5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

ज्यूस विकणारा एक पोरगा, त्याची स्वतःची अशी नवीन स्वप्न घेऊन कॅसेट विकण्याची एक कंपनी काढतो, पुढं जाऊन अगदी कमी वेळात तो त्याच्या त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर नाव करतो. इतकं की त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांच्या घरात जाऊन बसतो. एवढंच नाय तर ती कंपनी भारतातली सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी सुद्धा बनते. मंडळी गुलशन कुमार आणि त्यांच्या टी सिरीज कंपनीला कोण ओळखत नाही ? एकसे बढकर एक गाणी आणि सिनेमे या कंपनीनं आपल्याला दिले. आता त्यांची नाव सांगायला दिवससुद्धा पुरायचा नाही. या कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र झिरो टू हिरो असाच राहिलेलायं. एक सामान्य पोरगा त्ये टी सिरीजचा मालक असा त्यांचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. पण दुर्दैवान गुलशन कुमार अंडरवर्ल्ड नावाच्या सापाच्या विळख्यात अडकले आणि त्यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ते सुद्धा ज्या शंकराची रोज ते देवपूजा करायचे त्याच्या मंदिराच्या बाहेरच. नेमकं काय घडलं होत तेंव्हा ? असं यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डशी दुश्मनी का घेतली ? अंडरवर्ल्ड कडून धमकीचे फोन येत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही ? एकूणच गुलशन कुमार यांची हत्या का झाली, कोणी केली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या Blog च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

मंडळी गुलशन कुमारांच खरं नावंय गुलशन कुमार दुवा. 5 मे 1956 रोजी दिल्लीतल्या पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन कुमार यांच आयुष्य एखाद्या पिक्चरपेक्षासुद्धा खतरनाकयं. गुलशन कुमार यांचे वडील चंद्र भान दुआ यांच दिल्लीतल्या दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान होत. त्याचं ज्यूसच्या दुकानात गुलशन त्यांच्या वडिलांना मदत करायचे. पण गुलशन मात्र त्यांच्या कामावर कधीच खूश नव्हते. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होत. पण त्यांच्या घरच्या एकूण परिस्थितीमुळ ते हे काम करत होते. मग स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ज्यूसच्या दुकानासोबतच कॅसेट विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी गाण्यांची कॅसेटस स्वस्तात विकायला सुरुवात केली. या कामात मात्र त्यांना भरपूर यश मिळाल. त्यांनी 11 जुलै 1983 ला नोएडामध्ये ‘टी सीरीज’ नावाची एक म्युजिक कंपनी सुरु केली. 1988 मध्ये त्यांच्या कंपनीला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्याच वर्षी आमिर खान आणि जुही चावला यांचा एक पिक्चर आला होता. कयामत से कयामत तक. टी सिरीजने केलेल्या त्या पिक्चरच्या तब्बल 80 लाख कॅसेटस विकल्या गेल्या होत्या. त्यानंतर 1990 मध्ये आशिकी रिलीज झाला आणि त्याच्या म्युझिक अल्बमन तरं म्युजिक इंडस्ट्रिमधले सगळे रेकॉर्डचं तोडले. त्यावेळी कुमार सानु हे नव्या जमान्याचे किशोर कुमार झाले होते. त्यानंतरची पुढची 10 वर्ष ही फक्त टी-सीरिजच्याच नावावर होती. अनुराधा पौंडवाल, सोनू निगम हे गायक टी सिरीजच्या माध्यमातून बॉलिवूड म्युजिक इंडस्ट्रिमध्ये धुरळा करत होते. असं करत करत दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान चालवणाऱ्या एका पोरानं संगीत उद्योगाचा सगळा चेहरामोहराच बदलून टाकला होता. आणि हे सगळं घडल होत ते केवळ सात रुपये किमतीच्या कॅसेटमुळे आणि म्हणूनच कॅसेट विकणाऱ्या त्या मुलाच नाव लोकांनी कॅसेट किंग गुलशन कुमार असं ठेवलं होत.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

1997 मध्ये जेव्हा गुलशन कुमार त्यांच्या यशाच्या शिखरावर होते तेंव्हा टी-सीरीजनं टिप्स आणि सारेगामा या कंपन्याना मागं टाकून म्युजिक इंडस्ट्रिमधलं 65% मार्केट काबीज केलं होतं. जवळपास सगळ्याच मोठ्या सिनेमांचे म्युजिक राईट्स हे टी-सीरीजकडे होतेnआणि नेमक त्याचवेळी गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. हा तो काळ होता जेव्हा अंडरवर्ल्ड आणि फिल्म इंडस्ट्रीयांच्यातल्या संबंधाविषयी सगळ्यांना माहित होत. रिअल इस्टेट तेंव्हा डबघाईला आली होती. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधली लोकं अंडरवर्ल्डच्या लक्ष्यावर होती. मंडळी गुलशन कुमार यांच्या हत्येत अंडरवर्ल्डचा हात होता. खुनाच्या आरोपपत्रात अबू सालेमच्या नावाचा समावेश होता. मात्र ज्यावेळी त्यांचं नाव न्यायालयात घेण्यात आलं त्यावेळी त्याच्या नावापुढ गैरहजर असं लिहिलं जात होतं. अगदी तो मुंबईतल्याच आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असतानासुद्धा. आता आपण गुलशन कुमार हत्येप्रकरणी अबू सालेमवर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही ? आणि गुलशन कुमार यांच्या हत्येचा प्लॅन नेमका कसा आखण्यात आला, त्यात नक्की कोणाचा सहभाग होता ? याकडे वळूया. दिनांक 12 ऑगस्ट 1997. त्यादिवशी मंगळवार होता. 42 वर्षीय गुलशन कुमार पूजेची थाळी घेऊन घरातून बाहेर पडतात. लोखंडवाला कॉम्प्लेक्स, जिथे बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीतली अनेक स्टार लोकं राहत होती. तिथं गुलशन कुमार यांचा बंगलासुद्धा होता. घड्याळात 10 वाजून 10 मिनिट झाली होती.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)


तेव्हा पांढरा कुर्ता आणि पांढरे सँडल घातलेले गुलशन कुमार त्यांच्या मरून रंगाच्या मारुती एस्टीममधून खाली उतरले. समोर एक शिवमंदिर होत. गुलशन कुमार यांनी जीतनगरमध्ये स्वतः बांधलेलं हे मंदिर चार वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा पाहिल होतं. भगवान शिव आणि पार्वतीचे भक्त असणाऱ्या गुलशन कुमारांनी महागड्या टाइल्स लावून त्या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. तेव्हापासून ते रोज सकाळ संध्याकाळ या मंदिरात यायचे. दिनक्रम अगदी ठरलेला होता. पण तीन लोक मात्र या दिनक्रमावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून होते. जे त्या दिवशीसुद्धा गुलशन कुमार यांची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. आता यानंतर काय झालं हे जाणून घेण्याआधी गुलशन कुमार यांच्यावर नजर ठेवणारी लोकं कोण होती आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काय कारण होत. हे समजून घेणं महत्वाचयं. आणि त्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. या घटनेला कारणीभूत असणारी मूळ गोष्ट ही 7 जून 1994 पासून सुरू होते. जावेद रियाझ सिद्दीकी नावाचे एक प्रोड्यूसर होते. सिद्दीकी त्यावेळी एक सिनेमा बनवत होते. नाव होतं तू विष मैं अमृत. या पिक्चरची हिरोईन होती झेबा अख्तर. झेबा ही पाकिस्तानी एक्टरेस होती आणि दाऊद इब्राहिमच्या इच्छेनं तिला सिनेमांत कास्ट करण्यात आलं होतं. पण झेबाला साइन केल्यानंतर काही दिवसांतच सिद्दीकीनं तिला हटवण्याचा निर्णय घेतला. यामुळ दाऊद नाराज झाला आणि त्यानं 7 जून 1994 ला सिद्धकीची गोळ्या झाडून हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हत्येनंतरचं गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डचे फोन येऊ लागले. त्यामुळे युपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी त्यांना बॉडीगार्ड दिला.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

तेंव्हा मुंबईमध्ये 1994 ते 1997 या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांना धमक्या आल्या. यामध्ये सुभाष घई आणि मोहरा फेम राजीव राय यांचाही समावेश होता. त्यानंतरच 1997 ला गायक नदीम सैफी आणि गुलशन कुमार यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यावर्षी नदीम श्रवण जोडी फेम नदीम सैफी यांनी एक अल्बम लाँच केला होता. त्या अल्बमचं नाव होतं ‘हाय अजनबी’. या अल्बमची काही गाणी नदीमनं स्वतः गायली होती. नदीमला टी-सीरिजने या अल्बमचे हक्क विकत घेऊन त्याची जाहिरात करावी अशी इच्छा होती. पण गुलशन कुमार मात्र यासाठी तयार नव्हते. मंडळी गुलशन कुमारचा भाऊ किशन कुमार यानं कोर्टात दिलेल्या जबाबानुसार, गुलशन कुमार यांनी नदीमला त्याचा आवाज चांगला नसल्याचं सांगितल होतं. पण नंतर कस तरी करून हे सगळं जमलं आणि T-Series ने त्या गाण्यांचे हक्क विकत घेतले, प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवला पण अल्बम अगदीच फ्लॉप ठरला. नदीमनं यासाठी गुलशन कुमार यांना जबाबदार धरलं. त्या अल्बमला योग्य प्रसिद्धी न मिळाल्यामुळ तो अल्बम फ्लॉप झाल्याचं त्याला वाटलं. पुढं किशन कुमारन न्यायालयात असंही सांगितल की एका भेटीदरम्यान नदीमनं गुलशन कुमार यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतरच ५ ऑगस्ट १९९७ ला गुलशन कुमार यांना एक फोन आला. दुसऱ्या बाजूला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा आवाज होता. तुम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरात लोकांना रोज लंगर खायला घालता म्हणे, कधीतरी आम्हालाही खाऊ घाला असं सालेम पुढं म्हणाला. त्यांनतर अबू सालेमनं गुलशन कुमार यांना 10 खोके म्हणजेच 10 कोटी रुपयांची मागणी केली. या कॉलमध्ये अबू सालेमनं नदीमच्या अल्बमचे प्रमोशन नीट का केलं नाही, अशी विचारणा केली. तेव्हा गुलशन कुमार यांनी त्याला उत्तर दिलं की नदीमचा आवाज चांगला नाही आणि त्यामुळेच तो अल्बम फ्लॉप झाला. यानंतर ९ ऑगस्टला पुन्हा एकदा गुलशन कुमार यांचा अबू सालेम याला फोन आला.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

त्याबद्दल किशन कुमार यांनी कोर्टात असं सांगितलं की या दुसऱ्या कॉलमध्ये सुद्धा अबू सालेमकडून पुन्हा एकदा पैशाची मागणी करण्यात आली. तुम्ही अंडरवर्ल्डला हलक्यात घेताय असं पुढं सालेम म्हणाला. विशेष म्हणजे सालेमनं त्यात मुंबई पोलिसांचासुद्धा उल्लेख केला होता. तो म्हणाला कीं तुम्ही अजून पोलिसात गेला नाही, याचा अर्थ तुम्ही आम्हाला गांभीर्यान घेत नाही. पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची असेल. असं म्हणत अबू सालेमन गुलशन कुमार यांचा कॉल कट केला. मंडळी अशा धमक्या येऊन सुद्धा गुलशन कुमार पोलिसांकडे गेले नाहीत. त्यांच्या मित्रांनी त्यांना खूपदा पोलिसात जायला सांगितल, पण पोलिसात जाऊन त्यांना काही फायदा होणार नाही असं गुलशन कुमार यांना वाटल. तस तर गुलशन कुमार यांनी पोलिसात न जाऊन चुकी केली होती. कारण अवघ्या महिन्याभरापूर्वीचं दिग्दर्शक राजीव राय यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना पोलिस संरक्षण होत. त्यामुळेचं त्यांचा जीव वाचला होता. त्याआधी अबू सालेमनं सुभाष घई यांच्यावरसुद्धा हल्ला करण्याचा प्लॅन केला होता. पण त्याआधीच पोलिसांनी त्या हल्लेखोर मुलांना पकडलं होतं. या घटनेनंतर इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकारानं अबू सालेमशी चर्चा केली.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)


रिपोर्टरनं अबू सालेमला विचारलं कीं तुमच्या धमक्या ह्या फक्त पोकळ आहेत का, सालेमनं त्या रिपोर्टरला उत्तर दिलं, अजून फक्त एक आठवडा थांबा. आणि त्यानंतर तो आठवडा अखेर ऑगस्ट महिन्यात आला. त्या दिवशी गुलशन कुमार यांचा बॉडीगार्डही त्यांच्यासोबत नव्हता . त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो घरीच थांबला होता. 10 वाजून 40 मिनिटानी गुलशन कुमार मंदिरातून पूजा करून आपल्या कारकडे परतत होते. काही पावलं चालल्यानंतर गुलशन कुमार यांना त्यांच्या कपाळावर कोणतरी रिव्हॉल्व्हर ठेवलीय असं जाणवलं. कुमार यांनी पाहिल की निळ्या जीन्समध्ये लांब केस असलेला एक माणूस उभा होता. त्यावर गुलशन कुमार त्याला म्हणाले कीं काय करतोयस ? त्यावर पलीकडून रिप्लाय आला, ‘तुम्ही पुरेशी पूजा केली आहे, आता वर डायरेक्ट वर जाऊन करा. त्यानंतर एक गोळी सुटते आणि गुलशन कुमारांच्या कपाळाला भेदून ती गोळी निघून जाते आणि ते जमिनीवर पडतात. पूजेचं सगळं साहित्यसुद्धा इकडं तिकडं विस्कळीत होऊन जातं. गुलशन कुमार इकड तिकड पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ते जवळच्या घरांची मदत मागण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या घरातल्या महिला दरवाजा बंद करून घेतात. गुलशन कुमार दुसरा दरवाजा ठोठावतात. पण त्या घरातून सुद्धा त्यांना मदत होत नाही. त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेला रूपलाल सूरज रस्त्यावर पडलेला पूजेसाठी आणलेला कलश उचलतो आणि हल्लेखोरांच्या दिशेनं फेकतो. रूपलालच्या दोन्ही पायात गोळी लागते आणि तोही तिथेच पडतो. त्यानंतर हल्लेखोर गुलशन कुमारपर्यंत पोहोचतात. त्यावेळी कुमार सार्वजनिक शौचालयाजवळ उभे होते. त्यांनतर दोन जणांनी कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पाठीवर आणि मानेला एकूण 16 गोळ्या लागल्या. त्यावेळी गुलशन कुमार तिथं असलेल्या भिंतीचा आधार घेण्याचा प्रयत्न करत होते पण गोळ्या लागल्यामुळे त्यांचा तोल जातो.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

मंडळी गुलशन कुमारांनी ज्या सिनेमांसाठी म्युजिक दिलं अगदी त्याचं सिनेमातल्या एखाद्या ऍक्शन सीनप्रमाणेचं तिथं सगळं घडत होतं. ते जिथं कोसळले त्याच्या वरच्याचं भिंतीवर एक फरशी होती आणि त्या भिंतीवर देवीचं चित्र होतं. हा सगळा खेळ अवघ्या दोन मिनिटांत संपतो. तिन्ही हल्लेखोर शेजारी उभ्या असलेल्या टॅक्सीच्या चालकाला बाहेर ओढून काढतात. आणि टॅक्सी घेऊन गायब होतात. अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी पोलिस येतात. गुलशन कुमार यांना जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत. जिथ डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. मंडळी त्यानंतर इंडिया टुडेचा एक पत्रकार अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संवाद साधतो.  तेंव्हा गुलशन कुमार यांच्या हत्येत अबू सालेमचा हात असल्याचं राजन त्या पत्रकाराला सांगतो. सालेमनं दिग्दर्शक राजीव राय यांच्यावरसुद्धा हल्ला घडवून आणला होता आणि हे सगळं दाऊदच्या ऑर्डरवर सुरु होतं असंही तो पुढं सांगतो. पुढे गुलशन कुमार यांच्यावर दिल्लीला नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पोलीसांनी त्यांचा तपास सुरू केला . पुढे पोलीस तपासात काही गोष्टी समोर येतात. मे 1997 मध्ये अनीस इब्राहिमच्या दुबईतल्या कार्यालयात एक बैठक झाली होती. अनीस इब्राहिम म्हणजे दाऊदचा धाकटा भाऊ. या बैठकीत अनीस, अबू सालेम आणि त्यांच्यासोबत आणखी एक गुंड उपस्थित होता. या बैठकीत गुलशन कुमार यांची हत्या करून बॉलिवूडमध्ये एकप्रकारे धाक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तीन जणांना बोलावण्यात आलं. त्यापैकी एक असद रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंट हा अबू सालेमच्या जवळचा होता. पोलिसांनी याप्रकरणी मर्चन्ट आणि त्याचा भाऊ अब्दुल रशीद यांना अटक केली आणि या व्यतिरिक्त 19 जणांना सुद्धा आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आलं. यामध्ये अबू सालेम, नदीम सैफी सोबत आणखी एक नाव होतं जे खूप धक्कादायक होतं ते म्हणजे टिप्स कंपनीचे मालक रमेश तौरानी. नदीमसोबत रमेश तौरानीनं गुलशन कुमार यांना मारण्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा पहिला निर्णय 2002 मध्ये आला.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

पोलिसांनी दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बाकीच्यांना सोडून देण्यात आलं. पोलीस रमेश तौरानी यांच्याविरोधात पुरावे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयान त्यांना सुद्धा निर्दोष म्हणून सोडून दिलं. तोपर्यंत नदीम सैफी मुंबई सोडून लंडनला गेला होता. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. पण ब्रिटीश न्यायालयानं त्याच्याविरुद्ध सादर केलेले पुरावे अपुरे असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी त्याचं प्रत्यार्पण नाकारलं. नंतर नदीमने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं आणि तो भारतात कधी परतलाच नाही. अबू सालेम बद्दल बोलायचं झालं तर त्याला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं होत. पण त्याच्यावर कधीच खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. त्याचं कारण होतं पोर्तुगाल आणि भारत यांच्यामधल्या करारातल्या अटी.

(Gulshan Kumar | T Series| Underworld)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari

लग्न का लावून देत नाही म्हणून पोरानं बापाच्या डोक्यात घातली फरशी | उपचारादरम्यान बापाचा मृत्यू | Pandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Head

कोयता मारून नाय कोयता अडवून हिरो झालेला Leshpal Jawalge | Pune Crime News


या करारानुसार अबू सालेमविरुद्ध फक्त तेच खटले चालवता येतील ज्यावर सहमती झाली होती आणि गुलशन कुमार खून प्रकरण हे या यादीत नव्हते. त्यामुळे 2005 नंतर या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अबू सालेमला गैरहजर मानलं जात असताना, त्याला काही अंतरावर असलेल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणाचा अंतिम निर्णय हा 2021 मध्ये घेण्यात आला. त्यानंतर न्यायालयानं अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंट आणि अब्दुल रशीदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयानं म्हंटल की, नदीम सैफी आणि अबू सालेम यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे अबू सालेमविरुद्धचा खटला पुढे जाऊ शकला नाही आणि दुसऱा आरोपी नदीम सैफी आजपर्यंत भारतात परतलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात कितपत न्याय झाला हे सांगता येणार नाही, मात्र गुलशन कुमार यांचा वारसा अजूनही जिवंत आहे हे मात्र नक्की. T-Series हे संगीत जगतातलं आजसुद्धा खूप मोठं नाव आहे. T- series ची सगळी जबाबदारी सध्या गुलशन कुमार यांचे चिरंजीव भूषण कुमार हे सांभाळतायत. पण ज्यांनी ही कंपनी सुरु केली त्या गुलशन कुमारांना मात्र ही अशी दर्दनाक एक्झिट घ्यावी लागेलं असं कुणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. असो, पण बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

arun gawliarun gawli historyarun gawli interviewarun gawli moviearun gawli statusarun gawli vs dawood ibrahimbreaking newsgulshan kumar bhakti songsgulshan kumar deathgulshan kumar death casegulshan kumar death dategulshan kumar death documentarygulshan kumar death newsgulshan kumar death placegulshan kumar death reasongulshan kumar death storygulshan kumar death story in hindigulshan kumar death study iqgulshan kumar songsvishay bharivishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment