जत्रेतं बैल पळवणारा बॉलिवूडचा सगळ्यात खतरनाक व्हीलन कसा झाला | Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari


या माणसाला टीव्हीत बघितलं की एक तीव्र सनक डोक्यात जायची. मी तर थेट चॅनेलचं बदलायचो. पण माझ्या कम नशिबानं त्यो माणूस प्रत्येक सिनेमात असायचा. आन ती बी व्हीलनच्या रोलमध्ये. मग बोला. बारकी पोरं तर त्याला बघितलं की डायरेक्ट घाबरूनच जायाची. मंडळी सिनेमात निगेटिव्ह रोल करून सद्धा लोकांच्या लक्षात राहील असं काम करणं तस फार कमी अभिनेत्यांना जमलंय. पण त्यात बी एक धडाकेबाज नाव घायचं म्हंटल तर सदाशिव अमरापुरकर यांचं येत.  विशेष म्हणजे ह्यो मराठी माणुसय. कारण बऱ्याच लोकांना ह्यो व्हीलन आपल्या मराठी मातीतलायं ह्येच माहीत नाय. पण मराठी मातीतल्या या कलाकारानं हिंदी सिनेसृष्टीत आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलाय. या मराठमोळ्या खलनायकासमोर मोठ मोठे हिरो सुद्धा एकदम फिके पडायचे. कसंय मुळात दिसतानाच ह्यो माणूस कावेबाज दिसतो आन त्यात बी पण एकदा का ह्या पठ्ठ्यानं आपल्या स्टाईलनं डायलॉग घ्यायला सुरवात केली की मग एवढी भीती वाटायची की समोरच्याचा घाबरून पाक थरकाप उडायचा. त्यांचं काम आजही एवढं अंगावर येतं की लोक सिनेमा पाहून झाल्यावर सुद्धा घाबरलेले असतात. मंडळी सदाशिव अमरापूरकर यांच्या कामाची भुरळ पडली नसल असा एक पण माणूस सापडणार नाय. आजच्या Blog मध्ये आपण त्यांचाच संपूर्ण सिनेप्रवास बघणार आहोत.

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)

मंडळी सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी अहमदनगर इथल्या अमरापूर गावात झाला. त्यांचं खरं नाव गणेशकुमार नरवाडे.  पण मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतल, ज्याला आपण त्यांचं स्क्रीन नेम असं म्हणू शकतो. सदाशिवरावांचे वडील शेतकरी होते. त्यामुळ अगदी लहानपणापासूनच हा गडी शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रत बैल पळवणे अशी सगळी काम करण्यात पटाईत होता.. त्यावेळी त्यांच्याकडे जवळपास 100 शेळ्या होत्या.. त्यांना हा लहानगा सदाशिव रानात चरायला घेऊन जायचा. तस तर गुराढोरांमध्ये मातीत रमणाऱ्या सदाशिवला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.. यातूनच पुढं मग त्यांना नाटकांचा नाद लागला. पुढं त्यानंतर त्यांचं कॉलेज सुरू झालं. आयुष्याच्या या वळणावर सगळेच नाद बळावत जातात असं म्हणतात.. सदाशिव अमरापुरकर यांचं देखील अगदी असच काहीस झालं. कॉलेज म्हटलं की काही नाटक वेडी मंडळी आलीच आणि या नाटक वेढ्यांसाठी कॉलेजमधल्या एकांकिका म्हणजे तर जणू जत्राच आणि याच जत्रेत त्यांनी पेटलेली अमावास्या या एकांकितेत नायकाची भूमिका केली. हा त्यांच्या आयुष्यातला एकदम फर्स्ट एक्सपिरीयन्स होता. या भूमिकेनंतर सगळ्या कॉलेजमध्ये त्यांची हवा झाली. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि तिथूनच त्यांचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या जवळचे लोक त्यांना तात्या म्हणायचे. नाटकातलं तात्यांच काम बघायला प्रेक्षक भरपूर गर्दी करायचे. सुरुवातीच्या काळात ते अहमदनगरमध्येच थिएटर करत होते. त्यानंतर नाटकाच्या या वेडापाई त्यांनी मुंबई गाठली. एकदा त्यांनी त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलं होत की, महाविद्यालयीन दशेत मला नाटकाचं जबरदस्त वेड होतं, इतकं की आपण नाटकाशिवाय काहीच करू शकत नाही, त्यांची जाणीव पक्की व्हायला लागली होती. घरातून सुरुवातीला असणारा पाठिंबा, कौतुक नंतर मिळेनासा झाला. विरोध वाढायला लागला. वडिलांनी कोंडूनही ठेवलं. पण, बंद खोलीत तासभर विचार करून जेव्हा आपण खरच नाटकाशिवाय काहीच करू शकत नाही अस जाणवलं तेव्हा ओरडलो, ‘नाटक हा माझा श्वास आहे आणि त्याशिवाय मी जगू शकणार नाही’ आणि तिथून माझा रंगमंचावरील संघर्षाचा प्रवास सुरू झाला.

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)

त्यांनी काही स्वप्नं विकायचीत, छिन्न, ज्याचा त्याचा विठोबा, यात्रिक, लग्नाची बेडी, हॅन्ड्स अप, हवा अंधारा कवडसा अशा अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आणि लोकांची मन जिंकून घेतली.. नाटक की सिनेमा असं जर कोणी सदाशिव अमरापुरकरांना विचारलं तर ते बेधडक नाटक अस उत्तर द्यायचे. नाटक हाच त्यांचा जीव की प्राण होता. प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्म करायला त्यांना खूप आवडायच. विजय तेंडुलकरांच कन्यादान हे नाटक त्यावेळी सुरू होत. ते करत असताना तेंडुलकरांनी त्यांना सांगितल की, त्यांनी एका सिनेमाच कथानक लिहिल आहे.. त्यामध्ये एक छोटीशी भूमिका आहे, ती तुम्ही कराल का? आत्ता तेंडुलकरांनी विचारल्यावर सदाशिव अमरापुरकारांना नाही म्हणायला कारणचं नव्हतं. तो चित्रपट होता अर्धसत्य. या सिनेमाची जान म्हणजे सदाशिव अमरापुरकर यांची खलनायकी भूमिका. भूमिका छोटीशी असली तरी त्याचा प्रभाव मात्र नाद खुळा होता.  ती भूमिका इतकी लोकप्रिय झाली होती की त्यानंतर त्यांना बऱ्याच सिनेमांच्या ऑफर आला. खरं तर अपघातानेच ते सिनेविश्वात आले होते. पण बॉलिवूडला मात्र एक जबरदस्त खलनायक मिळाला होता. या सिनेमासाठी अमरापुरकरांना सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)


सुमारे 50 नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट विश्वात प्रवेश केला. त्यानंतर 22 जून 1897 या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली आणि त्यानंतरचं खऱ्या अर्थानं त्यांनी सिनेसृष्टी गाजवायला सुरुवात केली. माझ्या डोक्यात असा कोणताच विचार नव्हता, मी नाटकामध्ये हरवलो होतो. अचानक मला तेंडुलकरांनी सांगितल आणि गोविंद निहलानी यांनी मला सिनेमात घेतल, त्यामुळे मी फिल्मलाइनमध्ये आलो. मात्र माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. असं एका मुलाखतीत ते म्हणाले होते. सिनेमात जितका हिरो महत्वाचा असतो तितकाचं व्हिलन सुद्धा महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा तर व्हिलनमुळेच हिरोची किंमत वाढत असते.. व्हिलन जेवढा भयानक तेवढा हिरो जास्त फेमस होणार हे ठरलेलं असतं. सिनेमाचं हेच गणित सदाशिव अमरापूरकर यांना अगदी पक्कं ठाऊक होतं. सदाशिव अमरापूरकर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ चित्रपटातसुद्धा उत्तम भूमिका साकारली होती. यात सुद्धा त्यांनी एक खतरनाक विलन साकारला होता. सुपरस्टार धर्मेंद्र तर सदाशिव अमरापूरकर यांना स्वतःसाठी खूप लकी मानायचे.. सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात त्या दिवसांत केली जेव्हा धर्मेंद्र शिखरावर होते. धर्मेंद्र यांना त्यांची अभिनय शैली इतकी आवडली की ते त्यांचे फेवरेट खलनायक झाले होते. त्यांचं काम त्यांना एवढ आवडायचं की सदाशिव अमरापूरकर त्यांच्यासोबत २ ४ नाय तर तब्बल ११ चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते.. त्यांच्या ‘सडक’, ‘अर्धसत्य’, ‘इश्क’, ‘आखरी रास्ता’, ‘आँखे’ या सिनेमातल्या भूमिका जाम गाजल्या.. ‘सडक’मध्ये त्यांनी साकारलेली किन्नराची भूमिका आजही लक्षात लोकांच्या लक्षात आहे.. अभिनयाचा हा महाराजा सडक मधली महाराणी साकारताना सुद्धा कमी पडला नाही.. या भूमिकेची चर्चा तेंव्हा सगळीकडे झाली होती.. ‘मैं हूं इस जिस्म के बाजार का महाराजा और मेरा नाम है महारानी.’ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपलं सिनेसृष्टीवरच अधिराज्य सिद्ध केलं..

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)

त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि हरयाणवी अशा अनेक भाषिक सिनेमात काम केलयं.. खलनायकी, विनोदी, संवेदनशील, आदर्शवादी असे विविध पैलू असणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. सगळे मिळून जवळपास ३०० हुन अधिक सिनेमे त्यांनी केले. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची सुद्धा भूमिका केली होती.. ती देखील लोकांना प्रचंड आवडली होती. सिनेमा विश्वात अमरापूरकर व्हीलन म्हणून प्रसिद्ध असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते बेस्ट हिरो होते. कारण उत्तम अभिनेत्याबरोबरचं ते माणूस सुद्धा भारी होते. सामाजिक जाणीवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अनेक संस्था संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता.. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग केले होते. त्या नाटकात सुद्धा त्यांची मुख्य भूमिका होती. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जायचे. तिथे ते जमेल ती काम करायचे. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांच जिव्हाळ्याच नात होत.. समाजात चालणाऱ्या वाईट गोष्टींविषयी ते आवाज उठवायचे.. एकदा तर होळीच्या दिवसात त्यांच्या घराच्या परिसरात लोक धुळवड खेळत होते. त्यावेळी पाण्याची अमाप नासाडी सुरू होती.

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)

लोक आनंद घेत असले तरी अनेक भागात लोक प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा तरसत होती. ही नासाडी अमरापूरकरांना पहावली नाही. हे सगळं रोखण्यासाठी विनंती करायला म्हणून ते तिथल्या काही मंडळींशी बोलायला गेले. पण नशेत आणि धुंदीत असलेल्या तिथल्या काही माणसांनी त्यांना मारहाण करायला देखील कमी केलं नाही. अभिनयाचा बादशाह असलेल्या अमरापुरकरांनी समाजाच चांगलं व्हावं यासाठी लोकांचा मार खावा लागेल याची देखील पर्वा केली नाही. 2014 मध्ये त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं.. तब्येत बिघडली म्हणून त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं.. डॉक्टरांनी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं.. त्यांच्यावर उपचार सुरू केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या आजारातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली होती. ‘नाग हू मे नाग, काला नाग’ असं म्हणत त्यांनी न बसता आपलं खलनायकी विष सगळ्या इंडस्ट्रीज पसरवलं.. ‘अब हम उसके साथ खेलेंगे हैवानियत का खेल’ असं म्हणून त्यांनी खेळलेली ही अभिनयाची खेळी रसिकांच्या मनाला खूपच भावली.. ‘तालिया बजाने से काम नही होगा काम करने से काम होगा’ हे सूत्र त्यांनी डायलॉग पुरतच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा लागू केलं.. ‘पेड चाहे बबुल का हो या चंदन का कुल्हाडी सबको काटती है’ असं म्हणत त्यांनी आपल्या खलनायकी अभिनयाची कोल्हाडी सगळ्या इंडस्ट्रीवर चालवली.

(Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !


आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम हे प्रेक्षकांच्या ह्रदयात मात्र कायम घर करून आहे. बाकी तुम्हाला सदाशिव अमरापूरकर यांची कोणती भूमिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

जत्रेतं बैल पळवणारा बॉलिवूडचा सगळ्यात खतरनाक व्हीलन कसा झाला | Sadashiv Amrapurkar | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sadashiv amrapurkarsadashiv amrapurkar all moviessadashiv amrapurkar biographysadashiv amrapurkar comedysadashiv amrapurkar deathsadashiv amrapurkar dialoguessadashiv amrapurkar interviewsadashiv amrapurkar ki filmsadashiv amrapurkar ki maut kaise huisadashiv amrapurkar ki moviesadashiv amrapurkar maharanisadashiv amrapurkar mimicrysadashiv amrapurkar moviesvishay bharivishaych bharivishaychbhariविषय भारीविषयच भारीसदाशिव अमरापूरकर
Comments (0)
Add Comment