बीडच्या सभेतून धनंजय मुंडेनी शरद पवारांवर ३ मुख्य पलटवार केले | Dhananjay Munde – Ajit Pawar Beed Sabha | Vishaych Bhari

बीडमध्ये १७ तारखेला शरद पवारांनी जोरदार सभा घेतली.‌ या सभेत शरद पवारांनी धनंजय मुंडें विरोधात जबरदस्त फिल्डींग लावली. बबन गीते, सुशीला मोराळे अशा तगड्या प्लेयरना पक्षात इन केलं. त्यावर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेल्याचं म्हणलं जाऊ लागलं. पण त्यांनीही बीडमध्ये आज सभा घेतली. या सभेला मीडियानै उत्तरसभा म्हणलं. पण धनंजय मुंडेनी ही उत्तरसभा नसून विकाससभा आहे असं म्हणलं . या सभेत धनंजय मुंडेनी शरद पवारांवर ३ मुख्य पलटवार केले. ते नेमके कोणते, चला पाहूयात.

धनंजय मुंडेचा नंबर एकचा पलटवार म्हणजे, बीडमधलं मुख्य वंजारी नेतृत्व म्हणून धनंजय मुंडेनी स्वतः ला सिद्ध केलं.

( Dhananjay Munde – Ajit Pawar Beed Sabha | Vishaych Bhari )

शरद पवार यांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी वंजार्‍याचं पोर म्हणत संदीप क्षीरसागर यांना फ्रंटलाईन केलं होतं. अर्थात बीडमधील वंजारी समाजानं इथून पुढं संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे उभं रहावं असा त्याचा अर्थ होता. आता अर्थात बबन गीतेंना इन करून बीडमधील हीच वंजारी धुर्वीकरणाची लाईन शरद पवार गटाने अजूनच strong केली. आता यामुळेच शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आणि बबन गीते की भाजपच्या पंकजा मुंडे की मग अजित दादा गटाचे धनंजय मुंडे इथून वंजारी समाजाचे नेते आहेत ? हा एक मोठा प्रश्न इथल्या मतदारांपुढे निर्माण झाला असेल. त्यावर धनंजय मुंडेनी आज जोरदार भाषण करून हम खडे तो सबसे बडे अशीच भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. आजच्या सभेतून वंजारी समाजाचं आश्वासक नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे तसेच संदीप क्षीरसागर,बबन गीतेंनाही धनंजय मुंडेनी जोरदार लीड दिलं.

नंबर दोन, संदीप क्षीरसागरांची इमेज डॅमेज केली.

( Dhananjay Munde – Ajit Pawar Beed Sabha | Vishaych Bhari )

बीडच्या राजकारणात मुंढेनंतर क्षीरसागर फॅमिलीचं वजन मानण्यात येतं. आता संदीप क्षीरसागर यांना शरद पवार गटाने फ्रंटलाईन केल्यामुळे त्यांचं नेतृत्व बीडमध्ये establish होऊ नये ही proper काळजी धनंजय मुंडेनी घेतल्याचं बघायला मिळालं. त्यातलाच पहिला अध्याय म्हणजे, काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांना अजित दादा गटात इन करून धनंजय मुंडेनी संदीप यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. आता जर संदीप यांची इमेज डॅमेज केली नाही तर भविष्यात ते मुंडेना इथून डोईजड ठरू शकतील, असं धनंजय मुंडेना पक्क माहीतेय. खरंतर म्हणूनच योगेश क्षीरसागर यांना त्यांनी अजित दादा गटात प्रवेश दिलाय. आता म्हणूनच भविष्यात योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून संदीप यांच्यावर टीका झाली ,अगदी वैयक्तिक टीका झाली तर आश्चर्य वाटायला नको.

धनंजय मुंडेचा तिसरा पलटवार म्हणजे, शरद पवार नाही राष्ट्रवादीत इथूनपुढे अजित दादाच सबकुछ असतील हे त्यांनी सिद्ध केलं.

( Dhananjay Munde – Ajit Pawar Beed Sabha | Vishaych Bhari )

आजच्या सभेत धनंजय मुंडेनी शरद पवारांवर टीका करताना बरीच सावध भूमिका घेतली. त्यांनी एका बाजूला शरद पवारांना दैवत म्हणलं पण दुसर्‍याच बाजूला शरद पवारांनी बीडसाठी काय केलं ? असं म्हणून पवारांवर सडकून टीकाही केली. बीडमधील ऊसतोड कामगारांसाठी फक्त अजित दादांनीच काम केलं, दुसरं कोणी नाही. असं म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत अजित दादाच सबकुछ आहेत हेच सिद्ध केलं. शिवाय मी भाजपमधून उमेदवार असताना विधानपरिषदेला दोन मतं कमी पडली तेव्हा मला ती गुप्त मदत अजित दादांनी केली होती. मग मला सांगा अजित दादांमागे मी गेलो हे माझं चूकलं का? असंही म्हणून धनंजय मुंडेनी बीडकरांना भावनिक साद घातली.‌ अर्थात त्यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख हा शरद पवारांविरूद्ध तर अजित दादांची राष्ट्रवादीतील छबी सर्वोच्च ठरवणारा होता. एकूणच आजच्या सभेतून धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर हे मुख्य ३ पलटवार केलेत. पण तुम्हाला काय वाटतंय, धनंजय मुंडे बीडमध्ये शरद पवारांविरूद्धचा हा राजकीय डाव खरंच जिंकू शकतात का ? बीडच्या राजकारणात खरा किंग कोण,शरद पवार की धनंजय मुंडे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

Beed च्या सभेतून Dhananjay Munde यांनी पवारांवर हे ३ पलटवार केलेत | Beed Sabha Live | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *