पावसाळ्यात हनिमूनसाठीची १० बेस्ट ठिकाण | Top 10 Honeymoon Places in India| Top 10 Hill Stations Maharashtra | Vishaych Bhari

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला,

सांगा कुटं कुटं जायाचं हनिमूनला, सांगा कुटं कुटं जायाचं हनिमूनला हो,

आता तुम्ही म्हणालं इथं लग्नाचा पत्त्या नाय अन ह्यो गडी म्हणतुय कुठं कुठं जायाचं हनिमूनला. तर भावांनो आज ना उद्या तुमचं लग्न होईलच आसं आपण मानू, पण झाल्यावर तुम्हाला माहिती पायजे कनाय आपल्या कारभारणीला घेऊन त्ये हनिमून बिनिमून म्हणत्यात त्येला पावसाळ्याच्या दिसात नेमकं जायाचं कुठं. आता मी पावसाळ्यात का म्हणतुय तर आपल्या इकडं बऱ्यापैकी उन्हाळ्यापासून सुरू झालेली मुलामुलींची लग्न हल्ली पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच असत्यात. तर लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला वाटतं, त्यांना त्यांच्या वाटणीची प्रायव्हशी मिळायला पायजे. त्यासाठी कपल्स कुठल्या तरी फेमस डेस्टिनेशन्सला ट्रॅव्हल करून जायाचा प्लॅन करत्यात. आजच्या या लेखात मी तुम्हांला महाराष्ट्रासह भारतातल्या काही टॉप हनिमून स्पेशल ठिकाणाची माहिती सांगणारय…

( Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Top 10 Hill Stations in India | Vishaych Bhari )

तर सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या ठिकाणांची माहिती घेऊ, महाराष्ट्रात इतर ठिकाणाच्या तुलनेत फिरण्यासाठी, किंवा हॉटेलमध्ये स्टे करण्यासाठी बजेट कमी लागतं. त्यामुळं नवरदेवाच्या खिशाला कात्री लागत नाही. हा पण पैसा कमी गेला म्हणजे तुमच्या आनंदात कॉम्प्रमाईज होईल का तरी अजिबात नाय. असो,

लिस्टमध्ये पहिलं नाव येतं महाबळेश्वरचं. ( Mahabaleshwar )

सातारा जिल्ह्यात वसलेल्या महाबळेश्वरला त्याच्या अतिसुंदर निसर्गामुळं मिनी काश्मीरदेखील म्हणलं जातंय. पश्चिम महाराष्ट्रातले लोक फॅमिलीसोबत ट्रॅव्हलिंगसाठी आणि कपल्स हनिमूनसाठी महाबळेश्वरला जाणं पसंत करतात. त्याचं एक कारण म्हणजे महाबळेश्वरला पोहोचण्यासाठी जास्त लांबचा प्रवास करावा लागत नाही अन दुसरं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मूड आणि एक्सायटमेंट टिकून राहते. उंचच उंच डोंगर, दाट झाडी, थंडगार हवा, स्टे साठी स्वच्छ सुंद हॉटेल्स, जेवणाची उत्तम सोय आणि पावसाळ्यात हिरवाईमुळं खुलून येणारं एकूणच सगळं निसर्गसौंदर्य यामुळं महाबळेश्वरला क्लास डेस्टिनेशन्सचा दर्जा प्राप्त झालाय. त्याचं बरोबर ब्रिटिशकालीन वास्तू, छोटे मोठे धबधबे, तलाव, वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध झालेले वॉचेबल पॉईंट्स यासारख्या अनेक गोष्टी कपल्सना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे फिरण्यासोबतच हनिमूनला गेलेल्या कपल्सना एकांत मिळण्याचीही उत्तम सोय तिथं अस्तित्वातय. त्यामुळं तुम्ही पार्टनरला घेऊन महाबळेश्वरला जाण्याचा विचार करू शकता. आणखी सांगायचं म्हणजे महाबळेश्वरच्या वाटेवर पाचगणी नावाचं दुसरं एक थंडगार हवेचं ठिकाणय. जर तुम्हाला महाबळेश्वरचा जास्त पाऊस सूट होत नसेल तर तुम्ही पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असणाऱ्या पाचगणीचा ही हनिमूनसाठी विचार करू शकता. बाकी निसर्गसौंदर्यात Pachgani सुद्धा कमी नाही. तिथल्या डोंगरदऱ्या, मोठाले तलाव आणि पंचतारांकित हॉटेल्स प्रसिद्ध आहेत.

पुढची दोन नावं आहेत लोणावळा आणि खंडाळा. ( Lonavala Khandala )

ही दोन्ही ठिकाण जवळपास एकसारखी आहेत. या ठिकाणी पोहोचणं तुलनेनं जास्त सोप्प आहे कारण ही दोन्ही ठिकाण मुंबई बँगलोर महामार्गावर लागतात. तिथं हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या रॉयल सुविधा, ट्रॅव्हलिंगसाठी सहज उपलब्ध होणारी सोय आणि एकांतवासासाठी पूरक असं निसर्गसौंदर्य यामुळं उत्तम हिलस्टेशन्स म्हणून लोणावळा खंडाळा ही ठिकाणं नावारूपाला आल्यात. लोकं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वीकएंडला लोणावळा खंडाळ्याची वाट धरतात. आटोपशीर खर्चामुळं कपल्ससाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

( Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Top 10 Hill Stations in India | Vishaych Bhari )

तिसरं नावय माथेरानचं. ( Matheran )

मुंबई-पुणेकरांचं सर्वात आवडतं Hill Station. कदाचित स्वस्त पर्याय आणि जास्त आनंद या दोन कारणामुळं. माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातलं एक थंड हवेचं ठिकाणय. खरं तर ते सहलीसाठी ओळखलं जातंय पण हल्ली ते नव्या जोडप्याच्या हनिमूनसाठीही ओळखलं जातंय. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर हे माथेरान वसलेलंय. माथ्यावर घनदाट झाडी आणि लाल पायवाटा आहेत. उन्हाळ्यात राहण्यासाठीचं महाबळेश्वरसारखं इंग्रजांनी हे माथेरान शहर वसवल्याचं बोललं जातं. त्यामुळंच माथेरान आणि महाबळेश्वरमध्ये बऱ्यापैकी सारखेपणा आहे. पावसाळ्यात तर माथेरानला स्वर्गाचं स्वरुप प्राप्त होतं. मनं जुळण्यासाठी आवश्यक असणारा एकांत तिथं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो.

चौथ्या क्रमांकावर आहेत विदर्भातील चिखलदरा आणि सातपुडय़ातील तोरणमाळ. ( Chikhaldara, Toranmal Hill Station )

चिखलदराची ओळख हल्ली नागपूरकरांचं महाबळेश्वर अशी झालीय. वन्यजीव अभयारण्य, गावीलगडसारखा अक्राळविक्राळ किल्ला आणि मुख्य म्हणजे अतिशय शांत अशा ठिकाणी असलेले एमटीडीसीचं निवासस्थान आणि महत्वाचं म्हणजे तिथं इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत माणसांची गर्दी फारच कमी असते. त्यामुळं कपल्सना हवा तसा एकांत मिळतो.

पाचव्या नंबरवरय आहेत आपल्या कोकणातली तारकर्ली, गणपतीपुळे आणि दापोली ही शहरं. (Ganpatipule, Tarkarli, dapoli )

त्यापैकी मालवण-तारकर्ली इथं असणारी टॉप क्लास हॉटेलची सुविधा जगजाहीरय. त्याबद्दल वेगळं सांगायला नको. तसंच अंतर्गत प्रवासाची सुविधादेखील सहज उपलब्धय. भोगवे आणि निवती हे नितांतसुदर समुद्रकिनारे तिथल्या सुंदरतेत आणखी भर घालत्यात. गणपतीपुळे सुद्धा उत्तम रिसॉर्टसाठी फेमसय. त्यात एमटीडीसीच्या रिसॉर्टची बातच न्यारी. अन दापोली परिसरातील हर्णे, मुरुड हे बीच डॉल्फिन्स आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहेत. ही ठिकाण तशी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये कपल्ससाठी उत्तम पर्याय आहेत. ही झाली महाराष्ट्रातली काही फेमस नावं, अजून बरीच आहेत पण त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. आता आपण भारतातली काही प्रसिद्ध ठिकाण पाहूयात.

( Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Top 10 Hill Stations in India | Vishaych Bhari )

तर पावसाळा आणि हिवाळ्यात हनिमूनसाठी जोडप्यांची सगळ्यात जास्त पसंती असते ते म्हणजे केरळला. ( Kerala Tourism )

उंच पर्वतरांगा, धबधबे, गर्द झाडी, उंच उंच नारळाची झाडं, क्लासिक आणि आरोग्यदायी खाद्यसंस्कृती यामुळं प्री वेडिंग शूट, हनिमून आणि बेबीमूनसाठी जगभरातील अनेक जोडपे केरळात येत असतात. या राज्यात असलेल्या कोवलम हे ठिकाण हनिमूनसाठी अत्यंत योग्य आणि रोमँटिक स्थळ मानलं जातं. त्यामुळं तुम्ही हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्यात केरळला जाणं कधीही फायदेशीर ठरू शकतं. आणखी एक म्हणजे केरळच्या सर्वात स्वच्छ सुंदर तळ्यात तुम्ही जोडीदाराचा हात हातात घेऊन बोटींगचा ही आनंद घेऊ शकता. हा आऊट ऑफ महाराष्ट्र हनिमूनला जाताना तुमच्या भावनांसारखा खिसा देखील गरम ठेवावा लागेल.

पुढची ठिकाणयेत लडाख अन काश्मीर. ( Ladakh and Kashmir )

लडाख आणि काश्मीरचं सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही. लडाखमध्ये फार कमी पाऊस पडतो. त्यामुळं तुमच्या हनिमून ट्रिपमध्ये तुम्हाला कसला अडथळा येणार नाही. तुम्ही लडाखमध्ये पिच्चरस्टाईल तुमच्या जोडीदारासोबत एकांतवासातल्या तंबूतदेखील मुक्काम करू शकता. बाकी काश्मीरमधली युद्धजन्य परिस्थिती विसरून तुम्ही तिथल्या हँसी वादिया आणि खुला आस्मा फील केला तर तुमच्या भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत.

( Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Top 10 Hill Stations in India | Vishaych Bhari )

पुढचं नामांकित ठिकाणय राजस्थानातलं जयपूर. ( Jaipur, Rajsthan )


जयपूरला मुळातचं गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. जयपूरच्या रिमझिम पावसात तुमच्या मधूचंद्राला चार चांद लागू शकतात. वर तिथले रॉयल राजवाडे, ऐतहासिक वास्तू, युनिक आणि चविष्ट पदार्थ यामुळं तुमचं हनिमून अविस्मरणीय होऊ शकतं याची गॅरंटी देतो. हो पण पैश्यापाण्याचा अंदाज काढून जावा. कसंय रॉयल सुविधा घेताना मजा वाटती, पण नंतर कळतं त्याचा परिणाम खिश्यावर झालेलाय. असो,

पुढच्या शहराचं नावय गोवा. ( Goa Tourism )

आता हे नाव ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित नाकं मुरडू शकता. कारण मागच्या काळात गोव्यात पर्यटकांची लूट वाढलीये असा सूर ऐकू यायला लागलाय. पण जाणकारांच्या मते गोवा हे कपल्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशनय. आज सुद्धा हनिमूनसाठी मोठ्या संख्येनं जोडपी गोव्यात जातात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तिथं इतर पर्यटकांची गर्दी कमी असते त्यामुळं पावसाळ्यात कपल्सना पुरेसा एकांत मिळतो. बीच, ऐतहासिक ठिकाण, 5 स्टार हॉटेल्स यामुळं गोव्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बेस्ट टाईम स्पेंड करू शकता.

पुढंच्या शहराचं नावय उटी. ( Ooty Tourism )

सर्वांग सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेली कॉटेजेस, त्यापुढं असणारी भव्य मोठाली मैदानं, भव्यदिव्य नीलगिरी पर्वतांचं चित्तथरारक सौंदर्य आणि आजूबाजूला कायम असणारं चैतन्यदायी वातावरण यामुळं भारतातलं सर्वाधिक लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन म्हणून कपल्स ऊटीला जाणं प्रेफर करतात. तिथला पावसाळा आणि हिवाळ्यातला निसर्गाचा अनुभव आश्चर्यकारक असल्याचं बोललं जातं अन तो अनुभव घेताना जर जोडीदाराचा हात हातात असला तर मग काय सोन्याहून पिवळं. मनात असलं की माणसाला रस्ता सापडतोचं असं म्हणत्यात तरी पण उटीला कसं पोहोचायचं यासाठी तुम्ही गुगलबाबाला विचारू शकता. 

( Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Top 10 Hill Stations in India | Vishaych Bhari )

पुढंय सर्वाधिक लोकप्रिय शिमला हे हिलस्टेशन. ( Shimla Tourism )

आभाळाला गवसणी घालणारे बर्फाच्छादित पर्वत, नितळ पाण्याचे तलाव, घनगर्द झाडी, पॉश रस्ते, डोळ्यांना दिपवून टाकणारे धबधबे, ग्रीन व्हॅलीसारखी बेटावर असणारी हॉटेल्स सुविधा आणि कायमस्वरूपी दरवळणार यामुळं शिमल्याला “हिल स्टेशन्सची राणी” म्हणून ओळखलं जातं. जगात असा एकही माणूस नसेल जो शिमल्याचं सौंदर्य पाहून थक्क होणार नाही. बुलेट गाडीवर आपल्या जोडीदाराला बसवून शिमल्याची ट्रिप काढावी असं आज दहापैकी नऊ तरुणांचं स्वप्न असतंय ते उगाच नाही. हा पण भावांनो शिमल्याची ट्रिप तशी तुलनेनं अधिक खर्चिकय. पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंगबद्दलही लोकांचं सेम शिमल्यासारखंच मतंय. तिथल्या चहाच्या बागा, पावसाळ्यातली हिरवळ, प्रसिद्ध टॉय ट्रेन राईड, स्थानिक वस्तूंची खरेदी, मठाची सफर, जपानी मंदिर, रॉक गार्डन, टायगर हिल, शांती पेन गोंडा, बटासिया लूप या attractive ठिकाणामुळं दार्जिलिंगला सुंदरतेचा वर मिळालाय असं वाटतं.

कपल्सनी शंभर टक्के त्याचा विचार केला पायजे. आता जवळपास भारतातली पण सगळी बेस्ट हनिमून ठिकाण पाहू झाली. जर आता  तुमची चोईस इंटरनॅशनल ठिकाणाची असेल तर लगेहाथ तुम्हाला ते ही ऑप्शन देऊन टाकतो. त्यापैकी पहिलंय इंडोनेशिया. या देशातल्या १७,८०० बेटामुळं त्याला उत्तम सौंदर्य प्राप्त झालाय. इंडोनेशियातल्या बाली बेटाला तर देवांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं. बालीची आणि शांतता आणि प्रसन्नता सगळ्यांना तिथं येण्यासाठी भाग पाडते. त्यामुळं हनिमूनसाठी इंडोनेशियाला कपल्सची पसंतीय. नंतर येतं मालदीव. हा प्रदेश समुद्र किनाऱ्यांमुळं मागच्या काही काळात अनेक लोकांचं ड्रीम डेस्टिनेशन बनलाय. जगभरातून लोकं तिथं हनीमूनसाठी येतात. पुढंय सेशेल्स. भव्य लक्झरी लाईफस्टाईलसाठी फेमस असणारं हे ठिकाण आता सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन म्हणून उदयास आलंय. विशेषतः भारतीय जोडपी तिथं जास्त प्रमाणात जाणं पसंत करतायत. पुढंय फिलीपिन्स. फिलीपिन्स 7000 पेक्षा जास्त बेटांवर पसरलाय. आता बेटावर वसलेली ठिकाण किती सुंदर असतात ह्ये तुम्हाला वेगळं सांगायला नको. फिलीपिन्समध्ये तुमचा रोमान्स अधिक बहरू शकतो. पुढंचा देशय मलेशिया. मलेशिया हा रोमँटिक चमत्कारांचा देश मानला जातो. आधुनिक पायाभूत सुविधा, नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीव, संस्कृती आणि अन्न या सुविधा मलेशियाला टॉप क्लास हनिमून डेस्टिनेशनचा दर्जा देतात. पुढचंय मॉरीशस. एंटरटेनमेंट, नेचर प्लस एन्जॉयमेंट यामुळं जगभरातून लोकं मॉरीशस बेटावर येतात. आता तुम्ही हे सगळं ऐकलं खरं पण या ठिकाणी जाण्याची मजा तेव्हाचंय जवा तुमच्या हातात तुमच्या हक्काच्या जोडीदाराचा हात असेल. बाकी तुम्ही कधी या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करताय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती इंटरेस्टिंग वाटली तर लेख लाईक करून तुमच्या नवीन लग्न झालेल्या मित्र मैत्रिणीना शेअर करा.

पावसाळ्यात हनीमूनला जायची १० बेस्ट ठिकाणं | Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

beautiful hill stations in indiabest couple tour packages in indiabest hill station in indiabest hill station in india for summerbest hill stations in indiabest hill stations in india for honeymoonbest hill stations indiabest hill stations near delhibest hill stations of indiabest honeymoon destinations in indiabest honeymoon places in indiabest honeymoon places in worldbest places to visit in indiabreaking newshill stationhill station in indiahill stations in indiahill stations in india in hindihill stations in south south indiahill stations india top 10hill stations of indiahoneymoon destinations in indiahoneymoon indian placeshoneymoon placeshoneymoon places in indiaindia honeymoon placesplaces to travel in indiaplaces to visit for honeymoon in indiaplaces to visit in indiaromantic tourist places in indiatop 10 hill stations in indiatop 10 honeymoon places in indiavishaych bhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment