रावेरचा पुढचा खासदार कोण | Eknath Khadse की Raksha Khadse | Latest Marathi News | Vishaych Bhari

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या नाट्मय घडामोडींमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या पक्षांमध्ये फूट प़डली आहे. एवढंच नाही तर पवार कुटुंबासह राज्यातील काही प्रमुख कुटुंबांमध्येही राजकीय फाटाफूट झालेली आहे. तर काही ठिकाणी पुढील निवडणुकांमधील उमेदवारीवरून नात्यांमध्येच वितुष्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असाच एक मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ. इथून खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ह्या खासदार आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप आणि भाजपात झालेल्या अंतर्गत मतभेदानंतर एकनाथ खडसे यांनी मागे भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र खासदार रक्षा खडसे ह्या अद्याप भाजपामध्येच आहेत. दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे हे सून आणि सासरेच आमने-सामने येतील, अशी चर्चा तिथल्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता खरंतर सर्वांनाच आहे. पण तिथं नेमकी ताकद कोणाची जास्तंय? सासरे एकनाथ खडसे की मग सूनबाई रक्षा खडसे यांची? कोण रावेरमधून पुढील खासदार होऊ शकतो, चला सगळंच पाहूयात.

Raksha Khadse
Eknath Khadse

(Eknath Khadse vs Raksha Khadse | Latest Marathi News | Loksabha 2023)

मंडळी २०२४ लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांवर सर्वाधिक लक्ष राहणार आहे, अशा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ. एकनाथ खडसेंसारख्या मातब्बर नेत्यामुळे हा मतदारसंघ तसा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. तसेच एकनाथ खडसेंमुळे या मतदारसंघात भाजपाचं कायम वर्चस्वही राहिलं आहे. त्यामुळेच २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच इथे सलग तीन वेळा भाजपाचा उमेदवार विजयी झालाय. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये तर इथल्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे ह्या तब्बल तीन-सव्वा तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. आता अर्थात एकनाथ खडसे यांच्यामुळेच रक्षा खडसे इथून खासदार पदावर धडक मारू शकल्यात.असो, मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसेंनी केलेलं पक्षांतर आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे रावेरमध्ये परिस्थिती बदलली आहे. त्यातच आता विद्यमान भाजपा खासदार रक्षा खडसे आणि त्यांचे सासरे एकनाथ खडसे य़ा दोघांनीही रावेरवर आपला दावा ठोकलाय. एकनाथ खडसे यांना या मतदारसंघात असलेला जनाधार आणि त्याला महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची मिळणारी जोड पाहता ते इथे भाजपाच्या नाकी नऊ आणू शकतात. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांत पडलेल्या फुटीचा फटका खडसेंना नक्कीच बसू शकतो. दुसरीकडे रक्षा खडसेंनाही भाजप आणि शिंदे गटाच्या जोरावर आपण पुन्हा रावेर जिंकू शकतो असं नक्कीच वाटत असणार. पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलं असलं तरी येथील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या निवडणुकीत संमिश्र कौल लागलेला दिसतो. तर बघा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील भूसावळमधून संजय सावकारे विजयी झाले होते. त्यांनी ८१ हजार ६८९ मते मिळवताना प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार डॉ. मधू मनवतकर यांचा तब्बल ५३ हजार मतांनी पराभव केला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मागे संजय सावकारे हे एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणाऱ असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र ते भाजपामध्येच राहिले. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये सध्यातरी भाजपाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. पण जर एकनाथ खडसे रावेरमधून उभे राहिले तर मग संजय सावकारे cross voting करत एकनाथ खडसेंना मदत पुरवणार का , हा महत्वाचा प्रश्न आहे. आता भुसावळ मधुन ते ताकदीचे नेते मानले जातात. एकनाथ खडसेंमुळेच ते खरंतर मागे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे एकनाथ खडसे उभे राहिले तर सावकारे नाथाभाऊमागे छुपी ताकद उभी करू शकतात. असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय

(Eknath Khadse vs Raksha Khadse | Latest Marathi News | Loksabha 2023)

रावेर लोकसभा मतदारसंघातील दुसरा प्रमुख मतदारसंघ असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन सातत्याने विजयी होत आले आहेत. गिरीश महाजन यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख १४ हजार ७१४ मते मिळवताना राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला होता. एकूण मतदानापैकी महाजन यांना ५४ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघामध्येही भाजपाची बऱ्यापैकी ताकद दिसून येते . आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे वाद जगजाहीर आहेत. फडणवीसांनी खडसेंच्या विरूद्ध महाजनांना इथून ताकद पुरवलीय . आता ते जामनेर मधून ताकदवान नेते आहेत. ते निश्चित एकनाथ खडसेंना विरोध करतील. पण म्हणून ते रक्षा खडसेंना इथून सपोर्ट करतील असं नाही. कारण खडसे विरूद्ध खडसे वादाचा ड्रामा त्यांनी ओळखला आहे शिवाय खडसे family ला तिकीट मिळावं असं महाजनांना वाटत नाही. अर्थात भाजप हायकमांड कदाचित म्हणूनच इथून रक्षा खडसेंऐवजी गिरीश महाजन यांनाच भाजपतर्फे लोकसभेचं तिकीट देऊ शकतं.अशीही चर्चा आहे. आता तसं जर झालं तर एकनाथ खडसे विरूद्ध गिरीश महाजन ही फाईट इथून अजूनच इंटरेस्टिंग आणि तगडी होऊ शकेल. रावेर लोकसभा मतदारसंघात येणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चोपडा. चोपडा मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेनेच्या लता सोनावणे यांनी राष्ट्रवादीच्या जगदिशचंद्र वळवी यांचा २० हजार मतांनी पराभव केला होता. मात्र येथे अपक्ष उमेदवारांना मिळालेली लक्षणीय मतं लता सोनावणे यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत लता सोनावणे ह्या शिंदे गटात गेल्या आहेत. मात्र या भागात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती तसेच महाविकास आघाडीमधील एकजूट यामुळे समिकरणं बदलण्याचीच शक्यता आहे. चंद्रकांत सोनवणे हे इथून कीमेकर प्लेयर आहेत. आता रक्षा खडसे उभ्या राहिल्या किंवा भाजपचा कुठलाही नेता उभा राहिला तर मग लता सोनवणेंची ताकद त्या संबंधित नेत्यामागे उभी राहू शकते . पण इथून राष्ट्रवादी आणि एकूणच ठाकरे गटही एकनाथ खडसेंनाच ताकद पुरवू शकतं. फक्त इथून २०१९ ला जो अपक्ष उमेदवाराचा व्होटर आहे. तो नेमक्या कोणत्या दिशेने वळतो हे देखील इथून निर्णायकी असणार आहे.‌ आता शिंदे गटाविरूद्ध नाराजी आणि ठाकरेंची सहानुभूती या मुद्यावर कदाचित एकनाथ खडसे ही ताकद त्यांच्या बाजूने वळवू शकतील.

Girish Mhajan

(Eknath Khadse vs Raksha Khadse | Latest Marathi News | Loksabha 2023)

राज्यातील सर्वात चर्चित विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या १९५७ मतांनी पराभव केला होता. मात्र आता चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात गेले आहेत. तर एकनाथ खडसे य़ांच्य़ासोबत त्यांच्य़ा कन्या रोहिणी खडसे ह्याही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या आहेत.नुकतंच शरद पवार गटाने महिला प्रदेशाध्यक्ष हे पद देऊन रोहिणी खडसे यांना ताकद पुरवली आहे. आता शिंदे गटाविरूद्ध वातावरण तयार झाल्यामुळे ठाकरे गट इथून रोहिणी खडसेंना मदत करू शकतो. तसेच नाथाभाऊंच्या मागेही ताकद उभी करू शकतो. पण शिंदे गटाचे नेते चंद्रकांत पाटील हे म्हणून इथून रक्षा खडसेंमागे उभे राहतील असं नाही. रक्षा खडसेंऐवजी गिरीश महाजन असतील तर ते नक्कीच त्यांना ताकद पूरवतील. असो पण आता मुक्ताईनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मागे कुठलाही उमेदवार न देणं हेच पुढं खडसे वडील आणि लैकीच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं एक कारण झालं असावं हे मात्र इथं नोंद घेण्यासारखंय . रावेर लोकसभा मतदारसंघांतील रावेर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या शिरीश चौधरी यांनी भाजपाच्या हरीभाऊ जावळे यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र या मतदारसंघांमध्येही अनिल चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवत ४४ हजार मतं मिळवल्याने ही समिकरणे बदलली होती. आता हरिभाऊ जावळे हे २००९ साली रावेर लोकसभेचे खासदार झाले होते.‌ पण नंतर त्यांच्याऐवजी पक्षानं रक्षा खडसेंना संधी दिली. आता हरिभाऊ जावळे म्हणून रक्षा खडसेंच्या मागे उभे राहतील का ही शंका आहे. पण शिरीष चौधरी मात्र महाविकास आघाडी धर्म म्हणून एकनाथ खडसेंमागे उभे राहू शकतात. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या बुल़ढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून काँग्रेसचे राजेश एकाडे हे मागे विजयी झाले होते. राजेश एकाडे यांनी भाजपाच्या चैनसुख संचेती यांचा १४ हजार मतांनी पराभव केला होता. आता इथून राजेश एकाडे कदाचित मविआ धर्म पाळत एकनाथ खडसेंना बळ पुरवतील तर इथून संचेती मात्र रक्षा खडसे किंवा गिरीश महाजन यांनाच ताकद पुरवू शकतात.

(Eknath Khadse vs Raksha Khadse | Latest Marathi News | Loksabha 2023)

तर एकूण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचं समिकरण पाहता इथे कुठल्या एका पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे, असं मानता येत नाही. तरीही भाजपाचे दोन , शिंदे गटातील दोन आमदार इथे आहेत. एकूण चार विधानसभा मतदारसंघात भाजप ताकदवान आहे. तर उरलेल्या दोन मतदारसंघांत कांग्रेसचे आमदार आहेत. आता अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. एवढंच नाही तर २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांच्या त्यांनी नाकी नऊ आणले होते. पण शिवसेनेच्या लता सोनावणे आणि अपक्ष चंद्रकात पाटील हे एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने इथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची अवस्था काहीशी कमकुवत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राष्ट्रवादीचंही गणित इथ़ बिघडलेलं आहे. याचा फायदा निश्चितच भाजपाला होऊ शकतो. आता खडसे कुटुंबीयांचा विचार केल्यास महाजन वगळता त्यांचे कुठलेही मतभेद किंवा सत्तासंघर्ष उघडपणे झाल्याचं इथून दिसत नाही. उलट त्यांनी इथून बेरजेचंच राजकारण केलं आहे. तरीही एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बराच काळ लोटलाय.‌ तरीही त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे ह्या भाजपामध्येच आहेत. तसेच त्यांनी भाजपाविरोधात कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये. एक सक्रिय महिला खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. अशा परिस्थितीत दोन्हीकडून आपलेच उमेदवार उभे राहावेत आणि त्यातून एकाचा विजय व्हावा, अशी खडसेंचीच रणनीती असू शकते.असं जाणकारांचं मतंय. आता एकनाथ खडसे जरी राष्ट्रवादीत गेले असले तरीही रक्षा खडसेंच्या
रूपाने भाजप हायकमांडशी संबंध कायम ठेवत दोन्ही कडचे volve open ठेवायचे हाही खडसेंचा इथे प्लॅन आजपर्यंत नक्कीच राहिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, मात्र मागच्या वेळी या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यावेळचे काँग्रेस उमेदवार उल्हास पाटील यांना तीन लाख १९ हजार मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जागावाटपात ही जागा आक्रमक पणे शरद पवार गटात पाडून घ्यायची आणि खडसे विरूद्ध खडसे अशी लढाई करून तिसरा पर्यायच इथून ओपन होऊ द्यायचा नाही. अशी statergy कदाचित एकनाथ खडसेंची असावी.

rasthwadi 
Eknath Khadse

(Eknath Khadse vs Raksha Khadse | Latest Marathi News | Loksabha 2023)

पण आता म्हणूनच महाविकास आघाडी येथे उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांना पसंती देते की अन्य कुठल्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर भाजपा इथून दोन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांनाच पुन्हा संधी देणार की, खडसेंच्या कुटुंबातील असल्याने त्यांचा पत्ता कापून तिथे अन्य कुणाला संधी देणार यावर पुढील गणिते ठरणार आहेत. कदाचित रक्षा खडसे ऐवजी हे नाव गिरीश महाजन यांचंच असण्याची इथं दाट शक्यता आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, २०२४ ला रावेरमधून कुठल्या २ नेत्यांमध्ये फाईट होईल?
कोण हे रावेरचं मैदान मारेल ? रक्षा खडसे, एकनाथ खडसे की मग गिरीश महाजन कोणाची ताकद इथून जास्तंय ? आणि कोण रावेरचा भाजपचा पुढील खासदार होऊ शकतो . तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Eknath Khadse की Raksha Khadse, रावेरचा पुढचा खासदार कोण | Latest Marathi News | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *