असाय Sharad Pawar यांना चीतपट करण्याचा धनंजय मुंडेंचा रिव्हर्स प्लॅन | Dhananjay Munde Beed Sabha | Vishaych Bhari
शरद पवार यांनी बीडमध्ये जोरदार सभा घेतली तसं धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले . अर्थात शरद पवार बीडमध्ये फक्त शक्ती प्रदर्शन करून थांबले नाहीत तर त्यांनी धनंजय मुंडे विरूद्ध proper planning केलं . आणि त्यांच्या नाड्या कशा आवळता येतील असा प्रयत्न केला . यातूनच बबन गीतेंना शरद पवारांनी राष्ट्रवादीत घेतलं. पण त्यामुळे निश्चितच धनंजय मुंडेंची काही राजकीय गणितं बिघडली. . म्हणून तर धनंजय मुंडे यांनी तातडीने योगेश क्षीरसागर यांना अजित दादांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देत संदीप क्षीरसागरांच्या बीडमधील वाढत्या शक्तीला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. पण मग धनंजय मुंडे या राजकीय जुळवाजुळवीत यशस्वी ठरलेत का ? की शरद पवारच बीडमध्ये किंगमेकर ठरतील ? याच अनुषंगाने दोन्ही गटाच्या बीडमधील राजकीय पावरचा घेतलेला हा आढावा.

( Dhananjay Munde Beed Sabha | Vishaych Bhari )
बीडच्या सभेत शरद पवारांनी धनंजय मुंडे विरोधात proper राजकीय planning केल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये त्यांनी ओबीसी धुर्वीकरणाचा प्रयत्न तर केलाच पण मराठा आणि ओबीसी अशी मोट बांधायचाही जोरदार प्रयत्न सुरू केलाय. याच अनुषंगाने शरद पवार यांनी धनंजय मुंडेचं परळीतील ट्रंपकार्ड असणारा नेताच सोबत घेतलाय. आणि अर्थात ते नाव आहे जनक्रांती सेनेच्या बबन गीते यांचं. आता बबन गीते यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी काय साधलंय तर बघा बबन गीते यांचा बीड विशेषतः परळीच्या राजकारणात मोठा impact दिसून येतो. तिथे सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या कामामुळे त्यांचा जनसंपर्क आणि इमेजही चांगली आहे. आता तीच गोष्ट ओळखून शरद पवार यांनी गीतेंना आपल्या सोबत घेतलं आहे. तसं गीते यांच्या सपोर्ट मुळे विधानसभेत धनंजय मुंडेना परळीतील फाईट सोपी झाली होती. पण आता हेच गीते पवारांसोबत गेल्याने धनंजय मुंडेचं टेंशन वाढलं होतं. आता अर्थात बबन गीते हे वंजारी समाजाचे नेते आहेत. त्यांचे चुलते अण्णासाहेब गीते कधीकाळी रेणापूरचे आमदार होते.आणि बीडच्या राजकारणात वंजारी मतदार बहुसंख्य आहेत. अशावेळी गीते शरद पवार गटाकडून उभे राहिले तर मग वंजारी मतांचं व्होट डिव्हीजन होऊ शकतं. या खेळात पुढे पंकजा मुंडेही उतरल्या तर मग वंजारी मतदारांचं विभाजन होऊन मराठा मतदार इथे प्राईम फोकसला येईल . कारण बबन गीतेंसोबतच शरद पवारांनि डाव्या चळवळीतील नेत्या आणि ऊसतोड कामगारांसाठी काम करणार्या सुशीला मोराळेंना पक्षात घेतलंय तसेच शिवराज बांगर यांनाही इन केलंय. आता या तीन नेत्यांमुळं बीडच्या राजकारणात
वंजारी समाजाचं व्होट डिव्हीजन होऊन धनंजय मुंडेना फटका बसेल. तर चळवळीतील आणि मागास वर्गातील नेत्यांना सोबत घेतल्यामुळे शरद पवार यांना दलित आणि मुस्लिम अल्पसंख्याकांना सोबत घेता येईल. शरद पवार यांच्याप्रतीची सिंपथी आणि सर्वसामान्यांचा पाठिंबा यावर बीडमध्ये शरद पवार गट प्रभावी ठरू शकेल.
( Dhananjay Munde Beed Sabha | Vishaych Bhari )
आता या सगळ्यात बीडमध्ये निर्णायक ठरू शकणारा जातसमूह ठरू शकतो आणि तो म्हणजे मराठा समाज.आता मराठा समाजाचा नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे आणि शरद पवार यांचा मराठा factor plus मुंडे factor ची वंजारी मतं यावरच धनंजय मुंडेनी निवडणूक जिंकली होती. त्यामुळे मराठा समाजाचा एक बिग केडर चेहरा धनंजय मुंडे नक्कीच इथून पुढे आपल्या सोबत जोडण्यासाठी प्रयत्न करतील.आता बीडच्या राजकारणात मुंढेनंतर क्षीरसागर कुटुंबाचं मोठ नाव आहे. आणि त्यातील एक असणार्या संदीप क्षीरसागर यांना शरद पवार गटाने बीडच्या सभेत फ्रंटलाईन केल्याचं दिसतंय. आता म्हणून तर क्षीरसागर इफेक्ट खोडून काढण्याच्या हिशोबाने धनंजय मुंडेनी संदीप क्षीरसागर यांचै बंधू योगेश क्षीरसागर यांना आपल्या सोबत घेतलं आहे. आता आजच्या सभेत योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल नक्की करतील. या सगळ्यात हल्ला वैयक्तिक पातळीवरही घसरू शकेल. पण या सगळ्यात रवींद्र क्षीरसागर कुठली बाजू घेतायत हे सुद्धा निर्णायक ठरू शकतं. बीडच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ मुंडेशी आपलं नातं सांगून बीडशि कनेक्शन जोडलंय भविष्यात ते या मतदारसंघात की रोल प्ले करू शकतात. संदीप क्षीरसागर यांना वंजार्याचं पोर म्हणत त्यांनी मुंडेचा वारसा शरद पवार गट आणि क्षीरसागर यांच्याशी जोडून पाहिलाय.
त्यात किती यश येईल हे भविष्य ठरवेलच पण बीडच्या राजकारणात जातीय जुळवाजुळव इथून पुढे महत्वाचा ठरणार आहे.

( Dhananjay Munde Beed Sabha | Vishaych Bhari )
या सगळ्यात पंकजा मुंडेची भूमिका ही बघणं अतिशय महत्त्वाचं असं असेल. त्यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्री झाल्यावर औक्षण केलं असलं तरीही त्या bounce back नक्कीच करतील. त्यांना भाजप कडून संधी मिळण्याची अपेक्षा असल्यानेच त्या सध्या वेट and watch च्या भूमिकेत आहेत. कारण त्यांना गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये वाढवलेली भाजपची लीगसी सोडायची नाहीये. पंकजांनी पक्ष सोडला तर त्यांना डॅमेज करणं सोपं जाईल हा विरोधकांचा कावा त्यांच्या लक्षात असावा. म्हणूनच त्या मैदान सोडायला तयार नाहीण. आता अर्थात पंकछाच्या पराभवाला मागे देवेंद्र फडणवीस यांना दोषी धरलं गेलं होतं. त्यांची यावेळेस इथे काय भूमिका राहतेय हे पाहणं महत्वपूर्ण असं आहे. पण एवढं मात्र नक्कीय की शरद पवार आणि अजित दादांच्या संघर्षामुळे महाराष्ट्राचं राजकारण जातीय मुद्यावर शिफ्ट झालेलं आहे. आता पवारांनी बीडमध्ये मास्टर स्टरोक मारलाय त्यावर धनंजय मुंडेचा रिव्हर्स प्लॅनही तयार आहे. फक्त ऐनवेळेस डाव जिंकणार कोण हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय बीडच्या राजकारणात कोण कि़ंग ठरेल धनंजय मुंडे की शरद पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
One response to “असाय Sharad Pawar यांना चीतपट करण्याचा धनंजय मुंडेंचा रिव्हर्स प्लॅन | Dhananjay Munde Beed Sabha | Vishaych Bhari”
-
कशाला एनर्जी फुकट घालवायची… सकाळचा शपथविधी सोहळा लोक विसरली नाही…
Leave a Reply