शरद पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांचं पुढे काय हाल झाले | Sharad Pawar | Ncp | Maharashtra Latest Politics News

मंडळी २०१४ नंतर देशात सगळीकड नरेंद्र मोदींचा झंझावात पहायला मिळत होता. २०१४ नंतर झालेल्या तमाम निवडणुकीत भाजपने त्यांचा सगळ्यात मोठा विरोधी म्हणजे कॉंग्रेस पक्षाचा देशात सपशेल धुव्वा उडवला होता. आता इथून पुढं नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप पक्षचं देशाच्या राजकारणातला प्रभावशाली चेहरा असेल याची सर्व विरोधकांनाही खात्री वाटली असावी. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील अनेक पक्षातील विरोधकांवर इडी, एन आय ए आणि सीबीआयच्या चौकश्या सुरु झाल्या. विरोधकांनी अक्षरशः त्याचा धसका घेतला. २०१९ च्या निवडणुकांआधी हा सगळा प्रकार वाढल्यामुळं अनेक नेत्यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जाऊ लागलं. परिणामी मोदी लाट असताना महाराष्ट्रात कधीच काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असं काही नेत्यांना वाटू लागलं. त्यामुळं झालं काय तर महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादीला तर मोठं भगदाड पडलं. कॉंग्रेसपेक्षाही याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. कारण सगळे दिग्गज आणि विश्वासू नेते शरद पवारांना सोडून जाऊ लागले. त्यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावं सांगायची झालीच तर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, सचिन अहिर, विजयसिंह मोहिते पाटील यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश होतो. पण पुढं त्या नेत्यांचं काय झालं. Sharad Pawar यांची साथ सोडणं त्यांना महागात पडलं की या नेत्यांच्या ते सगळं पथ्यावर पडलं तेच आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणारय…

तर लिस्टमधल्या पहिल्या नेत्याच नावंय मधुकर पिचड.

मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. पवारांची मर्जी संपादन केल्यानंतर पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली होती. अकोले मतदारसंघातून तब्बल 1980 पासून ते निवडून येत होते. 1999 पासून 2009 पर्यंत ते सलग राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. 2014 ला त्याचं  मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड यांना ही त्यांनी आमदार केलं. पण, 2019 मध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान वैभव पिचड यांना भाजपनं उमेदवारीही दिली पण पवारांची साथ सोडणं वैभव पिचड यांना महागात पडलं. कारण तिथं राष्ट्रवादीच्याचं उमेदवारानं पिचड यांचा पराभव केला. एवढचं नाही तर  28 वर्षांपासून पिचड कुटुंबाची सत्ता असलेला अगस्ती साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला.

दुसरं मोठं नाव येतं ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचं.

विजयसिंह मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जायचे. अगदी काँग्रेसमध्ये असल्यापासून म्हणजे 1980 ते 1995 पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना खमकी साथ दिली होती. त्यांच्या प्रत्येक निर्णयात मोहिते पाटील सहभागी झाले होते. त्यामुळंचं की काय,पवारांनी त्यांना कायम मंत्रिमंडळात घेतलं. पुढं भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आल्यानंतर पाटलांच्या मंत्रीपदाला ब्रेक लागला. पण पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर 1999 ते 2009 या काळात विजय सिंह मोहिते पाटील पुन्हा मंत्री झाले. अगदी बॅरिस्टर अंतुलेपासून अशोक चव्हाणांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं. अगदी ते एक टर्म राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले होते. दरम्यान 2009 मध्ये राज्यात मतदारसंघाची पुनरर्चना झाली आणि त्याचा फटका मोहिते-पाटलांना बसला. निवडणुकीत मोहिते पाटलांचा पराभव झाला. पण पुढं 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. आता मोहिते पाटील पवार घराण्याची साथ कधीच सोडणार नाहीत असं चित्र असताना 2019 मध्ये त्यांच्या घरातल्या नव्या पिढीनं म्हणजे त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोदीलाटेत भाजपची वाट धरली. त्याचा रणजीतसिंह मोहिते पाटील यांना फायदाचं झाला. कारण 2020 मध्ये रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना भाजपनं विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलंय. पण आता अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातल्या राजकारणाचं चित्र बदललंय. त्याचा परिणाम आपल्या राजकीय कारकीर्दीवर होऊ नये यासाठी आता रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसलेली दिसतीये. अर्थात असं असलं तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या तिकीटाच्या आशेने रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले ते माढा लोकसभेचं तिकीट भाजपनं त्यांना वगळून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलं होतं. आणि आता तेच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यात आता शीतयुद्ध सुरू आहे.

( maharashtra political news )

तिसरं मोठं नाव म्हणजे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील ह्ये पिता-पुत्र.

पद्मसिंह पाटील हे तुळजापुरातलं सर्वात प्रभावी नेतृत्व. ते पवारांचे अत्यंत विश्वासू नेते होते. अगदी जिल्हा परिषदेपासून खासदारकीपर्यंत सर्व पदं मिळवलेले नेते म्हणजे पद्मसिंह पाटील. ते सलग सात वेळा आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा राणा जगजीतसिंह पाटील यांनाही राष्ट्रवादीनं विधान परिषद सदस्य बनवलं. त्यांना मंत्रिपद देखील मिळालं. पण, 2019 च्या निवडणुकीआधीचं त्यांनी पवारांना सोडून भाजपची वाट धरली. सध्या पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे भाजपच्या तिकीटावर आमदार असले तरी येणाऱ्या काळात शरद पवार त्यांच्यापुढ कडवं आव्हान उभं करणार ह्ये नक्की. अर्थात राणा जगजितसिंग भाजपमध्ये गेले असले तरी शिवसेनेच्या ओमराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचा पक्षांतरापूर्वी लोकसभा निवडणुकीत पद्धतशीर पराभव केला होता हे ही इथं नोंद घेण्यासारखंय.

या नंतर चौथं नाव आहे साताऱ्याचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं.

उदयनराजेनी २०१९ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यांत त्यांनी विजय ही मिळवला होता. पण, अवघ्या तीन महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम म्हणजे साताऱ्यात खासदारकीची पोटनिवडणूक लागली. भाजपनं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरवलं. पण, पवारांनी यावेळी तगडी चाल खेळली. त्यांनी स्वच्छ कारकीर्दीच्या श्रीनिवास पाटील या आपल्या मित्राला राजेंविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. बर नुसतं उतरवलं नाही तर श्रीनिवास पाटील यांना बळ देण्यासाठी भर पावसात सभा ही घेतली. ती सभा पवारांच्या पथ्यावर पडली आणि साताऱ्यात बाजी पलटवली. उदयनराजेंचा अतिशय मोठा मताधिक्याने पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले. त्यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर घेतलं. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना भाजप केंद्रात मंत्री करणार अशी मध्यंतरी चर्चा होती. पण, अजूनही त्यांना कुठलंही मंत्रिपद मिळालेलं नाही. साताऱ्यात राजेंचा राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णय कसा चुकीचा होता याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा होते. पण आता अर्थातच उद्यनराजै विरूद्ध शरद पवार ही rivalary साताऱ्यात उभी राहणार हे नक्की.

( maharashtra political news )

पुढचं मोठं नावं येतं ते म्हणजे मराठवाड्यातले जयदत्त क्षीरसागर यांचं.

गोपीनाथ मुंडेंच्या बीड जिल्ह्यात स्वतःच वेगळं राजकीय स्थान निर्माण करण तसं अवघड काम. पण तरी जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांच्या साथीने ते करून दाखवलं होतं. ते पवारांचे एकनिष्ठ नेते होते. राष्ट्रवादीनं त्यांना आघाडी सरकारच्या काळात महत्वाची खाती दिली होती. पण, त्यांनीही 2019 साली गटबाजीचं कारण पुढं करून राष्ट्रवादीला आणि पर्यायाने पवारांना सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं त्यांना 2019 साली विधानसभेत उमेदवारी दिली. पण तिथं ही पवारानी खेळी केली. त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून त्यांचाचं पुतण्या young and dashing नेतृत्व संदीप क्षीरसागर यांना मैदानात उतरवलं. काका-पुतण्याच्या त्या लढतीत जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. तो पराभव जयदत्त क्षीरसागर यांना जिव्हारी लागला. सध्या त्यांची वेगळीच कोंडी झालेलीय. कारण शिवसेनेत फुट पडल्यापासून त्ये शिवसेनेच्या दोन्ही गटापासून लांब हात ठेऊन आहेत. त्यांच्या मनात सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छाय असं बोललं जातय.

यानंतर पवारांची साथ सोडणारे नेते म्हणजे सचिन अहीर.

हे सुद्धा पवारांच्या मर्जीतले नेते. 1999 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार झाले. 2009 ला मंत्री असताना त्यांना गृहनिर्माण खातं मिळालं होतं. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते. पण, 2019 ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. 2019 ला त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडला. खरंतर हेच त्यांच्या राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचं कारण मानलं गेलं. कारण वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर ठाकरेंनी अहिर यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलंय. तर या नेत्यांव्यतिरिक्त अजून भास्कर जाधव, दिलीप सोपल, पांडुरंग बरोरा, शेखर गोरे हे नेते देखील ऐनवेळी शरद पवारांना सोडून गेले होते. पण २०१९ चा आढावा घेतला तर लक्षात येईल की राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सात आमदारांपैकी भास्करराव जाधव आणि राणा जगजितसिंह पाटील हे दोन आमदार सोडले तर कुणालाचं निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाहीये. म्हणजेच काय तर ज्या ज्या नेत्यांनी पवारांची साथ सोडलीये त्यांना जनतेनं साफ नाकारलेलं दिसतंय.

( maharashtra political news )

सध्या अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या मनातही निवडणुकीची धास्ती असल्याच्या चर्चा आहेत. कारण छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीतल्या काही दिग्गज नेत्यांनी सध्या भाजपसोबत जाणं पसंत केलंय. तेव्हा आता प्रश्न एवढाचंय कि येणाऱ्या काळात जनता बंड केलेल्या या आमदारांना पुन्हा स्वीकारणार की त्यांनाही घरचा रस्ता दाखवणार ? अर्थात याच उत्तर येणारा काळच देईल. पण एक नक्कीय, शरद पवार शेवटपर्यत आपली लढाई सोडणार नाहीत. आणि त्यांच्या लढाईचा impact बघता बंडखोर आमदारांना २०२४ ची निवडणूक जड जाण्याचीच शक्यता मानण्यात येतेय. पण त्याबद्ल तुम्हांला नेमकं काय वाटतंय, सध्या सोडून गेलेल्या आमदारांपैकी कोण कोण निवडून येवू शकतं आणि कोणाला पराभवाची चव चाखायला मिळू शकते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडीओ आवडला असेल तर लेख लाईक आणि शेअर करा. धन्यवाद !!!

शरद पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांचं पुढे काय हाल झाले | Sharad Pawar | Ncp | Maharashtra Latest Politics News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar ncpajit pawar news livebreaking newsmaharashtramaharashtra ncp crisismaharashtra newsmaharashtra politicalmaharashtra political big newsmaharashtra political crisismaharashtra political crisis explainedmaharashtra political crisis livemaharashtra political crisis updatemaharashtra political newsmaharashtra politicsmaharashtra politics explainedmaharashtra politics newsmaharastra politicspolitical crisis in maharashtrapoliticspolitics in maharashtrasharad pawarsharad pawar on ajit pawarvishaych bhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment