या चार वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेने राजकारणात सगळ काही पाहिलं. म्हणजे आधी राष्ट्रवाडीला भाजप बरोबर जाताना पाहिलं. मग काँग्रेसला शिवसेनेसोबत जाताना पाहिलं आणि नंतर कधी फुटणार नाहीत असं म्हणताना आधी शिवसेनेला ठाकरेंपासून आणि नंतर अजित दादांना शरद पवार यांच्यापासून फुटताना पाहिलं. आता अर्थात सांगायचा मुद्दा हा आहे कि सध्या राज्यात भाजप शिंदे गट आणि अजित दादा गट यांचं सरकार सत्तेत आहे. आता हे तिघेही वरून मस्त चाललंय आमचं असंच नेहमी दाखवत असतात. पण खरंच यांचं आतून सगळं आलबेल आहे का? काँग्रेस राष्ट्रवादीतून फुटून भाजप मध्ये जाण्याचा फ्लो मोठा असताना भाजप भविष्यात फुटू शकतं का ? भाजपचे नेते खरंच काँग्रेस राष्ट्रवादीत जाऊ शकतात? हे नेमकं कस होऊ शकतं हेच आपण या Blog मध्ये वाचणार आहे .तर बघा विषय असाय कि भाजपन शिंदे गटाला सोबत घेतलं इथपर्यंत काही अवघड नव्हतं. कारण भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती आहे. हिंदुत्व हा सुद्धा दोघांमधला कॉमन मुद्दा आहे. पण जेव्हा अजित पवार यांनी या सत्तेत उडी मारलीय तेव्हा डाव बिघडलाय. खरंतर मोदीना निवडून आणायचे आहे या हिशोबाने अजित दादांना कितीही जीवावर असलं तरीही सस्टेन करणं हे भाजपाला मस्ट आहे. आता यासाठी सगळं काही ठीक असल्याचं दाखवण्याचाच प्रयत्न या तिन्ही पक्षाकडून होताना नेहमीच दिसतोय. पण खरा खेळ हा लोकल राजकारणात बिघडलाय. तो नेमका कसा अजून बिघडू शकतो हेच आपण काही उदाहरणांच्या आधारे समजावून घेऊयात.
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
नंबर एकच उदाहरण आहे
इंदापूरातील हर्षवर्धन पाटील vs दत्तमामा भरणे हे प्रकरण.
तर बघा आता हर्षवर्धन पाटील हे तसें मूळचे काँग्रेसचे नेते. 2009 ला ते इंदापूरातून काँग्रेसचे आमदार राहिले होते. पण 2014 ला आणि 2019 लाही त्यांचा दत्ता मामा भरणे यांनी पराभव केला. 2014 ला हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस मध्ये होते तर 2019 ला ते भाजप मधून उभे होते. २०१९ त्यांचा अवघ्या 3110 मतांनी पराभव झाला होता. आता हर्षवर्धन पाटील यांची कोंडी अशी झालीय कि ज्या दत्ता मामा भरणे यांना ते विरोध करत आलेत तेच आज सत्तेत त्यांच्या पक्षासोबत वाटेकरी झालेत. शिवाय हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक असणारे अजितदादाही सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. आता त्यामुळेच जर ही तीन पक्षांची आघाडी अशीच टिकली तर उद्या इंदापूरची सीट कुणाला द्यायची हा विषय जागवाटपात उपस्थित होईल आणि तेव्हा सीटिंग मेम्बर म्हणून अजित दादा दत्ता मामा भरणे यांचंच नाव पुढे करतील. आता अशावेळी भाजप हर्षवर्धन पाटील यांचं नाव पुढ करेल. पण जर आता ज्याची आधी विजयी सीट त्याचा जागेवर दावा ,अशा न्यायानं विषय पुढं सरकला तर मग इंदापूरची महायुतीची उमेदवारी ही नक्कीच दत्ता मामा भरणे यांच्या पारड्यात पडेल. आता त्यावेळेस हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतील हा मुदा विचार करण्यासारखाय. अशावेळी मग हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे न राहता कदाचित पुन्हा काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतही जाऊ शकतील,असं मानण्यात येतंय.
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
नंबर दोन आहे माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंग मोहिते पाटील vs रंजितसिंग नाईक निंबाळकर हे प्रकरण.
तर बघा 2019 ला माढ्यातून शरद पवार उभे राहणार अशी चर्चा होती पण त्या चर्चेच पुढ काही झालं नाही. आणि भाजपचे रंजितसिंग नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवाडीचे संजयमामा शिंदे ही निवडणूक तिथे पार पडली. यात संजय मामा हरले. पण ही निवडणूक रंजितसिंग जिंकण्याच सर्वात मोठं श्रेय हे मोहिते पाटील घराला गेलं. आता रंजितसिंग मोहिते पाटील यांनी मागे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला पण त्यांच्याऐवजी येईनवेळी रंजितसिंग नाईक निबाळकर यांचच तिकीट फायनल झालं. पण आता यावेळेस मात्र रंजितसिंग मोहिते पाटील हे मैदानात उतरण्यासाठी उत्सुक असतील. आता हे दोन्ही नेते भाजप मध्ये आहेत, अशावेळी जर माढयातून रंजितसिंग नाईक निंबाळकर यांनाच भाजपने पुन्हा बरकरार ठेवलं तर मग मोहिते पाटील हे कदाचित पुन्हा एकदा राष्ट्रवादीत परतू शकतील. आता मध्यंतरीच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार जेव्हा माढा दौर्यावर गेले होते तेव्हा त्यांनी मोहिते पाटील यांची भैट घेतली होती. आता त्यामुळे मात्र रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचं टेंशन नक्कीच वाढणार आहे.
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
नंबर ३ आहे .
कागलमधील हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हे इथून हेवीवेट आमदार आहेत. त्यांनी सलग ३ टर्म झालं कागलमधून विजय मिळवला आहे.२०१९ ला त्यांनी अपक्ष उभे असलेल्या समरजीतसिंह घाटगे यांचा तब्बल २८१३३मतांनी पराभव केला होता. आता यावेळेस समरजीतसिंह घाटगे हे भाजपकडून लढण्यासाठी मैदानात उतरले होते . पण अजित दादा गट भाजपसोबत गेला अन् मुश्रीफ थेट मंत्रीच झाले. आता त्यामुळेच समरजीतसिंह घाटगे यांचा अलीकडे पारा चढलेला बघायला मिळतोय. आता विषय असाय की महायुतीकडून जर मुश्रीफांचं तिकीट फायनल झालं तर मग घाटगैंना वेगळा पर्याय निवडण्यावाचून उपाय राहणार नाही. आता अशावेळी समरजीतसिंह घाटगे अपक्ष उभे राहू शकतील. पण मागं त्याचा त्यांना तोटा सहन करावा लागला होता त्यामुळे मग त्यांना कांग्रेस किंवा राष्ट्रवादीचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे समरजीतसिंह घाटगे उद्या शरद पवार गट किंवा ठाकरे गटात गेले तरी आश्चर्य वाटायला नको.
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
नंबर चार आहे.
परळीतील पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष.
परळी हा तसा मुंडेंचा बालेकिल्ला.पण २०१५ ला इथून पंकजा मुंडे आमदार झाल्या तर २०१९ ला धनंजय मुंडे. आता शरद पवार गटाकडून इथे बबन गीतेंच्या नावाची चाचपणी चालली असली तरीही पुढील फाईटही पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे यांच्यातच होण्याची दाट शक्यताय .. आता अर्थात गंमत अशीय की जर महायुतीतनं धनंजय मुंडेंना तिकीट पक्कं झालं तर मग पंकजा मुंडेंना काहीही करून कुठल्यातरी पक्षाचा आधार घ्यावा लागेल. आता अशावेळी त्या शरद पवार गटात जाऊ शकतील अशी चर्चाय. आता पंकजा मुंडे यांना गमावणं भाजपसाठी तसं मारक ठरू शकतं. कारण ओबीसी नेत्या अशी त्यांची महाराष्ट्रात मोठी ओळख आहे.आता त्या स्वतः हून भाजपला क्विट करणारही नाहीत पण जर निर्वाणीची वेळ आली तर पंकजा मुंडे त्यांचं राजकारण वाचवण्यासाठी शरद पवार गटातही जाऊ शकतील. आता एक तुल्यबळ ओबीसी नेता पक्षात येणं हे शरद पवार गटालाही फायदेशीर ठरेल. मराठा प्लस ओबीसी अशी राज्यभर गोळाबेरीज करण्यासाठी ती गोष्ट शरद पवार गटाला बेनिफिशियरी ठरेल. तर पंकजामूंडेंना देखील हे सगळं तेव्हा तारक ठरू शकेल .
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
पाचवं उदाहरण आहे,
खानापूरातील गोपीचंद पडळकर विरूद्ध अनिल बाबर हा संघर्ष.
खानापूरातून सदाशिव पाटील आणि नंतर दोन वेळेस अनिल बाबर हे आमदार झाले आहेत.अर्थात इथून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी दोन्हीवेळा बरेच हातपाय मारले पण त्यात त्यांना साफ अपयश आलंय. आताही अनिल बाबर हे शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपसोबत सत्तेत आहेत. अशावेळी भाजप शिंदे गटाचे उमेदवार जर अनिल बाबर असतील तर मग गोपीचंद पडळकर यांना अपक्ष उभं रहाण्यावाचून पर्याय राहणार नाही. अर्थात महाविकास आघाडीकडे सदाशिव पाटील यांचा option असल्याने अनिल बाबर vs गोपीचंद पडळकर vs सदाशिव पाटील अशी तिहेरी लढाई इथं होऊ शकेल. पण पडळकरांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते अपक्षच उभे राहण्याची शक्यता जास्त आहे. कारण गोपीचंद पडळकर यांनी कांग्रेस राष्ट्रवादी आणि विशेषतः शरद पवार ,अजित दादांवर केलेल्या अघोरी टीकेमुळे ते ना कांग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील. ना कांग्रेस राष्ट्रवादी पडळकरांना पक्षात घेईल. आता या व्यतिरिक्त सातार्याचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा लोकल politics मध्ये कांग्रेस राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत अशी अधूनमधून चर्चा असते पण त्या चर्चेला अजूनतरी फार काही आधार नाही.तिकडे महाडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले हे तटकरेंविरूद्ध खार खाऊन आहेत. पण त्यांचे हात चीपेखाली अडकलेत. आता तटकरेंविरूद्ध त्यांचा रोष अषला तरीही थेट मतदारसंघात त्यांच्या जागेवर अद्याप तरी कोणी ठोसपणे दावा केलेला नाहीये. खरंतर तो ही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. त्याच्यावर नक्कीच कधीतरी स्वतंत्रपणे बघुयात
(Sharad Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Vishaych Bhari )
पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, खरंच विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप फुटू शकतं का? भाजपचे नेते पुन्हा कांग्रेस राष्ट्रवादीत दाखल होऊ शकतात का? तुमच्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे का? तसेच तुमच्या दृष्टीने अजून असे कोणते भाजपचे नेते आहेत जे ऐनवेळी भाजप सोडून कांग्रेस राष्ट्रवादीत परतू शकतील?तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply