सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा नष्ट केला पाहिजे असं का म्हणाला उदयनिधी स्टॅलिन | Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील क्रीडा व युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतच सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलंय. यामुळ देशातलं राजकारण आता चांगलच तापलय. देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या त्या वक्त्यव्याचा निषेध होतोय. स्टॅलिन यांच्या त्या वक्तव्यामुळे भाजप मात्र चांगलच आक्रमक झालेल दिसतंय. त्यानिमित्तानेच सनातन धर्मावर उदयनिधी यांनी नेमक काय वक्तव्य केलय आणि त्यामुळे नेमका काय वाद उफाळून आलाय ? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

मंडळी इंडिया आघाडीचं थोड फार बस्तान बसत असतानाच आता उदयनिधी यांच्या वक्तव्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुकसह त्यांच्या मित्रपक्षांचीही चांगलीच पंचाईत झालीय. त्यांच्या या वक्तव्यावर भूमिका घेणसुद्धा आता मित्रपक्षांना अवघड झालय. तस तर द्रमुकचे आक्रमक युवक नेते म्हणून उदयनिधी यांना ओळखलं जातं. दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी यांचे नातू आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी हे फिल्म डिस्ट्रिब्युटर, निर्माते, अभिनेते, द्रमुकच्या युवक आघाडीचे सरचिटणीस, आमदार आणि आता इथून असाचं त्यांचा प्रवास सध्या तमिळनाडूच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रिपदापर्यंत पोहचलाय. चित्रपट क्षेत्रात सुद्धा कधीकाळी त्यांना emerging ऍक्टरचा पुरस्कार मिळालाय. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलंय. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत आक्रमक प्रचाराची राळ उडवणाऱ्या उदयनिधी यांचा समावेश द्रमुकच्या स्टार प्रचारकांमध्ये झाला होता. चेपॉक तिरुवल्लीकेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आणि पुढे मंत्री झाल्यानंतर त्यांची द्रमुकचा उगवता तारा अशी ओळख झाली होती. मंडळी तस तर उदयनिधीना आधीपासूनचं जातिभेद आणि धार्मिक परंपरांच्या विरोधात बंड करणाऱ्या विचारसरणीचा वारसा लाभलेलाय. कारण त्यांचे वडील करुणानिधी यांनीही उच्चवर्णियांच्या विरोधात कधीकाळी खूप प्रखर शब्दात लिहलय.‌ पण सनातनवर झालेल्या या प्रखर टीकेवरून आता उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येतेय.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

पण आता हे प्रकरण नेमकं काय आहे. ते आपण बघुयात. तर बघा शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी चेन्नईत उदयनिधी तमिळनाडूतल्या प्रगतिशील लेखक आणि कलाकार संघटनेने आयोजित केलेल्या सनातन निर्मूलन परिषदेत बोलत होते.  तिथं बोलताना ते असं म्हणाले की काही गोष्टींना विरोध करता येत नाही, फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्याला हे संपवावे लागतील. अशाचप्रकारे आपल्याला सनातन धर्माला सुद्धा संपवायचे आहे. सनातन धर्मालाही विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे, सनातन हे नाव संस्कृतमधून आले. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्यानंतर लगेचचं अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या त्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.  त्यात त्यांनी असं लिहलं की “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला आहे. केवळ विरोध न करता ते नष्ट केलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. पुढं अमित मालवीय यांनी असंही लिहिलं की, “थोडक्यात, ते सनातन धर्माचे पालन करणार्‍या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहेत. द्रमुक हा विरोधी पक्ष इंडिया आघाडीतील प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा सहयोगी राहिलेला आहे.   पण आता भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या या वक्तव्या प्रकरणी यांच्याविरोधात दृमूक पक्षानेही तक्रार दाखल केली आहे. दृमुक पक्षाने आपल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, अमित मालवीय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे म्हटलं होतं त्याचा विपर्यास करून सोशल माध्यमांवर पोस्ट केलं आहे. या तक्रारीवरून तामिळनाडूच्या त्रिची पोलिसांनी बुधवारी 6 सप्टेंबर रोजी अमित मालवीय यांच्याविरुद्ध कलम 153 अ, 504, 505 1 ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्याबाबत m k स्टॅलिन असं म्हणाले की सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थकांनी उदयनिधी यांच्याबाबत खोटा प्रचार केला. याचा देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठा प्रमाणावर प्रचार करण्यात आला. असं असलं तर उदयनिधी यांनी तमिळमध्ये किंवा इंग्रजीत नरसंहार हा शब्द वापरला नाही. असं असूनही खोट्या दाव्यांचा प्रचार केला जात आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यानंतर ते असंही म्हणाले की उदयनिधी यांनी सनातन धर्मात दलित, आदिवासी आणि महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावावर मत व्यक्त केलं. त्यांचा कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

उदयनिधी यांनी सनातन धर्मातील शोषण करणाऱ्या या गोष्टींवर बोलणं भाजपा समर्थकांना सहन झालं नाही. त्यामुळे उदयनिधी यांनी सनातनी लोकांचा नरसंहार केल्याचा खोटा प्रचार केला गेला. पुढं या वादावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना याचं योग्य उत्तर देण्यास सांगितलं आहे.असंही‌ कळतंय. पण मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदयनिधी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य ऐकून दुःख झालं. मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उदयनिधी यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. खरंतर पंतप्रधान मोदींकडे उदयनिधी यांनी हे वक्तव्य केलं आहे की नाही हे तपासण्याची सर्व संसाधने आहेत. मोदींना उदयनिधी यांच्या विधानाबाबत खोटं पसरवलं जात आहे हे माहिती नाही की खोटा प्रचार केला जात असल्याचं माहिती असूनही त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत हे वक्तव्य केलंय ? असा सवाल सुद्धा स्टॅलिन यांनी नरेंद्र मोदी यांना विचारलाय. याच्याही पुढे जाऊन दृमूक पक्षाचे खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना थेट HIV बरोबर केली. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला. पुढे या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “स्टालिन हे हिंदूविरोधी आहेत. सनातन धर्म हा पौराणिक धर्म आहे. या धर्माला इतिहास आहे. असे स्टालिन धर्म कितीही आले तरी सनातन धर्म नष्ट करु शकत नाहीत. आता सगळे इंडिया आघाडीवाले एकत्र आले आहेत. ते हिंदुत्वादाच्या विरोधात आले आहेत. आता सगळ्यांचे खरे चेहरे दिसत आहेत, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर मनिशंकर अय्यरची जशी गत आहे तशी गत यांची झाली असती. पण दुर्देव आहे. त्यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री मुग गिळून गप्प बसलेले आहेत. हेच त्यांचं हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा मुखवटा पांघरुन हिंदुत्ववादी होता येत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर मनिशंकरसारखी गत ह्यांनी स्टालिन आणि चिदंबरम यांची केली पाहिजे, अशी भावना सगळ्यांची आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

पण दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उदयनिधी यांची पाठराखण केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र तथा कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियांक खरगे यांनीदेखील उदयनिधी यांची पाठराखण केलीय. उदयनिधी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना ‘जो धर्म प्रत्येकाला समान अधिकार देत नाही, प्रत्येकाला मानव म्हणून वागणूक देत नाही, तो धर्मच नाही,’ असे प्रियांक खरगे म्हणाले . खरगे यांच्या या विधानानंतर त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. या दाखल गुन्ह्यावर प्रियांक खरगे यांनी प्रतिक्रिया दिली की मी दोन मुद्दे मांडल्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक धर्माने समानतेचे तत्त्व मानले पहिजे. प्रत्येक धर्माने माणसांमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे, असे मी म्हणालो होतो. भारतीय संविधान हाच माझा धर्म आहे. संविधान मला समानता आणि समान संधी देते. त्यामुळे हाच माझा धर्म आहे, असे मी म्हणालो होतो. मला वाटतं मी हे जे काही बोललो आहे, त्यावर तक्रार करणाऱ्यांना आक्षेप असावा. मी जे बोललो, ते त्यांना चुकीचे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या मतावर ठाम राहणार आहे,” असे प्रियांक खरगे यांनी स्पष्ट केलं . पण उत्तरप्रदेशच्या रामपूर मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की उदयनिधी यांनी अशी वक्तव्ये करणे टाळावे.मी उदयनिधी यांचे वक्तव्य ऐकले आहे. ते मंत्री असून त्यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करणार नाही आणि असे वक्तव्य करणे टाळावे. या देशात सुमारे ९० कोटी हिंदू राहतात आणि इतर धर्माचे लोकही या देशात राहतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील द्वारका येथे जन्माष्टमीच्या कार्यक्रमात उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार प्रहार केला. स्मृती म्हणाल्या, भगवान श्रीकृष्णाचे नामजप इतके जोरात असले पाहिजे की ते सनातन धर्माला आव्हान देणाऱ्यांपर्यंत पोहोचेल. जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत आमच्या ‘धर्म’ आणि श्रद्धेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. पण उदयनिधींच्या वक्तव्याविरोधात दोन एफआयआर आणि कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. उदयनिधी यांच्या सनातन धर्म संपवण्याच्या वक्तव्यावर बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुधीर कुमार ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

याआधीही एका वकिलाने उदयनिधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल केला होता. यूपीच्या रामपूरमध्ये सुद्धा वकिलांनी स्टॅलिनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर बुधवारी कर्नाटक भाजप नेते नागराज नायक यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण इकडे महाराष्ट्रात मात्र स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे नितीश राणे यांनी त्यांची तोफ उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळवलीय. नितेश राणे म्हणाले, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनच्या कार्ट्याने सनातन हिंदू धर्म संपवून टाकू, असं बोलण्याची हिंमत दाखवली. या कार्ट्याला हे माहित नाही की जे ब्रिटिशांना जमलं नाही, जे औरंग्या आणि मुघलांना जमलं नाही ते तुला आणि घमंडियाच्या नावाने जमलेल्या सर्व पक्षांपैकी कोणालाही जमणार नाही. तो कार्टा हे विसरला की आमचे सगळे पूर्वज हे हिंदू होते. जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही तो देशाचा आणि राज्याचा काय होणार ? आणि स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी मुलगा आहे’ असं जे बोलत फिरतात ते उद्धवजी ठाकरे हे सनातनी हिंदू धर्मावर जे आक्रमण होत आहे त्यावर बोलण्याची हिंमत दाखवणार का? का चिडीचुप बसला आहात? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. पुढे उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही हिंदूचं आहात ना? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट सगळ्यांना देत फिरता मग स्टॅलिनच्या कार्ट्याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवा. काही दिवसांअगोदर ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये स्टॅलिनची सेवा करत होता ना ? खायला घालत होता, पाय दाबत होता! त्यामुळे तो सनातनी हिंदू धर्माचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आहे का? असा सुद्धा सवाल नितेश राणे यांनी यावेळी विचारलाय.

( Udhayanidhi Stalin Statement On Sanatan Dharma | Udayanidhi Stalin News | Vishaych Bhari )

या सगळ्या प्रकरणावर कमल हसन यांनी मात्र स्टॅलिन यांच्या बाजूने आपलं मत मांडल आहे. ट्वीट करत कमल हसन म्हणाले की नागरिकांची एखाद्या गोष्टीशी असहमत असण्याची आणि सतत चर्चा करण्याची क्षमता हे खऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार हे शिकवले आहे की, योग्य प्रश्न विचारल्याने अनेक महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासात योगदान मिळते. पुढे ते म्हणाले की उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील त्यांची मतं मांडण्याचा हक्क आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनाशी असहमत असाल तर त्यांना धमक्या देण्याचा किंवा कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तसेच संकुचित राजकीय फायद्यासाठी लोकांना भावनिक करण्यासाठी त्याच्या शब्दांचा विपर्यास करण्याऐवजी सनातनवर आधारित चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर ते असं म्हणाले की तमिळनाडू हे मोकळ्या वातावरणातील चर्चांसाठी नेहमीच सुरक्षित स्थान राहिले आहे आणि ते पुढेही राहील. सर्वसमावेशकता, समानता आणि प्रगती करून आपल्या परंपरांचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे. सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी योग्य ती चर्चा करूया. त्यामुळ एकूणच स्टॅलिन यांच हे वक्तव्य इंडिया आघाडीच्या भविष्यातील धोरनांसाठी घातक ठरणार का ? स्टॅलिन यांनी केलेलं वक्तव्य कितपत बरोबरय ? स्टॅलिन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तुमची मतं नेमकी काय‌ आहेत ,त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा नष्ट केला पाहिजे असं का म्हणाला Udaynidhi Stalin | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

hindum k stalinSanatan dharmstalin on sanatan dharmastalin son controversyUdaynidhi stalin on sanatanudhayanidhiudhayanidhi stalinudhayanidhi stalin interviewudhayanidhi stalin moviesudhayanidhi stalin on hinduismudhayanidhi stalin on hinduism tamiludhayanidhi stalin speechudhayanidhi stalin speech latestudhayanidhi stalin speech latest santhanamudhayanidhi stalin telugu newsvishay bharivishaych bhariविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment