मंडळी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी फॉर्म भरायची तारीख उलटून गेली तरी अजूनही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारीचा तिढा सुटला नाहीये. बारामती, कोल्हापूर, सातारा, माढा, नाशिक यांसारख्या हॉट लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून वातावरण तंग झालंय. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राल्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या हालचालींना भयानक वेग आलाय. भाजपनं जेव्हा महाराष्ट्रातल्या २० जागांवर उमेदवारी घोषित केली तेव्हा माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यानंतर भाजपच्याचं मोहिते पाटील गटानं निंबाळकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. तेव्हापासून माढ्यात उमेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी मागणी लावून धरली होती. पण भाजपकडून काहीही हालचाली करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. माढ्यात banner बाजी ही झाली पण मोहिते पाटील वेट and watch च्या भूमिकेत राहिले. पण आता फायनली मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. लवकरच विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील ह्ये शरद पवार यांची गाठ घेणार आहेत. त्यामुळ माढ्यात लोकांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार प्लस मोहिते पाटील हे समीकरण पाहायला मिळणारय अशा चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान शरद पवार यांनी डाव साधला, भाजपला शह दिला, म्हणजे जानकर दाखवले आणि मोहिते पाटील घेतले असे स्टेटस आता माढ्यात फिरु लागलेत. पण मोहिते पाटील खरच शरद पवार गटात जातील का ? भाजप त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का ? जशी बारामतीमध्ये विजयबापू शिवतारे आणि अजितदादांचं मनोमिलन झालं तसचं माढ्यात निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातली नाराजी दूर होईल का ? नेमकं काय सुरुय माढ्यात, त्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
मंडळी माढ्यात रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता. निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील गट एकवटल्याचं पहायला मिळालं होतं. मध्यंतरी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी माढ्यात जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. खरं तर तेव्हापासूनचं धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणारंय असे खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिलेत. विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय ह्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत. जयसिंह मोहिते पाटील यांनी त्याबद्दल बोलताना सांगितलं की, आम्ही मतदारसंघात चाचपणी करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप वरिष्ठ नेत्यांना समजले पाहिजे खरी ताकत कुठे आहे. भाजपच्या 28 पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत. सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे, पण भाजप मधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करत आहोत. येत्या चार दिवसांत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होईल. माढा, सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय. खरं तर काही दिवसांपूर्वी भाजपकडून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना अकलूज इथं पाठवलं होतं. त्यावेळी त्यांनी सुमारे दोन तास बंद दाराआड मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली होती, मात्र सकारात्मक तोडगा निघाला नव्हता. दरम्यान त्यावेळी आक्रमक झालेल्या मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही असं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप माढ्यात उमेदवार बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली. परिणामी आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघांमध्ये ताकद राखून असलेले मोहिते-पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. खर तर मध्यंतरी पवारांनी रासपचे महादेव जानकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना माढ्याची जागा देऊ असं वक्तव्य केलं होतं. पण त्यामागं पवारांचा दुसराचं डाव होता, जानकरांना फ्रंटलाईन करून पवार मोहिते पाटलांशी अंतर्गतरित्या सलगी साधत होते.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
दरम्यान सध्या जानकर महायुतीतचं राहणार हे जवळपास फिक्सय पण त्यांच्या आडून पवारांनी त्यांना हवा असलेला भाजपचा पावरफुल नेता फोडलाय अशा चर्चा माढ्यात रंगल्यात. कालच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल बुधवारी पुण्यात धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोहिते-पाटील घराण्याच्या सदस्यांकडून तुतारी हाती घेण्याची भाषा सुरु झाली होती. एकीकडं त्या घडामोडींची चर्चा सुरु असतानाच बुधवारी संध्यकाळी पुण्यातील एका लग्नसमारंभात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचीही भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये थोडीफार चर्चाही झाली. त्यामुळे मोहिते-पाटील पुन्हा शरद पवार यांच्या साथ देणार, या दाव्याला आणखीनच बळकटी मिळाली. येत्या तीन-चार दिवसांमध्ये शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची बैठक होणारय परंतु, मोहिते-पाटील यांचा शरद पवार गटातील नियोजित पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. त्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील लग्नसमारंभातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना गराडा घातला. पत्रकारांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बहुतांश प्रश्नांवर मौन बाळगलं. धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली नाही म्हणून तुमची नाराजी आहे का ? असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर विजयसिंह मोहिते यांनी होकारदर्शक मान हलवली. मात्र, मोहिते-पाटलांचं अजून काही ठरलेलं नाही, असंही ते म्हणाले.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
दरम्यान आज जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार आहे. पण खरंचं असं घडलं तर खासदार रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचा दावा राजकीय विश्लेशक करतायत. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातून 1 लाखाहून अधिक मताधिक्क्य दिलं होतं. त्यामुळं त्या मतदारसंघात मोहिते पाटील यांचीदेखील चांगली ताकद आहे. तर दुसरीकडं रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागं माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण खटाव या तालुक्याचे आमदार आहेत. आता आपण धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली तर माढ्यात चित्र कसं पालटू शकतं त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात, सगळ्यात पहिला लक्षात घेण्यासारखा मुद्दाय म्हणजे मोहीते पाटील घराण्याचे आणि शरद पवारांचे असलेले जुने संबंध. मंडळी माढा लोकसभा मतदारसंघात 2009 ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढवली होती. त्यांनी 3 लाखाहून अधिक मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा तिथं पराभव केला होता. त्यामुळं शरद पवारांची या मतदारसंघात चांगली पकड आहे हे दिसून येतंय. पण त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अटितटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता. 25 हजार मताच्या फरकानं विजयसिंह मोहिते पाटील हे तेंव्हा निवडून आले होते. तेंव्हा माढा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा आणि तेंव्हा शरद पवार आणि मोहीते पाटील घराण्याचे सबंधही चांगले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदासंघातलं वातावरण बदललं आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी मोहीते पाटील यांच्याविरोधात त्यांच्याच मतदारसंघात ताकद उभी करत असल्याचं त्यांना आढळून आलं होतं आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या तिकिटासाठी इथं राष्ट्रवादीनं नकार दिला होता. पण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळं मात्र त्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जवळपास 1 लाखाचं लीड त्यांनी एकट्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना मिळवून दिलं. त्या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांनतर दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फ्रंटलाईन करून मोहीते पाटलांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांचे समर्थक नाराज आहेत. त्याचा तोटा रणजीतसिंह निंबाळकर यांना येत्या निवडणुकीत होवू शकतो. पुढं तिसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मोहीते पाटलांनी रामराजे यांच्यासोबत घेतलेली भेट.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
मंडळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माढा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी रामराजे निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. खर तर रामराजे निंबाळकर हे अजितदादा गटाकडून त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांना माढ्याची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. आजही आहेत. रामराजे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यातले वाद देखील सवर्श्रुत आहेत. दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रामराजे आणि मोहिते पाटील यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. एकूणच त्या भेटीमागे मोहिते पाटलांचं माढा लोकसभेसाठी बेरजेचं गणित सुरू असल्याची चर्चा होती. रामराजेनी माढ्यात मोहिते पाटलांना ताकद पुरवली तरी विद्यमान खासदारांना यंदाची निवडणूक जडजाऊ शकते असं म्हंटल जातंय. एकूणचं या सगळ्या मुद्याच्या आधारे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटातुन निवडणूक लढले तर रणजितसिंह निंबाळकरांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते असे अंदाज बांधले जातायत. त्यासोबतच आमचं ठरलंय.. धैर्यशील मोहिते-पाटील हेच माढ्याचे भावी खासदार,’ अशा आशयाच्या पोस्ट मोहिते-पाटील समर्थकांकडून आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जातायत. त्यामुळे २००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आणि २०१४ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलेला माढा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहीते पाटलांच्या रूपाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार का या प्रश्नांचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल. पण सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्याचं बाजूने उभं असल्याचं चित्रयं.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
तसंच आपल्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघात काही ठिकाणी निंबाळकर यांचा बोलबाला असल्याचीही चर्चा आहे. पण मोहिते पाटील घराण्याची माढ्यातली ताकद पाहता लढाई चुरशीची आणि अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्हे आहेत. कारण नाईक निंबाळकर घराणं आणि मोहिते पाटील घराणं ही या मतदारसंघातील गणितं फिरवणारी घराणी आहेत. त्यात आणखी जर शरद पवारांची एन्ट्री झाली तर त्यांना मानणारा मोठा वर्ग हा या माढा लोकसभा मतदारसंघात आहे. कारण 2009 साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळं या मतदारसंघात पवारांचे मोठे नेटवर्क आहे. अर्थात मोहिते पाटील प्लस शरद पवार factor एकत्र आला तर रणजितसिंह निंबाळकरांना इथं ते जड जाऊ शकतं. पण तुम्हाला नेमकं काय काय वाटतंय ? धैर्यशील मोहीते पाटील शरद पवार गटातुन माढ्यात उभे राहतील का आणि तिथून ते निवडून येऊ शकतात का ? धैर्यशील मोहिते पाटील की रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढ्यात ताकद कोणाची जास्तंय ? तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
(Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patil)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
या ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhariजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariबच्चू कडू यांच्या विरोधामुळं अमरावती मध्ये नवनीत राणा पडतील ? | Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kaduया ५ लोकसभेच्या जागांसाठी एकनाथ शिंदे आजंही भाजप सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply Cancel reply