या ५ गडांवर फिरायला जाताना १० वेळा विचार करा कारण तिथून माघारी परतायची ग्यारंटी नाही | Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad News

पावसाळ्यातली हिरवळ मनाला भुरळ घालते त्यामुळं मित्र-मैत्रिणींसोबत एकदा तरी गडकिल्ल्यांवर फिरायला जायचा प्लॅन बनतोच. बर फक्त मोकळं फिरण्यात मजा येत नाय म्हणून ट्रेकिंग दरम्यान काहीतरी थ्रीलिंग, इंटरेस्टिंग करायचं ही मनात असतं. हल्लीच्या तरुणाईमध्ये हे ट्रेकिंगला जायचं फ्याड लईच वाढलंय. इंस्टा फेसबुकवर मित्रांनी किंवा फेमस व्यक्तींनी टाकलेल्या ट्रॅव्हलिंगच्या रिल्स बघायच्या, त्यातनं स्वतःला चार्जअप करायचं अन बॅगा खांद्यावर टाकून ट्रेकिंगला जायचं. कधी कधी धड गडांची माहिती अन इमर्जन्सी साहित्य सोबत नसतानाही तावातावातअसे निर्णय घेतले जातात. पण माहिती नसताना गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणं कसं जीवावर बेतू शकतं ह्ये तुम्हाला पाच दिवसापूर्वी हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या पाच जणांच्या प्रसंगावरून लक्षात आलंच असेल. एकाला त्या ट्रेकिंग दरम्यान स्वतःचा जीव ही गमवावा लागला. त्यामुळं माहिती नसताना ट्रेकिंगला जाणं फार रिस्की ठरू शकतं. म्हणून आज आपण महाराष्ट्रात नेमकी अशी कोणती ठिकाण आहेत जिथं गेल्यावर तुम्हाला सेफ्टी कमस् फर्स्ट हा नियम लक्षात ठेवण्याची गरज पडू शकते त्याची माहिती घेणारय. लेखात सांगितलेली माहीती फक्त ट्रेकिंग लव्हरचं नाही तर ट्रॅव्हलिंगची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगीय. त्यामुळं लेख पूर्ण वाचा..


तर मंडळी महाराष्ट्रातलं ट्रेकिंगसाठी सगळ्यात जास्त अवघड आणि भीतीदायक समजलं जाणारं ठिकाण म्हणजे कलावंतीण माची.

dangerous fort in maharashtra,dangerous fort,dangerous fort in india,dangerous fort trek in maharashtra,dangerous fort trekking,dangerous fort in the world,dangerous fort of shivaji maharaj,dangerous fort climbing,dangerous fort trek,महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ले,dangerous fort in pune,dangerous fort in kokan,dangerous fort in satara,dangerous fort in kolhapur,treking videos,fort treking videos,jkv,vishaych bhari,vishay bhari,harishchandragad,
kalavnatin durg,
kalavantin machi

कलावंतीण दुर्ग म्हणून ओळखला जाणारा हा एक किल्ला असून त्याची उंची २२५० फूट एवढीय. महत्वाचं म्हणजे गडावर चढण्यासाठी चक्क नव्वद डिग्री मध्ये दगड कापून पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. त्या पायऱ्या चढायला खूप अवघड असून मोस्ट थ्रीलर ट्रेकिंगचा अनुभव तिथं प्रत्येकाला येतो. पण वर गेल्यानंतर जो काही अद्भुत नजारा दिसतो त्याला तोड नाय. जर तुम्ही मुंबईहून पुण्याला जात असाल तर कलावंतीण दुर्ग हा डोंगरवजा किल्ला पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत बघायला मिळतो. दुर्ग कलावंतीण, कलावंतीणचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ते ठिकाण ओळखलं जातं. ट्रेकिंगचं थोडं तरी ट्रेनिंग घेतल्याशिवाय हे शिखर चढणं आणि उतरणं खूप अवघड मानलं जातं. फक्त थ्रील आजमावयचं म्हणून Over Excitement मध्ये भेट द्यायला जाल तर कार्यक्रम अवघड होऊन बसेल.

तसंच एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कुठेही ट्रेकिंगला जाताना तुमच्यासोबत अत्यावश्यक वस्तू जसं की दोरी, first aid बॉक्स, नेव्हिगेशन device like कंपास, नकाशा नसेल तर किमान मोबाईल तरी, टॉर्च, हेडलॅम्प किंवा कंदील यापैकी एक गोष्ट, तसंच चाकू आणि दुरुस्तीची साधनं, आग निर्माण करण्यासाठी मॅचबॉक्स, लाइटर किंवा फायर स्टार्टर, आपत्कालीन निवाऱ्याची साधनं, जलशुद्धीकरण आणि हायड्रेशनची साधनं आणि काही अतिरिक्त कपडे वगैरे असणं अत्यंत गरजेचंय.

( Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad News )

दुसरं डेंजर ठिकाण म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला हर्षगड म्हणजेच हरिहर किल्ला.

तो नाशिक मध्ये असून त्याची उंची ३६७६ फूट एवढी आहे. तो गड इतका अवाढव्य आहे की जवळून पाहिल्यानंतर अंगावर काटाच येतो. त्या किल्ल्याच्या ऐंशी डिग्री मध्ये असणाऱ्या कातर पायऱ्या चित्तथरारक अनुभव देतात. तो गड चढताना पाय थरथरतात आणि उतरताना खाली बघितलं तर काळजाचे ठोके वाढतात. हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला किल्ला असून अजूनही उत्तम स्थितीतय हे विशेष. आधी तो किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता पण शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करताना त्र्यंबकगडासोबत तो किल्लासुद्धा जिंकला होता. तिथंही हजारो पर्यटक दरवर्षी थ्रील अनुभवण्यासाठी जातात. बऱ्याच दुर्घटना ही होतात. त्यामुळं तिथं जाताना ही ट्रेकिंगबद्दलची माहीती घेऊन आणि सगळी पूर्वतयारी करुन जावा.

तिसरं ठिकाणय पुणे जिल्ह्यातील तैलबैला किल्ल्याची भिंत.

dangerous fort in maharashtra,dangerous fort,dangerous fort in india,dangerous fort trek in maharashtra,dangerous fort trekking,dangerous fort in the world,dangerous fort of shivaji maharaj,dangerous fort climbing,dangerous fort trek,महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ले,dangerous fort in pune,dangerous fort in kokan,dangerous fort in satara,dangerous fort in kolhapur,treking videos,fort treking videos,jkv,vishaych bhari,vishay bhari,harishchandragad
तैलबैला किल्ला,
tailbail killa 
tailbail fort,
tailbail bhint

ती भिंत साधारणपणे १०१३ मीटर म्हणजेच ३३२२ फूट उंच असून उत्तर – दक्षिण पसरलेली आहे. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात ऐकलेलं लावारस उसळून थंड होतो आणि पुन्हा लावारास उसळतो आणि सेम प्रक्रिया घडून मोठ मोठे डोंगर तयार होतात त्या प्रक्रियेचं आयकॉनिक उदाहरण म्हणजे तैलबैला किल्ला. तैलबैला भिंतीच्या मध्यावर “V “ आकाराची अशी वेगळी खाचय. त्यामुळं त्या भिंतीचे २ भाग झालेले पाहायला मिळतात. त्या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी 100 टक्के तुमच्याजवळ ट्रेकिंगचं ज्ञान आणि ट्रेकिंगचं अत्यावश्यक सामान असणं गरजेचंय. त्याच किल्याला कवडीचा डोंगर म्हणूनही ओळखलं जातं. बरेच अनुभवी ट्रेकर्स सांगतात, तिथं अतिशय सावधगिरी बाळगून, नियोजनबद्ध पद्धतीनेचं जावं लागतं. अन्यथा काहीतरी विपरीत घडण्याचे चान्सेस जास्त असतात.

( Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad News )

चौथं आणि सगळ्यात डेंजर ठिकाण, जिथं आता नुकताच मोठा इन्सिडेंट घडला. तब्बल ४००० फूट उंचीचा, भयानक जंगलाने वेढलेला हरिश्चंद्र गड.

अहमदनगर जिल्ह्यातला तो हरिश्चंद्र गड चढताना घनदाट जंगलातून वाट शोधत जावं लागतं. पावसाळ्यात गडाच्या पाऊलवाटा मुजून जातात त्यामुळं त्या गडावर वाट शोधणं खूप अवघड होऊन जातं. तशी वाट न सापडल्यामुळेचं मागच्या आठवड्यात त्या पाच मित्रांचा ग्रुप हरिश्चंद्रगडावर भरटकला आणि तब्बल 48 तास त्यांना अन्न पाण्याविना राहावं लागलं. त्यातला एकाचा तर जीव ही गेला. बाकीच्यांना गडावरील तज्ञ व्यक्तींच्या मदतीनं शोधण्यात मदत मिळाली आणि त्यांचा जीव वाचला. सध्या त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळं जर पावसाळ्यात हरिश्चंद्र गडावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर प्लीज खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इमर्जन्सी साहित्य स्वतःसोबत घेऊन जा.

आता राहिला शेवटचा म्हणजे पाचवा गड अन तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला.

dangerous fort in maharashtra,dangerous fort,dangerous fort in india,dangerous fort trek in maharashtra,dangerous fort trekking,dangerous fort in the world,dangerous fort of shivaji maharaj,dangerous fort climbing,dangerous fort trek,महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ले,dangerous fort in pune,dangerous fort in kokan,dangerous fort in satara,dangerous fort in kolhapur,treking videos,fort treking videos,jkv,vishaych bhari,vishay bhari,harishchandragad,
वासोटा किल्ला,
vasota killa,
vasota gad,
vasota fort

वासोटा म्हणजे जावळीच्या जंगलातलं अनोखं दुर्गरत्‍न. तब्बल ४२६७ फूट उंचीचा व्याघ्रगड म्हणजेच वासोटा. किल्ल्याच्या पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढलीय. पावसाळा उन्हाळा किंवा हिवाळा, ऋतू कोणताही असो वासोट्याची सफर कायमच डेंजर असते. गडाची खडानखडा माहिती ठेवणारे लोक सुद्धा कित्येक वेळा वासोट्यावर भरकटलेले आहेत. त्यामुळं तिथं जाताना वाटाड्या किंवा मार्गदर्शक व्यक्तीची मदत घेऊनच जा असा सल्ला देण्यात येतो.

( Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad News )


दरम्यान ट्रेकिंगला गेल्यावर काही लोकांना मद्य घेण्याची वाईट सवय असते. तसला काही प्रकार न करता ट्रेकिंगवेळी योग्य आहार तेवढा घ्या आणि सगळ्यात महत्वाचं अलेवज दोन नियम पाळा. एक सेफ्टीच्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळा अन दुसरा पहिला नियम कधी विसरू नका. बाकी तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुमच्या माहितीत ट्रेकिंगसाठी अजून कोणतं डेंजर ठिकाण असेल तर त्याबद्दल ही कमेंट मध्ये नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

या ५ गडांवर फिरायला जाताना १० वेळा विचार करा कारण तिथून माघारी परतायची ग्यारंटी नाही | Dangerous Fort Trek in Maharashtra | Harishchandragad News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *