सगळ्यांना पोट धरून हसवणारे Dada Kondke शेवटी एकटे कसे पडत गेले | Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari

जसं जीवाचा जीव घुटमळ, तसं पिरतीच वाढतंय बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गं न है बघून दुस्मन जळ
वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं..


आता तुम्ही म्हणाल, ह्यो गडी का आज रंगात आलाय. तर ऐका, तीन दिवसांपूर्वी आपल्या लाडक्या दादांचा जन्मोत्सव झाला आणि मागच्या काही काळापासून झी टॉकीज या मराठी टी व्ही चॅनेल्सवर दादांच्या सिल्व्हर जुबली चित्रपटांचा धडाका सुरूय. त्यानिमित्तानं आम्ही ठरवलं आपल्या वन अँड ओन्ली जुबलीस्टार दादा कोंडके यांचा संपूर्ण चित्रपट प्रवास तुम्हाला सांगायचा. आता आपल्या कॉमेडी किंग दादांची बायोग्राफी सांगायची म्हणल्यावं दादांचं यकांद सुपरहिट गाणं तर झालंच पाहिजे म्हणून मग आपली गाण्यानं सुरुवात केली. चला तर मग सुरुवात करू,

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

dada kondke biography,
dada kondke bio,
dada kondke biography in marathi,
dada kondke biography book pdf download, 
dada kondke biography in hindi,
dada kondke biodata,
dada kondke wiki,
dada kondke wiki marathi,
दादा कोंडके,
दादा कोंडके ची गाणी,
दादा कोंडके ची गाणी mp3,
दादा कोंडके चे गाणे,
दादा कोंडके मराठी पिक्चर,
दादा कोंडके सासरच धोतर सासरचे धोतर,
दादा कोंडके मराठी चित्रपट,
दादा कोंडके यांची गाणी,
दादा कोंडके कॉमेडी,
दादा कोंडके उषा चव्हाण,
उषा चव्हाण,

मंडळी मराठी चित्रपट विश्वात दादा कोंडके एकमेव असे अभिनेते होते ज्यांना लोकं जुबलीस्टार म्हणून ओळखतात. त्याचं कारण तुम्हाला माहितीयेच, दादांचे सलग नऊ सिनेमे 25 आठवड्यांपेक्षा जास्त थियेटरला चालले होते म्हणजेचं सिल्वर जुबली हिट झाले होते. त्याची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने ही घेतली होती. पोट धरून सोडा अगदी गडागडा लोळेस्तोवर लोकांना हसवणं आणि धकाधकीच्या जीवनात त्यांना चार घटकेचा विरंगुळा देणं हा दादांचा उद्देश. त्यांचा सिनेमा गावगाड्याचं अस्सल जगणं दाखवायचा अन म्हणूनचं लोकांना त्यांचे रॉ सिनेमे खूप आवडायचे. पण आपल्या संपूर्ण आयुष्यात लोकांना मनमोकळं हसवणाऱ्या दादांच्या आयुष्याचा शेवटचा काळ खूपच अस्वस्थ आणि एकाकी राहिला. असो, आता आपण सुरुवातीपासून त्यांचा प्रवास सविस्तर जाणून घेऊ. स्वातंत्र्यपूर्व भारताचा काळ. १९३२ साली पुण्याजवळील इंगवली गावचे खंडेराव कोंडके आणि सखुबाई कोंडके या नवरा बायकोचं कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आलं. मुंबईत, ते कुटुंब लालबागच्या चाळीत स्थायिक झालं. सुदैवानं खंडेराव कोंडके यांना बॉम्बे डाईंगच्या सूतगिरणीत काम मिळालं. पुढं 8 ऑगस्ट 1932 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या दाम्पत्याच्या पोटी कृष्णा नावाच्या मुलाचा जन्म झाला. सर्वात मोठा मुलगा या नात्यानं घरात सगळेजण त्यांना दादा म्हणू लागले. गंमत म्हणजे पुढं जाऊन दादांनी सिनेमात सुध्दा कृष्णा ऐवजी दादा कोंडके असंच नाव लावायला सुरुवात केली. लहानपणी दादा खूप मस्तीखोर होते. रेडिफला दिलेल्या मुलाखतीत दादांनी सांगितलं होतं की लालबाग परिसरात त्यावेळी माझी दहशत होती. आमच्या वस्तीतल्या मुलींची कोणी छेडू काढू शकत नसायचं. कारण मी विटा, दगड, सोड्याच्या बाटल्यांनी खूप मारामारी करायचो. दरम्यानच्या काळात दादांच्या घरातील अनेकांना अपघातात मरण आलं. त्यावेळी दादा खूप शांत झाले आणि एकांतात राहू लागले. पण पुढं त्यांनी आपलं दुःख विसरून लोकांना हसवण्याची किमया करून दाखवली. सुरुवातीच्या काळात दादांनी ‘अपना बाजार’ नावाच्या किराणा दुकानात नोकरीला सुरुवात केली होती. पुढं काही बँडमध्ये ही काम केलं.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

दरम्यान त्याचंकाळात दादांची निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबत ओळख झाली. त्यांच्या सहवासामुळं दादांचा अभिनय आणि नाटकाकडं ओढा वाढला. दादांची एकूणच पर्सनलॅटी पाहता ते फार फार तर साईड ऍक्टर होतील असं अनेकांना वाटत होतं. पण, गोविंद कुलकर्णी, वसंत सबनिस आणि भालजी पेंढारकरांनी त्यांच्यातलं खरं पोटेन्शीयल ओळखलं होतं. त्याचंवेळी वसंत सबनीसांनी दादांसाठी विच्छा माझी पुरी करा हे नाटक लिहिलं. त्या नाटकाच्या माध्यमातून दादांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांच्या नाटकाचे महाराष्ट्रात हजारच्या वर प्रयोग झाले. लोकांना ते नाटक आणि दादांचा अभिनय भयाण आवडला. त्या नाटकांचे दौरे करत असताना गावगाड्यातल्या सामान्य लोकांसाठी मनोरंजन म्हणजे नेमकं काय असतं याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांचा तोच अभ्यास त्यांना पुढं नंतरच्या प्रवासात कामी आला. दादांच्या सामाजिक जाणीवा ही प्रखर होत्या. त्यामुळं त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून नेहमी एका विशिष्ट सामाजिक वर्गाला टार्गेट न करता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं मनोरंजन करायचं ठरवलं. विच्छा माझी पुरी करा या नाटकातलं काम बघून पुढं १९६९ साली भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘तांबडी माती’ या सिनेमात रोल ऑफर केला. तोपर्यंत नाट्यरंगभूमीवर रमणारे दादा तांबडी माती’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेमात झळकले. तो पिच्चर बॉक्स ऑफिसवर म्हणावा तेवढा चाल्ला नाय पण सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सिनेमातलं जीवाशिवाची बैलजोड लाविल पैजला आपली कुडं हे दादांवर चित्रित झालेलं गाणं खूप गाजलं. त्यानंतर दादांनी कामाक्षी प्रॉडक्शन नावाची स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली. त्या निर्मिती संस्थेद्वारे त्यांनी अनेक सुपरडुपर हिट सिनेमांची निर्मिती केली. त्यापैकी त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे सोंगाड्या. त्यावेळी मोठी काँट्रोव्हर्सी ही झाली होती.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

dada kondke biography,
dada kondke bio,
dada kondke biography in marathi,
dada kondke biography book pdf download, 
dada kondke biography in hindi,
dada kondke biodata,
dada kondke wiki,
dada kondke wiki marathi,
दादा कोंडके,
दादा कोंडके ची गाणी,
दादा कोंडके ची गाणी mp3,
दादा कोंडके चे गाणे,
दादा कोंडके मराठी पिक्चर,
दादा कोंडके सासरच धोतर सासरचे धोतर,
दादा कोंडके मराठी चित्रपट,
दादा कोंडके यांची गाणी,
दादा कोंडके कॉमेडी,
दादा कोंडके उषा चव्हाण,
उषा चव्हाण,

त्याचं झालं असं पुण्यात तब्बल 25 आठवडे सोंगाड्या हाऊसफुल्ल झाल्यानंतर सिनेमा मुंबईत ही रिलीज व्हावा अशी दादांची इच्छा होती. पण मुंबईचे थियेटर मालक मराठीपेक्षा हिंदी सिनेमांना जास्त प्राधान्य द्यायचे. त्यामुळं दादांनी पैसे देऊन कोहिनुर थियेटरच्या मालकाला सिनेमा लावण्याची गळ घातली. पैसे घेऊन कपूरने सिनेमा लावला खरा पण नंतर देवानंदचा तेरे मेरे सपने रिलीज झाला अन त्यानं सोंगाड्या थियेटरमधून उतरवला. मग नाराज झालेल्या दादांनी बाळासाहेबांकडे जाऊन मदत मागितली. त्यावर बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन कोहिनूर थियेटरमध्ये पुन्हा सोंगाड्याचे शो सुरू केले अन तब्बल 37 आठवडे हाऊसफुल्ल चाल्ला. तिथंपासून दादा कोंडके आणि बाळासाहेबांची गट्टी जमली ती जमलीचं. त्यानंतर दादांनी शिवसेनेच्या मंचाकरून ठोकेलेली धडाकेबाज भाषणे ही महाराष्ट्रात प्रचंड गाजली हे तुम्ही जाणताच. पुढं जाऊन दादांनी गनिमी कावा, तुमचं आमचं जमलं, पळवा पळवी, आंधळा मारतो डोळा , आली अंगावर, एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार , बोट लावीन तिथं गुदगुल्या, मला घेऊन चला, मुका घ्या मुका, येऊ का घरात, राम राम गंगाराम, वाजवू का, सासरचं धोतर, ह्योच नवरा पाहिजे अशा सिल्वर जुबली सिनेमांची निर्मिती केली. त्यांच्या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमात असणारे डबल मिनींग डायलॉग्ज, सुपरक्लास गाणी ही दादांच्या सिनेमाची जमेची बाजू. त्यावर कहर म्हणजे दादांचा बरमुडा, त्याला लटकणारी लांबच्या लांब नाडी, झंकी पंकी शर्ट अन त्यांचा विक्षिप्त पण निरागस अभिनय पाहून लोकं थेटरात उलथी पालथी व्हायची. डायलॉग्जमुळं अनेकदा सेन्सॉर बोर्ड त्यांच्या सिनेमावर आक्षेप घ्यायचं पण दादा त्यांच्या मिश्किल भाषेत उत्तरं देऊन सेन्सॉर बोर्डाला ही नमतं घ्यायला भाग पाडायचे. काही काळानं दादांनी हिंदीकडं ही आपला मोर्चा वळवला.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

त्यांनी अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में, आगेकी सोच, तेरे मेरे बीच मे, खोल दे मेरी जुबान असे काही हिंदी सिनेमे ही केले. एवढंच काय मराठीत सुपरहिट झालेले पांडू हवालदारचा दादांनी चक्क चंदू जमादार नावानं गुजरातीमध्ये ही रिमेक केले. दादांची एक खास गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात दादांना ज्या ज्या कलाकार, लेखक, संगीतकार आणि इतर पडद्यामागच्या टेक्निशियन लोकांनी साथ दिली त्यांना दादांनी कधीच एकटं सोडलं नाही. वर्षानुवर्षे त्यांनी त्यांच्यासोबतचं काम केलं. माझ्या यशात या टीमचा फार मोठा वाटाय असं ते वेळोवेळी म्हणायचे. उषा चव्हाण आणि मधू कांबीकर या दोन आघाडीच्या आणि हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत दादांची विशेष जोडी जमली आणि लोकांना देखील त्यांची केमिस्ट्री भयाण आवडली. तसंच स्क्रीनप्ले राजेश मुजुमदार, संगीतकार राम लक्ष्मण, गायक जयवंत कुलकर्णी, महेंद्र कपूर आणि गायिका उषा मंगेशकर यांनीच दादांसोबत जास्तीत जास्त काम केलं. मराठी सोडा त्यावेळी बॉलिवूड कलाकारांमध्येही दादा कोंडके खूप लोकप्रिय झाले होते. धर्मेंद्र, जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. गोविंदा आणि दादा कोंडके यांच्या चेहऱ्यात साम्य असल्यामुळं दादा तुमच्या पोटाला आलेत की काय असंही अनेकांनी त्यांना विचारलं होतं. हे तर काहीच नाही बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी तर दादा कोंडके यांच्या प्रोडक्शनचा भाग असलेल्या फटाकडी सिनेमात कुठ कुठ जायाचं हनिमूनला’ ही लावणीही केली होती. त्या गाण्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपला आवाज दिला होता. शक्ती कपूर तर दादा कोंडकेच्या प्रेमातचं होते. एका मुलाखती दरम्यान शक्ती कपूरने दादांसोबतचा किस्सा सांगितला होता.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

dada kondke biography,
dada kondke bio,
dada kondke biography in marathi,
dada kondke biography book pdf download, 
dada kondke biography in hindi,
dada kondke biodata,
dada kondke wiki,
dada kondke wiki marathi,
दादा कोंडके,
दादा कोंडके ची गाणी,
दादा कोंडके ची गाणी mp3,
दादा कोंडके चे गाणे,
दादा कोंडके मराठी पिक्चर,
दादा कोंडके सासरच धोतर सासरचे धोतर,
दादा कोंडके मराठी चित्रपट,
दादा कोंडके यांची गाणी,
दादा कोंडके कॉमेडी,
दादा कोंडके उषा चव्हाण,
उषा चव्हाण,

ते म्हणाले, “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप भाग्याचं मानलं जायचं. दादांकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. मीदेखील यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या चित्रपटात काम केलं. त्या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक् झालो. दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता. आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते. आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं. त्यामुळे माझं मन तृप्त झालं. त्या गावातली अनेक लोकं रोज संध्याकाळी दादांकडे यायची. त्यात महिला, तरूण आणि म्हाताऱ्या माणसांचा समावेश असायचा. ते दादांसमोर आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मोकळ्या मनानं मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही. माझ्या माहितीनुसार, त्याकाळी ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार होते. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे. का तर त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असं त्यांना वाटायचं. सध्या अशी माणसं बनवणं देवानं बंद केलय.

शक्ती कपूर यांच्या अनुभवावरून दादांच्या मानसिकतेचा अंदाज येऊ शकतो. दादांचा आणखी एक फेमस किस्सा म्हणजे एकदा मधू कांबीकर यांना सिरीयलची ऑफर देऊन तीन अज्ञात माणसांनी किडनॅप करायचा प्लॅन आखलेला होता. त्यासाठी ते तिघे जण मधू कांबीकर यांच्या घरी बोलणी करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी बोलतानाच मधू कांबीकर यांना शंका आली होती. पुढं आपल्याला त्या प्रसंगातून फक्त दादा कोंडकेचं वाचवू शकतील अशी खात्री असल्यामुळं त्या आपल्याला मैत्रिणीला भेटायचंय असं कारण काढून त्या दादा कोंडकेना भेटायला गेल्या. त्यांनी दादांना घटनेची कल्पना दिली अन नंतर दादांनी त्या तिघांना घरी बोलावून आपल्या अंगरक्षकांकरवी बेदम मार दिला. स्पेशल कोंडके स्टाईलमध्ये ठेवणीतल्या शिव्या ही घातल्या अन त्यांचा प्लॅन हाणून पाडला. तो किस्सा त्यावेळी मुंबईत खूप गाजला होता. असं म्हणतात की, दादांचा सिनेमा लागला की बॉलिवूडलाही धडकी भरायची. कारण दादांचे सिनेमे थियेटरमधून किमान 25 आठवडे तरी उतरत नसायचे.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

एकदा असंच झालं, राज कपूर त्याच्या मुलाला म्हणजे ऋषीं कपूरला बॉबी सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत होते पण त्यांना कळलं की दादांचा एकटा जीव सदाशिव’ सिनेमा रिलीज होणारे. दादांच्या त्या सिनेमाची धास्ती घेऊन तेव्हा राज कपूर यांना बॉबीच्या प्रदर्शनाची तारीख तब्बल पाच महिने पुढं ढकलावी लागली. दादांचं स्टारडम आणि क्रेझ सांगण्यासाठी एवढा किस्सा कदाचित पुरेसाय. आता हे झालं दादांच्या यशाबद्दल, त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल. पण दादांचं खाजगी आयुष्य सतत वादग्रस्त राहिलं असं म्हणतात. काही जणांच्या मते दादांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचं होतं पण उषा चव्हाण यांनी त्यांना नकार दिला. पण उषा चव्हाण यांनी मुलाखती दरम्यान ही गोष्ट नाकारली होती. पुढं दादांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केलं. नंतरच्या काळात दादा आणि नलिनी कोंडके यांचा घटस्फोटही झाला. मात्र घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी सांगितलं होतं की, दादा आणि त्यांनी कधीही लग्न केलं नव्हतं आणि १९६७ पासून त्यांचा दादांशी कसलाच संपर्क नव्हता. पण नलिनी यांना तेजस्विनी नावाची एक मुलगी होती जिचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. त्यामुळं अनेकांनी तेजस्विनी ही दादा आणि नलिनी कोंडके यांची मुलगीय अशा वावड्या उठवल्या होत्या. पण आपल्या संपूर्ण हयातीत दादांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या दादांचा शेवटचा काळ मात्र खूप एकाकीपणात गेला. त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं शब्द म्हणूनचं मनाला चटका लावून जातात.

दादा म्हणतात, आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे.

( Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari )

dada kondke biography,
dada kondke bio,
dada kondke biography in marathi,
dada kondke biography book pdf download, 
dada kondke biography in hindi,
dada kondke biodata,
dada kondke wiki,
dada kondke wiki marathi,
दादा कोंडके,
दादा कोंडके ची गाणी,
दादा कोंडके ची गाणी mp3,
दादा कोंडके चे गाणे,
दादा कोंडके मराठी पिक्चर,
दादा कोंडके सासरच धोतर सासरचे धोतर,
दादा कोंडके मराठी चित्रपट,
दादा कोंडके यांची गाणी,
दादा कोंडके कॉमेडी,
दादा कोंडके उषा चव्हाण,
उषा चव्हाण,

दादांच्या मृत्यूबद्दल सुद्धा एक गूढता आहे. १४ मार्च १९९८ रोजीचा तो काळा दिवस, पहाटे ३.३० वाजता दादर, मुंबई येथील रामा निवास या निवासस्थानी दादांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं शुश्रुषा नर्सिंग होममध्ये हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ही ते दादांना वाचवू शकले नाहीत. सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दादांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला असं काही जण म्हणतात. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार दादांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं होतं आणि घरी दादांचं निधन झालं होतं. मागच्या काही काळात रितेश देशमुख यांनी दादांचा बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढच नाही तर रितेशनं त्याच्या एक व्हिलन सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सुरी आणि टीमसोबत त्या विषयावर चर्चाही केली होती. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्या सिनेमाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होती. मात्र अजून तरी त्या प्रोजेक्टवर काम सुरू झालेलं नाहीये. सध्या आणखी एका कारणामुळं दादा कोंडके पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ६ ऑगस्ट पासून झी टॉकीज या वाहिनीवर ज्यूबली स्टार दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट दाखवण्यात येत आहेत. मात्र हे चित्रपट दाखवण्यास ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार दादांच्या चित्रपटाचे मालकी हक्क त्यांच्याकडे आहेत. सध्या उषा चव्हाण यांनी त्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली असून तो वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. पण ते काहीही असलं तरी तब्बल तीन दशके ज्यांनी महाराष्ट्रातील लोकांना पोट दुखेस्तोवर हसवलं त्या कॉमेडी किंग दादांचा खऱ्या अर्थानं विषयच भारी होता ह्ये नक्की. त्यांच्या त्या सुपरहिट कलेला म्हणूनच विषयच भारी टीमचा कडकडीत सलाम. तुम्हाला जुबलीस्टार कोंडके यांचा नेमका कोणता सिनेमा, गाणं किंवा डायलॉग्ज आवडतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

सगळ्यांना पोट धरून हसवणाऱ्या Dada Kondke यांचा शेवट खूप दुःखात झाला | Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *