पंजाबराव डख हा माणूस खरा की खोटा | Panjabrao Dakh Live | Panjabrao Dakh Havaman Andaj Today | Vishaych Bhari

पंजाबराव डख ! तुम्ही जर पेशान शेतकरी असाल आणि तुम्ही जर हे नाव कधी ऐकलं नसेल तर 100% तुम्ही हाडाचे शेतकरीच नाही. अहो, कारण महाराष्ट्रात क्वचितच एखादा असा शेतकरी असेल ज्याला हा व्यक्ती माहिती नसेल. मंडळी हा व्यक्ती महाराष्ट्रभर त्यांचे हवामान अंदाज वर्तवण्यासाठी फेमसय. इतका की काही शेतकरी आज त्यांना देवाच रूपचं मानतायत. आता असं असल तरी पंजाबरावांनी हवामान शास्त्राच अधिकृत शिक्षण घेतलेलं नाहीये. मग तरीही त्यांचे अंदाज बरोबर कसे काय येतात. त्याचबरोबर त्यांनी ह्यावर्षी वर्तवलेला अंदाज नेमका का चुकलाय ? बऱ्याच शेतकऱ्यांकडून त्यांच्यावर आरोप का होतायत ? हवामान खात्यानं पंजाबारावांना तुम्ही अंदाज वर्तवू नका असं का सुचवलय ? पंजाबराव डख नेमके खरे की खोटे ? आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत….

तर मंडळी Punjabrao Dakh हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामनगावचे.. तस तर पंजाबराव डख यांचा जन्म हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला.. मग त्यांना हा हवामान अंदाज वर्तवण्याचा नाद कसा लागला.. तर त्याची पण एक गोष्टय.. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलंय की 1995 साली मी जेंव्हा लहान होतो.. तेंव्हा टीव्हीला बातम्या संपताना हवामान खात्याकडून हवामान अंदाज वर्तवला जायचा.. पण बऱ्यापैकी तो चुकीचा ठरायचा.. मग शेतकऱ्यांचं नुकसान व्हायच आणि ते मला बघवंल नाही म्हणून मी हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं.. सुरुवातीला त्यांनी TV वर येणाऱ्या उपग्रहाच्या चित्राचा अभ्यास करायला सुरुवात केली.. हळू हळू त्याचं नोंदी वरून त्यांनी हवामान अंदाज वर्तवायला सुरु केलं… त्यासाठी त्यांनी कॉम्प्युटरचा सिडॅक कोर्सही केला.. त्यावर ते सॅटेलाईट इमेज म्हणजेच उपग्रहाच चित्र बघायचे.. त्याच्याच आधारे त्यांनी 2001- 2002 च्या आसपास टेक्स्ट मेसेज च्या सहाय्यान हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायला सुरुवात केली.. हळू हळू व्हाट्सअँप फेसबुक आणि ट्वीटर आलं.. मग त्यावरती ही ते शेतकऱ्यांना त्यांचा अंदाज सांगू लागले.. त्यासाठी त्यांनी निसर्गातल्या काही गोष्टींच्या निरीक्षणाचीही मदत घेतली.. जसं की सूर्य मावळताना सूर्याभोवती तांबडा रंग आला की समजायचं 72 तासात पाऊस पडणारे.. tubelight भोंवती जर कीटक गोळा झाले की 72 तासात पाऊस पडणार.. पावसाळ्यात ढगांवरून जाणाऱ्या विमानाचा आवाज खाली जमिनीवर आला तर 72 तासात पाऊस पडणार.. ज्या वर्षी गावठी आंबे जास्त खाल्ले त्यावर्षी दुष्काळ पडणार.. कावळ्यान झाडाच्या टोकावर घरट बांधलं की यंदा दुष्काळ पडणार… तेच जर घरट त्यानं झाडाच्या मध्यभागी बांधलं तर जास्त पाऊस पडणार.. हे असे काही नैसर्गिक आणि पारंपरिक parameters वापरून पंजाबराव अंदाज वर्तवतात..

( Punjabrao Dakh weather | Panjabrao Dakh Havaman Andaj Today )

आज त्यांचे जवळपास 1250 व्हाट्सअँप ग्रुप आहेत.. त्याचबरोबर त्यांचं स्वतःच यु ट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजसुद्धा सुद्धा आहे ज्यावर आज लाखो शेतकरी त्यांच्याशी जोडलेले आहेत.. पंजाबराव पेशान टेम्पररी शिक्षक आहेत.. पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्यावर आरोप होतायत.. कारण काही दिवसांपूर्वी भरमसाठ राक्षसी पाऊस पडेल असा अंदाज Punjabrao Dakh यांनी व्यक्त केला होता.. पण भारतीय हवामान विभागान यंदा दुष्काळ पडणार आहे असा अंदाज वर्तवल्यानंतर डखांनी त्यासंदर्भात यंदा दुष्काळ पडणारे असा नवा व्हिडीओ प्रदर्शित केला मग त्यावरून शेतकरी सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलेच संतापले.. एप्रिलच्या सुरवातीपासून पंजाबराव डख यांनी राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भाकीत केलं होतं.. पण नंतर पंजाबराव डखांच्या या पलटीवर सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्यात..

त्यातच एक शेतकरी म्हणाले की..

एक गाजलेले हवामान अभ्यासक…त्यांचे अक्षरशः हजारेक Whatsapp ग्रुप,बरेच यु ट्यूब चॅनेल, एवढा मोठा पसारा. आणि ब्रेकिंग न्युज प्रमाणे रोजच पावसाचे अंदाज. 365 दिवसात 365 अंदाज. साहजिकच काही गोळ्या लागायच्या काही हुकायच्या. पण हुकलेल्याचा डेटा कोण ठेवतो, लागलेल्याचा ‘डंखा’ त्रिखंडात. आणि भाषा… धुवुन काढणार, आजवर बघितलं नसेल अस पाणी पडणार, वाहून जाणार, भयानक पाऊस, द्राक्षं उतरायला आलेली असतात तेव्हा हलकासा हवामान बदल देखील शेतकऱ्याचा बीपी वाढवतो.. त्यात असल्या भाषेत अंदाज ऐकून अनेकजण सलाईन वर गेले असतील… तीन वर्षात मार्केटला या अभ्यासकाने अक्षरशः झोपवलय.. अनेक शेतकऱ्यांनी विनंत्या केल्या, आर्जव केली.. तुम्ही क्लिपा ऐकल्या असतीलच, पण साहेब आपल्याच धुंदीत. योगायोगाने तीन वर्षात पावसाने थैमान मांडल्याने यांचे अंदाज बरोबर ढगात लागलेत. पण आता मात्र त्यांचा कस लागलाय आणि कधी नव्हे तो!! आमचं लक्ष आहे. पावसाने दडी मारल्यावर किती अंदाज बरोबर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…

( Punjabrao Dakh weather | Panjabrao Dakh Havaman Andaj Today )

त्याचबरोबर सोशल मिडीयावर भगवान पवार नावाचे नेटकरी म्हणाले की,

मी डख साहेबांना २०१६ पासून फाॅलो करतो. तेव्हा त्यांचे नाव गाव ही झाले नव्हते. २०१६ ते २०१८ या दुष्काळी सालातील त्यांचे बहुतांशी अंदाज चुकले. २०१९ ते २०२२ या चार वर्षांतील त्यांचे बहुतांशी अंदाज खरे ठरले. तर सारं काही सुरळीत चालू असताना नेमके २०२२ मे जुन अन् २०२३ चा मे जुनचेच त्यांचे अंदाज का चुकलेत. का हे अंदाज स्क्रीरप्टेड होते ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कारण पंजाबराव डखांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची जोरदार तयारी केली होती…

भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की,

हवामान अंदाज ही शास्त्रीय पध्दत असते, सर्वच हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवर मांडले जातात. शेतकरी आता जागरुक होत असल्याने भविष्यात अशा बोगस हवामान अंदाजकांची दुकानं बंद होतील..

नुकतीच सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख आणि नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली होती… यामध्ये परभणीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले होते.. यामध्ये डख काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतायत असा सुद्दा आरोप लगावण्यात आला आहे… आता याचसंदर्भात विषयच भारीने पंजाबराव डख यांच्याशी प्रतिक्रीयेसाठी संपर्क साधला. पण त्यांनी त्यासंदर्भात प्रतिसाद दिला नाही.. ( Punjabrao Dakh weather || Panjabrao Dakh Havaman Andaj Today )

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की,

मी काही वर्षापुर्वी एका शेतकरी कार्यक्रमासाठी परभणी या ठिकाणी गेलो होतो… शेतकऱ्यांचा एक गट एका व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आला… म्हणाले, सर हे हवामान अंदाज व्यक्त करतात… त्यांना तुमचा फक्त आर्शिवाद द्या.. मी त्यांना सांगितले, हवामान अंदाज व्यक्त करण हा येड्यागबाड्याळाचा खेळ नाही.. आकडेवारी आणि शास्त्रीय माहीतीसोबत तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी अभ्यास लागतो.. तुम्ही हे करु नका असं मी त्यांना सांगितलं. परंतू पुढील काही वर्षात हेच गृहस्थ पंजाबराव डख म्हणुन पुढे आले, आता ते अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनलेत. हवामान अंदाज ही शास्त्रीय क्लिष्ठ प्रक्रीया आहे, असो हे असे बुडबुडे येत राहतील आणि मिटतीलही असं डॉ. साबळे म्हणाले.

( Punjabrao Dakh weather | | Panjabrao Dakh Havaman Andaj Today )

त्यामुळे आता हवामान खात आणि Punjabrao Dakh या दोघांच्या गदारोळात भरडला जातोय तो फक्त आपला सामान्य शेतकरीच हे नक्की..
बाकी नैसर्गिक घटनांच्या आधारे काही आडाखे बांधणे या भारतीय पारंपरिक ज्ञानाला कोणी नाकारत नाही. पण हवामानाचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसताना देखील स्वतःनेच तयार केलेल्या काही निरीक्षणाच्या आधारे असा रोखठोक हवामान अंदाज वर्तवन कितपत योग्यय हा गंभीर सवाल आहे. शिवाय जर एखादी व्यक्ती असेल कि संस्था असेल ती जर काही भांडवलवादी कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असेल आणि त्यात आपला सामान्य माणूस भरडला जात असेल तर आवाज उठवणं आपलं कामंय.. पण आता तरीसुद्धा काही शेतकर्यांना पंजाबराव डख यांचे अंदाज बिनतोड वाटतायत. तर काही शेतकऱ्यांना मात्र या अंदाजात बर्याच त्रुटी आढळून येतायत. डख साहेबांचे वीमा कंपन्यांशी लागेबांधे दिसून येतायत.असो पण तुमचं मत नेमकं काय आहे? पंजाबराव डख हवामान तज्ञ म्हणून खरे की खोटे आहेत ? त्यांच्या हवामान अंदाजा बद्दल तुमची मतं आणि तूमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा..

पंजाबराव डख हा माणूस खरा की खोटा | Panjab Dakh Live | Panjabrao Dakh Havaman Andaj | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newspanjabrao dakhpanjabrao dakh farmerspanjabrao dakh farmingpanjabrao dakh latest predictionpanjabrao dakh livepanjabrao dakh majha kattapanjabrao dakh monsoon 2023panjabrao dakh monsoon predictionpanjabrao dakh on abp majha kattapanjabrao dakh patil weather todaypanjabrao dakh predictionpanjabrao dakh rain predictionpunjab dakhpunjab dakh havaman andajpunjab dakh havaman andaj livepunjab dakh havaman andaj todaypunjabrao dakh on monsoonvishaych bharivishaychbhariपंजाब डखपंजाब डख पाटीलपंजाब डख लाईव्हपंजाब डख हवामानपंजाब डख हवामान अंदाजपंजाब डख हवामान अंदाज liveपंजाब डख हवामान अंदाज live todayपंजाब डख हवामान अंदाज todayपंजाब डख हवामान अंदाज आजचापंजाब डख हवामान अभ्यासकपंजाबराव डकपंजाबराव डक अंदाजपंजाबराव डखपंजाबराव डख आजचा हवामान अंदाजपंजाबराव डख लाईव्हपंजाबराव डख हवामान अंदाजपंजाबराव डख हवामान अंदाज liveपंजाबराव डख हवामान अंदाज todayपंजाबराव डख हवामान अंदाज today liveविषयच भारीहवामान अंदाज पंजाब डख
Comments (0)
Add Comment