ्या हॉटेल्समार्फत रिटेल फूड चेन चालवतो असंही त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं. पण नंतर अचानक कंपनीनं पोंझी स्कीमसारखी एक गुंतवणूकीची योजना सुरू केली. ज्याचं नाव होतं टाइमशेअर हॉलिडे प्लॅन. कंपनीच्या सांगण्यानुसार लोकांनी त्यांच्या टाइमशेअर हॉलिडे प्लॅनमध्ये पैसे गुंतवले तर ठराविक कालावधीनंतर त्यांना तगड्या इंटरेस्ट रेटनुसार रिटर्न्स दिला जाईल. खरं तर जेव्हा कोणतीही कंपनी अशा वाढीव रिटर्न्सच्या स्कीम आणते तेव्हा आपली लोकं त्याची कोणतीही शहानिशा न करता फक्त फुगवलेल्या आकड्यांच्या लालसेपोटी त्यात पैसे गुंतवून मोकळे होतात. दरम्यान हायेस्ट रिटर्न्ससाठी कंपनीच्या वेगवेगळ्या हॉलिडे पॅकेजमध्ये मुंबईतील लोकांनी गुंतवणूक करायला सुरवात केली. बघता बघता गुंतवणूकदारांकडून तब्बल 4,050 कोटींच्या आसपास रक्कम कंपनीकडं जमा झाली. ओमप्रकाश गोएंकाची स्कीम हिट झाली होती.

( Fraud, Royal Twinkle Club | Maharashtra Scam Story)

दरम्यान पुढं त्यानं ट्विंकल एन्वयारेटेक प्रा.लि. नावाची दुसरी कंपनी सुरू केली अन त्यातूनही कोटींच्यावर पैसे लोकांकडून गोळा केले. मुंबईनंतर पुणे, नाशिक भागात त्या कंपनीनं तिचे हातपाय पसरायला सुरुवात केली. ट्विंकलची ग्रोथ अन पसारा वाढत होता पण ठराविक काळ उलटून गेल्यानंतर ही कंपनीकडून गुंतवणूकदारांना कसलाचं परतावा दिला गेला नाही. तेव्हा मात्र सगळ्यांच्या शिट्ट्या गुल झाल्या. पुढं काही गुंतवणूकदारांनी कंपनीच्या ऑफिसात जाऊन त्यांच्या पैशांची मागणी केली तर रॉयल ट्विंकल स्टार क्लबकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. मग मात्र लोकांना खरी परिस्थिती समजली. आपली फसवणूक झालीये ही गोष्ट लक्षात आल्यावर सगळ्यांनी पोलिसात धाव घेतली. 15 हजार तक्रारी दाखल झाल्या आणि मीडिया मध्ये त्याची चर्चा झाल्यानंतर त्याकडं सेबी अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेनं लक्ष घातलं. दरम्यान सेबीकडून अधिकचा तपास करण्यात आल्यानंतर समजलं की संबंधित कंपनी ही सामूहिक गुंतवणूक योजनांमध्ये गुंतलेली असून त्यांनी आजवर गुंतवणूकदारांकडून हजारो कोटी रुपये उकळल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 2014 साली SEBI ने Royal TwinkleStar Club लिमिटेड कंपनीचे संचालक आणि एजंट लोकांना गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यास प्रतिबंध केला. पण तोवर त्यांच्या संचालकांना अटक झाली नव्हती. पुढं मग त्यांनी सिट्रस चेकइन्स लिमिटेड ही आणखी एक नवीन कंपनी सुरू केली अन लोकांकडून पैसे गोळा करण्याचं काम सुरू ठेवलं.

Fraud, Royal Twinkle Club

( Fraud, Royal Twinkle Club | Maharashtra Scam Story)


पुढं त्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची एंट्री झाली अन त्यांनी ओमप्रकाश गोएंका याच्या पाठोपाठ रॉयल ट्विंकलच्या आणखी दोन संचालकांना जेरबंद केलं. प्रकाश उत्तेकर आणि व्यंकटरामन नटराजन अशी दोन अटक झालेल्या संचालकांची नावे होती. त्या दोघांनाही कोर्टात हजर केलेलं असता त्यांना साधारण 15 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती. आता त्यांचा करंट स्टेटस काय आहे त्याची माहिती उपलब्ध नाहीये. ते दोघंच क्लबचं दैनंदिन काम सांभाळायचे. तर गोएंका अद्याप कोठडीत असल्याचं समजतंय. एका रिपोर्टनुसार तक्रारी कमी दाखल झाल्या असल्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रॉयल ट्विंकल स्टार क्लबनं तब्बल 18 लाख लोकांना गंडा घातलेला असून त्याच्या फ्रॉडची रक्कम जवळपास 8000 कोटींच्या घरात आहे. सेबीनं त्यांच्या कारवाई दरम्यान रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक इन्सच्या एकूण 46 मालमत्तेचा 97 कोटी रुपयांपेक्षा जास्त आरक्षित किंमतीवर लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्या लिलावामधून हजारो कोटी रुपयांचे पैसे वसूल करण्याचा सेबीचा प्रयत्न होता. लिलाव होणार्‍या मालमत्तेमध्ये ऑफिस कॉम्प्लेक्स, निवासी फ्लॅट्स, भूखंड आणि महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दादरा आणि नगर हवेली इथल्या काही दुकानांचा समावेश असल्याचं समजतय. इतक्या ठिकाणी कंपनीनं लोकांचा पैसा वापरून त्यांची गुंतवणूक करून ठेवली होती.

( Fraud, Royal Twinkle Club | Maharashtra Scam Story)

एका प्रसिद्ध वृत्तपत्रात 6 एप्रिल 2022 रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीनं त्या लिलाव प्रकियेचं जाहीर निवेदन दिलं होतं. दरम्यान त्याआधीही नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत, कंपन्यांच्या 220 हून अधिक मालमत्तांचा 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त राखीव किंमतीवर लिलाव करण्यात आला होता. डिसेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सेबीकडून ते पाऊल उचलण्यात आलं होतं. त्या आदेशात सेवानिवृत्त न्यायमूर्ती जेपी देवधर यांच्या अध्यक्षतेखालील विक्री-सह-निरीक्षण समितीला सहा महिन्यांत कंपन्यांच्या 114 मालमत्तांची विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता कंपनीच्या मालकीच्या सगळ्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे रिटर्न करण्यात येतील अशी माहिती मिळतीये. त्याची अधिक माहिती तुम्हाला सेबीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल. सध्या तरी रॉयल ट्विंकल स्टार क्लबसंबंधी एवढीच माहिती आमच्याहाती लागली. येत्या काळात रिफंडबद्दल नवी काही अपडेट समोर आली तर त्याची माहीती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. बाकी तुमचे किंवा तुमच्या कोणत्या नातेवाईकाचे या रॉयल ट्विंकल स्टार क्लबमध्ये किती पैसे गुंतलेले आहेत ह्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

18 लाख कुटुंबं, ८००० कोटींचा Fraud, Royal Twinkle Club ची गोष्ट | Maharashtra Scam Story

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *