आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्ताच भोपाळ मध्ये झालेल्या एका सभेत समान नागरी कायद्याचा उल्लेख केला आणि उत्तराखंड सरकारने त्याच विषयावर नेमलेल्या एका कमिटीचाही रिपोर्ट आता पब्लिक केला आहे. त्यामुळे अनेकांना आशा आहे की भाजपा आता संपूर्ण देशात समान नागरी कायदा राबवेल. अनेकांचा असाही विश्वास आहे की फक्त मोदींसारखा प्रबळ नेताच आरक्षण संपवून सर्वांसाठी समान नियम आणि कायदे आणू शकतो. पण खरंच समान नागरी कायदा आल्यानंतर आरक्षण संपुष्टात येऊन फक्त मेरिटवर आधारीत व्यवस्था भारतात येईल का ? हेच आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत…
आता त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की समान नागरी कायदा म्हणजे नक्की आहे तरी काय ? तर मित्रांनो आपल्या देशात कायद्याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे criminal laws आणि दुसरा म्हणजे civil laws अर्थात नागरी कायदा. Criminal laws मध्ये IPC, CrPC इत्यादी संकल्पना येतात. Civil laws मध्ये मोडणाऱ्या marriage ( लग्न ), divorce, adoption ( मूल दत्तक घेणे ) succession ( आपल्यानंतर संपत्ती कोणाला जाणार ) इत्यादी गोष्टी प्रत्येक धर्माच्या personal laws नुसार नियमित केल्या जातात. आता आपल्या देशात criminal laws सर्वांसाठी सारखेच आहेत पण civil laws चा भाग असणारे personal laws हे मात्र वेगवेगळ्या धर्माच्या लोकांकरिता वेगवेगळे आहेत. जसं की मुस्लिम लोकांसाठी शरिया लॉ, ख्रिश्चन लोकांसाठी ख्रिश्चन लॉ आणि हिंदू, शीख, जैन, बौद्ध लोकांसाठी हिंदू कोड बिल असे कायदे आहेत.
भारतात ही व्यवस्था अगदी पुरातन काळापासून आहे. पुरातन काळात धर्म व कायदे या दोन्ही गोष्टी एकच असत. मुघलांच्या काळातही फक्त criminal laws सर्वांसाठी सारखे होते पण ज्या गोष्टी धर्मानुसार महत्त्वाच्या होत्या त्या गोष्टींचा सबंधित व्यक्तीच्या धर्माप्रमाणेच निवाडा व्हायचा. इंग्रज भारतात आल्यानंतर सुद्धा त्यांनी हीच पद्धत कायम ठेवली जेणेकरून लोकांना आपण त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करतोय असं वाटू नये. कारण इंग्रजांनाही अंदाज होता की जेव्हा जेव्हा भारतीयांच्या धर्मावर आक्रमण होते तेव्हा ते कशाचीही पर्वा न करता धर्म रक्षणासाठी लढतात. याचा प्रत्यय त्यांना १८५७ च्या उठावात पण आला. हीच व्यवस्था भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कायम करण्यात आली.
पण भारतीय संविधानात अनुच्छेद ४४ मध्ये योग्य वेळी भारतात समान नागरी कायदा सर्व धर्मांना विश्वासात घेऊन राबवण्यात यावा अशी नोंद करण्यात आली आहे. काही धर्मांमध्ये महिलांना योग्य ते अधिकार नसल्यामुळे त्या असुरक्षित असतात आणि त्यामुळे त्यांचे शोषण होत असते. याच गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि देशात ‘एक देश एक कायदा’ आणण्यासाठी संविधान निर्मात्यांनी समान नागरी कायद्याला संविधानात स्थान दिले. दुसरीकडे आरक्षणाची व्यवस्था ही मूळतः समाजातील त्या प्रवर्गला न्याय देण्यासाठी करण्यात आली होती ज्यांनी अच्छूतपणाच्या वेदना सोसल्या होत्या आणि जे समजाच्या प्रमुख प्रवाहातून बाहेर होते. त्यानंतर मात्र काही सामाजिक कारणांमुळे आरक्षणाच्या कक्षा रुंदावन्यात आल्या आणि इतर काही समाजांनाही (ओबीसी) आरक्षणाचा फायदा देण्यात आला. आरक्षण देण्यामागे starting line सर्वांसाठी समान करणे हा मुख्य उद्देश होता कारण काही समाज हे मुख्य प्रवाहातून पूर्णतः बाहेर होते. संविधानातील अनुच्छेद १४, १५ व १६ नुसार पात्र समाजाला आरक्षण देणे कायद्याला धरून आहे. संविधानाचा १४ वा अनुच्छेद समानतेचा अधिकार देतो. त्यानुसार जे समान पातळीवर आहेत त्यांना एक समान वागणूक देणे आणि जे अगोदरपाूनच समाजाने त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे समान पातळीवर नाहीत त्यांना असमान वागणूक ( positive discrimination) देणे ही तितकेच महत्वाचे आहे. अर्थात त्यांच्या भल्यासाठी काही अन्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.
या सगळ्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आरक्षण आणि समान नागरी कायदा या दोन वेगवेगळ्याया गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींमागे वेगवेगळे लॉजिक आहे. त्यामुळे समान नागरी कायदा अमलात आणल्यामुळे आरक्षणास कोणताही धोका पोहोचणार नाही. आरक्षण व्यवस्था ही जशी चालत आली आहे तशीच चालू राहील.
पण महेश जेठमलानी यांच्या म्हणण्यानुसार, “ समान नागरी कायदा हा जनतेसाठी महत्वाचा आहे. पण उत्तराधिकारी, वारसा, लग्न आणि घटस्फोट यांसारख्या मुद्द्यांवर आपण एकमत घडवून आणू शकत नाही. प्रायोगिक तत्वावर समान नागरी कायदा यशस्वी होण्याचा कोणताच आराखडा सरकारकडे नाही. जर तसं झालं नाही तर भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे, असं म्हणण्याचा अर्थ काय? ” असा सवाल ही महेश जेठमलानी यांनी त्यासंबंधी उपस्थित केलाय.
कदाचित त्यामुळेचं की काय देशातल्या वेगवेगळ्या संघटनांनी समान नागरी कायद्याला कडाडून विरोध केलाय. बाकी या प्रकरणावर तुमचं मतं नेमकं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, धन्यवाद.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply