शरद पवार यांनी येवल्यापाठोपाठ बीड मध्ये सभा घेऊन वातावरण तापवायला सुरूवात केली. आणि या दोन सभांच्या यशस्वी आयोजनानंतर त्यांनी आपला मोर्चा आज कोल्हापूरकडै वळवलाय. आज कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवार यांची तिसरी सभा पार पडतेय.आता या सभेचे अध्यक्ष आहेत, शाहू छत्रपती महाराज. आता अर्थात शाहू छत्रपतींनी तेव्हा लोकसभा उमेदवारी संदर्भातच्या मीडियाने त्यांना विचारलेल्या प्रश्नाला निकालात काढलं होतं. पण तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारे खासदारकी लढवणारच नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली नाही. आता म्हणूनच शाहू छत्रपतींना जर उभं करायचंच असेल तर त्यासाठी शरद पवारांना कोल्हापुरात कशी चक्र फिरवावी लागतील , हेच आपण आज या तीन मुद्यांच्या आधारे समजून घेणार आहोत.
तर नंबर एकचा मुद्दा आहे महाविकास आघाडीत रस्सीखेच
( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
शरद पवार यांच्या आजच्या सभेमुळे शरद पवार गटाकडून शाहू छत्रपतींचं नाव कोल्हापूर मधून पुढील खासदारकीसाठीचे प्रबळ उमेदवार म्हणून establish केलं जाईल. पण त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांना ठाकरे गटासोबतचा डाव जिंकावा लागेल. म्हणजे बघा कोल्हापूरची ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे. इथून संजय मंडलिक हे शिवसेनेचे सध्याचे खासदार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा तब्बल २,७०,५६८ मतांनी पराभव केला होता. आता ठाकरे गट, शिवसेनेनं मागे ही जागा जिंकलीय असं म्हणून महाविकास आघाडीत बार्गेनिंग करू शकतं. कारण २०१९ च्या न्यायाने त्यांच्या कडे २ लाखाचं लीड होतं. पण अर्थातच आता या तीन चार वर्षांत कोल्हापूरची गणितं बरीच बदलली आहेत. म्हणजे जे संजय मंडलिक हे ठाकरे गटाकडून खासदार झाले होते ते आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेत तर राष्ट्रवादीकडून निवडणूक हरलेले धनंजय महाडिक हे आता भाजपकडून राज्यसभेचे खासदार झाले आहेत. आता जर भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गट एकत्र राहिले तर इथून पुढचे लोकसभा उमेदवार संजय मंडलिक असतील की महाडिक गटाचा कोणी दुसरा व्यक्ती, हा भविष्यातला इथून मोठा प्रश्न असणार आहे. कारण दोन्हीही इथले पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आणि आता ते सत्तेत सोबतही आहेत. पण आता महाविकास आघाडीबद्ल बोलायचं झाल्यास ठाकरे गट मागील इलेक्शनमधील लीडच्या आधारे इथे दावा करू शकतो. पण म्हणून तर शरद पवार गटाकडून शाहू छत्रपतींसारखं बिग फेम नाव चर्चेत आणून ठाकरे गटावर एकप्रकारे दबाव आणण्याचं काम शरद पवारांनी सुरू केलं आहे. पण संजय राऊत यांनी मागे यासंदर्भात बोलताना ‘जिंकेल तिथे उमेदवार आपला’ असं वक्तव्य केलं होतं. याच न्यायाने बोलायचं झाल्यास ठाकरे आणि शरद पवार गटात इथल्या जागेसाठी बरीच घासाघीस होणार हे नक्कीय. म्हणूनच ऐनवेळेस कदाचित शाहू छत्रपती ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार झाले , तरी नवल वाटायला नको. तसंही शाहू छत्रपती आणि ठाकरे गटाचे संबंधही गेल्या राज्यसभा निवडणूकीवेळी उत्तम असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं . पण तुर्तास शरद पवारांना शाहू छत्रपतींच्या खासदारकीचा पहिला टप्पा हा महाविकास आघाडीतूनच पूर्ण करावा लागेल.
दुसरा मुद्दा आहे बंटी पाटलांची साथ
( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
कोल्हापूरच्या राजकारणातील सध्याचे दोन जबरदस्त प्रभाव गट म्हणलं तर ते आहे पाटील आणि महाडिक घराणं. पैकी धनंजय महाडिक मागे इथून राष्ट्रवादीचे नेते होते. त्यांची आणि बंटी पाटलांची त्याआधी कधीकाळी एकमेकांना साथसोबतही होती. पण आता महाडिक गेलेत भाजपमध्ये. तर बंटी पाटील आणि दोघात गोकुळ, राजाराम वरून बर्याच वेळा कंडका पडलाय . आता महाडिक गट हा अपेक्षेनुसार भाजप ,अजित दादा गट आणि एकनाथ शिंदे गटासोबत उभा राहील,असं म्हणलं जातंय. त्यामुळे इथून शिंदे गटाचे संजय मंडलिकच पुन्हा कदाचित लोकसभेसाठी प्रबळ दावेदार ठरतील. पण आता बंटी पाटील यांच्या महाडिक विरोधामुळे ते शाहू छत्रपतींना फुल on साथ देतील. आणि बंटी पाटलांची हीच सहसोबत शरद पवारांसाठी उद्या महत्वाची ठरणार आहे. पण यासाठी बंटी पाटील यांनी मागे दिलेली संजय मंडलिकांना साथ तसेच बंटी पाटील यांचे हसन मुश्रीफांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध या दोन गोष्टी शरद पवारांना proper भेदाव्या लागणार आहेत. सोबतीलाच मंंडलिक आणि महाडिक गटातील दुहीतंही काम करावं लागणार आहे. पण आता मंडलिकांना आपण इथून पुढे साथ देणार नाही, असं नुकतंच काही दिवसांपूर्वी बंटी पाटील यांनी म्हणलं होतं. ही सुद्धा इथं विशेष नोंद घेण्यासारखी गोष्टंय. खरंतर शाहू छत्रपतींच्या राजघराण्यामुळे आणि ठाकरे -पवारांच्या सहानुभूतीमुळे बंटी पाटलांनाही कोल्हापूरच्या राजकारणात पब्लिक फिगरमध्ये येण्याची ही चांगली संधी मिळणार आहे, हे देखील इथं लक्षात घ्यायला हवं.असो .
तर नंबर तीनचा मुद्दा आहे, समरजीतसिंह घाटगेंना सोबत घेणे.
( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
अजित दादा गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्री केल्याबरोबरच कागलमध्ये भाजपचे समरजीतसिंह घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्थात ज्या हसन मुश्रीफांवर ईडी कारवाई झाली. तेच मुश्रीफ भाजप सोबत गेल्याने तिथे समरजीतसिंह यांची मोठी अडचण झाली. कदाचित उद्या विधानसभेला समरजीतसिंह घाटगें ऐवजी हसन मुश्रीफच शिंदे- पवार -फडणवीस युतीचे उमेदवार झाले तर भाजपमधून समरजीतसिंह घाटगेंचा पत्ता कट होऊ शकतो. अशावेळी ते शरद पवार गटाकडेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण लोकसभेपुरतं बोलायचं झाल्यास राजघराण्याच्या मुद्यावर किंवा घाटगेंच्या मुश्रीफ विरोधाच्या मुद्यावर शरद पवार घाटगेंची मतं वळवू शकतील. आता समरजीतसिंह घाटगे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे पण याव्यतिरिक्त कोल्हापूरच्या राजकारणावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की इथले चंदगड,कागल, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर या सहाही मतदारसंघात शरद पवारांना असं विरोधकांना grab करावे लागणार आहे. आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आपण विचार करू. तर बघा कोल्हापूर दक्षिणचा विचार करता कांग्रेसचे रूतुराज पाटील,करवीरमधून कांग्रेसचे पीएन पाटील तर कोल्हापूर उत्तरमध्ये कांग्रेसच्या जयश्री जाधव, हे नेते शरद पवार गटासोबत राहतील. इथं बंटी पाटील यांचं वर्चस्वही दिसून येतं. पण राधानगरी मतदारसंघातुन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरूद्ध शरद पवारांना तोड शोधावा लागेल.
( Sharad Pawar Kolhapur Sabha | Vishaych Bhari )
आता या सगळ्यात चंदगडचे अजित दादा गटाचे आमदार राजेश पाटील यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. खरंतर कोल्हापुरात शरद पवार यांना प्रस्थापित आणि संस्थानिक नेत्यांसोबत काही नवीन चेहर्यांनाही जवळ करावं लागणार आहे. जसं की बीडमध्ये त्यांनी बबन गीतेंना इन करून धनंजय मुंडेचं टेंशन वाढवलं आहे. असो , पण आता सकाळीच शरद पवार यांनी अजित दादा हे आमचेच नेते आहेत असं म्हणून अजून एक गुगली टाकली आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही शरद पवार अजित दादा गटात फूट नाही असं म्हणलंय. जयंत पाटीलही अधूनमधून हीच री ओढतात. आता कालपरवा तर प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांच्या कोल्हापूरच्या सभेला गर्दी करा ,असं म्हणलंय. यामागे बरेच राजकीय अर्थ दडलेले आहेत.आता या सगळ्या खेळ्या करण्यात शरद पवार अर्थातच मास्टर आहेत. कोल्हापूरातून ते अनेकवेळा पावरफुलही ठरलेले आहेत. अगदी जेव्हा १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती तेव्हा याच कोल्हापूरात शरद पवार यांनी आपली पहिली सभा घेतली होती. त्यांच्या आजच्या सभेत पुरोगामीत्व, शाहू संस्थानशी कनेक्शन आणि त्यातून जातीय ध्रुर्वीकरण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. शाहू छत्रपतींच्या खासदारकीच्या दृष्टीने आणि शरद पवार गटाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचंही असणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय ? कोल्हापूरातून शाहू छत्रपती खरंच पुढील खासदार होऊ शकतील का ? शरद पवारांना कोल्हापूरकर पुन्हा स्वीकारतील का ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply