सांगोल्याचा पुढचा आमदार कोण | Shahaji Bapu Patil की Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari


मंडळी सांगोला मतदारसंघ म्हणलं की स्व. गणपतराव देशमुख यांच नाव न घेणं चुकीचं ठरेलं. कारण या मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेलाय. तब्बल 54 वर्ष या मतदारसंघावर आबांनी इथं आपलं एकहाती वर्चस्व राखून ठेवलं. सांगोल्यातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात हा एक पक्ष आणि एकच माणूस कायम ठेवला. त्यामुळेच २०१९ पर्यंत काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर कोणालाही या मतदारसंघात शिरकाव करता आलेला नाहीये. 1995 ला मात्र शहाजी बापु पाटलांनी गणपतराव देशमुखांना इथून एकदा नमवलं होतं. पण त्यानंतर डायरेक्ट 2019 ला गणपतराव आबांनी वयोमानानुसार निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि तिथं त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उभं केलं. पण अवघ्या 768 मतांनी शहाजी बापू पाटलांनी त्यांचा तिथे पराभव केला. पण आता 2024 च्या निवडणुकीसाठी या मतदारसंघात काय चित्र असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे.  दुसऱ्या बाजूला गणपतराव देशमुखांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळ आता सांगोल्यात शहाजी बापू आपलं वर्चस्व कायम ठेवणार की शेकापचे बाबासाहेब देशमुख बाजी मारणार ? हेच आपण आजच्या Blog मध्ये वाचणार आहोत.

(Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari)

मंडळी लोकसभेच्या दृष्टीने सांगोला हा मतदारसंघ माढा या लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघात मराठा आणि धनगर या दोन समाजाची वोटबँक जास्त आहे. त्यातल्या त्यात धनगर  समाजाची मतं या मतदारसंघात निर्णयक ठरतात. आता खरंतर गेले कित्येक वर्ष झालं हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा गड राहिलेलाय. शेकापचे स्व. गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे या मतदारसंघातून 11 टर्म झालं आमदार राहिलेलेयेत. खरंतर त्यांच्यामुळेच एक पक्ष एक झेंडा आणि एक आमदार अशी ओळख सांगोल्याला मिळालीय. त्यांना सांगोल्याचे परमनंट आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. गणपतराव देशमुखांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सांगोल्याचा पाणी प्रश्न उचलून धरला होता. 1962 पासून सलग गणपतराव देशमुखचं या मतदारसंघातून निवडून येत होते. पण 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता त्यांनी सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्त्व केलंय.  1972 साली काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी तर 1995 साली काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवलाय. पण आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकावरच काढली. मात्र 1978 आणि 1999 सालची सरकारं त्याला अपवाद राहिली. कारण 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राच्या विधिमंडळात 55 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 साली सन्मानही झाला होता.असो. पण 2019 च्या निवडणुकीला गणपतरावं देशमुखांनी वयोमानानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवलं. आधी भाऊसाहेब रूपनर इथून शेकापचे उमेदवार ठरले होते पण नंतर अनिकेत देशमुख यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण 2019 ला अवघ्या ७६८ मतांनी शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांनी त्यांचा पराभव केला. खरंतर त्या आधी 4 वेळा गणपराव देशमुखांनी शहाजी बापू पाटलांचा पराभव केला होता.

(Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari)

एकदा तर शहाजी बापू पाटलांनी जसं गणपतरावाना जिंकण्याची सवय झालीय तस मला हरण्याची सवय झालीय असं मान्य केलं होतं. पण मंडळी जश्या 2019 च्या निवडणुका पार पडल्या तस अनिकेत देशमुख हे आपल्या मतदारसंघापासून दूर झाले. मग अनिकेत देशमुख मतदारसंघात नसताना गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवायला आणि सातत्यानं मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घ्यायला सुरुवात केलीय. नुकतच त्यांच्या नेतृत्वात 40 गावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यअधिकाऱ्यांना आमदार त्यांच्या मतदार संघाच्या विकासात हस्तक्षेप करतायत असं निवेदन दिलंय. आता ते प्रकरण मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे सोपवलंय. बाकी बाबासाहेब देशमुख हे सुद्धा पेशान डॉक्टर आहेत. एक शांत, संयमी युवा नेतृत्व म्हणून त्यांची आता मतदारसंघात ओळखय. प्रत्येक दिवशी विविध गावच्या आलेल्या लोकांच्या भेटी घेत, विशेषतः राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणांना घेऊन ते आज गावा-गावात जाऊन शेकापच्या जुन्या – नव्या नेत्यांशी सुसंवाद साधताना दिसतायत. एकूणच काय तर 2019 च्या निवडणुकीत गणपतराव देशमुखांची गमावलेली लीगसी पुन्हा काबीज करण्याचा बाबासाहेब देशमुख यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सांगोल्यात शेकापचा चेहरा हे बाबासाहेब देशमुखच असतील असंचं सगळीकड बोललं जातंय. आता इथले सध्याचे आमदार आहेत शहाजीबापू पाटील. मघाशी सांगितल्याप्रमाण 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापूनी विधानसभेत प्रवेश केला होता.

(Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari)

फक्त 192 मतांनी ते तेव्हाही निवडून आले होते. पण 1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजीबापू पाटील यांना सलग पराभवालाच सामोरं जावं लागलंय. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारलेत.  तर बघा विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. पण परत तेंव्हाव्ही त्यांचा पराभव झाला. अखेर 2014 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभवचं स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असतानाचं युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले आणि ते तिथून अखेर निवडून आले. पण 1990 पासून आजपर्यंत तब्ब्ल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदाच विजय मिळवता आला आणि  त्यांचे दोन्ही विजय हे सुद्धा अगदीच निसटते आहेत.म्हणजे 1995 मध्ये फक्त 192 तर 2019 मध्ये फक्त ७६८ मतांनी त्यांना विजय मिळवता आलाय . त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा तिथं मोठा प्रतिसाद मिळाला होता असं अनेकांच म्हणणं आहे. पण त्यानंतर शिंदे गटानं ठाकरेंपासून दूर जात जे बंड केलं त्यात शहाजी बापु सुद्धा होते. त्यावेळी त्यांचं काय झाडी काय डोंगरवालं काॅल रेकाॅर्डिंग आख्या महाराष्ट्रात फेमस झालं .

(Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari)


शहाजीबापूंची राज्यभर क्रेझ झाली.पण त्यांना त्यांच्या मतदारसंघात गद्दार म्हणून रोष सहन करावा लागला. पण एकूणच काय तर आता बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील अशीच मुख्य लढत आपल्याला सांगोल्यात उद्या बघायला मिळणारे. पण तस बघायला गेलं तर एक बुद्धिमान, शांत आणि समाजात एकजीव होणार नेतृत्व म्हणून बाबासाहेब देशमुख यांची ओळख निर्माण झालीय. त्यामुळ गणपतरावं देशमुखांच्या पारंपारिक मतदारांचा त्यांना पाठिंबा असणारे आणि संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपली स्वतःची मोट बांधन्यासाठी चांगली कंबरही कसलेलीय. दुसऱ्या बाजूला शहाजी बापू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांनी भरघोस निधी आणून भरपूर विकासकाम केलेलीयेत,असा स्वतः दावा केलाय . आता इतर पक्षांचा विचार केला तर या मतदारसंघात अजित दादा गटाचे दीपक साळुंखे हे सुद्धा इथून इच्छुक उमेदवार आहेत. खरं तर 2019 लाचं दीपक साळुंखे हे उभे राहणार होते. पण नंतर त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला.
ते भाजपमध्ये जातील अशीही मागे चर्चा होती. आता भाजपकडून राजश्रीताई नागणे पाटील याही इथं उभं राहणार असल्याच्या चर्चा होत्या
.पण आता ऐनवेळी जर शहाजी बापूंनीच अजून एक टर्न घेत भाजपमध्ये उडी घेतली तर मग तेच कदाचित सांगोल्यातून भाजपचा मुख्य चेहरा होतील . तसंही मला शिवसेनेपेक्षा सांगोल्यातून भाजपची मतं जास्त पडलीयेत असं ते उघडपणे म्हणाले होते. असो पण शिंदे गटातून तिकीट मिळालं तर बापूंना शिंदे गट आणि भाजप इथून ताकद पुरवेल खरा. पण त्यांच्यावर चिडलेला ठाकरे गट तसेच शेकाप मात्र बापूंच्या विरूद्ध तडफेने काम करेल. अशात शरद पवार आणि ठाकरे गट इथून बाबासाहेब देशमुख यांनाच फ्री स्पेस देऊ शकतो. पण या दरम्यान अजित दादा काय भूमिका घेतील हे महत्वाचं ठरेल.

(Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari)

सगळ्यात आधी तर ते इथून त्यांचे उमेदवार दीपक साळुंखे असावेत म्हणून पत्ते सरकवतील. सेम वे भाजपही त्यांचा उमेदवार पुढे करेल. पण शहाजी बापू यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असा चेहरा बघून भाजप इथून कदाचित शहाजी बापूंना सोबत घ्यायचा नक्कीच विचार करेल. पण प्रश्न उरतो तो म्हणजे जर शहाजी बापू हेच महायुतीचे उमेदवार झाले तर मग अजित दादा शहाजी बापूंना सपोर्ट करणार की मग पडद्यामागून सूत्रं फिरवणार? कारण शहाजी बापूंनी मागे अजित दादांवर कशी सडकून टीका केली होती हे सगळ्यांनीच पाहिलं असेल. आता त्यावेळी कदाचित दिपक साळुंखे यांना बंडखोरी करायला लावून सांगोल्यातून आतल्या मार्गे आपला उमेदवार विजयाचाही प्रयत्न अजित दादा करू शकतील पण अशामुळे इथं कदाचित शहाजी बापूंचा किंवा मग बाबासाहेब देशमुख यांचाही तोटा होऊन निवडणूक अधिक रंगतदार होईल. आणि दीपक साळुंखे पाटील हे ही रेसमध्ये येऊ शकतील. पण एकूणच आता शहाजी बापूंना सांगोला पुन्हा काबीज करणं वाटतं तेवढं सोपं राहिलं नाही. पण बाबासाहेब यांनाही आता इथून सावध पावलं टाकावी लागतील असं सध्या तरी दिसतंय. बाकी पुढं काय घडतंय ते हळूहळू बाहेर येईलच. आपण त्यावर नक्कीच लक्ष ठेवून राहू.फक्त या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय सांगोल्यात ताकद कोणाची जास्तंय, सांगोल्याचा पुढचा आमदार नक्की कोण होईल,शहाजी बापू पाटील की बाबासाहेब देशमुख ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

सांगोल्याचा पुढचा आमदार कोण | Shahaji Bapu Patil की Babasaheb Deshmukh | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar news livebabasaheb deshmukhbiography ganpatrao deshmukhbreaking newsganpatrao deshmukhganpatrao deshmukh sangolaganpatrao deshmukh songganpatrao deshmukh speechganpatrao deshmukh statussangolasangola bail bazarsangola live newssangola newsSangola vidhansabhashahaji bapu patilshahaji bapu patil dialogueshahaji bapu patil speechshahaji bapu patil speech satarashahaji bapu patil statusshahajibapu patil on sharad pawarsharad pawar on ajit pawarvishay bharivishaych bhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment