२ वर्षात ३६ जणांचा मृत्यू , बॉडीबिल्डर अकाली का जातायत | ही आहेत कारण | Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

मंडळी काही दिवसांपूर्वीच जगभरात कीर्ती मिळवलेला मराठमोळा शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर याच निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आलीय.. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यासारखे अनेक मानाचे किताब आशिष साखरकर याने पटकावले होते. मात्र दुर्दैवान गंभीर आजारपणामुळे त्याचा मृत्यू झालाय.. त्याचसोबत जस्टीन विक्की नावाच्या एका बॉडीबिल्डरचा सुद्धा काल परवा 210 किलो वजन उचलताना मृत्यू झालाय.. खरंतर काही दिवस झालं बॉडीबिल्डरांच्या अशा अनेक आकस्मित मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यात.. बर त्यांची वय सुद्धा काय फार नाहीयेत… सगळे तिशी चाळीशीतले तरुणयेत.. मग आतां इतकी चांगली शरीरयष्टी असूनसुद्धा ह्या तरुणांचा इतक्या लवकर मृत्यू का होतोय ? ते इतक्या अकाली का जातायत ?

Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

तर बघा, हे जाणून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण काही घटनांचा आढावा घेऊया.. तर मंडळी, नुकतीच 2 जुलैची घटनाय जोएस्थेटीक्स या नावाने प्रसिद्ध असणारा जर्मन बॉडीबिल्डर जो लिंडनर याचा  वयाच्या फक्त तिसाव्या वर्षी मृत्यू झाला.. त्यानंतर थोडं मागं जाऊया.. 80 आणि 90 च्या दशकात, ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला प्रो बॉडीबिल्डर अँड्रियास मुन्झर.. 12 मार्च 1996 ला त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या.. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल.. त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव होत होता.. मग लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली… त्याच्या किडन्या आणि लिव्हर आधीच निकामी झाले होते.. त्यामुळेच डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत… आणि 14 मार्च 1996 च्या सकाळी त्याचा मृत्यू झाला.. मृत्यूच कारण काय तर डिस्ट्रोफिक मल्टिपल ऑर्गन फेल्युअर. तो फक्त 31 वर्षांचा होता… पुढे मुंझरच्या आलेल्या पोस्टमॉरटम रिपोर्टने बॉडीबिल्डिंग जगाला धक्का बसला.. कारण या रिपोर्टमधून ज्या काही गोष्टी बाहेर आल्या त्या ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.. रिपोर्टमध्ये अस दिसून आल की मुंझरच्या लिव्हरमध्ये टेबल टेनिस बॉलच्या आकाराच्या असंख्य गाठी झाल्या होत्या आणि हृदयाच वजन साधारण 300 ग्रॅमपेक्षा जास्त 636 ग्रॅम इतक वाढल होत… त्याच्या लिव्हरच वजन 2.9 किलोग्रॅम होत जे एका सामान्य पुरुषाच्या 2 किलोग्रॅम वजनाच्या लिव्हरपेक्षा जवळजवळ एक किलो जास्त होत.. लिव्हर मधल्या पित्ताच्या नळ्यांनी सुद्धा त्यांच काम करण बंद केल होतं.. त्याच्या किडन्या मोठ्या आकारात सुजल्या होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या पोटात 20 वेगवेगळ्या प्रकारची उत्तेजक द्रव्य सापडली होती.. बर असा जगात एकटाच बॉडीबिल्डरय का ज्याचा असा मृत्यू झालाय.. तर अजिबात नाही… मंडळी आमच्याकडं अशाप्रकारे अकाली मृत्यू झालेल्या बॉडीबिल्डरांची आख्खी यादीचय.. सुरुवातीच नाव माईक माताराझो.. वयाच्या 48 व्या वर्षी मृत्यू.. 2004 मध्ये त्याची ओपन हार्ट सर्जरी झाली होती.. त्यानंतर 3 वर्षांनी 2007 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला.. शेवटी, 16 ऑगस्ट 2014 रोजी हार्ट ट्रान्सप्लॅन्टेशनची वाट बघत असतानाचं त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला..

Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

डॅलस मॅककार्व्हर वय वर्ष अवघ 26.. 22 ऑगस्ट, 2017 रोजी डॅलस त्याच्या आजूबाजूला पडलेल्या खरकट्या अन्नासोबत घरातल्या जमिनीवर सापडला… मृत्युंच कारण काय तर प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या किडण्या आणि लिव्हर.. नासेर एल सोनबती.. वय वर्ष 47.. किडनी आणि हृदय काम करायचं बंद झाल म्हणून मृत्यू ग्रेग कोवाक्स.. वय 44.. मृत्युंच कारण हार्ट फेल्यूर.. मोहम्मद बेनाझिझा.. वय अवघ 33… 4 ऑक्टोबर 1992 ला ते हॉटेलच्या एका खोलीत मृतावस्थेत आढळून आले.. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यान मृत्यू झाला होता.. रिच पियाना.. वय वर्ष 46.. 2017 मध्ये, रिच यांना हृदयविकाराचा झटका आला.. ते जमिनीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला… त्याच्यामुळे ते बरेच दिवस कोमात गेले. पण आठवडाभरातच त्यांचा श्वासोच्छवास बिघडू लागला म्हणून त्यांच निधन होईपर्यंत त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.. रिच पियाना यांच्या रिपोर्टमध्ये असं निर्दशनास आलं की त्यांचं हृदय प्रमाणापेक्षा मोठ झालेलं होतं..  लिव्हर च्या आस पास भरपूर फॅट गोळा झाल होतं आणि किडन्या सुद्धा फेल झाल्या होत्या.. मंडळी ज्यांना आपन फिट्ट आणि निरोगी समजत होतो त्यांचीच जर अशी अवस्थाय.. तर मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग जिमला जाणंच चुकीचंय का? मसल बॉडी बनवण चुकीचय का ? तर तसं अजिबात नाहीये.. चुकीचं हे आहे की चुकीच्या पद्धतीन बॉडी बनवण.. मंडळी ह्या बॉडीबिल्डरांच्या मृत्युंचा बारकाव्यानं अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्याचं जणांचे मृत्यू हे हार्ट फेलियेर, लिव्हर फेलियर, किडनी फेलियर या कारणांमुळे झालेत..
मग हे असं का होतय तर त्याचं सगळ्यात महत्वाच कारणय बॉडी लवकर आणि चांगली सुधरावी यासाठी घेतली जाणारी anabolic स्टेरिऑइड्स आणि supplements… मंडळी तुम्हाला ह्या स्टेरिऑइड्स आणि suplements ने नक्कीच चांगली बॉडी बनवता येईल.. पण त्यासोबत तुमचा मृत्यू सुद्धा लवकर होणार हे पण फिक्सय.. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय.. पण मंडळी त्याची तशी कारणयेत..बॉडीबिल्डर जे स्टेरिऑइड्स घेतात त्याचे भयानक दुष्परिणामयेत.. कारण स्टेरिऑइड्स डायरेक्ट तुमच्या हॉर्मोन्स सिस्टीम वर आघात करतात.. तुमच्या good fats ला कमी करून तुमचं इंटर्नल फॅट वाढवतात.. त्यानं कॅन्सर ट्यूमर हार्टअटॅक सारखे रोग तर हमखास होतात.. शिवाय लिव्हर, किडनी आणि हार्ट लवकर फेल होतात ..

Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

त्यामुळं हे बॉडी बिल्डर लोक लवकर जाण्याचं मूळ कारण हे लवकर बॉडी बनवण्यासाठी घेतली जाणारी स्टेरिऑईडसयेत.. Steriods बॉडी बिल्डरांच्या शरीरावर कसे इम्पॅक्ट करतात याची सायंटिफिक कारणं मी आता तुम्हाला सोप्प्या भाषेत सांगतो.. तर बघा जास्त वजन उचलता यावं, लवकर बॉडी फुगावी म्हणून बॉडी बिल्डर anabolic steriods इंजेक्शन, गोळ्याच्या किंवा क्रीमच्या माध्यमातून त्वचेवरून शरीरात घेतात.. पण आता बघा तुमचं 2 इंच शरीर वाढायला देशी आहारान जनरली 8 महिने लागतात.. पण तेच जर तुम्ही स्टेरिऑइड्स घेतले तर ते 2 इंच शरीर फक्त दीड ते 2 महिन्यात वाढत.. ..हा आता बाहेरूनं जरी शरीर आकर्षक वाटत असल तरी हे स्टेरिऑइड्स आतून मात्र शरीराची पूर्ण वाट लावून टाकतात.. त्याच्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजेच डायबेटीज यासारखे आजार होतात.. त्याचबरोबर हाड ठिसूळ आणि कमजोर होतात.. मानसिक ताण येतो, चिडचिड होते, डोळे कमजोर होतात, निद्रानाश होतो, मूड स्विंग्स होतात. भावनांवर सुद्धा कंट्रोल राहत नाही.. स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर आणि शरीरावर केस येतात.. पुरुषांसारखा आवाज होतो, मासिक पाळी मध्ये अनियमितता येते असे असंख्य प्रॉब्लेम्स या स्टेरिऑइड्स आणि सप्लिमेंट्समूळ होतात.. त्यामुळं भविश्यात बॉडी बिल्डर होऊ पाहणाऱ्या माझ्या लाडक्या दोस्तांनो जरा जपून.. उगाच इर्षेला पेटून स्टेरॉईड घेणं अतिशय चुकीचंय… कारण मंडळी 2022 या एक वर्षात 50 वर्षाखालच्या 36 बॉडीबिलड्रांचा मृत्यू झालाय.. हा आकडा ऐकून तरी निदान सावध व्हा.. देशी खाऊन सुद्धा बॉडी बनवता येते हे विसरू नका.. लगेच रिझल्ट पाहिज्ये या इर्षेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.. मागेसुद्धा बॉडीबिल्डर समीर साखरेकर ची बातमी टीव्ही वर आली होती.. त्यांच्या तर दोन्ही किडन्या फेल झाल्यात.. आता तो खूप फर्स्ट्रेटेड आहे.. त्याच्या पाठी बायको आणि दोन मुलं सुध्दायत.. लवकरच त्याचीं किडनी ट्रान्सप्लांट करावी लागणारे..

Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

त्यामुळं पोरांना सांगणंय, उगं वाकडं तिकडं बाॅडी बनवायच्या नादाला लागू नका.. त्यापेक्षा आपला तालमीचा देशी व्यायाम चालू ठेवा.‌ निबार मेहनत घ्या. फळं, कडधान्य , मांसाहार, दुध रेग्युलर आहारात ठेवा. एक दिवस तुम्हांला रिझल्ट नक्की दिसेल. अन् सुया टोचून टेंपररी बॉडी तर आजीबातच नको. परमनंट बाॅडीबिल्डर बनून समाजातलं तुझं वजन वाढव. कुठलीही टिकाऊ गोष्ट वेळ घेते हे लक्षात ठेव. असो, अभ्याला तर त्याजं उत्तर मिळालं असंलच पण तुम्हाला मात्र ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

२ वर्षात ३६ जणांचा मृत्यू , बॉडीबिल्डर अकाली का जातायत | ही आहेत कारण | Side Effects of Steriods | Bodybuilding Is Good or Bad | How to Gain Muscle Naturally

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

aesthetic bodybuildinganabolic steroids side effectsbeginners bodybuildingbest legs in bodybuildingbodybuidling bubble gutbodybuidling side effctsbodybuildingbodybuilding (sport)bodybuilding breakfastbodybuilding dietbodybuilding nutritionbodybuilding steroidsbodybuilding trainingbodybuilding vs powerliftingbreaking newsfast weight lossfast weight loss dietfat losshindi bodybuilding updateshow to lose weighthow to lose weight fastlose weightlose weight fastmotivation bodybuildingmy weight loss journeypowerlifting vs bodybuildingronnie coleman bodybuildingside effectside effectsside effects of corticosteroidsside effects of steroidside effects of steroid creamside effects of steroid creamsside effects of steroid injectionside effects of steroidsside effects of steroids in femalessteroid cream side effectssteroid cream side effects on facesteroid cream side effects solutionsteroid cream side effects treatmentsteroid side effectssteroidssteroids side effectsteeth weight losstim gabel bodybuildingvishaych bhariweight lossweight loss deviceweight loss dietweight loss drinkweight loss helpweight loss journeyweight loss mistakesweight loss motivationweight loss secretweight loss teethweight loss tipweight loss tipsweight loss transformationweight loss workoutविषयच भारी
Comments (0)
Add Comment