8 ठरले पण एकनाथ शिंदे यांच्या या ५ खासदारांचं तिकीट कापलं गेलंय का ? | Loksabha Election 2024 News|Eknath Shinde


मंडळी सध्या राज्यातल्या जवळपास सर्वच मुख्य पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा सपाटा सुरूय. कालच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ही त्यांच्या पहिल्या आठ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पण गंमत म्हणजे त्यात कल्याण, नाशिक यांसारख्या मोठ्या मतदारसंघाचा समावेश नाही. तर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं दिसतंय. पण शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सरकार स्थापन केलं तेव्हा जवळपास 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. मग आता यादी जाहीर करताना फक्त आठच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी का जाहीर करण्यात आली याबद्दल राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ज्यांची नावं यादीत नाहीत त्या शिंदेंसोबतच्या उरलेल्या खासदारांची तिकिटे कापली गेलीत का हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे. आजच्या या व्हिडीओत आपण खरंच शिंदे गटातील त्या खासदारांची तिकिटे कापली गेलीयेत का, सध्या त्या मतदारसंघात काय राडा सुरूय, त्याचा आढावा घेणारंय.

eknath shinde,

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)


मंडळी सर्वात पहिल्यांदा सुरुवात करू यादीतल्या नावापासून. पण त्याआधी शिंदे गटाकडून नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर झालीये त्याची यादी स्क्रीनवर पाहू..
मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
बुलडाणा – प्रतापराव जाधव
दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
कोल्हापूर – संजय मंडलीक
शिर्डी – सदाशिव लोखंडे तर या आठ जागांवर शिंदेनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत.
त्या यादीत तिकीट कापले गेलेले पहिले खासदार आहेत रामटेकचे कृपाल तुमाने. शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्यानं तुमाने यांच्यासमोरील अडचणी वाढल्यात असं बोललं जातंय. मतदारसंघात तुमाने यांच्या परफॉर्मन्सबद्दल नाराजी आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे तिथून दोनदा विजयी झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली त्यावेळी सुरवातीला तळ्यात-मळ्यात भूमिका घेणारे कृपाल तुमाने नंतर शिंदे गटासोबत गेले. रामटेकमधल्या अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळं तुमाने यांचं तिकीट कापलं जाणार किंवा तिथं भाजपचा उमेदवार दिला जाणार असल्याच्या चर्चाना आधीच उधाण आलं होतं. पण शिंदेना तिथं स्ट्रॉंग चेहरा सापडत नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वीच उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर काल शिंदे गटानं अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवेंना उमेदवारी जाहीर केलीय. पारवे यांना तिथं काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचं आव्हान पेलावं लागण्याची शक्यताय..

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)

तिकीट कापलं गेल्याची चर्चा असणारे शिंदे गटाचे दुसरे नेते आहेत नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे. गोडसे यांची खरं तर नाशिक मतदारसंघावर चांगली पकड असल्यानं शिंदे महायुतीतून हेमंत गोडसे यांनाचं उमेदवारी देतील अशा चर्चा आहेत. पण दुसरीकडं नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांनी नाशिकची जागा भाजपला मिळाली नसली तर आम्ही गोडसे यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतल्याचं कळतंय. अगदी भाजपच्या तीन विद्यमान आमदारांची ही तीच भूमिका आहे. बरं एवढंच नाही तर आता अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी ही नाशिकची उमेदवारी भुजबळांना मिळावी म्हणून दंड थोपटललेत. म्हणजे महायुतीत असूनही भाजप आणि अजितदादांच्या समर्थकांनी उमेदवार म्हणून गोडसे नकोत ही भूमिका घेतल्याची चर्चाय. परिणामी नाशकात गोडसेंच्या उमेदवारीमुळं महायुतीची ताकद विभागण्याची भीती आहे आणि त्याचा फायदा ठाकरें गटाच्या राजाभाऊ वाजे यांना होईल असं म्हंटलं जातंय. तसंच मागं एका कथित व्हायरल व्हिडीओमुळं खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिमा मतदारसंघात डागाळल्याची चर्चा आहे. परिणामी हा सगळा वाद सूरू असल्यानं आणि नाशिकची जागा भाजपला सोडायची नसल्यानं शिंदे यांची तिथं गोची झालीये. त्यामुळं खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केलेली असली तरी आता एकनाथ शिंदे हे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून तिथं नवीन उमेदवार देऊ शकतील असं बोललं जातंय.

hemant godse,

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)

तिसरे आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे गेली 2 टर्म कल्याण मधून खासदार आहेत. यंदा ही खरं श्रीकांत शिंदे यांनाचं कल्याणची उमेदवारी मिळणार हे निश्चित असलं तरी भाजप सुद्धा ठाणे आणि कल्याणच्या जागेसाठी अडून बसल्याच्या चर्चा आहेत.कल्याणमधील सर्वच भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केलाय तर कल्याणची जागा भाजपलाचं पाहिजे असा त्यांचा सूर आहे. सध्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तर ही श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला विरोध करत यंदा कल्याणमध्ये भाजपचा खासदार होणार अशी रोखठोक भूमिका घेतली होती. हिंदुत्ववादी मतांचा केडर बेड मोठा असल्यानं कल्याणच्या जागेसाठी भाजप जोर लावतंय. परिणामी भाजपनं महाशक्तीचा वापर करून कल्याणची जागा बळकावली तर श्रीकांत शिंदे यांची तिकीट कापलं जाईल का अशा चर्चाना उधाण आलंय. पण श्रीकांत शिंदे यांना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, कुणी कितीही दावे केले तरी लोकांना माहितेय ठाणे कल्याणमध्ये कामं कोण करतंय. ठाणे कल्याणमध्ये पुन्हा एकदा आमच्या शिवसेनेचाचं खासदार निवडून येणार. सध्या भाजपकडून कल्याण नाही तर ठाणे लोकसभेच्या जागेवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातंय अशीही चर्चा आहे.

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)

त्यानंतर तिकीट कापल्याची चर्चा असणारे चौथे नेते आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित. 2019 साली ऐनवेळी भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित हेच पालघर लोकसभेसाठी सध्या इच्छुक आहेत पण स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून गावित यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला जातोय. विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं तिथं वर्चस्व नसलं, तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्वय आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलंय असा भाजप नेत्यांचा दावाय. पण मुद्दा असाय की महायुतीच्या जागावाटपात ती जागा कुणाच्या वाट्याला येणारय. कारण शिंदे आणि भाजपकडून त्या मतदारसंघावर दावा करण्यात आला असून भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्यय तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे नेते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहतात असा त्यांचं इतिहासय. परिणामी भाजपनं तिथं नवीन उमेदवार दिला तर गावित यांची अडचण वाढू शकते. पण ऐनवेळी भाजप गावित यांनाच कमळाच्या चिन्हावर लढायला सांगू शकतं अशी एक शक्यता असली तरी सद्यस्थितीत गावित यांचं तिकीट धोक्यात असल्याची चर्चा आहे.

rajendra gavit,

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)

पुढं पाचव्या नेत्या आहेत यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी. तब्बल पाचवेळा यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांच्यासाठी सध्या खूप कठीण काळ सुरूय. शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाची धरलेली वाट अनेकांना आवडली नाही. एका बाजूला भाजप सुद्धा यवतमाळ वाशीम मतदारसंघावर डोळा ठेवून आहेच पण आपल्याचं पक्षाकडून गवळी यांचा घात होण्याची शक्यता जास्त आहे. मागं जरी महायुतीच्या महामेळाव्यात भावना गवळी यांनी मैं मेरी झान्सी नहीं दूंगी म्हणत मतदारसंघावर क्लेम कायम ठेवला असला तरी भाजपकडून तिथ सातत्यानं उमेदवार बदलाचा अजेंडा रेटला जातोय. मतदारसंघातल्या अँटी इनकम्बन्सी फॅक्टरमुळे भावना गवळी यांना तोटा होण्याची शक्यता अधिकय म्हणून तिथं भाजपचा उमेदवार देण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय पण शिंदे गट ती जागा भाजपला सोडायला तयार नाही. दरम्यान गवळीच्या जागी आता नव्या दमाच्या संजय राठोड यांची वर्णी लागणार असल्याची तिथं चर्चा आहे. त्यामुळं यंदा भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे.तर सर्वात शेवटचे नेते आहेत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर. विनींग सीट असल्यानं शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाचं पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण तिथं ठाकरेंचा प्रभाव अधिकय आणि त्या तुलनेत शिंदे गटाची ताकद कमकुवत आहे असा दावा भाजपकडून केला जातोय म्हणून तिथं उमेदवार बदलाची मागणी भाजपकडून सातत्यानं केली जातेय. तसंच ठाकरेंनी त्या मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तिकर हे ऐनवेळी माघार घेतील अशीही चर्चा आहे. दरम्यान कीर्तीकर यांचं वाढतं वय आणि इतर शक्यता लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा अशी भूमिका शिंदे गटाची आहे म्हणून त्यांनी आता फिल्म अभिनेता गोविंदा यांना पक्षात सामील करून घेतलंय. फिल्मसिटी मुंबईत आहे आणि त्यामुळं मला मुंबईसाठी काहीतरी करायची इच्छा आहे असं मत गोविंदा यांनी व्यक्त केलंय. गोविंदा यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. त्यामुळं शिंदे यांच्याकडून गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट करून गोविंदा यांना तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात येत्या काळात मोठी उलटफेर होण्याची चिन्हे आहेत.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, पहिल्या यादीत या विद्यमान खासदारांची नाव न टाकण्याची कारणे काय आहेत. खरंच शिंदे गटाच्या या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार का, यादीत ज्यांची नावं आहेत त्यापैकी किती खासदार निवडून येऊ शकतात ? तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

(Loksabha Election 2024 News|Eknath Shinde)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून लढल्यास माढ्याचे फिक्स खासदार | Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patilबच्चू कडू यांच्या विरोधामुळं अमरावती मध्ये नवनीत राणा पडतील ? | Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kaduधाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhariया ५ लोकसभेच्या जागांसाठी एकनाथ शिंदे आजंही भाजप सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde

8 ठरले पण एकनाथ शिंदे यांच्या या ५ खासदारांचं तिकीट कापलं गेलंय का ? | Loksabha Election 2024 News|Eknath Shinde

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *