राजकारणात काहीही होवो पण या ३ बहीण भावांच्या जोड्या कधीच फुटणार नायत | Raksha Bandhan 2023 | Raksha Bandhan Status

मित्रांनो आज रक्षाबंधन. बहीण भावांच्या अतूट प्रेमाचा हा सण . त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप सार्‍या शुभेच्छा.‌ तर मित्रांनो आज रक्षाबंधननिमित्तच आपण ३ अशा बहीण भावांच्या जोड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यांच्यात अनेकवेळा राजकीय संघर्षाची वेळ आली पण त्यांच्यातलं बहीण भावाचं प्रेम कधीच आटलं नाही. उलट ते वेळेनुसार वाढतच गेलं. तर कोण कोण आहेत हे राजकारणातील ३ प्रेमळ आणि मायाळू बहीण भाऊ, चला पाहूयात…

तर नंबर एकची जोडी आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची.

तसं तर उभा महाराष्ट्र या बहीण भावांच्या मायेच्या नात्याबद्दल जाणतो. म्हणजे या दोघांत अजित दादा तसे वयाने मोठे. म्हणून तर मग दादा बोलला की ताई त्यांचं नम्रपणे ऐकून घेणार हे एकदम ठरलेलं असतं . तसे अजित दादा तापट स्वभावाचे पण सुप्रिया सुळे याबाबतीत मायाळू. पण खरंतर दरवर्षी दोघे कितीही बिझी असो ते रक्षाबंधनासाठी एकत्र येतातच. एवढंच नाही तर दिवाळीसारखा सण असला की हे आख्खं पवार कुटुंबच एकत्र येतं. यातला प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. कोण देशात कोण, परदेशातही आहे. पण पवार कुटुंबाची संस्कृती म्हणजे ते दरवर्षी सणा निमित्त का होईना एकत्र येतातच. असो . पण आता अजित दादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं अनेक जण सांगतायत. अगदी दोन्ही गटातील नेते एकमेकांविरूद्ध सडकून टीका करतायत. आता राजकारणात काहीही असो पण कुटुंबाच्या बाबतीत पवार कट्टर आणि एकसंध आहेत. आता हेच संस्कार सुप्रिया सुळेंत ही रूजलेत. म्हणून तर दादांच्या एवढ्या मोठ्या अंतर्गत बंडानंतरही
अजित दादा हा माझा मोठा भाऊ आहे म्हणत त्या़नी कायम अजित दादांविरूद्ध थेट बोलणं टाळलंय. अगदी अजित दादा यांचे चिरंजीव म्हणजेच सुप्रिया सुळे यांचे भाचे पार्थ आणि जयवरही सुप्रिया तीच माया लावतात. म्हणून तर आज राजकारणात दोन टोकाला असलै तरीही अजित दादा सुप्रिया सुळेंना हक्काने दरडावू शकतात तर सुप्रिया सुळे एवढं सगळं होऊनही अजित दादांना कधीच अंतर देत नाहीत. दोघांमधला एक किस्साही भारीय , म्हणजे असं म्हणतात की अजित दादा जेव्हा २०१९ ला पहाटेचा शपथविधी करून भाजपसोबत गेले. आणि नंतर परत आले तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळे या त्यांच्यावर नाराज होत्या. पण तेव्हा सुप्रिया सुळेंची नाराजी दूर करण्यासाठी अजित दादांनी एक छानशी कॅडबरी आणली होती म्हणे. आता काय खरं काय खोटं माहीत नाही पण या दोघा बहीण भावांचं प्रेमाचं हे bonding एकदम भन्नाट असंच आहे.

राजकारणातील बहीण भावाच्या नात्याची दुसरी कट्टर जोडी म्हणजे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे.

आता पंकजा आणि धनंजय मुंडे हे दोन टोकावरील राजकारणी. दोघांनी बर्‍याचवेळा एकमेकांविरूद्ध अतिशय टोकाची टीका केली.
अगदी आता हे दोन नेते एकमेकांचं तोंड पहाणार नाहीत असं चित्र निर्माण झालं. पण शेवटी ती ही इथून तिथून शैवटी माणसंच की हो . म्हणून तर राजकारण कितीही टोकाचं झालं तरी हे दोन नेते रक्षाबंधनला मात्र न चुकता एकत्र येतात. पंकजाताई मोठ्या प्रेमाने धनंजयना ओवाळते तर धनंजयही पंकजाला ओवाळणी म्हणून गिफ्ट देतात. या बहीण भावांच्या नात्याच्या बाॅंडची उभ्या महाराष्ट्राला मागच्याच महिन्यात कल्पना आली होती. म्हणजे जेव्हा धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा पंकजा यांनी त्यांचं मोठ्या दिलाने औक्षण केलं होतं. भगवानगड येथे ही दोघं एकत्र आली . अगदी काही ठिकाणी तर या दोघांनी विचारधारा सोडून एकमेकांची सोबत करून बीडमध्ये काही निवडणूकाही जिंकल्यात.
आता म्हणून तर जसं मुंबईत दोन ठाकरे बंधू एकत्र कधी येणार ही त्यांच्या कार्यकर्त्यांना आस लागून आहे अगदी तशीच ती बीडच्या राजकारणात पंकजा आणि धनंजय मुंडेंबद्दल असते. आता दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांची ही आतली भावना आहे. पण ते काहीही असो राजकारणात ,टोकाला घेऊन जाणार्‍या वातावरणाला रक्षाबंधनाचा हा धागा प्रेमाचं नवं बळ देत असतो हेच खरंय ..

राजकारणातील तिसरी आणि बहीण भावाच्या प्रेमाची तिसरी क्यूट जोडी म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची.

तसं गांधी कुटुंबाची असंख्य माणसं या देशासाठी कुर्बान झालेली आपल्याला माहीतेयत. त्याच गांधीच्या वारश्याला हे दोन बहीण भाऊ आज अजूनच पुढं घेऊन चाललेत. दोघंही तसे राजकारणात आहेत. पण त्यांचं राजकारणात असतानाही , राजकारणी न वाटणं हेच त्यांचं यश आहे. प्रियांका आणि राहुल दोघंही लहानपणापासून एकत्र वाढलेत. एकत्रितपणे खेळलेत ,बागडलेत, एकत्रितपणे त्यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या पचवलीय. या सगळ्या आघातात लहानपणी लोकांप्रती द्वेष निर्माण होणं साहजिक होतं पण हे दोन्हीही नेते प्रेमाचा संदेश देत देशभर फिरतायत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बर्‍याच ठिकाणी आपण या दोघांना एकत्रित बघितलंय. अगदी या वयातंही ते मजा मस्ती सोडत नाहीत. खर्‍या अर्थाने हे बहीण भाऊ राजकारणातील राजहंसांची जोडी आहे. राजकारणात कितीही वाईट वेळ आली, कोणी कितीही वैयक्तिक, कौटुंबिक टीका केली तरी ते एकमेकांना साथ द्यायचं थांबवत नाहीत. तर मित्रानो अशा आहेत या राजकारणातील बहीण भावांच्या तीन क्यूट, मजबूत आणि जबरदस्त जोड्या. या तिघांमध्ये कुणी कितीही टोक गाठू . पण कोणी बाहेरच्या दुश्मनानं आरे केलं तर दुसरा पळत येऊन त्याला कारे म्हणण्याची ताकद ठेवतो. राजकारणात राजकारण, पण प्रेमात फक्त प्रेम,माया एवढंच या सगळ्यांनी अगदी परंपरेने जपलंय. आणि हीच तर खरी आपली रक्षाबंधनाची संस्कृती आहे. ती आपणही अशीच जपूयात, वाढवूयात. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप सार्‍या शुभेच्छा.

राजकारणात काहीही होवो पण या ३ बहीण भावांच्या जोड्या कधीच फुटणार नायत | Raksha Bandhan 2023

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar news livebreaking newspankaja munde on dhananjay munderaksha bandhanraksha bandhan 2023raksha bandhan 2023 wishesraksha bandhan drawingraksha bandhan imagesraksha bandhan mehndi designraksha bandhan quotesraksha bandhan statusraksha bandhan wishesraksha bandhan wishes for brothersharad pawarsharad pawar on ajit pawarsupriya sule on ajit pawarvishay bharivishaychbhariरक्षा बंधन 2023रक्षा बंधन 2023 कब हैंरक्षा बंधन 2023 मुहूर्त टाइमरक्षा बंधन कब हैरक्षा बंधन का इतिहासरक्षा बंधन की हार्दिक शुभकामनाएंरक्षा बंधन मुहूर्तरक्षा बंधन राखी शुभ मुहूर्तरक्षा बंधन शायरीरक्षा बंधन स्टेटसविषयच भारी
Comments (0)
Add Comment